Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यलो ऑकर ची स्वप्ने

ह — हर_हुन्नरी, Mon, 10/08/2018 - 12:25
यलो ऑकर ची स्वप्ने : पानगळ सुरु झालीय नोव्हेंबर मधली सेकंदागणिक कोसळतायत हजारो स्वप्नं गवताच्या अगणित हिरव्या छटांमध्ये रानावनांत , जंगलात शहरातल्या पार्कात पडीक घरांच्या अवतीभवती धांदल नुसती अविरत एकेक पान पाहावं अगदी जवळून , गाढ , सुगंधी झोपेतल्या खुशबूदार स्वप्नासारखं पहिल्या धारेच्या प्रशियन ब्लू चे शिंतोडे सूर्याने जाळून टाकलेले कच्चे खाऊन टाकलेले रंग व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना पर्यंत च्या सर्व रंगश्रुती अलगद ऐकाव्यात पान गळून पडताना किणकिणतात या श्रुती ...काही तुटक जिवंततेच्या हिरव्या खुणा छोट्या मोठ्या , नुकत्याच मेलेल्या , मरून कुजलेल्या, पानांचा साचत जातो थर करड्या मातीची किंचित थरथर आसमंतच झालाय यलो ऑकर

प्रतिक्रिया द्या
1169 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/08/2018 - 13:54 नवीन
अजून लिहा.आवडली रचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
N
Naval Mon, 10/08/2018 - 14:41 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा