Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालू घडामोडी : नोव्हेंबर २०१८

ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/01/2018 - 16:14
🗣 106 प्रतिसाद
शक्ती अवतरला ! IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अ‍ॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.  (जालावरून साभार)

प्रतिक्रिया द्या
44090 वाचन

💬 प्रतिसाद (106)
ड
डँबिस००७ Mon, 11/19/2018 - 16:37 नवीन
पुणे पोलिस आता दिग्विजय सींग यांची चौकशी करणार आहे अशी बातमी आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 11/20/2018 - 00:06 नवीन
पोलिसांना जरी पुरावे सापडले असले तरी आता मोदी आणि बीजेपी सुडाचे राजकारण करत आहेत अश्या बोंबा मारायला पुरोगामी सुरुवात करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रम्प Tue, 11/20/2018 - 06:48 नवीन
मला वाटतंय तो फुटक्या मणिशंकर च ना ? ज्याने पाकिस्तानी मीडिया ला भाजप ला सत्तेतून घालवण्यासाठी मदत माघीतली होती ?. मणिशंकर करू शकतो तर दिग्गी करणार नाही कशावरून ? काहीही करून भाजपला सत्तेतून घालवायचे अन समजा काँग्रेस मित्रांचे सरकार आले तर महत्वाचे मंत्रिपद घ्यायचे या साठी लाळघोटे पणा चालला आहे .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/21/2018 - 06:23 नवीन
$1.66 billion security aid to Pak is suspended: Pentagon ट्रंप यांची इतर अनेक धोरणे वादग्रस्त असू शकतील. पण, पाकिस्तानसंबंदीचे त्याचे नुसते धोरणच नव्हे तर कृतीही वास्तववादी आणि कडक राहिली आहे. या आधिच्या अमेरिकन प्रशासनाने केवळ वर वर बोलबच्चन धमक्या देणे पण व्यवहारात पाकिस्तानला आर्थिक व राजकिय पाठबळ पुरवण्यात धन्यता मानली होती. ट्रंप प्रशासनाने मात्र कडक इशार्‍यांबरोबरच आर्थिक व सामरिक मदतीच्या नाड्या आवळणे सुरू ठेवले आहे. यामुळे, पाकिस्तानच्या पंतप्रधानाला आपली राष्टीय जुनी कर्जाविरोधी भाषणबाजी गिळून, कटोरा घेऊन सौदी अरेबिया व चीनकडे कटोरा घेऊन भीक मागायची पाळी आली आहे ! पाकिस्तानने काही वर्षांपूर्वीच येमेनच्या यादवीयुद्धात सौदी अरेबियाला लषकरी मदत करायला नकार देऊन दुखावले आहे, तेव्हा सौदीने पाकिस्तानला मदत केलीच तर, ती (अरबी स्वभावाप्रमाणे) मागच्या नकाराच्या अपमानाचे पूर्ण उट्टे काढणार्‍या अटी टाकूनच करेल. चीन तर पाकिस्तानला कर्जात बुडवून आपल्या दारातला कुत्रा बनवायला टपूनच बसलेला आहे... त्यामुळेच केवळ पाकिस्तान नव्हे तर मालदिव, श्रीलंका, इ देशांतून चीनच्या कर्जाऊ मदतीचा विरोध होत आहे... तिकडे लक्ष न देणे महागात पडेल हे पाकिस्तानी प्रशासनाला सांगण्याची गरज नाही. थोडक्यात, पाकिस्तानची अवस्था, "धोबीका कुत्ता, न घर का न घाट का" अशी झाली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक व सामरिक मदत नाकारण्याचे भारतासाठी सकारात्मक परिणाम होतील... कारण, पाकिस्तान, त्या मदतींचा बराचसा भाग तिच्या मूळ उद्येशांच्या (पक्षी : अतिरेक्यांचा बंदोबस्त) विरुद्ध जाऊन, अतिरेक्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यांना भारत व अफगाणिस्तानविरुद्ध वापरण्यासाठी करत असे. आता, त्या कारवाया संपूर्णपणे बंद होतील असे नाही, तरी किमान, त्यांना मिळणारे अमेरिकन आर्थिक/सामरिक बळ कमी होईल. हे भारताच्या दृष्टीने चांगले आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 11/21/2018 - 11:40 नवीन
डॉ, म्हात्रे सर बातमी बद्दल धन्यवाद ! पाकिस्तानच्या वेगाने घसरणार्या आर्थिक परिस्थीत असताना पाकिस्तानला आताच्या बलशाली व विकासाकडे वेगाने वाटचाल करणार्या भारताकडे बघणे भाग पडत आहे. पाकिस्तानची आर्थिक तसेच सामरीक परिस्थीती ही दयनिय झालेली आहे. चीन शिवाय दुसरा म्हणण्यासारखा दोस्त राहीलेला नाही. पाकिस्तानचे यु ए ई मध्ये ( एतिसलात टेलिफोन कं मध्ये ) ८०० मिलीयन डॉलर्स गेल्या १० वर्षांपासुन अडकुन पडलेले आहेत. ते परत मिळाल्यास बुडत्याला काडीचा आधार ह्या म्हणीप्रमाणे पाकिस्तानला थोडा आधार मिळाला असता पण भ्रष्ट राजकारण्यामुळे प्रत्यक्षात ते दुबईत रहात असुन सुद्धा ह्या पाकिस्तानी राजकर्त्यांना ह्या विषयावर यु ए ई सरकारकडे ( तसेच एतिसलात टेलिफोन कं ) बोलायला धीर होत नाहीय. पाकिस्तानात आता भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करुन कदाचीत पुढे भारताशी संलग्न व्हाव असा मत प्रवाह सुरु झालेला आहे. आता हा व असा मत प्रवाह आता अखंड भारत ह्या संकल्पनेला विरोध करणार्या लोकांना जड जाणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विशुमित Wed, 11/21/2018 - 16:37 नवीन
कभी खुशी कभी गम..!! https://www.loksatta.com/maharashtra-news/unseasonal-rain-in-pune-jilha-and-maharashtra-farmers-are-in-worry-1793078/
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 11/21/2018 - 16:53 नवीन
नॅशनल हेराल्ड केस मधली कोर्टातल्या घडामोडी श्री सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्विटर हँडल वरुन जनतेला देत असत, रा गांधी व सोनिया गांधी या केस मध्ये आरोपी असुन सध्या बेल वर बाहेर फिरत आहेत. ह्या केस संबंधातल्या बातम्या दर रोज जनते पर्यंत पोहोचत असल्याने सध्या निवडणुकीच्या धामधुमीत गांधी परीवाराची पत घसरत होती त्यावर उपाय म्हणुन श्री सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध मोतीलाल व्होरा हे कोर्टात गेले ! पण कोर्टाने काही ऐकल नाही ! श्री सुब्रमण्यम स्वामी पुर्वी प्रमाणे ट्विटर हँडल वरुन जनतेला माहिती देउ शकतील ! https://youtu.be/BsXRVW8jqXY
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 07:44 नवीन
भारताच्या आंदमान निकोबार मधील उत्तर सेंटीनेल बेटावरील सेंटीनेल आदीवासींना आधुनिक जगातील कुणाचाही संपर्क नको असतो. ते त्यांचे जिवन शिकार करुन उदरनिर्वाहावर पारंपारीक पद्धतीने जगतात. संपर्क तोडून असलेल्या आदिवासींशी संपर्काने त्यांचे आयुष्यमान आणि स्वतंत्रापणे जगण्याचे स्वातंत्र्य पहाता पहात हिरावले जाते हे अनेक अभ्यासातुन सिद्ध झाले. स्वतंत्रपणे जगणार्‍या जरावा नावाच्या आदीवासी जमातीचे कसे दुर्दैवी भिकारीकरण झाले या बद्दल पंडीत नावाच्या पहिल्या संपर्क करणार्‍या मानववंश शास्त्रज्ञाचॉ हि मुलाखत डोळ्यात अंजन घालणारी असावी. भारतीय सरकार ते न्यायालय आधुनिक मानवी संपर्कापासून दूर राहू इच्छिणार्‍या उत्तर सेंटीनली जमातीस संपूर्ण संरक्षण पुरवते. चाऊ नावाचा आमेरीकी ख्रिश्चन मिशनरी ह्या सर्वाची, कायद्यांची पूर्ण माहिती असूनही भारतीय कायदे धाब्यावर बसवून एक अ‍ॅडव्हेंचर म्हणून त्या आदिवासींचे ख्रिश्चनीकरण करण्यासाठी उत्तर सेंटीनली बेटावर जाऊन मारला गेला. बेकायदेशीरपणे सेंटीनेल बेटावर नेऊन पोहोचवण्याकरता या चाऊ ने ३२५ डॉलर म्हणजे जवळपास २३ हजार रुपये आंदमानी मच्छिमारांना मोजले. हे बेकायदेशीर कृत्य करण्यापासून आंदमान निकोबार वरील त्याचे चर्च मित्र ते त्यांच्या कुटूंबीयांना अशा अ बेकायदेशीर कृत्याची कल्पना असूनही त्यांनी त्याला थांबवले नाही . भारत सरकार किंवा आंदमान निकोबार स्थानिक सुरक्षा यंत्रणा किंवा प्रशासना पासून असे कुणि काही करु पहाते आहे याची पुर्वसूचनाही दिली नाही. या चर्च मिशनर्‍याला पैसे पुरवणारे आमेरीकन चर्च आणि पब्लिक या वर पडदा टाकु इच्छित दिसतात . त्या चाऊने आम्हाला सांगितले होते पण आम्ही त्यालाही थांबवले नाही आणि प्रशासनालाही कळवले नाही याची कबुली ना कुटूंबीय देतात ना चर्च या चाऊच्या उपद्व्यापांना आर्थिक बळ पुरवणारे कुटूंबीय आहेत की चर्च माहित नाही पण तेही चाऊ एवढेच बेजबाबदार आहेत असे म्हणावेसे वाटते. मुख्य म्हणजे सांस्कृतिक र्‍हासास कारणिभूत ठरु शकतील अशा धर्मांतरणांवर आमचा देश कायदेशीर बंधने टाकण्यात नेहमीच कमी पडला हे प्रत्येक वेळी अधोरेखीत होत गेले तरी भारतीयांना झोपेतून कधी जागे व्हावेसे वाटलेले नाही. संदर्भ वृत्त
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 11/22/2018 - 08:15 नवीन
ख्रिश्चन मिशनर्‍यांचे असे प्रताप इंग्रजांच्या भारतातील राजवटी पासून सुरु आहेत, त्यात नवीन काहीच नाही! भारतीयांचे खरे शत्रू मुस्लीम नसून मिशनरी आणि धर्मांतरित ख्रिश्चन लोकं आहेत! कॉंग्रेस सोडून कुठलाही पक्ष सत्तेत असेल तर त्यांच्या कारवायांवर मर्यादा येतात म्हणून चर्च मधे कॉंग्रेसला मत द्या असा प्रचार उघडपणे चालतो! किती कॉंग्रेस नेते आपली नावे हिंदू लावत असले तरी त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याबद्दल एक लेख मागे वाचनात आला होता! त्यात चिदंबरम यांचेही नाव होते! ख.खो.दे.जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 10:06 नवीन
...भारतीयांचे खरे शत्रू मुस्लीम नसून मिशनरी आणि धर्मांतरित ख्रिश्चन लोकं आहेत!...
भारतीय उपमहाद्वीपातील बहुसंख्य मुस्लिम किंवा बहुसंख्य ख्रिश्चन असोत ते मूळचे भारतीयच निघतील त्या बाबत शंका घेण्याचे अथवा समुदाय विषयक शत्रुत्व बाळगण्याचे कारण नसावे. प्रश्न भारत बाह्य खासकरुन अब्राहमिक तत्वज्ञानांच्या मग ते इस्लाम असो अथवा ख्रिश्चन असो आम्ही आणि आमच्या शिवाय इतर कुणि नाही याबाबत अतिरेकी एकलवादाच्या आग्रहाने स्थानिक संस्कृतींबद्दलच्या अनादराने निर्माण होतो - कालानुरुप सांस्कृतिक बदल आणि अभिसरण वेगळे आणि चालू संस्कृतीचा खूनपाडून दुसरी बाह्य संस्कृती आणून लादणे वेगळे आणि त्यातही आमचा धर्म आणि तत्वज्ञान होलीअर दॅन दाऊ वाली वृत्ती आक्षेपार्ह वाटते. दक्षिणेत मेणबत्ती एवजी समई लावणारे भारतीय संस्कृतीला जागा देणारे चर्च आहेत त्या बाबत आपुलकी वाटते. शीख पंथ स्वतःचे वेगळेपण जपताना सांस्क्रुतिक र्‍हास होऊ देत नाही, किंवा अगदी इराणमध्ये उगम पावलेला बहाई धर्म भारतीय उगमाचा नसुनही इतर सर्व धर्मांना समानतेने स्विकारतो तेव्हा त्या बाबतही मनात नाराजी उत्पन्न होत नाही. त्या शिवाय भारत बाह्य विचारधारेचा स्विकार करणे एकवेळ समजता येते त्या सोबत भारत बाह्य देशांची अप्रत्यक्ष मानसिक गुलामगिरी ज्यात मग भारतीय लिपी शोधून रोमन ते फार्सी-अरेबीक लिपी वापरणे असो वा आर्थिक दृष्ट्या भारत बाह्य देशांशी नाळ कृत्रिमपणे जोडताना स्वदेशीयांच्या हितांकडे दुर्लक्ष करणे असो या वास्तविक खुपणार्‍या बाबी असाव्यात. भारतीय तत्वज्ञानात आणि संस्क्रुतित इतरत्रचे तत्वज्ञान आणि संस्कृतितील चांगल्या गोष्टी स्विकारण्याचा पुरेसा मोकळेपणा आहे . भारतात या भारतातील गुरुजनांशी भेटून तुमच्या तत्वज्ञानातील आणि संस्कृतीतील चार चांगल्या गोष्टी शेअर करा आमच्याही चार चांगल्या गोष्टी घ्या त्यासाठी चालू संस्कृतीचा खूनपाडून दुसरी बाह्य संस्कृती आणून लादण्याची गरज अनाकलनीय वाटते. बाकी याझिदी किंवा कलश या विषयावर गूगल शोध देऊन बघा किंवा सोबत ex-muslim असा सर्च युट्यूबवर अद्याप दिला नसल्यास माजीमुसलमानांची स्वतःची मनोगते ऐका, धर्मांतरे घडवताना केल्या जाणार्‍या इस्लामी क्रौर्याचे दर्शन -बीना फेक न्यूज -२१व्या शतकातही होऊ शकावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 10:09 नवीन
....भारतीय लिपी सोडून रोमन ते फार्सी-अरेबीक लिपी वापरणे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गवि गुरुवार, 11/22/2018 - 09:52 नवीन
भारतीय सरकार ते न्यायालय आधुनिक मानवी संपर्कापासून दूर राहू इच्छिणार्‍या उत्तर सेंटीनली जमातीस संपूर्ण संरक्षण पुरवते.
ते वेगळ्या बेटावर प्रथमपासून आहेत. कोणी तिथे येऊ गेला तर ते हल्ला करतात. त्यांच्यात बाकीच्या जगातल्या रोगांची इम्युनिटीही नाही. असे अनेक मुद्दे वाचण्या ऐकण्यात येतात. वेगळ्या बेटावर नसलेल्या पण भारतीय भूमीवर landlocked एरियात राहणाऱ्या एका समाजाने शस्त्रे घेऊन इतर भारतीयांना (पोलीस, मिलिटरी आणि अन्य प्रदेशातल्या नागरिकांना) क्ष एरियात येण्यास मज्जाव केला, आणि तरीही येऊ पाहिल्यास सशस्त्र हल्ला केला तर ते "सहन केलं जाईल आणि त्यांना खास जमात / समूह म्हणून अस्तित्व जपण्यासाठी संरक्षण दिलं जाईल" की मिलिटरी हल्ला करून, अटक / शिरकाण करून एरिया ताब्यात घेतला जाईल? एक तात्विक प्रश्न. यातून अंदमान केसमधल्या निसटत्या बाजूही दिसल्या तरी चांगलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
mrcoolguynice गुरुवार, 11/22/2018 - 11:25 नवीन
वेगळ्या बेटावर नसलेल्या पण भारतीय भूमीवर landlocked एरियात राहणाऱ्या एका समाजाने शस्त्रे घेऊन इतर भारतीयांना (पोलीस, मिलिटरी आणि अन्य प्रदेशातल्या नागरिकांना) क्ष एरियात येण्यास मज्जाव केला, आणि तरीही येऊ पाहिल्यास सशस्त्र हल्ला केला तर ते "सहन केलं जाईल आणि त्यांना खास जमात / समूह म्हणून अस्तित्व जपण्यासाठी संरक्षण दिलं जाईल" की मिलिटरी हल्ला करून, अटक / शिरकाण करून एरिया ताब्यात घेतला जाईल? एक तात्विक प्रश्न. यातून अंदमान केसमधल्या निसटत्या बाजूही दिसल्या तरी चांगलं.
आयोव ! गुगली / दुसरा / फ्लिप्पर / कॅरम कुठल्या प्रकारची शैली गविजी तुमची ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/22/2018 - 12:44 नवीन
सरळ लिहितात की टोमणे असतात काही समजत नाही. ते ऑनलाइन आले की आम्ही ऑफ लाइन जातो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
अ
अथांग आकाश गुरुवार, 11/22/2018 - 15:20 नवीन
ते ऑनलाइन आले की आम्ही ऑफ लाइन जातो.
तेच बरं आहे! नाहीतरी तुमच्या बालिश कॉमेंटस वाचायला कंटाळाच येतो! ॲड. प्रो. डॉ. (स्वयंघोषित) अथांग आकाश Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 13:20 नवीन
माहितगार अजून चर्चेत आहेत, निसटत्या बाजूंची काळजी करण्यासाठी आणि गूगलींना अभ्यासपूर्णपणे झेलण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 13:21 नवीन
'न थकता अखंडप्णे'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गवि गुरुवार, 11/22/2018 - 13:46 नवीन
हॅ हॅ हॅ.. वस्ताद आहात. कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विशुमित गुरुवार, 11/22/2018 - 13:51 नवीन
त्यासाठी नेमके काय खाता तुम्ही? मशरुम्स वगैरे असे काही?? शंखपुश्पी..?? एक कुतूहल म्हणून विचारले. ... मराठी समग्र कसे लिहितात हे तुमच्या प्रतिसादांवरून मला प्रथम समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डँबिस००७ गुरुवार, 11/22/2018 - 08:59 नवीन
मुख्य म्हणजे सांस्कृतिक र्‍हासास कारणिभूत ठरु शकतील अशा धर्मांतरणांवर आमचा देश कायदेशीर बंधने टाकण्यात नेहमीच कमी पडला हे प्रत्येक वेळी अधोरेखीत होत गेले तरी भारतीयांना झोपेतून कधी जागे व्हावेसे वाटलेले नाही. ख्रिश्चन मिशनर्‍यांचे असे प्रताप इंग्रजांच्या भारतातील राजवटी पासून सुरु आहेत, त्यात नवीन काहीच नाही! गेल्या काही दिवसात बर्याच नविन गोष्टी वाचनात आल्या त्यात महत्वाची म्हणजे, जेंव्हा ईस्ट ईंडिया कंपनी भारतात आली त्यावेळेला त्यांच्या बरोबर ख्रिश्चन मिशनर्‍यांचे लोंढे पोपच्या आशिर्वादाने भारतात यायला तयार होते. पण फक्त आर्थिक फायद्याच्या आशेने आलेल्या ईस्ट ईंडिया कंपनीला त्यांच्या कामात काही प्रॉब्लेम / अडथळा नको होता म्हणुन त्यांनी ह्या ख्रिश्चन मिशनर्‍यांना नकार दिला. त्यामुळे जेंव्हा पहीला गव्हर्नर कोलकत्ता मध्ये आला. त्यांच्याकडे ह्या ख्रिश्चन मिशनर्‍यांकडुन एक पत्र गेल की भारतात सतीची प्रथा आहे व त्या विरुद्ध गव्हर्नरने सती विरुद्ध कायदा करावा. त्याचे पडसाद ब्रिटीश पार्लमेंट मध्ये असे केले गेले की भारतीय हिंदु समाज हा खुपच मागासलेले असल्याने त्यांना धर्म परिवर्तना शिवाय मुक्ती नाही. त्यामुळे भारतात ख्रिश्चन मिशनर्‍यांना परवानगी मिळावी. कलकत्ताच्या गव्हर्नरने सती विरुद्ध कायदा केला व दुसर्या दिवसापासुन बंगाल मध्ये सती जाणे बंद झाले. त्या मागचे कारण असे होते की सती जाण्याची प्रथा भारतात फक्त राजस्थान व गुजरातेत आहे. त्या मुळे असेही बंगाल मध्ये सती जाण्याची घटना घडत नव्हती. मुळ निवासींना मागासलेले दाखवुन त्या प्रदेशावर विजय मिळवुन तेथे सत्ता काबिज करणे हा युरोपियन लोकांचा नेहेमीचा प्रकार होता. खुद्द अमेरिकेतही रेड ईंडीयंसना असेच मागासलेले दाखवुन शेवटी त्यांची हत्त्या करण्यात आली. भारतात लोक काम करणारे असल्याने त्या वर्क फोर्सचा फायदा ब्रिटीशांनी उचलला. गोव्यात पोर्चुगीजांनी किती अत्याचार केलेला होता ह्याची कल्पना गोव्याच्या आजुबाजुला व भारतात ईतरत्र रहाणार्या लोकांना कधीच नव्हती. पण ती कल्पना आता गोव्यात रहाणार्या लोकांना सुद्धा नाही. ह्या अत्याचाराच्या मागे असलेल्या व्हॅटीकन पोपने रवांडा सारख्या आफ्रिकेच्या छोट्या देशाची माफी मागीतली पण गोव्याच्या जनतेची भारतासारख्या मोठ्या देशाची माफी कधीही मागीतली नाही. गोव्यात ह्या पोर्चुगीजांनी किती हिंदु व नविन ख्रिश्चन लोकांची हत्या केली त्याची गणतीही नाही. त्या बद्दल एक व्हीडीयो आवर्जुन बघावा असा आहे. Goa Inquisition : Lest We Forget -- A Talk By Shefali Vaidya https://www.youtube.com/watch?v=6nEseljBZ-c&t=8s
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके गुरुवार, 11/22/2018 - 10:34 नवीन
By Mahabaleshwar Sail is a must read for those who want to know more. Bookganga.com says, very aptly, of this book: सोळाव्या शतकात पोर्तुगीज भारतात पश्चिम किनाऱ्यावर येऊन थडकले आणि त्यांनी गोवा हे बेट आपल्या ताब्यात घेतलं. पण केवळ प्रदेशावर सत्ता प्रस्थापित करून ते थांबले नाहीत. जो धर्म राजाचा तोच प्रजेचा असला पाहिजे, या धर्मवेडानं पछाडलेल्या या सत्तेनं प्रजेचं धर्मातर करण्यासाठी, त्यांना ख्रिश्चन करण्यासाठी त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले. छळ केला. त्या अत्याचारांचं रौद्र रूप म्हणजेच 'तांडव'. अडोळशी गावात घडणारी ही कहाणी त्या वेळच्या संपूर्ण गोव्याचं एक सामाजिक, मानसिक आणि श्रद्धेय जग उभं करतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
प
प्रचेतस गुरुवार, 11/22/2018 - 10:38 नवीन
'तांडव' खूपच जबरदस्त आहे. सार्वकालिक सर्वोत्तम कादंबर्‍यांपैकी एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविकिरण फडके
अ
अथांग आकाश गुरुवार, 11/22/2018 - 14:50 नवीन
त्या काळी भारतात आलेले मिशनरी आणि धर्मांतरित झालेले लोकं ज्यांना ईस्ट इंडियन ख्रिस्चन म्हंटले जाते त्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या निष्ठा या कधीच भारताशी नव्हत्या/नाहीत! भारतातील अत्यंत कर्मठ ख्रिस्चन म्हणून त्यांची ओळख आहे! हिंदू-मुसलमानांमध्ये कायम तेढ राहण्यासाठी हे लोकं सातत्याने प्रयत्नशील असतात! स्वतःच्या शिक्षणापासून घर घेण्या/बांधण्या, लग्ना पर्यंत चर्च कडून मदत घेणारी हि लोकं नंतर सहकर्मचारी/ शेजाऱ्यांशी अशा काही अढ्येतेखोरपणे आणि इतरांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल अशा पद्धतीने वागतात कि काय सांगावे! कॉनव्हेंट शाळांमध्ये मुलांना भरती करण्यासाठी आज आपल्यातील अनेक लोकं प्रचंड उत्साही दिसतात, पण दुर्दैवाने त्या पढ्या-लीख्या गावारांना हे देखील माहिती नसते कि कॉनव्हेंट शाळा या चर्च ने अनाथ मुला/मुलींसाठी सुरु केल्या होत्या! तोच प्रकार आता CBSE आणि ICSE च्या बाबतीतही बघायला मिळतो! जिथे जन्मले, तिथेच मरेपर्यंत नोकरी/व्यवसाय करणारे लोकही आपल्या पाल्यांना स्टेटस सिम्बॉल म्हणून CBSE आणि ICSE शाळांमध्ये भरती करताना बघितले कि हसायलाच येते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रम्प Fri, 11/23/2018 - 11:50 नवीन
कसलं आलंय कर्मठ ख्रिश्चन . गेल्या दोन तीन शतकातील ख्रिश्चनांचा लैंगिक स्वैराचार बघितला तर हिंदू धर्म कधीही श्रेष्ठ वाटतो . किमान आपल्या धर्मात मंदिरातील पुजारी बलात्कार केस मध्ये सापडले तर सर्वात अगोदर भक्तगण त्यांना तुडवतील मग पोलिसांच्या स्वाधीन करतील . पण त्यांच्यात केरळ मधील पाद्र्याना वर्षभर पोप ने संरक्षण दिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश
ड
डँबिस००७ गुरुवार, 11/22/2018 - 10:45 नवीन
ह्या अत्याचाराच्या मागे असलेल्या व्हॅटीकन पोपने रवांडा सारख्या आफ्रिकेच्या छोट्या देशाची माफी मागीतली पण गोव्याच्या जनतेची भारतासारख्या मोठ्या देशाची माफी कधीही मागीतली नाही. देशाच्या सरकारात धमक नसेल तर व्हॅटीकनचा पोपच काय पण, दुसरा कोणताही सोम्या गोम्यापण त्या देशाला भित नाही.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 11/22/2018 - 11:30 नवीन
देशाच्या सरकारात धमक नसेल तर व्हॅटीकनचा पोपच काय पण, दुसरा कोणताही सोम्या गोम्यापण त्या देशाला भित नाही.
