Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निघताना....

श — शिव कन्या, गुरुवार, 08/23/2018 - 13:32
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

प्रतिक्रिया द्या
7492 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्राची अश्विनी Fri, 08/24/2018 - 03:30 नवीन
आहा! हळवी, तरल!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 08/24/2018 - 08:23 नवीन
साॅलिड झालीये
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 08/24/2018 - 08:51 नवीन
तरल कविता आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण हे खासच
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 08/26/2018 - 12:21 नवीन
आह्ह्ह्हा, अप्रतिम
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/26/2018 - 13:45 नवीन
सुर्रेख! फार देखणी.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 08/26/2018 - 14:35 नवीन
सुंदर गहन र्‍हदयस्पर्शी कविता. Image removed.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 08/30/2018 - 07:00 नवीन
प्रतिसाद देण्यासाठी खास लॉग ईन व्हावे असे काहीतरी! आवडले! :-)
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 08/30/2018 - 13:55 नवीन
भारीच आहे
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 09/02/2018 - 18:00 नवीन
सर्व रसिक वाचकांचे मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 09/05/2018 - 16:09 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा