कलादालन

प्रकाशचित्रे : सुख वाटे जीवा...

Primary tabs

"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच!
पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे.
डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो.
कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो.
निसर्गाशी गळाभेट होते. चार क्षण विसावा मिळतो.
विसाव्याचे हे क्षण चिरंतन स्मरणात रहावेत म्हणून टिपले आहेत मी.
ते पाहून तुम्हालाही क्षणभर सुख वाटलं तर सार्थक झालं असं म्हणेन.

अनिल हटेला

क्या बात है !!!
कुठल्या ठिकाणाची आहेत ही प्रकाश चित्रे ?
१ले ४ थे ५ वे तर अप्रतीम ....
२ रे आणी तीसरे कोकणातले असावे असे वाटते...

शेवटचे चित्र मात्र कन्फ्युजन आहे ......

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसाव्याचे क्षण फार सुरेख आहेत. डोळ्यांना 'सुख वाटे.. ' झाले.
स्वाती

सहज

सुंदर फोटो..... सार्थक.

विसुनाना तुम्ही व्यक्त केलेल्या मताशी संपुर्ण सहमत.

ते पाहून तुम्हालाही क्षणभर सुख वाटलं तर सार्थक झालं असं म्हणेन.

अगदी खरच ! काही काळ या निसर्गचित्रांनी विसावलो.
प्रकाश घाटपांडे

शितल

सर्वच फोटो अप्रतिम काढले आहेत.
:)

सूर्य

चित्रे सहीच आहेत. कोणती ठिकाणे आहेत ही?

- सूर्य.

प्राजु

विसुनाना,
हॅट्स ओफ टू योर फोटोग्राफी..
कोण्तं जास्ती आवडलं हे सांगणं कठीण आहे..
ग्रेट!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश

"तिसर्‍या डोळ्याची" कमाल आवडली!
मस्त प्रकाशचित्रे!
-(निवांत) ऋषिकेश

लिखाळ

वा !
सर्व फोटो छान आहेत.. पाहुन प्रसन्न वाटले :)
-- लिखाळ.

मदनबाण

विसुनाना सर्व फोटो छान आहेत..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मदनबाण

विसुनाना सर्व फोटो छान आहेत..

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

केशवराव

विसुनाना, प्रकाश चित्रे आवडली. मन प्रसन्न झाले.

यशोधरा

सुरेख प्रकाशचित्रे! ठिकाणांची नावे दिलीत तर खूपच छान होईल.

सुंदरच आहेत ही प्रकाशचित्रे. पण, कुठे काढली वगैरे थोडी माहिती द्या ना जमली तर...

बिपिन कार्यकर्ते

सुक्या

बहुतेक महाबळेश्वर आहे. नीडल प्वाइंट दिसला म्हनुन सांगतो. सुरेख प्रकाशचित्रे

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

राघव

खूप सुंदर प्रकाशचित्रे :)
पहिले सगळ्यात जास्त आवडले!!

मला वाटते ही प्रकाशचित्रे महाबळेश्वरची आहेत. चु.भू.द्या.घ्या.
मुमुक्षु

विसुनाना

प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि प्रकाशचित्रे पाहणार्‍यांचे आभार.
महाबळेश्वरच आहे.