Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

द्वादशैतानि नामानि

अ — अनन्त्_यात्री, Wed, 09/05/2018 - 12:42
अगा वक्रतुण्डा, ध्यान जरा द्यावे जनांसी करावे, थोडे सुज्ञ II १ II अगा एकदंता, ध्वनी प्रदूषण वाढविती जन, ऐकवेना II २ II कृष्ण-पिंग-अक्षा, ऊर्जेची नासाडी करिती आवडी, अज्ञ जन II ३ II अगा गजवक्त्रा, बाजारू संगीत पिडे दिनरात, धाव आता II ४ II अगा लंबोदरा, वर्गणीची सक्ती जुलूमाची भक्ती, थांबवावी II ५ II अगा हे विकटा, साथ नवसाची करी जनतेची, बुद्धी भ्रष्ट II ६ II विघ्नराजेंद्रा रे -जल, भूमी, वात सर्व प्रदूषित, कैसे झाले II ७ II अगा धूम्रवर्णा, पर्यावरणाची जाणीव जनांची, वाढवावी II ८ II अगा भालचंद्रा, क्षुद्र भेदाभेद निरर्थ वितंड, नष्ट करी II ९ II अगा विनायका ,बुद्धीचा तू देव भक्तांना वैभव , बुद्धीचे दे II १०II अगा गणपती , थोर तुझी कीर्ती सौहार्दाची व्याप्ती, वाढवावीII ११ II अगा गजानना , मागतो मी दान दुजा लोकमान्य, धाड आता II १२ II

प्रतिक्रिया द्या
5767 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ख
खिलजि Wed, 09/05/2018 - 13:47 नवीन
यात्री साहेब छान जमून आलीय बरं का ...
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Fri, 09/07/2018 - 12:57 नवीन
सुंदर काव्य!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/07/2018 - 12:58 नवीन
छान जमली आहे!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 09/07/2018 - 13:38 नवीन
आावडली कविता.
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/07/2018 - 20:22 नवीन
छान! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 09/08/2018 - 09:14 नवीन
सर्वाना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 10/07/2018 - 07:14 नवीन
फलक करून विसर्जनाच्या मिरवणुकीत लावावी अशी. मुकाट सभासद नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 10/07/2018 - 07:18 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा