भिडे गुरुजींना झालंय काय ?
भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो .
अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले .
कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?
पडद्या मागच्या दुहेरी खेळीतमीही थोडेसे स्पष्टीकरण देणारच होतो. भिडे गुरुजींच्या भाषाणाचे जमतील तितके विडीयो शोधुन पाहिले , युट्युबवरही जितके मिळाले ते नीट पाहीले, बहुतांश सारेच व्हिडीओ अर्धवट आहेत . एकही संपुर्ण व्हिडीओ मला तरी अजुन सापडलेला नाही. भिडे गुरुजींच्या अनुयायांपैकी " चौगुले" नावाच्या एका व्यक्तींने देखील गुरुजींचे व्हिडीयो अर्धवट दाखवुन आणि सिलेक्टीव्ह अर्थ काढुन अपप्रचार केला जात आहे असे विधान केले आहे ! तस्मात मी माझ्या वरील प्रतिसादाबाबत जरा माघारच घेत आहे . जोवर संपुर्ण व्हिडीओ पहायला मिळत नाही तोवर काहीही कॉमेन्ट करणे योग्य नाही ! कादाचित हा देखील "जळगाव जोशी कांडा"सारखा फुसका बार निघु शकतो ! पण बाकी ते ३२ मणाचे सिंहासन हा प्रचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि तो बाळबोध पणाअच आहे ह्या मतावर मात्र ठाम आहे ! एवढी जर प्रसिध्दी आहे तर ३२ मण सिंहासन करण्यापेक्षा ३२ मिलियन हिंदुंना रोजगाराच्या संधी उपलब्ध्द करुन द्या , हिंदुत्वाचं प्रदर्शन एका रायगडावर का ? ३२ जिल्ह्यात रायगड तयार करुन दाखवा - आमचे सनातनी हिंदुत्व सांगते !गुरुजी चें लटके समर्थनआर यु किडिंग मी ???? मी कुठेच गुरुजींचे समर्थन केलेले नाहीये आणि कसलेही प्रमाणापत्र दिलेले नाहीये , उलट ते बाळबोध , इम्प्रॅक्टिकल बोलतात्त , त्यांचे हिंदुत्व ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ आहे अशी खिल्लीच उडवली आहे त्यांच्या विचारसरणीची. मात्र जेव्हा त्यांच्या व्हिडीओतले मुद्दे अर्धवट उचलुन वापरल्याचे दिसले तेव्हा " संपुर्ण व्हिडीयो पाहिल्या शिवाय काहीही मत बनवणे चुक आहे" असा मी सावध पवित्रा घेतला आहे ! कारण स्वयंघोषित पुरोगाम्यांसारखे तोंडावर पडाणे चांगले नव्हे ! संपुर्ण व्हिडीयो पाहुन बोलुयात .