Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेफाली वैद्य आणि इतर लोकांशी संवाद साधण्याची संधी

स
साहना
Sat, 08/04/2018 - 21:27
🗣 37 प्रतिसाद
सिलिकॉन व्हेली मध्ये खालील मंडळी येत आहे. ह्यांचे व्याख्यान आहे आणि त्यानतंर त्यांच्याशी संवाद साधनांची संधी किंवा डिनर घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध असणार आहे. ११ ऑगस्ट (शनिवार) - श्री राजीव श्रीनिवासन ह्यांचे व्याख्यान "How India was an Empire of Intellect and not just of Spirit" आहे. (आयोजक इंडिक बुक क्लब ) २५ ऑगस्ट (शनिवार) - सौ शेफाली वैद्य यांचे वाख्यान आहे. अजून विषय ठरलेला नाही. (आयोजक हिंदू महासभा ) ३ सप्टेंबर लेबर डे सुट्टी - डॉक्टर कोएनराड एलस्ट ह्यांची दोन अभ्यासपूर्ण व्याख्याने आहेत (आयोजक Bookstruck.in ) - आर्यन होमलेन्ड डिबेट मधील अद्यतन शोध आणि मते (३ तास) - मोदी सरकारची ४ वर्षातील कामगिरी (३ तास) सर्व व्याख्याने विनामूल्य असून मिपा वरील सदस्यांनी लाभ घ्यावा. सर्व व्याख्याने फेसबुक लाईव्ह वर सुद्धा पाहता येतील. माहिती साठी संपर्क : +१ (669) 223-1204

प्रतिक्रिया द्या
11421 वाचन

💬 प्रतिसाद (37)
ट
ट्रम्प Mon, 08/06/2018 - 16:26 नवीन
म्हणजे सगळे वक्ते मिशन 2019 चे वातावरण तयार करायला येत आहेत तर !!!! येऊ द्या !!! येऊ द्या !!!! ती माटी माणुश रोशगुल्ला बांगलन बाई नाही परवडणार .
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 08/07/2018 - 07:35 नवीन
ऑनलाईन ट्रोलना भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली आहे . लौकरच पद्म पुरस्कार मिळतील. पुढे राज्यपाल वगैरे ! शिव्या देउन पोट भरायचा धंदा जोरात आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 07:48 नवीन
कारण माझ्या भावना इतक्या टोकदार नसल्या तरी शेफाली वैद्यबाईंना फॉलो करण्याइतके मटेरियल त्यांच्या लेखनात, ट्विट्स मध्ये किंवा ऑप इंडिया पोस्ट्स मधेही नसते. बहुतेक सगळं काही व्हॉटअबाऊटरी आधारित कंटेंट ऐकायला कार्यक्रमात कोणी जावं, त्यापेक्षा त्यांना ट्विटरवरच वाचलेलं परवडण्यासारखे आहे, सतत ट्विट करत राहणे ही तशीही त्यांची खासियत आहेच. टीप - त्यांच्या एकंदरीत लेखनात एकच गोष्ट खूप भारी असते, ती म्हणजे त्यांचा 'साड्यांचा अभ्यास' टेक्सटाईल हिस्टरी मध्ये खरंच त्यांचं ज्ञान आदरणीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पुंबा Tue, 08/07/2018 - 14:48 नवीन
ललितदेखिल छान लिहितात त्या. पुर्वी फॉलो करत असे मात्र राजकिय पोस्टमध्ये जे भयानक अज्ञान, गलिच्छ भाषा, व्हाटाबाऊटरी असते तिचा वीट येऊन ब्लॉक केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
A
arunjoshi123 Wed, 08/08/2018 - 07:49 नवीन
राजकिय पोस्टमध्ये जे भयानक अज्ञान, गलिच्छ भाषा, व्हाटाबाऊटरी असते तिचा वीट येऊन ब्लॉक केले.
उदा. देता येईल का? मंजे बाकी लोकही पाहत असतात तिच्या ट्वीट्स. तेव्हा अपप्रचार करण्याअगोदर उदाहरण द्याल तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Wed, 08/08/2018 - 08:53 नवीन
ट्विटरबद्दल मी सांगू शकत नाही पण फेबुवर मी त्यांना २ वर्षांपुर्वीपर्यंत फॉलो करत असे. आपटार्ड, लिबटार्ड अशी विरोधकांना लेबलं देणे, नेहरू-गांधींबद्दल अफवा, तद्दन खोटी माहिती, नीट भाषेत वाद घालणार्‍यांशीदेखिल अतिशय अपमानजनक भाषेत बोलणे हे अनुभवून झाले आहे. ललित इतकं सुंदर लिहिणारी ही बाई राजकारणाबद्दल लिहिताना एवढी ताळतंत्र का सोडते असा प्रश्न तेव्हा पडायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Wed, 08/08/2018 - 11:05 नवीन
नक्की कोणत्या संदर्भात कुणाला काय म्हटले याचं उदाहरण मिळेल का? ================ मला प्रत्यक्ष त्यांचा संदर्भ हवा आहे. ========== शिवाय इथे त्यांच्यावर ज्या प्रकारचे प्रतिसाद आलेत त्यापेक्षा फार भयंकर नेटवर येतात. तेव्हा त्यांनी एकतर्फी अत्यंत साधुव्रुत्तीनं लिहावं कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Wed, 08/08/2018 - 11:50 नवीन
शिवाय इथे त्यांच्यावर ज्या प्रकारचे प्रतिसाद आलेत त्यापेक्षा फार भयंकर नेटवर येतात.
हो. त्याचीदेखिल कल्पना आहे. त्याचा निषेधही मी वेळोवेळी केला होता. मला त्यांचे लिखाण अतिरेकी/बव्हंशी ट्रोलिंगला समांतर वाटले. शिवाय राजकिय विश्लेषक म्हणुन टिव्हीवर जाताना भाजपची तळी उचलण्याची पराकाष्ठा त्या करायच्या ते डोक्यात जाणारे होते. त्याकारणे मी माझ्या हातात होते ते केले. बाईंना ब्लॉक मारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/07/2018 - 07:49 नवीन
असुद्या, तुम्हाला तुमच्या आवडत्या पक्षातर्फे ती संधी मिळत नाही, म्हणून तुमचा त्रागा समजू शकतो ! -- असो, नशीब असते एकएकाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 08:29 नवीन
कपिलमुनीवर वैयक्तिक झालाय म्हणून विचारतोय, तुम्ही शेफाली वैद्यताईंचा डु आयडी आहात काय? =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/07/2018 - 08:39 नवीन
होय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
प
प्रसाद_१९८२ Tue, 08/07/2018 - 08:41 नवीन
वैयक्तिक वगैरे काही नाही, मी सहज थोडी गम्मत केली. :)) --- कपिलमुनी यांनी ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
क
कपिलमुनी Tue, 08/07/2018 - 09:00 नवीन
मिपावर चर्चा बॅन झाल्या नाहीतर बर्‍याच आयडी मध्ये पोटेंशियल होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 09:04 नवीन
चर्चा बॅन नाहीत, तर तुणतुणे खाजवत बसणे बॅन झाले आहे. मग!? करायची का आपण चर्चा कपिलमुनी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 09:01 नवीन
स्वभाव आवडला बरंका प्रसाद भाऊ! उगा अंगाला लावून घेणे नाही अन मस्करीची कुस्करी नाही, जियो ! (और लगे रहो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ज
जेम्स वांड Tue, 08/07/2018 - 08:59 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
श
शाम भागवत Tue, 08/07/2018 - 09:22 नवीन
राज्यसभेचे सभासदत्व राहिले की हो. :) कृ.ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
S
sagarpdy Tue, 08/07/2018 - 13:42 नवीन
मटार उसळ, शिकरण पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
अ
अभ्या.. Tue, 08/07/2018 - 14:39 नवीन
हा मटार उसळ शिकरण काय प्रकार असतो? कुठे मिळते हे कॉम्बीनेशन? कुणी सांगेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
र
राघवेंद्र Tue, 08/07/2018 - 14:52 नवीन
