Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा पदार्थ विज्ञान ब्लॉग : मुलांनी Physics मध्ये निदान पास तरी व्हावे यासाठीचा प्रयत्न!!!

अ
अनिकेत कवठेकर
गुरुवार, 07/26/2018 - 10:30
🗣 12 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, सर्व प्रथम माझ्या ब्लॉग ला तुम्ही देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. मराठी ही ज्ञानभाषा आहे हे तुम्ही तुमच्या प्रतिसादामधून सिद्ध केलंत .. आज एका महत्वाच्या विषयासंबंधी आपल्याशी बोलणार आहे, तो विषय आहे भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान किंवा Physics. न्यूटनची काही सूत्रे व काही formule याच्या पलिकडे या विषयात काही आहे असं फार कोणाला वाटत नाही. त्याला कारण म्हणजे ज्या पद्धतीने याविषया वरील पुस्तके लिहिली जातात आणि त्यातही गणिते सोडवून मार्क मिळवण्यावर भर दिला जातो त्यामुळे या विषयात काही मनोरंजक, मजेदार असू शकेल असं निदान त्या वयातल्या विद्यार्थ्यांना वाटत नाही.. पण या विषयाची गोम म्हणजे तुम्हाला Science ला जायचं असेल तर या विषयाशी सख्य करावंच लागतं..केवळ Physics आवडलं नाही म्हणून Science career सोडलेले खूप आहेत..शिवाय गोगलगाईच्या पोटात पाय असं म्हणतात तसं या Physics विषयाच्या पोटात Maths दडलेलं असतं..एकंदरच अवघड मामला..याचाच चुलत भाऊ Engineering Mechanics हा असून तो भल्याभल्यांना रडवतो..मुलांची वर्ष राहतात..मुलांना नैराश्य येतं.. या सर्व पार्श्वभूमीवर या विषयावर आधारीत गोष्टी मराठीत लिहाव्यात आणि मुलांचा ताण थोडा हलका करावा यासाठी मी एक ब्लॉग सुरु केला..यात विक्रम वेताळाच्या गोष्टींच्या रूपात या संकल्पना मांडत आहे..त्यात भर म्हणजे भारतातील पदार्थ विज्ञानाचे ४-५व्या शतकातील पुस्तक मिळाले..त्याचाही योग्य तेवढा संदर्भ देऊन गोष्टी लिहिल्या, लिहितोय..उद्देश एवढाच की मुलांनी निदान पास होण्यासाठी तरी अभ्यास करावा व नैराश्यातून सुटावं..त्याच साठी सारा खटाटोप.. --तुम्ही अशा विद्यार्थ्यांचे पालक असाल तर या ब्लॉग चा संदर्भ म्हणून वापर करून मुलांना संकल्पना समजवू शकता.. --स्वत: शिक्षक असाल तर शिकवण्यात थोडी मजा आणू शकता.. --विद्यार्थी असाल तर ताण थोडा हलका करू शकता.. --या विषयात नापास झालेल्या, हा विषय जड जाणाऱ्या, हा विषय अजिबात न आवडणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना हा ब्लॉग वाचायला सांगून थोडी मदत करु शकता.. काही सुधारणा सुचवायच्या असल्यास सुचवू शकता..जरूर विचार केला जाईल ..ब्लॉग लिंक खाली देत आहे..प्रतिक्रीया कळवा..वाचायचे पैसे पडत नाहीत!!! विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात हे फक्त Physics बद्दल झालं पण इतरही विषयांवर मराठीत लिखाण व्हायला हवं.. विषय अगणित आहेत .. वाचकही अगणित आहेत.. तुमच्या आवडीच्या विषयावर लिहा.. मला जसं मिपा वरच्या मंडळींनी समजून घेतलं तसं तुम्हालाही समजून घेतील.. प्रसंगी दुरुस्त्या सुचवतील .. पण यातून कोणालातरी शिकण्यात मदतच होईल .. त्यामुळे मागे हटू नका.. कळावे लोभ असाच कायम राहावा ही विनंती .. अनिकेत कवठेकर
वर्गीकरण
physics
Education
school

प्रतिक्रिया द्या
4093 वाचन

💬 प्रतिसाद (12)
क
कंजूस गुरुवार, 07/26/2018 - 13:01 नवीन
विज्ञान, गणित, या विषयंची समजच मुलांना आणि पालकांना कमीच असते. पण तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 17:33 नवीन
कंजूस साहेब, ज्या पद्धतीने ह्या विषयावर लिहिलेले आहे त्यामुळे हा घोळ आहे. इतिहास सुद्धा जर सन-सनावळयापुरताच राहिला असता तर कोणी लक्ष घातलं नसतं. तसं जर पदार्थविज्ञानाबद्दल लिहिलं तर थोडी मजा येइल. त्यातून या विषयातील आवडही वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
द
दुर्गविहारी Fri, 07/27/2018 - 16:26 नवीन
अतिशय उत्तम संकल्पना. याची अत्यंत गरज आहे. फक्त विषय सोपा करण्यासाठी ब्लॉगमधे काही व्हिडीओ टाकता येतात का फा. कुठलीही गोष्ट व्हिजुअलाईज करता आली तर ती अत्यंत सोपी होते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 17:37 नवीन
आधी लिखाणातून ही अपिल वाढवायचा प्रयत्न करेन..विडिओ वगैरेचे स्किल माझ्याकडे नाही..सूचना चांगलीच आहे..नवीन शिकावे लागेल..जरूर प्रयत्न करु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
श
शेखरमोघे Sat, 07/28/2018 - 02:53 नवीन
अतिशय गरज असलेला हा विषय आहे. पण हाच काय इतर कुठलाही विषय समजण्यापेक्षा त्यात साचेबद्ध उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील हाच जर सगळ्यान्चा प्रयत्न असेल तर विषय सोपा करण्यासाठी काहीही करून दिले तरी त्यात कुणीच डोके घालणार नाही. उत्तम resource material!
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 17:44 नवीन
पण गोष्टीरूपात लिहून थोडी मजा आणली तर नक्कीच थोडे प्रयोग करण्याची ईच्छा निर्माण होऊ शकते, शिवाय मराठीतून विषयाचा गाभा जास्त परिणाम कारकपणे पोहोचतो ही मातृभाषेची ताकद आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे
B
balasaheb Sat, 07/28/2018 - 06:34 नवीन
खुप मस्त
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 17:38 नवीन
प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: balasaheb
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/28/2018 - 18:25 नवीन
स्पृहणिय उपक्रम ! त्याला उत्तम यशासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 20:40 नवीन
धन्यवाद..कळावे लोभ असावा ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सतिश गावडे Sat, 07/28/2018 - 18:51 नवीन
ते डेरीव्हेटीव्ज आणि इंटीग्रेशन कधी आणि कशासाठी वापरतात तेही लिहा ना कधीतरी. बरीच वर्ष झाली त्याचा "अभ्यास" करुन. मात्र ते नेमकं कधी आणि कुठे वापरत असतील हा प्रश्न मनाला नेहमी सतावत असतो ;) नशिब, दैव हे व्हेक्टर अल्जिब्रामधल्या रिझल्टंट व्हेकटरसारखे आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात अनेक बरेवाईट घटक असतात जे आपल्या आयुष्यावर, आपल्या ध्येयांवर, स्वप्नांवर परीणाम करत असतात. काही चांगला परीणाम करतात तर काही वाईट. काही आपल्या स्वप्नांना पुरक असतात तर काही आपल्या स्वप्नांच्या गळ्याला नख लावतात. हे सारे घटक म्हणजेच व्हेक्टर्स. त्यांची परीणाम करण्याची क्षमता म्हणजे त्यांची "मॅग्निट्युड" आणि ते घटक आपल्या स्वप्नांना पुरक आहेत की मारक यावरुन ठरते त्यांची डायरेक्शन. यातले दोन महत्वाचे व्हेक्टर म्हणजे आपली ईच्छाशक्ती आणि आपले प्रयत्न. या सगळ्यांचा जो काही एकत्रित प्रभाव असतो तो असतो रिझल्टंट व्हेक्टर. ज्याला आपण रोजच्या भाषेत नशीब किंवा दैव म्हणतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत कवठेकर Sat, 07/28/2018 - 20:38 नवीन
पण तुमच्या प्रतिसादातच्या पहिल्या परिच्छेदातली डेरिवेटिव, इंटिग्रेशन, n-series या गोष्टींवर कथा आहेत ब्लॉग मध्ये.. विखंडन पद्धत: बदल मोजण्याची गुरुकिल्ली (Differentiation or derivatives: A tool to measure the rate of change) क्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्यामालिका : अंदाजातील अचूकतेकडे मारलेली हनुमानउडी (Integration and number series : Quantum leap towards exactness in approximations) विकलांची गोळाबेरीज: हे n व त्यांची पिल्लावळ कुठून पैदा झाली? (Importance of ‘n’ in integration)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा