Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन

स — संदीप-लेले, Mon, 10/01/2018 - 16:16
असे समुद्र अथांग, मन त्याहूनही खोल हिमालय जो उत्तुंग, मन त्याहूनही थोर वाहताना होते नदी कधी वाकडी वेल्हाळ मन जागच्या जागीच आणि तरीही नाठाळ लहरी वारा आणे पाण्यावरती तरंग मनी उठता तरंग लहरते अंतरंग वेगवान प्रकाशाला संथ काळाचीच साथ संथ जीवनी राहून मन धावते वेगात तारे टांगले ज्यावर त्यास म्हणती अंबर मन टिपते विश्वाला, मन विश्र्वाचे झुंबर मूल पाहताच मन लहानाहून लहान तेच तन तेच मन खरे तेव्हांच महान हाव भाव राग लोभ, मनी अगणित मिती देव धर्म पाप पुण्य, सारी त्याचीच निर्मिती अवकाश पोकळीत होय अंधाराची सीमा मनाच्या पोकळीला नाही कसलीच सीमा क्षण त्यास युगासम, युग कधी त्यास क्षण जगण्यास प्रेरक ते मन काळास शरण विश्व काळोखाचे घर, चांदण्याने उजळते मन दुःखात बुडता, ज्योत ज्योतीने पेटते मन एकटे एकटे त्यास सोबतीचा ध्यास ज्याची मागते सोबत त्यास वेगळीच आस ढोल आत किती शांत आणि बाहेर गोंगाट मन आतून गोंगाट अन बाहेर बिनबोभाट दोन घास खाऊनिया भूक पोटाची भागते हवे नको ते मिळता भूक मनाची वाढते भरलेल्या पोटी मन कठीण वज्रासमान पोटी पडताच खड्डा, मन वाकली कमान इथे तिथे नको पाहू, इतरेजनांना सांगते कळत वा नकळत स्वतः सगळे चाखते मन पाहते सारेच, असो मूर्त वा अमूर्त मूर्त मानते स्वतःला पण असते अमूर्त ... संदीप लेले

प्रतिक्रिया द्या
2187 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
राघव Mon, 03/16/2020 - 21:06 नवीन
दोन घास खाऊनिया भूक पोटाची भागते हवे नको ते मिळता भूक मनाची वाढते ही कल्पना खूप आवडली. :-)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/17/2020 - 01:25 नवीन
छान.... चाल कोण लावणार? सलील कुलकर्णी कि श्रीधर फडके !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/17/2020 - 04:01 नवीन
मनाचे श्लोक आवडले, चालीचे म्हणाल तर वादळवाट ची चाल एकदम फिट बसते या गाण्याला पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Tue, 03/17/2020 - 06:26 नवीन
राघव, चौकस २१२ आणि ज्ञानोबाचे पैजार - धन्यवाद ! वादळवाट ची चाल - खरच की ! व्वा, छान कल्पना दिलीत पैजारबुवा!
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले Tue, 03/17/2020 - 06:34 नवीन
कविता मिपा वर टाकल्यानंतर सुचलेल्या ओळी: डोह मनाचा नितळ, त्याच्या तळात आभाळ दिसे गढुळ डोहाच्या, पृष्ठभागीच पाताळ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा