Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाळी लाल कुंकु

अ — अविनाशकुलकर्णी, गुरुवार, 08/02/2018 - 09:07
भाळी लाल कुंकु गळ्यात काळे मणी अस्तित्व तुझे जाणवे साजणे क्षणोक्षणी * अंगणी रोज शेणसडा रेखते नाजुक रांगोळी जोडव्याचा तो पदान्यास भासे तू नाजुक कळी * सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळते माझे जीवन अकुकाका

प्रतिक्रिया द्या
3175 वाचन

💬 प्रतिसाद (9)
च
चांदणे संदीप गुरुवार, 08/02/2018 - 09:18 नवीन
छान आहे. :) Sandy
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/02/2018 - 10:17 नवीन
उजळते माझे जीवन अकुकाका हे वाचलं आणि जरासा दचकलोच ! :) छान आहे काव्य.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 08/02/2018 - 10:49 नवीन
अकुकाकांनी प्रथमच काही वाचण्यासारखे लिहीलं आहे. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 08/04/2018 - 07:28 नवीन
पण सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद भिनला अन्नपुर्णा भासे मजला यात इतर िकाणी आहे तसे यमक जुळलेले नाही त्यामुळे थोडी खटकली
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 08/04/2018 - 12:00 नवीन
शिवाय, कोनाड्यातल्या हिंदमातेपेक्षा बराच आहे. ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
अ
अभ्या.. Sat, 08/04/2018 - 12:09 नवीन
सकाळची तुझी लगबग चुलीस करी चूल पोतेरे कंकणाचा नाद मजला कशी अंगाई वाटे रे *. तुळशी समोर तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं सहाणेला लाभे गंध .. आता जुळलं का यमक? येनीवे ह्याच्या पेर्णेने "आमचा लाल कंपू" पाडावे काय?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/09/2018 - 02:43 नवीन
आळीपाळीने कुंथु! असं पण पाडता यील! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Sat, 08/04/2018 - 15:14 नवीन
खरं तर खेड्यात हे अस्तित्वात आहे का ते माहीत नाही खुलासेच्छुक नाखु
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/09/2018 - 05:26 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा