Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मारवा

श — शिवोऽहम्, Wed, 10/03/2018 - 21:25
कालचीच असावी तशी आठवते ती गोष्ट फाटकाबाहेर तुझी वाट पहाताना थकली नव्हती रविवारची आळसावलेली सकाळ आणि तू आलीस, सावळी-सुंदर, किरणांचं पाणी प्यालेले ओले केस घेऊन, सुगंधी.. पाकळ्यांवर दवं सावरणाऱ्या शेलाट्या निशिगंधासारखी. आणि दिसलीस फलाटावर वाट पहाताना त्या घुसमट गर्दीतही तुझं हसू तेवत होतंच तेच आठवतं अजून तुला आठवताना.. पण तुला जाणवले का माझे हात हासत 'दे टाळी!' म्हणताना कधी? जेंव्हा हिंडलो निवांत फुटपाथवर पुस्तकं धुंडाळत असू देत कितीही फसवं आता पण काही घडलं नसतं का निराळं? जेंव्हा तू बोलत होतीस भरभरून जाणाऱ्या क्षणांना थांबवणाऱ्या स्वप्नांबद्दल.. आणि प्रवास थांबूच नये वाटलं होतं मूक पाषाणशिळांच्या देशातुन जाताना! जगत शिकताना, झोकून देताना, चुकचुकताना वळून येतं आभाळ आत कुठेतरी खोलवर पारा उडालेल्या स्मृतींच्या आरशात जेंव्हा बघतो तुला अस्पष्ट, धूसर. जाईल का कधी हा सल तुला न पाहण्याचा? आहेस तिथे अजून तू उभी गरब्याच्या रिंगणात मला बोलावू पहाणारी जरी लय निराळी भुलवते माझ्या पावलांना आणि रिंगण माझं माझ्यातलं सुटत नाही

प्रतिक्रिया द्या
1191 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/21/2018 - 15:19 नवीन
सुरेख....! तू आलीस, सावळी-सुंदर, किरणांचं पाणी प्यालेले ओले केस घेऊन, सुगंधी.. पाकळ्यांवर दवं सावरणाऱ्या शेलाट्या निशिगंधासारखी. खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 10/21/2018 - 15:40 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा