Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पिंपळ

श — शिवोऽहम्, Wed, 10/31/2018 - 05:44
त्या तीरावर आहे तो पिंपळ पानांतुन ज्याच्या सळसळते ऋतुंची जाग आणि नखांनी ओरबाडतात ज्याला बिलंदर खारी ढोलीतल्या. तळहातच जणू! पिंपळपानं आहेत काही तांबुस कोवळी रेषांतुन जीवन घेऊन ओलंकंच लालसावलेलं, आभा ल्यालेलं प्रकाशाची. जडमूढ मुळांनी धरली आहे माती घट्ट पसरून आपली बोटं लांबचलांब आपोष्णी करायला पृथ्वीच्या गाभ्यातुन! फांद्यांचे बाहू फेकत अस्ताव्यस्त निळावंतीच्या वाणीने सांगतो तो घरट्यातल्या पिल्लांना आणि चोचीतल्या अळ्यांनाही, जन्मजन्मांतरीच्या कर्मकहाण्या वाऱ्यावर दहादिशा होणाऱ्या रुई-म्हाताऱ्यांच्या नी शीळ वाजवणाऱ्या पक्षांच्या. पांथस्थांच्या सावल्या टेकतात त्याच्या बुंध्याशी सुखदु:खांच्या बोलांच्या नी यतींच्या गभीर पाठांच्या सरी कोसळतात अन आदळतात त्याच्या निबर अंगावर कधी वादळवाटांसारखी माणसं हलवतात त्याला गदगदा पण हंसाच्या वृत्तीनं तो घेतो फक्त कहाण्यांचे अर्क आणि त्यागतो नश्वर, चिकट थेंब कर्मविपाकांचे. नित्य उभा आहे कधीचाच छिलल्या सालीचा पोत मातकट त्याच्या, जीर्णफाटकं महावस्त्र पांघरून जणू उभा असावा पुरातन जखमी अश्वत्थामा!

प्रतिक्रिया द्या
2243 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रमोद देर्देकर Wed, 10/31/2018 - 16:11 नवीन
Mast Kavita avadali.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/02/2018 - 13:05 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/02/2018 - 13:16 नवीन
सुर्रेख!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 11/03/2018 - 04:06 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/05/2018 - 18:04 नवीन
व्वा जबरदस्त
  • Log in or register to post comments
प
पिंट्याराव Mon, 12/10/2018 - 14:46 नवीन
.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा