रेल्वे अपघात आणि बेजबाबदार भारतीय
एका ट्रेनला थांबण्यासाठी किती वेळ लागतो ?
अॅव्हरेज मालगाडीस (वस्तूंची ने आण करणारी माणसांची नव्हे) ९० ते १२० डब्बे असू शकतात. म्हणजे डबे मिळुन हि लांबी अगदी किलोमीटर किंवा दिड किलोमीटर पर्यंत असू शकते ! (रेल्वे म्हटले की केवळ पॅसेंजर ट्रेनच आठवतात नाही ? मालगाड्यांचे वेळा पत्रक तुम्हाला माहित असते ?) समजा अशी मालगाडी ९० किमी प्रतीतास वेगाने धावते आहे तर पूर्ण इमर्जन्सी ब्रेक दाबल्या नंतर अशा मालगाडीस थांबे थांबे पर्यंत दिड एक किलोमीटर पुढे पोहोचलेली असू शकते. (आपण केवळ वेगाचा विचार करतो, त्या मलगाडीच्या इंजीनने ५०-१०० डब्बे ओढणारा फोर्स अक्व्यार केलेला असू शकतो हे लक्षात रहात नाही) . ९० किमी प्रतीतास वेगाने १ किमी अंतर केवळ ४० सेंकदात पार पडत असते . ट्रेनचा वेग १०० किमी असेल तर १ किमी अंतर केवळ ३६ सेकंदात आणि १२० किमीचा वेग असेल तर १ किमी अंतर केवळ ३० सेकंदात पार पडते.
९० किमी प्रतीतास वेगाने १ किमी अंतर केवळ ४० सेंकदात पार पडत असते हा जरी वेग घेतला . तर १० सेकंदात ट्रेन २५० मिटर म्हणजे 820.21 फूट पुढे सरकत असू शकते.
व्यवस्थीत नजर असलेल्या मानवाची दृष्टी पूर्ण सपाट कोणताच अडथळा नसलेल्या परिस्थितीत अनेक किलोमीटर (अगदी कदाचीत २० किमी पर्यंत ) पण हि फार आदर्श स्थिती झाली. पहाडी , चढ, वनस्पती, वळणे, धुके, पाऊस, धुळीचे प्रमाण याच्या परिणामी नजर अत्यंत कमी / मर्यादीत झालेली असू शकते. समजा रेल्वे ड्राय्व्हरला अगदी १ किमी पर्यंतचे दृष्य स्पष्ट दिसते आहे , ब्रेक दाबायला जे सेकंद लागतील तेवढ्या सेकंदात गाडी एक दिड किमी अंतर सहज पार करुन पुढे गेलेली असू शकते. आणि मुख्य म्हणजे रस्त्यावरील वाहनांप्रमाणे समोर आलेली वस्तु व्यक्ती वाचवण्यासाठी ड्रायव्हींगचा अँगल बदलण्याचा पर्याय रेल्वे ड्रायव्हरला उपलब्ध नसतो. रेल्वे केवळ रेल्वे रुळावरुनच धावू शकते.
ताशी ८८.५ किमी प्रतीताशी वेगाला विवीध वाहने थांबण्यासाठी किती वेळ घेऊ शकतील ? आकडे अंदाजे
* टायर ब्रेक व्यवस्थित असलेली चांगल्या कंडीशन मधिल लाईटवेट पॅसेंजर कार इमर्जन्सी ब्रेक दाबल्यावर थांबण्यासाठी दोनशे फूट ( साधारणतः साठ मीटर ?) पर्यंतचे अंतर घेऊ शकते. ( हाय स्पीड ड्रायव्हींगचा सोस असेल तर मिनीमम डिस्टन्सची गरज लक्षात घ्या
* कमर्शिअल व्हॅन किंवा बस २३० फूट
* कमर्शिल ट्रक ट्रेलर ३०० फूट ( साधारण एक फुटबॉल ग्राऊंडची लांबी )
* एक लाईट रेल्वे ट्रेन ६०० फूट ( साधारण दोन फुटबॉल ग्राऊंडची लांबी )
* पण तेच लेखाच्या सुरवातीस नमुद केलेली मालगाडी थांबण्यास १८ फूट बॉलग्राऊंडची लांबी लागू शकते.
* (वर उल्लेखलेले फुटबॉल ग्राऊंड आमेरीकन फूटबॉल ग्राऊंड आहेत, फुटबॉलग्राऊंड म्हटले घरा समोरच्या आंगणाच्या लांबीची कल्पना करु नये हे महत्वाचे)
ट्रेन इतर वाहनांप्रमाणे हवी तशी दिशा बदलून धावू शकत नाही ट्रेनला रूळावरच धावावे लागते.
जसे जमिनी वरुन आपण विमान पहाताना ते तसे सावकाश जात आहे असे वाटते तसेच ऑप्टीकल इल्यूजन दृष्टीभ्रमामुळे ट्रेन आहे त्याच्या पेक्षा लांब आणि सावकाश येत आहे असे वाटते पण प्रत्यक्षात वेग अधिक असतो. (आपल्या गाड्यांच्या आरशांवरही मागची गाडी भासते त्या पेक्षा जवळ असू शकते हे लिहिलेले असते) . ट्रेनचे अंतर आणि वेग या बाबत अदमास लावण्यात सहज गल्लत होऊ शकते खास करुन रात्रीच्या वेळी तर नक्कीच.
जर आवाजाच्या भिंती अथवा मोठ्या फटाक्यांच्या आवाजाने तुमचे कान अधू झालेले असतील तर हॉर्न मग ट्रेनचे असू देत कि गाड्यांचे ऐकु न येण्याची बरीच शक्यता असू शकते.
मालगाड्यांचे वेळा पत्रक, ते पॅसेंजर ट्रेनच्या वेळांमधले सर्व बदल तुम्हाला ठाऊक असतात ? बाळासाहेब ठाकरे म्हणत धोकाच पत्करायचा असेल तर देशाच्या सिमेवर जा ! तिकडे धोका पत्करणार्यांची गरज आहे. रस्ते असोत वा रेल्वेचे रूळ धोका पत्करण्याच्या जागा नव्हेत. तुम्ही इतर काहीच काम न करता नुसते खाल्ले तरी एका शतकर्याच्या धान्याला आणि कष्टाला न्याय मिळत असतो हे तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठे योगदान आहेच. तेव्हा रस्ते आणि रुळांवर तुमचे जीव डावावर लावू नका, आप्त स्वकीयांना टांगणीवर ठेऊ नका. वाहने आणि प्रवास आनंद आणि आरोग्य जपून हवीत.
अमृतसरच्या रेल्वे अपघातात झाले ते होऊन गेले. इथून पुढे शहाणे होण्याचा जरासा प्रयत्न करुयात. काय म्हणता ?
भारतीय रेल्वे मधील ब्रेक पद्धती आणि समज गैरसमजांवर प्रकाश टाकणारा युट्यूब व्हिडिओ
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
संदर्भ : minnesota safety council ऑपरेशन लाईफ सेव्हर वेबसाईट पेज हा लेख लिहिताना जसे पाहीले
* लेखात
* केवळ चुकीच्या जोखीमा घेऊ नयेत या दृष्टीने आंतरजालावर उपलब्ध आकडेवारी कोणतीही वेगळि खात्री न करता वापरली आहे तेव्हा आकडेवारीच्यां अचुकतेचा कोणताही दावा नाही. चुभूदेघे. उत्तरदायित्वास नकार लागू.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- CYMATICS: Science Vs. Music - Nigel Stanfordटिप्पणीची गरज नाही...
हे भारतात असंख्य रेल्वे फाटकांवर दिसणारे दृष्य आहे. असे असतानाही नेहमी, "कोण दोषी आहे हे ठरवण्यासाठी कमिटी बसवली की नाही याची चर्चा चालू होते"... किती दांभिक असावे याला काही सीमा ?! :(