शितपीत्त - अॅलोपॅथी कि होमिऑपॅथी?
काही ठराविक पदार्थ खाण्यात आला की अंगावर चट्टे-गांध्या उठतात, खाज सुटते सर्वसाधारण ही शितपीत्तची लक्षणं आहेत. Urticatia, Hives हे याच प्रकारात मोडणारे. कित्येक वेळा असंपण होतं की कोणत्या पदार्थामुळ हा त्रास होतोय हे ओळखणं अवघड होउन जातं. कारण खुप वेळा तो पदार्थ खाल्ला किंवा नाही खाल्ला तरी अंगावर चट्टे-गांध्या उठ्ण्याचा त्रास होतो. अॅलोपॅथीने लगेच फरक पडतो पण तात्पुरता, संपुर्ण जात नाही. अॅलोपॅथी मधलं cetirizine हे औषध हे काम करतं.
काही लोकांच मत आहे कि होमिऑपॅथी शितपीत्त, Urticatia, Hives साठी उत्तम आहे. मुळासकट त्रास जातो पण होमिऑपॅथीसाठी गुण यायला वेळ लागतो. एक भाग असा आहे की हा त्रास जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला लगेच प्रभावी औषध अपेक्षित असतं जे अॅलोपॅथी मध्ये आहे. त्यामुळं अॅलोपॅथी की होमिऑपॅथी हा गोंधळ उडालेला दिसतो. मिपावर कोणी याबाबत जाणकार असेल तर यावर प्रकाश टाकावा.
💬 प्रतिसाद
(8)
उ
उगा काहितरीच
Wed, 09/05/2018 - 16:20
नवीन
नेमका हाच प्रॉब्लेम आहे मला. cetirizine असलेली गोळी दर काही दिवसांनी घ्यावी लागते. त्यामुळे जाणकार लोकांच्या प्रतिक्षेत. रच्याकने मधे यासाठी आयुर्वेदीक उपचार घेतले होते काही महिने गोळी घेण्याची आवश्यकता वाटली नाही. पण नंतर पहिले पाढे पंचावन ! हिवाळ्यात हा त्रास जास्त होतो.
- Log in or register to post comments
व
विदेशी वचाळ
Fri, 09/07/2018 - 07:24
नवीन
"शीतपित्त" काय म्हणताय त्याला ? आमच्या मराठी मध्ये "ऍलर्जी" असे म्हणतात. आणि मी जेवढा अभ्यास केला आहे त्यावरून तरी ऍलर्जी ला ठोस उपाय नाही आहे. आमच्या देशात (म्हणजे "उसगावात ) अनेक जणांना शेंगा दाण्याची ऍलर्जी होते. लहान पाणी शेंगा दाणे देत नाहीत, त्याचे तेल खात नाहीत, मग होते ऍलर्जी. ही ऍलर्जी बरेच वर्ष राहते. भारतीय वंशाच्या लोकांची ऍलर्जी जाते. पण बऱ्याच लोकांची जातच नाही.
शरीरातल्या मास्ट सेल नामक पेशी ह्या ऍलर्जी ला कारणीभूत असतात. आणि त्यांच्यावर कुठल्याच चूर्णाचा आणि कुठल्याच होमिओपॅथिक दवाईचा उपाय चालत नाही.
बाकी इतर जाणकार सांगतीलच.
असो.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 09/07/2018 - 11:20
नवीन
कोकम + जिरे पावडर, किंवा कोकम सरबत. किंवा जिरागोळ्या.
प्रथिनांची ( कडधान्ये, तेलबिया, शेंगदाणे यांतील) अॅलर्जी हे कारण.
होऊ नये असे उपचार नसतात. जेव्हा त्रास होईल तेव्हाच.
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
Sun, 09/09/2018 - 17:43
नवीन
मला काही वर्षांपूर्वी हा त्रास खूप झाला होता. जवळ जवळ दीड वर्ष रोज अॅलोपॅथीचे औषध घ्यावे लागे. मोठमोठ्या गांधी उठत अंगभर. खूप त्रास होत होता. कंटाळून गेले होते. शेवटी माझ्या चुलत बहिणीच्या सासर्यांने एका आयुर्वेदीक डॉक्टरचा पत्ता दिला. त्या डॉ. ने सर्वप्रथम सगळी अॅलोपॅथी औषधे बंद करून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू केले. त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे सुरवातीला त्रास जरा वाढला. पण नंतर शीतपित मुळापासून बाहेर पडले. संपूर्ण गुण येण्यासाठी 3 महिने नियमित औषध घावे लागले होते.
त्याच डॉ च्य उपचाराने अनेक शितपित्ताचे जुने रोगी पूर्णपणे बरे झालेले आहेत
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sun, 09/09/2018 - 20:30
नवीन
मनिम्याउ ,
त्या डॉ चां अॅड्रेस व कॉंटॅक्ट मिळेल का ??
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
Mon, 09/10/2018 - 11:10
नवीन
तुमची ख व बघा
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 09/10/2018 - 10:56
नवीन
मला लहानपणी क्वचित असा त्रास व्हायचा. मग आमसूल चोखून खाणे वा आमसूल भिजवून ते पाणी पिणे यामुळे त्रास कमी व्हायचा. वाढत्या वयाबरोबर हा त्रास नाहीसा झाला. विशेष काही करावे लागले नाही.
- Log in or register to post comments
प
प्रभास
Tue, 09/11/2018 - 09:07
नवीन
मला पण या विकाराचा बराच त्रास सहन करावा लागलेला आहे. दोन तीन वेळा मला होमिओपॅथिक औषधयोजनेचा फार चांगला गुण आलेला आहे. पण मुळापासून ही पिडा जात नाही. तुम्ही आयुर्वेदिक उपचार पण करून बघू शकता.
- Log in or register to post comments