अभ्या पुण्यात येऊन इतके दिवस झाले. एकानेही तुला घरी जेवायला नाही बोलावले असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 08/07/2018 - 14:58 नवीन
नाही ना रे राघवा. :( लैच वाळीत टाकल्यावानी केलंय बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
श
शाम भागवत Wed, 08/08/2018 - 16:19 नवीन
काहीही. पुलंची पुस्तके तुम्ही वाचलेली नाहीत, अशी माझ्या मनाची समजूत घालणे मला बिलकूल झेपत नाहीये. तस्मात माझा पास. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
ट्रम्प Tue, 08/07/2018 - 16:11 नवीन
आखाडा चे दोन तीन दिवस बाकी राहिलेत आणि तुम्ही मटार उसळ शिकरण बद्दल चर्चा करताय ? बहोत नाइंसाफी है .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शाम भागवत Tue, 08/07/2018 - 15:40 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ड
डँबिस००७ Tue, 08/07/2018 - 17:46 नवीन
शिव्या देउन पोट भरायचा धंदा जोरात आहे. अख्खा विरोधी पक्ष आज ही हेच करत आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 08/07/2018 - 19:26 नवीन
आताचे पूर्वीचे सगळेच विरोधी पक्ष हेच करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ Tue, 08/07/2018 - 20:37 नवीन
शिव्या देउन पोट भरायचा धंदा हल्ली जोरात आहे. अस ध्वनित होत होत म्हणुन म्हंटल की आताच विरोधी पक्ष हेच करत आहेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Wed, 08/08/2018 - 07:53 नवीन
आम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री नको हा राजकीय विरोध नाही, हा आजकालचा शिव्यांचा धंदा आहे. फरक आहे रे कपिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Wed, 08/08/2018 - 07:45 नवीन
ऑनलाईन ट्रोलना भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली आहे .
तुम्हाला कोणीओओओओणी पुसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
A
arunjoshi123 Wed, 08/08/2018 - 07:47 नवीन
लौकरच पद्म पुरस्कार मिळतील. पुढे राज्यपाल वगैरे ! शिव्या देउन पोट भरायचा धंदा जोरात आहे.
अरे कपिल, ७० वर्षे चाललेलं हे धंद्याचं मॉडेल बंद पडलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
शब्दबम्बाळ Wed, 08/08/2018 - 06:29 नवीन
LOL शेफाली वैद्य! यांना म्हणे बड्डे ला पंप्र यांनी टिवटिववर फॉललॉव करून गिफ्ट दिल होत! असेही अनेक ट्रोल्स फोल्लो करतातच ते, त्यात अजून एक भर! बाकी, परदेशातून फंड गोळा करायची तयारी सुरु झाली वाटत!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 08/08/2018 - 08:53 नवीन
या शेफारलेल्या वौद्यने अमृता फडणवीस यांना सुद्धा ट्रोल केले होते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/08/2018 - 10:35 नवीन
उच्च विचार प्रदर्शित करणारे आयडी अचानक कंपूगीरी सुरू करतात पाहून आश्चर्य वाटले
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/08/2018 - 16:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
श
शाम भागवत Wed, 08/08/2018 - 10:47 नवीन
अजो परतले वाटते. गुरूजी कधी येणार? मंगूशेटची अनुपस्थिती पण जाणवतेय. त्यांनापण आणा रे कुणीतरी. हे सगळे आले की खूप काय काय कळत असत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 08/08/2018 - 10:52 नवीन
ते एस काका पण कुठे गायब झालेत कायकी, व्यायामाचे डोक्यात घेतलेय की वेटलॉसचे काही कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मार्मिक गोडसे Fri, 08/10/2018 - 06:51 नवीन
शेफाली वैद्य सारख्या लोकांचा बुरखा फाडणारा लेख.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा