रदीफ नाही कधी जुळला ...
रदीफ नाही कधी जुळला
न कधीही काफिया सुचला
गजल जगण्यातला तरिही
कैफ भरपूर अनुभवला
जिव्हारी लागतिल ऐसे
कितीतरी वार परतविले
तरी एल्गार युध्दाचा
जखम ओली असुन केला
सदैवच लागले होते
ध्यान हे ऐहिकापार
इकडच्या ऊनछायेचा
कधी अफसोस ना केला
💬 प्रतिसाद
(3)
र
राघव
Mon, 10/15/2018 - 03:04
नवीन
तुटक आणि अपूर्ण वाटते आहे. आणिक थोडा विचार कल्पना पूर्ण करुन जाईल. :)
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Mon, 10/15/2018 - 04:28
नवीन
काही शब्दांचे (रदीफ, काफिया) अर्थ कळले नाहीत तरी सुरेश भटांच्या गजलांची आठवण झाली. लिहित रहा.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 10/16/2018 - 12:56
नवीन
देणार्या सर्वांना धन्यवाद!
- Log in or register to post comments