कंपन्यांचे ले ऑफ
आय टी कंपन्या बऱ्याच वेळा ले ऑफ करतात म्हणजेच अर्थात आपल्या एम्प्लॉयीना नारळ देतात . तशा बऱ्याच कंपन्या अगदी नॉन आयटी कंपन्याही ले ऑफ करतात पण कमीतकमी त्यांच्या एम्प्लॉयीना भरपाई देतात . (टेल्को , बजाज वैगेरे ) पण आयटी कंपन्या मात्र फक्त नोटीस पिरेडचे पैसे देतात . कंपनी त्यांना रेसिग्नेशन द्यायला लावते. सभ्य भाषेत त्याला पिंक लेटर मिळाले असेही म्हणतात. रेसिग्नेशन नाही दिले तर टर्मिनेट करू अशी भीती घालतात . मग बिचारे एम्प्लॉयी मुकाट रेसिग्नेशन देतात . त्यांची एकजूट नसल्याने ते कोणाकडे दाद मागू शकत नाहीत . मोठा पगार हा नुसता दिखावा असतो कारण खूपशा लोकांनी घरे घेतलीत . पुण्यामुंबईत घर घ्यायचे म्हणजे करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्ची पडत असतो त्यामुळे सेविंग्ज नसतेच आणि असे ले ऑफ झाले कि काही खरे नसते . अक्षरशः दुसरा जॉब मिळोंपर्यंत पूर्णतः वाट लागते कारण घराचे हफ्ते थकवणे शक्य नसते .
हे सर्व का लिहिले तर मी माझ्या कंपनीतले आतापर्यंतचे दोन ले ऑफ पहिले आता तिसरा होऊ घातलाय त्यामुळे डोक्याचा नुसता भुगा झालाय . ज्यांना काढले जाते त्यांच्याकडे त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला नव्हता म्हणूनच त्यांना जायची वेळ आली ह्याच नजरेने पाहतात . मॅनेजरचे राजकारण पण काहींना भोवते. एखादा प्रोजेक्ट जातो त्यात क्लाएन्टला किती फुंडींग मिळाले , त्याचा व्यवसाय किती वाढला , आपल्या कंपनीने त्यांच्याकडून किती नफा काढला , इथली तिथली माणसे बदलणे अशा बऱ्याच फॅक्टरवर प्रोजेक्टचे जाणे अवलंबून असते पण सर्वात शेवटी त्याचे खापर एम्प्लॉयी वर फोडून त्यांची हकालपट्टी होते . आतापर्यंत तुम्ही त्यांना का ठेवले त्यांचा परफॉर्मन्स नव्हता तर? पण जोवर कंपन्यांचा फायदा असतो तोवर त्या ठेवून घेतात , भरघोस नफा कमावतात आणि नको असेल तेंव्हा सरळ त्यांना काढून टाकतात . शिवाय ह्या आयटी कंपन्यात तुम्ही एकदा शिका तुम्हालाते कायम उपयोगी पडेल असे कधीच होत नाही , नेहमी स्वतःला अपडेट करत राहा, त्यासाठी खर्च करा , स्वतःला छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्या करत राहा असले उद्योग करावे लागतात . सतत तुम्ही गुलाम असल्यासारखे क्लायंटचा शब्द झेला , त्यासाठीचे पराकोटीचे टेन्शन , स्ट्रेस घ्या पण बिन बोलता तोंडात साखर पेरून काम करत राहा असले उदयॊग करावे लागतात .हे सर्व असह्य होऊन दर फ्रायडेला दारूचे ग्लास रिचवा , दर अर्ध्या तासाला भकाभका सिगारेटी फुंका ...हेच लाईफ होऊन गेलेले असते .
काही उदाहरणे द्यायला आवडतील , पहिल्यांदा जेंव्हा ले ऑफ झाला तेंव्हा एकाची बायको गरोदर होती . रोजची टेन्शन पेलवणार नाही म्हणून ह्याने तिला रिझाईन द्यायला लावलेले . आईवडील ह्याच्यावरच अवलंबून. त्याने कंपनी अगदी लहान होती तेंव्हापासून काम केलेले म्हणजे कंपनि मोठी होण्यात त्याचा नक्कीच हाथ होता .अशा वेळी त्याला व आणखी पंधरा जणांना अर्ध्या तासाच्या नोटीसवर काढून टाकले . टेन्शन ने इतका गोंधळला होता कि बास . कंपनीने काढून टाकताना त्याच्या योगदानाचा विचार केला नाही . घरी सांगितलेस का म्हणल्यावर ,"घरी सांगायची हिम्मत नाही म्हणाला ". त्याला बरेच दिवस जॉब मिळाला नव्हता . किती अवघड आहे अशा स्थितीत जॉब जाणे . त्याच वेळी नुकतेच कॅम्पस मधून रिक्रूट केलेले चार जणांना काढून टाकले . वाळल्यासंगे ओलं जळतंय तसा प्रकार झालेला . बिचाऱ्यांची कॅम्पस मधल्या पुढल्या संधी पण हुकल्या आणि पुन्हा फ्रेशर म्हणून जॉब शोधणे किती अवघड . त्यात एक मुलगी खूप कष्टाने शिकून आलेली ती तर असं झाल्यामुळे इतकी रडली होती कि बास . अर्ध्या तासात कंपनी इमेल अकाउंट बंद झाले . आपल्या सॅलरी स्लिप पण त्यांना फॉरवर्ड करायला जमले नाही .
एकाने नुकतेच होम लोण घेतले होते , काही बॅकअप नाही , डाउनपेमेंट सुद्धा इथून तिथून लोकांकडून उसने घेतले होते. ते परत करण्याचे शेड्युल होते . त्याला हे कंपनीला समजावता समजावता नाकी नऊ आले . कसेतरी त्याला घेतले , पण कधीही संबध नसलेल्या टेकनॉलॉजि वर टाकले आणि शिवाय भारतातच दुसऱ्या लोकेशनला पाठवून दिले . इतके अवघड झाले कि बिचार्याला आपणहून राजीनामा द्यावा लागला .
दुसऱ्या ले ऑफ च्या वेळी काहींना अड्जस्ट करण्यासाठी भलत्याच टीम मधल्या लोकांना जावे लागले . त्यांना चार दिवसाच्या मुदतीवर काढले . जबरदस्त मनस्ताप दिला . दोन महिन्यात पाहिजे तो जॉब मिळण्यासाठी एकजण आपल्या दोन महिन्याच्या बाळाला बायकोला हिथेच सोडून दुसरीकडे जॉब ला गेला. मोठी मुलगी शाळेत , तिला नवीन शहरात ऍडमिशन घेणे अड्जस्ट होणे अवघड वाटले . त्यानेही जवळपास ६ वर्षे ह्या कंपनीत जॉब केला होता . तो गेला तेंव्हा बाकी टीमची पण गोची झाली होती , मॅनेजर तर बिचारा रडकुंडीला आला होता , नवीन लोकांना घेऊ न कसे काम करायचे म्हणून ते हि चार दिवसाच्या केटीवर .
कंपन्या करोडो रुपये मिळवतात आणि पाहिजे तेंव्हा लोकांच्या पोटावर पाय आणतात. काहीतरी कायदे व्हायला हवेत . अवघड आहे एकूण . कंपन्यांच्या मालकांना काहीही फरक पडत नाही . अशा परिस्थितीत नक्की काय करायचे? कंपन्यांशी लॉयल राहणे किती घातक असू शकते . होम लोन घेताना काय करायचे , नवीन जॉब मिलोपर्यंत कसा पेशन्स टिकवायचा ह्यावर ह्यात चर्चा व्हावी असे वाटते . कायदे असले तर कोणते ? त्यासाठी काय क्रायटेरिया असतो वैगेरे मुद्दयांवर चर्चा अपेक्षित आहे . अगोदर अशी चर्चा झाली असल्यास त्याचा धागा हि अवश्य द्यावा .
छानछोकी मेंटेन करत रहा , पार्ट्या वगैरे करा , टीमला खुश ठेवण्यासाठी पार्ट्यायाची कोणी जबरदस्ती करतो काय ? स्वतःची इमेज वाढवण्याकरता हि फालतुगिरी चालते. बंद करा.करोडो रुपयांचे फ्लॅट असतात. त्याचे हफ्ते , लाईफस्टाईल मेंटेन करण्यात सगळा पगार खर्चीजर का कोणी १ वर्ष लोन करता बॅकअप पुरवणार असेल तरच घर घ्यावे. पूर्वचि पिढी काय वेडी होती काय ? उशिरा / सेटल झाल्यावर घर घ्यायला. जे नोकरीत सुखचित्र दिसतेय ते कायम टिकणारे नाही हि जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. हॉटेलिंग / lifestyle / फॅन्सी शॉपिंग सर्व फालतुगिरी आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे. थोडक्यात नोकरी गेली तर रडण्यात काय अर्थ नाही. आणि हे प्रकार आता वाढतच जाणार आहेत हे लक्षात ठेवावे.पण मध्यम/लहान आकाराच्या सर्विस कंपन्या मध्ये असं तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार जास्त होतात असं वाटतं.भारतीय आय टी कंपन्या यात आघाडीवर आहेत. काही अमेरीकन कंपन्यादेखील आहेत. या सर्व बड्या कंपन्या आहेत.आय टी त नोकरी लागल्यावर, फ्लॅट घेण्यापेक्षा 2 एकर शेती घ्या. कधीच उपाशी मरणार नाही. शेती शिवाय मजा नाही..!!असे !!! नक्की काय भानगड आहे ?!