भोक
💬 प्रतिसाद
(32)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 10/31/2008 - 04:15
नवीन
प्रभुदेवा,
आपल्या चिरंजीवांना वातावरणाची काळजी निर्माण झाल्याबद्दल आपले उभयतांचे त्रिवार अभिनंदन !
(आणि हा लेख कळल्याबद्दल आमचेही अभिनंदन!)
ऍक्टिविझम हा ह्या तरुण वयामध्ये आवश्यकच असतो. एन्व्हायरनमेंटालिझम इज द सेफेस्ट ऍक्टिविझम दॅट यंग पीपल कॅन हॅव्ह नाऊ अ डेज !
(दुसरा पर्याय, म्हणजे, क्यालिफोर्नियातील प्रपोझिशन ८ च्या विरोधी. आता तुम्हीच ठरवा.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 04:21
नवीन
आपले आभार कसे व्यक्त करु?
प्रपोझिशन ८ वर जरा प्रकाश टाकाल काय?
अवांतर : प पार्टीची भाषा आपण वापरु नये.(कळ्ल्याबद्दल अभिनंदन वगैरे)
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 10/31/2008 - 04:26
नवीन
विबाहसंबंधी एकवाक्यता.
कुणाचेही कुणाशीही लग्न होऊ शकते, असा निर्णय कोर्टाने दिल्यावर, त्याच्या विरोधी लोकांनी हे प्रपोझिशन टाकले.
परंतु, आता काही विचरी लोक क्यालिफोर्नियात आहेत असे दिसते आहे.
नोव्हेंबर ४ ला, कृपया क्यालिपोर्नियातील प्रपोझिशन ८ च्या विरोधात मत करा !!!
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Fri, 10/31/2008 - 04:37
नवीन
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Fri, 10/31/2008 - 14:19
नवीन
घरच्या विजेचे भोक बुजवण्यासाठी कॅपॅसिटर वापरा!
संजय अरे जरा नेमकेपणाने सांगशील काय? कपॅसिटर कुठे लावायचा? किती मायक्रो फॅरेडचा? वगैरे तपशील सांगितलास तर नक्कीच प्रयोग करून पाहता येईल.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 14:23
नवीन
जरा अज्ञानी लोकांना सुजाण करावे अभ्यंकरांनी.
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Fri, 10/31/2008 - 17:05
नवीन
देवसाहेब व प्रभूसाहेब,
१.
आपल्य घरात वापरली जाणारी वीज ही बहुदा कुठल्यातरी कॉइल (Electromagnet) ला उर्जा देण्यासाठी वापरली जाते. जसे, फ्रिजची मोटर, गीझरची कॉइल, फ्लुरोसंट दिवे, पंखे इ.
ह्या कॉइल्सना उर्जा देताना, रीऍक्टीव पॉवर ह्या स्वरुपात मोठ्या प्रमाणावर उर्जा वाया जाते.
आपल्या घरात येणार्या विजेच्या लाईन मध्ये योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर लावल्यास, हा कॅपॅसिटर ह्या रिऍक्टिव पॉवरचा प्रभाव कमी करतो.
त्यामुळे कमी उर्जा वापरून आपण घरातील उपकरणे वापरु शकतो.
किंवा, नेहमी वापरत असलेल्या उर्जेत जास्त उपकरणे चालवू शकतो.
२.
खाली दिलेले दुवे आपणास कॅपॅसिटरचे मुल्य शोधण्या साठी उपयोगी पडतील.
http://www.allaboutcircuits.com/vol_2/chpt_11/4.html
http://ambercaps.com/lighting/power_factor_correction_concepts.htm
३.
आपल्या विभागातील चांगला इलेक्ट्रिशियन अथवा वीज कंपनीतील कर्मचारी आपल्या घरातील विजेचा वापर मोजुन आपणास आवश्यक असलेल्या कॅपॅसिटरचे मुल्य सांगू शकतील. तसेच बसवूनही देऊ शकतील.
४.
कॅपॅसिटरच्या वापरात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र बराच मागे आहे.
कॅपॅसिअरचा वापर मोठ्या प्रमाणावर करून आपण वीजेचे संकट बर्यापैकी आटोक्यात आणू शकतो.
ह्यासंबंधी दै. सकाळच्या एका अंकात मुखपृष्ठावर सविस्तर बातमी आली होती. आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना बरेच शोधूनही, तो दुवा सापदु शकला नाही.
५.
असले कॅपॅसिटर बनवणारे उत्पादकही आपणास तांत्रीक नार्गदर्शन करू शकतात. विशेषतः सोसायट्यांना एक कॅपॅसिटर संच बसवणे कमी खर्चाचे असेल.
कॅपॅसिटर बनवणारे काही उत्पादक खालील प्रमाणे:
http://www.magnewin.com/
http://www.yashacapacitors.com/
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 10/31/2008 - 17:34
नवीन
> ह्यासंबंधी दै. सकाळच्या एका अंकात मुखपृष्ठावर सविस्तर बातमी आली होती. <
आपण या बातमीबद्दल बोलत आहात असे वाटते -
महाराष्ट्र करतो १००० मेगावॉटची नासाडी
महाराष्ट्राने ओढवून घेतली साडेसाती
या दोन्ही लेखात मिळून कपॅसिटर बद्दल माहिती आहे.
--लिखाळ.
- Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर
Fri, 10/31/2008 - 17:40
नवीन
हीच बातमी शोधीत होतो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Fri, 10/31/2008 - 04:46
नवीन
प्रभूसाहेब तुम्ही इतरांना शहाणे करून सोडण्यासाठी जिवाचा आटापिटा करता. त्यातली थोडी,अगदी थोडीशीच शक्ती घरच्यासाठी वापरा म्हणजे मग हे असे प्रश्न घरात निर्माण होणार नाहीत. एकूण आपापसात सुसंवाद नाही असे वाटते. आगाऊ सल्ल्याबद्दल माफी असावी.
माझे निरीक्षण चुकीचे असल्यास आनंदच होईल.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत
Fri, 10/31/2008 - 04:50
नवीन
>>जाता जाता: तुमचा मुलगा अगदी तुमच्यासारखा दिसतो असे म्हणणार्याना नेमके काय म्हणायचे असते.
डी एन ए चाचणीची गरज नाही. ;)
- अभिजीत
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 04:56
नवीन
भोक हे माझ्या गाढवपणाची कबुली आहे. मी कुठे सर्व विषयात सर्वज्ञ आहे. आणि बस काय , देवानी दिलेला सल्ला आगाऊ कसा असेल.
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 10/31/2008 - 05:16
नवीन
बरेचदा उत्तर सोपे असते.
जे तिर्थरुपांनी केले त्याच्या बरोब्बर उलटे केले तर फायदाच फायदा ही आईची सोपी शिकवण.
अश्या तर्हेने माय-लेकाने अजुन एक चांगले काम केले. उशीरा का होईना कथानायकाच्या डोक्यात प्रकाश पडला. ही मालीका येउ दे अजुन बरेच काम करायचे आहे मायलेकांना.
;-)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 05:21
नवीन
खेळिया आठवत का सहजराव?
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 10/31/2008 - 05:23
नवीन
मी तुम्हाला त्याबद्दल माहीती पाठवा म्हणालो होतो. आठवते का?
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 10/31/2008 - 06:36
नवीन
एवढा सहज (?) साधा लेख, त्यावर हे प्रतिसादांत क्रिप्टिकत्व का बरे ?
खेळिया हे पुणे-२९ मधील एक खेळण्यांचे दुकान आहे.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 10/31/2008 - 06:45
नवीन
आपडीया!
आता प्रभु म्हणतायत म्हणजे तिथे एड्ल्ट टॉयज मिळत असावीत असे वाटते.
पुणे २९ भलतेच मॉड झाले तर.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 11:38
नवीन
साथ आली असावी बहुतेक
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
Fri, 10/31/2008 - 12:20
नवीन
टायटल लय भारी . वाचल्याव उत्सुकता वाडली व्हती
*
पयल्यांदा लेख आनी माजे बूद्धी ची गाटभेट झाली
आसच लीवत रहा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 10/31/2008 - 14:05
नवीन
प्रभूसर,
ही मुले चांगले विचार करतात, ते अमलात आणताना आईबापाला कुठलीही कल्पना न देता अमलात आणतात. चांगलच तर आहे त्यात काय सांगायचं किंवा विचारायचं असं त्यांना वाटत असावं.
आपल्या चिरंजीवांना पर्यावरणाबद्दल विचार करावासा वाटला हे महत्वाचे.
रेवती
- Log in or register to post comments
क
कपिल काळे
Fri, 10/31/2008 - 14:13
नवीन
संजय अभ्यंकरांशी सहमत..
कॅपॅसिटर वापरल्यामुळे, भारनियमनातून मुक्ती मिळू शकते.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 14:16
नवीन
कसे ते कळेल का?
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 10/31/2008 - 14:21
नवीन
ही माहीती देईन म्हणतो.
चतुरंग
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Fri, 10/31/2008 - 14:23
नवीन
येऊ द्या! वाट बघतो!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 10/31/2008 - 14:26
नवीन
स्वतंत्र विचाराचे झालेत असे नक्की!
आपण जे करतो आहोत त्यातले आपल्या आई-बापांना काही कळत नाही असे त्यांना वाटू लागले की समजावे मुलं मोठी झाली!
(मला माझ्या आई-बाबांबद्दल असे कधी वाटायला लागले होते नक्की आठवत नाही पण त्यामानाने माझ्या मुलाला लवकरच तसे वाटणार आहे की काय अशी शंका मनाला चाटून जाते. ;) )
चतुरंग
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 10/31/2008 - 14:33
नवीन
लेखाच्या निमित्ताने बरीच भोक बुजतील असे दिसते. मुलाच्या बाबतीत तुम्ही म्हणता ते लवकरच होईल हे नक्की. आणि जेवढ लवकर तेवढ बर चतुरंग साहेब.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 10/31/2008 - 16:17
नवीन
छान ! तुमच्या मुलाला पर्यावरणाची काळजी वाटते आहे तो काही करु इच्छितो हे आनंददायक आहे.
शहरात राहणार्या लोकांनी पर्यावरणाची काळजी करत राहण्यापेक्षा आपल्या खिशाची काळजी म्हणून काही केले तरी तो खारिचा वाटाच ठरणार आहे.
कारण खर्च कमी करणे म्हणजे अवास्तव गरजा कमी करणे. आणि अवास्तव गरजा काय आहेत ते ओळखून त्या कमी करणे म्हणजे अध्यात्मिक जीवनाची सुरुवात तसेच उन्नत पार्थिव जीवनाकडे वाटचाल. :)
--लिखाळ.
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Fri, 10/31/2008 - 21:08
नवीन
प्रभू साहेब,
आपल्या मुलाने असा विधायक विचार करावा ही खरेच आनंदाची बाब आहे. तुम्हा तिघांचेही अभिनंदन.
आपला,
(पर्यावरणवादी) भास्कर
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 10/31/2008 - 17:08
नवीन
अभिनंदन..
लेख पटला आणि समजला सुद्धा! बाकी आपल्या पत्नीचेही अभिनंदन.... तुम्हाला तुमच्या लेखनाबद्दल जाणिव करून दिली.. ;) )ह. घ्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Fri, 10/31/2008 - 21:22
नवीन
चला आता आम्हीही काही भोकं बुजवायचा संकल्प सोडतो(खरेतर 'धरतो' म्हणायला हवे.)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 11/01/2008 - 09:13
नवीन
अरे व्वा! भोकता पण छान की..!
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Sun, 11/02/2008 - 16:48
नवीन
कोणत्याही प्रकारे उपलब्ध जैविक, रासायनिक वा विद्युत उर्जेची बचत करण्याकडे कल ही अभिमनास्पद बाब आहे.
जर हेतु हा अशा प्रकारातुन "पॉसीटीव्ह बचत" असेल तर त्याचाच थेट परिणाम आपल्या वार्षीक खरचावर दिसुन तेथेसुद्धा बचत दिसते म्हणजे पर्यायी आपल्याकडुन वातावरणाचे रक्षण करणार्या कुठल्यातरी आवरणाला धोका व्हायचा सोडुन उलट त्याचे पडलेले छिद्र बुजवण्यास मदत होते व त्याचा त्याचाथेट परिणाम आपल्या खिशाचे भोक पण बुजवण्यात दिसतो ही महत्वाची गोष्ट, थोडक्यात काय तर स्वार्थही झाला आणि परमार्थही झाला ...
ह्या बाजुने विचार करणार्या लोकांचे आम्हाला नेहमीच कौतुक वाटते व आज प्रभुसरांच्या मुलाचे अभिनंदन करावेसे वाटते ....
असो. हा प्रकार अतिशय महत्वाचा आहे कारण ही उर्जाकेंद्रे काहीशे वर्षांनी नक्की संपणार व त्या वेळेपर्यंत आपण त्यावर पुर्ण अवलंबुन अशा परिस्थीतीत असु. अशा वेळी जर ह्या गोष्ती वापरायलाच मिळणार नाहीत तर आपली अवस्था चक्क "फ्रीज" केल्यासारखी होईल. ते टाळण्यासाठी काही उपाय शोधायला हवेत व जर त्याची सुरवात आजच आमच्यासारख्या तरुण पिढीकडुन होत असेल तर ह्यासारखे समाधान नाही ...
अवांतर : आजकाल भारतातल्या मोठ्ठ्या शहरात व इकडे प्रत्येकच ठिकाणी घरटी ३-४ चारचाकी किंवा दुचाकी गाड्या दिसतात व मंडळी ती हौसेखातर तुफान वापरतात व त्यातुन जैविक इंधनाची अतोनात नासाडी होते हे पाहुन वाईट वाटते. पण आज जर प्रत्येकाला वेगळी गाडी हा स्तेटस सिंबॉल होणार असेल तर तेलावाचुन सर्व गाड्या धुळ खात पडण्याची वेळ दुर नाही ...
शक्य तितके "सार्वजनिक परिवहन" वापरुन ह्या जैविक इंधनाची बचत करता आली तर पहावे.
कारण हा प्रकार इंस्टंट तयार होत नाही व कॄत्रीम बनवणे अजुन तरी जमले नाही ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
- Log in or register to post comments