Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गीत - गँ गणपतये

क — कौस्तुभ आपटे, Sun, 09/23/2018 - 07:33
॥श्री॥ गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण गँ गण ण ण ण, गँ गणपतये देवांमाजी, अग्रदेव तू, त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥ हे शिव-शक्तिच्या संगमा हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू वेदांची रे मंत्रणा ! विद्या-कला ठायी तुझ्या तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥ तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती हे देवांच्या सेनापती रविचंद्रधिनायक विश्वही तुजला सुर्याने ओवाळती सिद्धेश्वरा, विघ्नेश्वरा, हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥ पदी मंजुळ घुंगुर नादतो कटिबंध भुजंगही शोभतो हे सुंडतुंड, गजगंड तिलंकीत मूषक वाहन वाहतो लंबोदरा, मनमोहना, तू दृष्टि राख, हीच कामना ॥३॥ गीत - कौस्तुभ गाणे इथे ऐकत येइल https://youtu.be/FBP3KzPa6jM आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला हा माझा सुरेल निरोप. गणपतीचे हे गाणे मी सहा वर्षापूर्वि ’असे स्फुरावे गीत’ह्या माझ्या अल्बम मधे रिलीज केलं होतं. विशेष सांगायचे म्हणजे ह्या गाण्यात ’माझ्या नवर्याची बायको’फेम ’शनया’ म्हणजेच रसिका सुनील कोरस मधे गायली आहे. तेंव्हा ती कॉलेज मधे शिकत होती आणि झी मराठी सारेगम मधे कोरस मधे गात असे. विशेष सांगायचे म्हणजे ह्या गाण्यात ’माझ्या नवर्याची बायको’फेम ’शनया’ म्हणजेच रसिका सुनील कोरस मधे गायली आहे. तेंव्हा ती कॉलेज मधे शिकत होती आणि झी मराठी सारेगम मधे कोरस मधे गात असे. गाण्याच्या शेवटी काही फोटो आहेत पहा ओळखता येत्ये का :). ह्या गाण्याचे शब्द आणि संगीत माझे असून, अक्षय कावळे आणि रोहन मोकल ने म्युझीक अरेंजमेंट केली आहे. गाणं ऐका आणि आवडल्यास नक्कि लाईक करा. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
2752 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गणेशा Wed, 09/26/2018 - 09:36 नवीन
भारी एकदम.. कौस्तुभ.. आपण ठाण्याला भेटलेलो आहोत कवितेचे कार्यक्रमात असे आठवते.. वर्षे अंदाजे २००८-०९
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा