Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चंद्राचे मनोगत

क — कलम, Fri, 09/14/2018 - 09:14
कशाला हसावे कशाला जगावे कशासाठी अन्याय हा पार्थवा असत्यास कवटाळुनी मी जगावे कुणाला वदू माझी ही वंचना निशेच्या कुशीतून जन्मास यावे मला बागडाया तमाचे रण कधी भेट नाही स्वतःच्या पित्याची संबोधती सूर्य नारायण नसावे मला का कधी स्वत्व माझे पित्याने दिले दान तेजः कण युगे लोटली आज आहे उभा मी निशेला करोनि स्व ला अर्पण सभोवताली अति क्षुद्र तारे स्व प्रकाशे आनंदात तेजाळती कधी सर्व एकत्र येऊनि मजला कटू बोल बोलुनी वेडावती जरी पृथ्वी लोकी अति मूल्य माझे स्वतःसाठी आहे अति गौण मी आकारे ही पूर्णत्व नाहीच मजला रवीच्या प्रकाशे सदा अर्ध मी नको ते अलंकार तेजः कणांचे जयावीन मी न माझा उरे नको ती स्तुती अन नको ती प्रशंसा मला वाटते सर्व ते उपरे असे याचना ही तुला पार्थवा रे युगांची असे ही खरी साधना भूमंडलास निःशब्द करण्या स्व तेजे नभी पेटवावे तमा एकदा

प्रतिक्रिया द्या
2288 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रचेतस Fri, 09/14/2018 - 09:48 नवीन
सुरेख कविता. ही घ्या तुम्हास एक चंद्रमूर्तीची भेट. Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 09/14/2018 - 10:20 नवीन
पृथ्वीचे प्रेमगीत सारखे हे चंद्राचे मनोगीत म्हणावे का
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 09/14/2018 - 10:27 नवीन
सुरेख कल्पना.
  • Log in or register to post comments
क
कलम Sat, 09/15/2018 - 05:59 नवीन
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 09/16/2018 - 18:32 नवीन
छान ! "हा खेळ सावल्यांचा" या मराठी चित्रपटातील गाणे आठवले " हा चंद्र ना स्वयंभु । रवीतेज वाहतो हा । ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा। " पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
क
कलम Fri, 09/21/2018 - 06:46 नवीन
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
प
प्राची अश्विनी Mon, 10/08/2018 - 03:55 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा