पाकीस्तानी निवडणूका आणि अस्थिरता पुढेही कायम रहाण्याची चिन्हे
पाकीस्तानी लोकशाही अद्याप लष्करी प्रभावातून बाहेर येण्यास बराच अवकाश असावा. पण कमीतकमी मागच्या निवडणूका नंतर प्रत्यक्ष लष्करी हस्तक्षेप न होता पाकीस्तान पिपल्स पार्टी चे सरकार जाऊन मुस्लिम लीग नवाज शरीफ सरकारच्या हाती सत्ता सुपूर्द होऊन पाच वर्षे सरकार चालले हिच पाकीस्तानसाठी मोठी गोष्ट असावी.
पाच वर्षांनतंर पुन्हा एकदा येत्या २५ जुलैला पाकीस्तानात निवडणूका होऊ घातलेल्या दिसतात. ओपीनीयन पोल्सच्या एक दोन बातम्या आल्या आहेत. त्यानुसार पाकीस्तानी पंजाबात मुस्लिम लीग नवाझ शरीफ यांचा प्रभाव अद्याप कायम असावा, पाकिस्तानची त्यातल्या त्यात सेक्युलर पार्टी पाकीस्तान पिपल्स पार्टीची मात्र पडझड होऊन ईम्रान खानची PTI पार्टी पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्षाची जागा घेईल असे दिसते. ईम्रान खान हे नाव क्रिकेट मुळे भारतीयांना माहित असले तरी ईम्रान खानने आता पर्यंत घेतलेल्या भूमिका सर्वसाधारणपणे कट्टरतावादावर पांघरूण घालणार्या घेतल्या असाव्यात . त्यात ओपिनीयन पोल्स नुसार मुस्लिम लिग- नवाज शरीफ मोठा पक्ष राहीला तरी पूर्ण बहुमताची शक्यता कमी असून त्रिशंकू स्थिती संभवण्याची शक्यता असावी. म्हणजे परिणामी सत्तेत कोणतेही सरकार आले तरी छोट्या ते मोठ्या कट्टरतावादी पक्षा सोबत संसार करण्याची वेळ येऊ शकते.
अर्थात गेल्या पाच वर्षातील पाकीस्तान मधील बातम्या पाहील्या तर कट्टरतावाद कमी होण्या एवजी वाढण्याकडे कल राहीला असावा. पाकीस्तान पिपल्स पार्टी , मुस्लीम लीग आणि ईम्रान खानची पार्टी मिळून राजकारणाला स्टॅबिलीटी देतील आणि अधिक कडव्या कट्टरांवर अवलंबून असणार नाहीत तो पर्यंत अणवस्त्रे अतिरेक्यांच्या प्रत्यक्ष हातात पडण्याची शक्यता कमी राहील. पण त्रिशंकू स्थिती झालीतर कडवेपणा वाढून त्याचा अफगाणीस्तान विषयक भूमिकात असहकार्याची भूमिका वाढून अफाअणिस्तान - ट्रंप समोरचे आवाहन वाढते, आणि भारतासाठी आहे नित्याच्या कटकटींना तोंड देण्याची पुढची मानसिक तयारी करावी लागणार असे वाटते.
* पाकीस्तानी ओपिनीयन पोल संदर्भ १
* पाकीस्तानी ओपिनीयन पोल संदर्भ २
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है, बरसता है जो आँखों से वो सावन याद करता है... :- Arzoo [ 1965 ]