Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सारंगिया

म — मनमेघ, गुरुवार, 09/06/2018 - 07:58
तुझ्यातला सारंगिया माझ्या मागे सावलीसा कधी माझ्याहून आर्त कधी मूक अव्यक्तसा कधी माझ्याबरोबर सूर्यसा तू डोक्यावर कधी माझ्याहून दुणा जणू माझ्यातून उणा ! तुझ्यातल्या सारंगीचे रंग, माझा मनःपट, माझ्या सुरांचे कुंचले ओथंबून काठोकाठ विलंबित कधी द्रुत श्वासनि:श्वासांची लय मीट डोळे, पहा मन तुझे माझे चित्रमय ! ~ मनमेघ

प्रतिक्रिया द्या
3247 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/06/2018 - 08:30 नवीन
मीट डोळे, पहा मन तुझे माझे चित्रमय !
उत्तम रचना. Sandy
  • Log in or register to post comments
म
मनमेघ गुरुवार, 09/06/2018 - 13:56 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
श
श्वेता२४ गुरुवार, 09/06/2018 - 14:08 नवीन
मन सारंगीमय झाले
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Fri, 09/07/2018 - 12:55 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
र
राघव Fri, 09/07/2018 - 13:05 नवीन
आवडले रे! :-)
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 09/08/2018 - 10:40 नवीन
//तुझ्यातला सारंगिया माझ्या मागे सावलीसा कधी माझ्याहून आर्त कधी मूक अव्यक्त//// गाण्याला सारंगीची साथ असावी असावी तर अशी. जीवनात साथ असावे तर अशी. मनाला अत्यंत भावणारे काव्य. ज्याने सारंगी ऐकली आहे त्याला उमजावे याचे मोल....
  • Log in or register to post comments
म
मनमेघ Wed, 09/12/2018 - 12:18 नवीन
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा