सांगा, तुम्ही काय काय विकलय ? (कसं कसं पटवलय ?)
'विकणे' शब्दाला 'पटवणे' असा साधा सोपा शब्दही सुरवातीसच घेऊ, कारण 'विकणे' या शब्दाची बर्याच जणांना धास्ती असते. - या धागा चर्चे पुरते नकारात्मक आणि अनएथिकल अनुभव जरासे मागे ठेऊ आणि चांगल्या अनुभवांचा ते ही खरेदीच्या नव्हे विक्रिच्या विचार करू -
कारण प्रत्येकाने, अगदी लहानपणा पासून कुणाला न कुणाला कशा न कशासाठी पटवलेले असते . किंवा छोट्या मोठ्या गोष्टी विकलेल्या असतात. कधी एखाद्या आनंद मेळ्यात एखादा स्टॉल लावलेला असतो , एखादी सेकंड हँड वस्तू ते घर भाड्याने देणे अशी सेवा विकलेली असते किंवा एखाद घर विकून पाहिलेल असतं. शेतकरी ते घरगुती पदार्थ बनवणारे या सर्वांनी काही ना काही विकुन बघीतले असते. आणि खासगी क्षेत्रातील नौकरदार वर्गाने मुलाखत देताना स्वतःचे कौशल्य विकुन दाखवलेले असते.
मला या विषयाशी संबंधीत अजून दोन एक तरी लेख लिहिण्याचा मानस आहे, पण तत्पुर्वी सर्व मिपाकर वाचक आणि लेखकांचे तुम्ही (वस्तु, सेवा, संकल्पना घेणार्याच्या कपाळाला कटूतेची आठी न पडू देता) काय काय विकलय ? (कसं कसं पटवलय ?) या बद्दल सकारात्मक, एथिकल आणि यशस्वी अनुभव शेअर करुया.
* सांगा, तुम्ही काय काय विकलय ? (आणि कसं कसं पटवलय ?)
* व्यक्तिगत टिका, अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळणे आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार
💬 प्रतिसाद
(17)
स
सर्वसाक्षी
Sat, 10/06/2018 - 07:16
नवीन
शिर्षक वाचुन अचंबित झालात? पण मी खरंच माथेरान विकलय, एक संकल्पना म्हणून.
तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि सौ. ठाण्याहून डेक्कन एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातून पुण्याला निघालो होतो. मे महिना असावा. बसायला जागा नव्हती, उभ्याने प्रवास करत होतो. आम्ही उभे होतो त्या बाकावर एक मध्यमवयीन जोडपं बसलेलं होतं. होतं मराठीच पण पुण्या मुंबई कडचं नसावं. स्मित हास्याची देवाण घेवाण झाली. ते लोणावळ्याला चालले होते, सहजच फिरायला निघाले होते.
बघता बघता नेरळ आलं. त्या जोडप्याने कुतुहलाने पलिकड्च्या फलाटावर लागलेली छोटी गाडी पाहिली. मी तात्काळ माथेरानचे निसर्ग सौंदर्य, मातीचे रस्ते,वाहन प्रवेश नसल्या मुळे रस्त्यातून निवांत भटकायचा आनंद , छोट्या गाडीची मजा वगैरेचं वर्णन सुरू केलं, हातात वेळ थोडा होता. "तुम्ही माथेरान अजून पाहिलच नाहीत? अहो लोणावळं झक मारतय! निवांत माथेरानला जा. लोणावळं हली फार गजबजलाय......... बघा पटकन ठरवा, जर समोरची छोटी गाडी गेली तर तीन तास दुसरी गाडी नाही"
जोडप्यानं तात्काळ माथेरानला जायचा निर्णय घेतला, माझे आभार मानले आणि ते उतरुन गेले.
बसायला मस्त जागा मिळाली, कधी नव्हे ते बायकोकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळाले.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 10/06/2018 - 10:56
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 10/07/2018 - 19:59
नवीन
असे क्षण फार कमी वेळा येतात.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 10/08/2018 - 09:47
नवीन
:-)))
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 10/06/2018 - 11:03
नवीन
मी इथंच मिपावर दोन तीन धागे विकलेत !
हेच ते धागे:
तलकाडू : एक प्रवास
कहाणी एका पाण्याची !
कहाणी एका औदार्यवतीची
(जस्ट गंमत)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 10/07/2018 - 20:09
नवीन
पण मोठ्या मुलाला शालेय शिक्षण घेत असतांना पैसे कमी पडले की, कागदाचे आवाज करणारे, फटाके शाळेतल्या मुलांना विकून वडापाव खायचा.
धाकटा मुलगा २ वर्षे कॉलेजला गेलाच नाही.शिक्षणाचा कंटाळा आला म्हणाला.त्या काळात त्याने, घरगूती पदार्थ विकायचा धंदा करून बघीतला.
बायको जर्मन भाषा विकते आणि पंजाबी ड्रेसेस शिवते.
तर आमची सौ.आई आणि आमच्या सासूबाई पिशव्या शिवून विकतात.
- Log in or register to post comments
G
Ganesh Dwarkan…
Mon, 10/08/2018 - 10:34
नवीन
"बायको जर्मन भाषा विकते आणि पंजाबी ड्रेसेस शिवते.".. हे छान!!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 10/12/2018 - 09:41
नवीन
सर्वात best गोष्ट विकणं म्हणजे भविष्य! हात, पत्रिका, आकडे यांच्या मदतीने लोकांना काहीही ठोका... नक्की विकलं जातं. मी स्वतः नाही विकलं पण अनुभवलंय. लोक लगेच विश्वास ठेवतात आणि विकत घेतात. त्यात 'तुम्ही खूप सहन केलंय आणि तुमची कोणालाही किंमत नाही' ही दोन वाक्य तर जादू आहेत.
कोणाला इच्छा असली तर प्रयोग करून बघा
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 10/12/2018 - 09:52
नवीन
धागा चर्चा लेखास एथिकल अनुभवांची चर्चा अभिप्रेत आहे. सहकार्यासाठी अनेक आभार.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Tue, 10/23/2018 - 15:05
नवीन
शाळेत पाचवीत असताना तरुण भारत पेपर सोबत खजाना नावाची एक पुरवणी यायची. त्यात एक 150 वर्षांचं कॅलेंडर मिळालं होतं. त्याच्या फोटोकॉपी एनलार्ज करून सुरुवातीला 20 आणि मग नंतर 10-5 रुपयांना काही दिवस विकल्या. मुलांना नंतर कळलं की हा फक्त झेरॉक्स विकतोय. मग हा धंदा बंद पडला.
एकदा वहीला खाकी कव्हर घालून आणायला सांगितलं होतं. माहीत होतं की मुलं विसरतीलंच. जादा रीम घेऊन गेलो आणि त्या विकल्या.
असं बरंच काही.. आता आठवलं की मजा वाटते.
आणि ती पोरं भेटली की शिव्या देतात. :D
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 10/23/2018 - 15:20
नवीन
रोचक, वर दिलेले दोन प्रकार तरी डिसेंट आणि संधीच सोन करणारे आहेत. आपण 150 वर्षांचं कॅलेंडर घेण्यासाठी मित्रांना कसे कन्विन्स केलेत ? पु.ले.शु.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Tue, 10/23/2018 - 17:17
नवीन
कन्विन्स करायची फारशी गरज पडली नव्हती. असं काहीतरी सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. शिवाय मी नंतर होलसेलर झालो आणि माझ्याकडून डिस्काउंटमध्ये घेऊन काहींनी पुढे विकले कॅलेंडर.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 10/23/2018 - 17:21
नवीन
=)) जेनुआईन कौतुक :)
- Log in or register to post comments
ज
जेडी
Tue, 10/23/2018 - 17:20
नवीन
मी आतापर्यंत काहीही विकु शकले नाही पण लेकीने पणत्या रंगवुन विकल्यात, मन्यांचे, क्विलींगचे कानातले, माळा करुन, छान पेंटीग करुन , नवीन डिजाईन करुन बुकमार्क ग्रिटींग कार्डस, स्कुबीचे, मण्यांचे किचेन करुन विकले आहेत. इनफॅक्ट आईला गरज असेल तर स्वत:चा पाॅकेट मनी पण विकलाय(व्याज घेते), रद्दी विकते. मेहंदी छान काढता येते पण शेजारच्या काकुंनाही फुकट काढुन मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. घरकाम पण पैसे दिलेस तरच करीन अशी स्पष्ट तंबी देते.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 10/26/2018 - 19:09
नवीन
:-)
:-)))
- Log in or register to post comments
ज
जेडी
Tue, 10/23/2018 - 17:23
नवीन
मुलीने काॅलेजच्या मुलांनी जर्नल मध्ये ड्राईंग काढुन कॅटबर्या मिळवलेल्या आहेत
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 10/24/2018 - 17:09
नवीन
कॉलेजमध्ये आधी गरज म्हणून व नंतर ईजी मनी म्हणून शंभर रुपये प्रति जर्नल लिहून दिलेली आहेत. दिवसात २०० रुपये!! सात आठ दिवसात दीडदोन हजार कमाई!
- Log in or register to post comments