तुमचे म्हणणे सयुक्तिक वाटते पण २०१४ नंतर परिस्थिती बदलली नं ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 12:24 नवीन
असंच काही नाही देशाची दयनीय परिस्थिती एक माणुस एक सरकार बदलू शकत नाही. अटल बिहारींच्या काळात वाच्यता न करता पुरुलीया प्रकरणातील अपराध्याना सोडावे लागले तर या सरकारला केरळातील मासेमार्‍यंचा खून करणार्‍या इटालीयन हिरोंना इटलीत जाऊ द्यावे लागले. देशाच्या वील पॉवर साठी प्रत्येक नागरीकाची वील पॉवर खर्ची घालण्याची तयारी पाहिजे ती भारतीयात नीटशी कधीच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
M
mrcoolguynice गुरुवार, 11/22/2018 - 12:47 नवीन
देशाची दयनीय परिस्थिती एक माणुस एक सरकार बदलू शकत नाही. "पण देशाची दयनीय परिस्थिती एकंच माणुस बदलू शकतो "..( सिंगल हिरो सिंड्रोम ), अशी विचारसरणी लोकांच्या मनात का बरे बिंबली /बिंबवली गेली असेल ? ती विचारसरणी कशी (सकारात्मकपणे ) बदलता येईल ??
देशाच्या वील पॉवर साठी प्रत्येक नागरीकाची वील पॉवर खर्ची घालण्याची तयारी पाहिजे ती भारतीयात नीटशी कधीच नव्हती.
वील पॉवर का नाहीये ? का तयार झाली नाही / का होऊ नाही दिली गेली ? का तयार होत नाही / का होऊ नाही देत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 11/22/2018 - 17:28 नवीन
वील पॉवर का नाहीये ? का तयार झाली नाही / का होऊ नाही दिली गेली ? का तयार होत नाही / का होऊ नाही देत ?
आपले हे प्रश्न खरेच कळीचे आहेत.
"पण देशाची दयनीय परिस्थिती एकंच माणुस बदलू शकतो "..( सिंगल हिरो सिंड्रोम ), अशी विचारसरणी लोकांच्या मनात का बरे बिंबली /बिंबवली गेली असेल ? ती विचारसरणी कशी (सकारात्मकपणे ) बदलता येईल ??
उर्वरीत देशांचे माहित नाही भारतात तरी 'व्यक्तीपूजा', 'परिवारपूजा', 'ग्रंथपूजा' या समस्या गंभीरच आहेत. विचारसरणी बदलता येते का माहित नाही. ग्रंथपूजेचा उतारा आणखी नव्या कथा-काव्य लेखनात असतो, व्यक्तीपूजेचा उतारा मुर्तीपुजेनेच होतो, हे भारतीयांना ठाउक आहे. परिवार पूजेचा उतारा मात्र अद्याप भारतीयांना ठाऊक नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/22/2018 - 10:49 नवीन
......... व्हॅटीकनचा पोपच काय पण, दुसरा कोणताही सोम्या गोम्यापण त्या देशाला भित नाही." + १
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 11/22/2018 - 14:13 नवीन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा भूतकाळ त्यांची पाठ सोडायला तयार नाही. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/shah-three-ips-oicers-principal-conspirators-probe-oicer/articleshow/66742725.cms .... कॅर्नल आणि साध्वीला दिलासा मिळाला अशी वदंता होती पण त्यांचं काय अजून अलबेल नाही. .... नॅशनल हिर्लाड प्रकरणी माय-लेकरांवर पण टांगती तलवार आहे. .... सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीचा गाडीवान बैलं सावलीला सोडून कुठे फरार झालाय देव जाणं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/24/2018 - 15:51 नवीन
After historic sixth world title, Mary Kom sets eyes on 2020 Tokyo Olympics gold मेरी कोमने प्रतिस्पर्ध्यावर ५-० असा विजय नोंदवित आपल्या टोपीत अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. मुष्टियुद्धात जागतिक पातळीवर सहावे सुवर्णपदक मिळवून तिने जागतिक विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे. पुरुष गटातही आजवर सहा सुवर्णपदके हाच विक्रम आहे. या गुणी खेळाडूचे जेवढे अभिनंदन करावे व आभार मानावे तेवढे थोडेच आहेत !!!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/24/2018 - 15:59 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/insolvency-law-help-address-rs-3-lakh-cr-stressed-assets-in-2-yrs-official/articleshow/66783251.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/24/2018 - 16:01 नवीन
https://www.news18.com/news/india/dont-need-money-for-6-months-arun-jaitley-on-seeking-rbis-surplus-reserves-1949203.html
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/30/2018 - 08:08 नवीन

ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है ?!

China signals displeasure to Pakistan with map depicting PoK in India CGTN (China Global Television Network) हा चिनी सरकारचे अधिकृत टिव्ही चॅनल आहे. नुकत्याच कराची येथिल चिनी उपवकिलातीच्या (काऊन्सलेट) इमारतीवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची बातमी देताना या चॅनलने दाखविलेल्या नकाशात पाकिस्तानव्याप्त काश्मिर भारतामध्ये दाखवला. चिनी सरकार, केवळ त्यांने अधिकृत केलेलेच नकाशे वापरावे याबद्दल अत्यंत आग्रही असते. हा नियम केवळ चिनी संस्थाच नव्हे तर चीनमध्ये काम करणार्‍या सर्व चिनी/गैरचिनी संस्था व तेथे प्रसिद्ध होणार्‍या सर्व माध्यमांना पाळावा लागतो. यातून गुगल, मायक्रोसॉफ्ट, इत्यादी महाकंपन्यांनाही जरासुद्धा सूट नाही. या कारणासाठी, मान्य असो वा नसो, आंतरराष्ट्रिय कंपन्याना चीनसाठी चीनी सरकारमान्य नकाशा आणि बाकी सगळ्या जगासाठी दुसरा नकाशा असे नेहमी करावेच लागते. चिनी संस्थांनी सरकारमान्य नसलेला नकाशा जवळ बाळगणे हा दंडनिय अपराध आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द चिनी सरकारच्या माध्यमाने, पाकिस्तानव्याप्त काश्मिर भारतामध्ये दाखवणे, लक्षणिय गोष्ट आहे. मात्र, आताच चीन-पाकिस्तानचे वाजले, असे म्हणून आनंद साजरा करायची गरज नाही ! कारण, बर्‍याचदा चीन असे माध्यमांतले फुगे हवेत सोडून, (अ) दुसर्‍या देशाला सूचना देतो (पोश्चरिंग) आणि (आ) त्या देशाच्या प्रतिक्रियेवरून पुढची रणनिती आखतो. तेव्हा, ही गोष्ट पाकिस्तानशी संबंध खूप खराब झाले आहेत असे समजण्याऐवजी, चीनने पाकिस्तानला, "सुधारून घे भाऊ आणि आपल्या चड्डीत रहा" असे सांगितले आहे, असे समजणे जास्त संयुक्तिक होईल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 11/30/2018 - 08:35 नवीन
चीनी लोक सहसा नकाशांबाबत भोंगळ नसणार. त्यांनी चूक केली तर केवढी बातमी होऊ शकते. चीनी वृत्त माध्यमातील आपण म्हणत असलेल्या नकाशाची लिंक मिळाली नाही पण अक्सई चीन चिन मध्ये दाखवून पिओके भारतात दाखवले असेल तर ते मुद्दाम केलेले असू शकते पण अक्सई चीन सहीत पि ओ के भारतात दाखवला असेल तर नकाशांबाबत फारशी माहिती नसलेल्या चिनी व्यक्ती कडून अनवधानाने गल्लत झाली असू शकते - आणि हि शक्यता अधिक वाटते. कारण चीन महासत्ता आहे आणि पाकीस्तान आर्थीक अडचणीत असताना चीनशी पंगा घेणार नाही, पाकीस्तानला वाकवण्यासाठी पडद्या मागे असे थातूर मातूर काही करण्यापेक्षा पाकीस्तानी लोकांना दमात घेण्याची पुरेशी क्षमता चीनी लोकांकडे नक्कीच असणार असे वाटते. पाक व्याप्त काश्मिर भारतात दाखवला आहे की पाकीस्तानात हे बारकाव्यांबाबत नजर सरावल्या शिवाय समजणे जरासे अवघड जाते . असंख्य भारतीय पूर्ण काश्मिर भारतात दाखवणारा नकाशा न वापरता पाकव्यप्त काश्मिर पाकीस्तानात दाखवणारे तिसर्‍या देशातील दृष्टीकोणांचे नकाशे वापरत असतात. तरीही भारतीयांचे भारताच्या नकाशांप्रती अज्ञान अनास्था आणि भोंगळपण खेदकारक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/30/2018 - 08:45 नवीन
नकाशांबाबत फारशी माहिती नसलेल्या चिनी व्यक्ती कडून अनवधानाने गल्लत झाली असू शकते चिनी संस्थांनी सरकारमान्य नसलेला नकाशा जवळ बाळगणे हा दंडनिय अपराध आहे. हा मुद्दाम ठळक केलेला मजकूर नजरेआड झालेला दिसतोय. शिवाय, तो नकाशा कोणी ऐर्‍यागैर्‍या माध्यमांतर्फे नाही तर चीनी सरकारच्या अधिकृत माध्यमातर्फे दाखविला गेला आहे... अश्या बाबतीत गलथानपणा करणे चीन सरकारमध्ये भारत सरकारइतके सामान्य समजले जात नाही, तेथे अश्या गोष्टींसाठी वरपासून खालपर्यंत सर्व अधिकार्‍यांना कडक शिक्षा होते. मुख्य म्हणजे, चीनी सरकारी (आणि बहुतांश महत्वाच्या गैरसरकारी) संस्था एका समन्वयित (coordinated) प्रणालीचा भाग असतात व त्या सरकारची तातकालिक व दीर्घ मुदतिची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी चालवल्या जातात... त्यांना स्वतंत्र आस्तित्व नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डँबिस००७ Fri, 11/30/2018 - 09:14 नवीन
भारतात कृृृृतग्घ्न लोकांची कमी नाही. पुर्ण काश्मिरवर भारताचा दावा चुकीचा आहे असे मानणारे महाभाग भारतात रहातात. प्रशांत भुषण, अरुंधती रॉय हे त्या पैकीच काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Fri, 11/30/2018 - 09:47 नवीन
ए.एम.यु. मधील जुलै २०१८ चा हा तु नळीवरील व्हिडीओ बघा. कोण काश्मिरी हमिदा नयिम आहे तिला ए.एम.युत व्यासपीठ मिळते वगैरे पण या व्हिडीओच्या सुरवातीस ए.एम.यु कार्यक्रमातील अँकर 'दुनिया की सबसे बडी जम्हुरीयत कश्मिरमे कितनी खुबसुरत नजर आ रही है" म्हणून खोचक डायलॉग मारतो त्यावर ए.एम.यु. श्रोत्यांच्या टाळ्यांचा अर्थ नेमका काय आणि कसा काढणार ? त्याच व्यासपिठावर अर्बन नक्षलांचे असणे माझ्या डोळ्यातून सुटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार Fri, 11/30/2018 - 09:51 नवीन
....भारतात कृृृृतग्घ्न लोकांची कमी नाही.....
भारतात यांना नेमके काय कमी पडते की तथाकथित लोक थाळीत छेद करण्यास तयार होतात तेच समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
माहितगार Fri, 11/30/2018 - 09:40 नवीन
@ म्हात्रेजी, राजकारणात अशक्य काहीच नसते हे स्वतः चिनी लोकांचे पारंपारीक तत्वज्ञान आहे पण तरी सुद्धा आपण म्हणता तसे जाणीवपुर्वक असेल तर चीनची बरीच मोठी कोलांट उडी ठरेल. चीन एवढ्यात अशी कोलांट उडी मारेल असे व्यक्तिशः वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/30/2018 - 11:04 नवीन
माहितगारजी, चीन एवढ्यात अशी कोलांट उडी मारेल असे व्यक्तिशः वाटत नाही. हे मी कधी म्हटले आहे ?! माझ्या लेखनातिल सर्व मजकूर न वाचताच तुम्ही अगोदरचा व हा प्रतिसादसुद्धा लिहिला आहे असे वाटते आहे ! :) सर्व मजकूर व विशेषतः शेवटचा परिच्छेद वाचल्यास... "या इतक्या कारवाईमुळे चीनची रणनिती बदलली आहे हे सिद्ध होत नाही. किंबहुना, हा केवळ संदेश धाडण्याचा (पोश्चरिंग) प्रकार आहे", अश्या स्पष्ट अर्थाचा मजकूर मी लिहिल्याचे ध्यानात येईल. मात्र, ही कृती चुकीने झालेली नसून, पाकिस्तानला दिलेला इशारा आहे, याबाबत संशय नाही. या कृतीची मुख्य कारणे अशी आहेत... (अ) पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवर सतत होणारे हल्ले, (आ) चीनच्या पाकिस्तानातील प्रकल्पांवर पाकिस्तानात सतत होणारी टीका, (इ) पाकिस्तानच्या भूमीवर एका चीनी व्यवस्थापकाची झालेली हत्या, (ई) आता नुकताच कराचीतील चिनी उपदुतवासावर झालेला हल्ला... आणि (उ) या सगळ्यांबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात पाकिस्तानला आलेले अपयश (किंबहुना, मुद्दाम केलेले दुर्लक्ष).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 11/30/2018 - 11:27 नवीन
..मात्र, ही कृती चुकीने झालेली नसून, पाकिस्तानला दिलेला इशारा आहे, याबाबत संशय नाही....
१) असे इशारे चुकार न ऐकणार्‍यांना दिले जातात, इम्रानखानच्या पक्षाने 'चीनच्या पाकिस्तानातील प्रकल्पांवर अंशतः टिका केली असेल नाही असे नाही -इम्रानखान ने कितीही गप्पा मारल्या तरीआर्थीक स्थिती वाईट असताना व्चीनचे पडद्यामागचे इशारे इम्रानखान आणि पाकी लष्कराला पुरेसे असावेत - पण चीनला असा जाहीर इशारा द्यायचा असता तर चीनने इम्रानखानच्या भेटीच्या आधी किंवा भेटी दरम्यानच दिला असता. जसे त्यांच्या अध्यक्षाची मोदींसोबत भेट चालू असताना चीनी सैन्याने घुसखोरी केलेली होती. २) काश्मिरचा काही भाग पाकीस्तानने चीनला आंदण दिलेला आहे, आणि समजा उद्या पाकव्याप्त काश्मिर भारताचे झाले तर तो भूभाग भारतास देऊ असे चीनने भारतास कबूल केलेले आहे. पाकव्याप्त काश्मिर भारतास मिळाले तर आंदण मिळालेल्या भूभागावर चीनला पाणी सोडावे लागेल शिवाय त्या भागाने भारत आणि अफगाणीस्तान जोडले जातील . भारता सोबत उर्वरीत सीमा विवाद सुटेपर्यंत , काही मोठी चूक केल्या शिवाय चीन पाकिस्तानसोबत इशार्‍यांचा खेळ खेळण्याची शक्यताही व्यक्तीशः कमी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Sat, 12/01/2018 - 06:52 नवीन
राजस्थानमध्ये बी एस एफ ने केलेल्या धार्मीक कल विषयक पहाणीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडीयाने दिले आहे . बॉर्डर सेक्युरीटीवर शक्य असलेल्या प्रभावांचा सुरक्षा दलांनी त्यांच्यापुरता अभ्यास करण्यास काळजी वाटणार्‍या गोष्टींची माहिती सरकारला देण्यास हरकत नाही. पण सुरक्षा दले म्हणजे समाजशास्त्रीय अभ्यासातील पारंगत व्यक्ती नव्हेत त्यांच्या पहाण्यांच्या आधारावर अधिक सखोल अभ्यास आणि विचार विमर्शासाठी अशा पहाण्या आधी विद्यापीठांकडे गेल्या पाहीजेत. अर्थात विद्यापीठातील प्राध्यापकांनी आपण परदेश धार्जीणे असल्यासारखे वागू नये तरच त्यांच्या अभ्यासाला अर्थ उरतो हे हि लक्षात घेणे महत्वाचे असावे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/01/2018 - 08:56 नवीन
बिएसएफ दल... (अ) स्थानिक भूभागावर तळ ठोकून बसलेले असते. (आ) स्थानिकांच्या (गुप्त/उघड) सहकार्याने आणि खबरी व गुप्तहेरांच्या जाळ्याच्या मदतीने माहिती जमा करणे व ती दिलेल्या कामासाठी वापरणे, ही कोणत्याही संरक्षक दलाच्या रणनीतीतील शुन्यस्तरीय मूलभूत गरज समजली जाते... त्या माहितीशिवाय, दलाच्या कारवाया अयशस्वी होणे आणि/किंवा स्थानिक लोकांसाठी आणि/किंवा दलाच्या मानवसंसाधनासाठी धोकादायक होणे, यांची शक्यता अस्विकार्य असावी इतकी मोठी होऊ शकते. अर्थातच, ती माहिती मिळविणे आणि तिचे विश्लेशण करणे ही प्रत्येक संरक्षक दलाची "जीवन-मरण स्तराची" आवश्यकता असते. (इ) देशाची आणि स्थानिकांची सुरक्षा हेच सर्वोच्च ध्येय बिएसएफ सारख्या संरक्षक दलाच्या पुढे असते... आणि भारतिय संरक्षक दले ते ध्येय गाठण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, याबद्दल संशय नसावा. अर्थातच, संरक्षक दले काम करताना स्थानिक, वैचारिक, राजकिय, इत्यादी हितसंबंध खर्‍या माहितीआड येऊ देत नाहीत. त्याविरुद्ध... (अ) स्थानिक परिघाबाहेरच्या लोकांनी (ज्यात विद्यापिठाचे प्राध्यापकही येतात) चार-आठ दिवस भेट देऊन अनोळखी लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काढलेले निष्कर्ष तुलनेने कमी विश्वासू असतात. (आ) अश्या अभ्यासात, संवेदनाशील विषयावरील (ज्याबाबत, अनोळखी लोकांपुढे सत्य उघड करणे, स्थानिक हितसंबंधांमुळे, सहसा टाळले जाते) विश्वासू माहिती मिळणे कर्मकठीण असते, हे सांगायला नकोच. केवळ सर्वेक्षण करायला आलेल्या लोकांना (ज्यात विद्यापिठाचे प्राध्यापकही येतात) अशी मिळालेली माहिती अर्धवट सत्य आणि/किंवा धडधडीत असत्य असली तरी त्यामुळे सर्वेक्षण करणार्‍यांना तडक धोका नसतो... अर्थातच, सर्व माहिती, जरूर पडल्यास धोका पत्करून, मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करणे हे फार विरळ असते. (इ) "वैचारिक व राजकिय हितसंबंधांना सोईचे निष्कर्ष काढणे आणि स्थानिक भूभागाला भेट न देताही तसे करणे" हे बर्‍याच तथाकथित मान्यवर भारतिय शिक्षणसंस्थांमधिल तथाकथित विचारवंत प्राध्यापकांचे मुख्य लक्षण बनले आहे. वरील तुलनात्मक वस्तूस्थिती पाहिली तर, कोणाचे मत जास्त विश्वासू असेल, हे वेगळे सांगायची गरज आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/01/2018 - 09:43 नवीन
म्हात्रेजी आपल्या पहिल्या दोन मुद्द्यांबाबत कोणतेच दुमत नाही. सुरक्षेच्या दृश्टीने केलेल्या सर्वेक्षणांचा सुरक्षादलांसाथी स्वतःचा उपयोग असतो. अर्थात कायद्याचे कुठे उल्लंघन होत नाही ना इथपर्यंत सुरक्षा दलांची मर्यादा असते. संबंधीत समुदायांशी धार्मीक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सुरक्षादलांनी संवाद साधण्यास मर्यादा असतात. चुकीच्या दिशेने जाणार्‍या मत प्रवाहांना संवादातून आव्हान देऊन विचार परिवर्तन अथवा मने वळवण्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता मर्यादीत असतात ही समस्या आहे. वैचारीक मतप्रवाहांशी संवाद साधण्याची क्षमता वैचारीक धार्मीक, सामाजिक , राजकीय नेतृत्वात अधिक व्यास्थित असू शकतात. वैचारीक संवाद तुम्ही अथवा मीपण साधू शकतो पण अशा संवादांना निष्पक्ष सखोल शास्त्रीय सर्वेक्षणांची साथ असेल तर सध्याच्या विचार धारेतील नेमक्या कमतरता लक्षात घेऊन अधिक नेमके पणाने संवाद साधता येतो. विद्यापीठीय प्राध्यापक आणि त्यांचा विद्यार्थीवर्ग दिशाहीन होऊन देशहीत समजेनासे झाला आहे हि चिंतेची बाब आहे ती दुरुस्त झालीच पाहिजे . पण तर्कशास्त्र , विज्ञान ते समाजशास्त्र , राज्यशास्त्र अशा विषयातील ज्ञान रचनात्मक पद्धतीने संबंधीतांच्या प्रबोधनासाठी वापरले गेले तर विद्यापिठीय मंचाचा इफेक्टीव्ह वापर करुन घेता येऊ शकावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/01/2018 - 10:19 नवीन
संबंधीत समुदायांशी धार्मीक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सुरक्षादलांनी संवाद साधण्यास मर्यादा असतात. चुकीच्या दिशेने जाणार्‍या मत प्रवाहांना संवादातून आव्हान देऊन विचार परिवर्तन अथवा मने वळवण्याच्या सुरक्षा दलांच्या क्षमता मर्यादीत असतात ही समस्या आहे. जगभरच्या संरक्षण दलांच्या सामाजिक कार्यांबद्दल (ज्यांना, "हार्ट्स अँड माईंड्स ऑपरेशन्स" असे म्हणतात) पुरेशी माहिती घेतल्यास तुमचे वरचे मत बदलेल. या कारवाया संरक्षणदले, स्वदेशातील अशांत भूप्रदेशावर, करत असतात. स्थानिक अशांत भूप्रदेशात संरक्षण दलाचा भाग म्हणून कार्यरत असताना अश्या कारवाईचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे. सद्याही भारतात लष्कराने, (अ) काश्मिरमध्ये चालवलेल्या शाळा, (आ) मुलकी आधारभूत सेवांमध्ये मदत करणे, इत्यादी कामे धार्मीक, सामाजिक आणि राजकीय सुसंवाद साधण्यास मदत करत आहेतच. याशिवाय महत्वाची बाब अशी की, भारतिय संरक्षक दले केवळ सुसंवाद डोळ्यासमोर ठेऊन काम करतात, याबाबत लोकांच्या मनात संशय नाही... सद्याचे राजकिय नेते आणि 'तथाकथित विचारवंत' असे काही करतील असे समजणे, अंधश्रद्धा आणि/किंवा भ्रम (delusion) समजावा, अशी परिस्थिती आहे, हे सांगायला नकोच ! असो, माझे असे निरिक्षण आहे की तुमची मते "अत्यंत आदर्शवादी" आहेत /असतात. ती तशी असण्याला आक्षेप नाही, नसावा. मात्र, आदर्शवादी ध्येय गाठण्यासाठीही, व्यावहारीक परिस्थिती जमेस धरणे अत्यंत आवश्यक असते... अन्यथा निराशा पदरी येते. "चांगले करावे / चांगले करा रे" असे म्हणून चांगले होत असते तर हे जग केव्हाच नंदनवन झाले असते. यासंबंधात, अगोदरच्या प्रतिसादात एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहिला, तो असा... धार्मीक/सामाजिक/राजकीय उद्येशाने प्रेरित लोकांना (मग ते प्राध्यापक असो की तथाकथित विचारवंत) अशांत आणि/किंवा संवेदनाशील प्रदेशात, सर्वेक्षण किंवा सुसंवाद करण्यास पाठवणे, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्यासारखे आहे ! "काश्मीर फुटिरतावाद्यांनी दरवाजातून हाकलून लावले तरी त्यांची तळी उचलत असलेल्या" आणि "शिक्षणसंस्थांत व माध्यमांत महत्वाच्या पदांवर शिरकाव केलेल्या", राजकारण्यांच्या/तथाकथित विचारवंतांच्या/त्यांच्या गुप्त-उघड पाठीराख्यांच्या मांदियाळी डोळ्यासमोर असताना, त्यांच्याकडे कृतींकडे दुर्लक्ष करून, त्यांच्याकडून आदर्शवादाचा आग्रह धरण्याइतके, व्यवहारात घातक काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/01/2018 - 11:24 नवीन
आपल्या चिंतांशी सहमत आहे, त्याच वेळी आदर्शवादी आहे हे ही खरे , कारण अंतीम ध्येय सकारात्मक आणि रचनात्मक असणेच अभिप्रेत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/01/2018 - 16:31 नवीन
आदर्शवाद बाळगताना आपले पाय वस्तूस्थितीच्या जमिनीवरून निसटून हवेत तरंगू लागल्यास, आदर्शवादसुद्धा फक्त हवेत तरंगत राहतो आणि नकारात्मक शक्तींचा विजय होतो, हे सार्वकालीक सत्य नजरेआड होऊ नये, इतकेच सुचवतो. अशा प्रकारच्या आदर्शवादाने स्वतःचा अहंकार (इगो) सुखावण्यापलिकडे फारसा फायदा होत नाही. केवळ आदर्शवादाची भलावण, इच्छा किंवा विनंती करून खलप्रवृत्तीची माणसे/तत्वे सज्जन बनली असती तर... नियम, कायदे, पोलीस, सैन्य यांची या जगात जरूरच राहिली नसती आणि खोटेपणा-फसवणूक-जुलुम-जबरदस्ती-वसाहतवाद यासारखे नकारात्मक व नाशकारी शब्दही आस्तित्वात आले नसते. तेव्हा, आदर्शवाद जरूर असावा, पण तो भोंगळ/भाबडा (नाईव्ह) नसून वस्तूस्थितीच्या मजबूत पायावर उभा असला तरच टिकतो... हे, जगाचा तर सोडाच पण, भारताचा इतिहासही डोळ्यासमोर असताना सांगावे लागते, हे आश्चर्यकारक आहे ! इतिहास विसरणार्‍या माणसांच्या नशीबी त्याची पुनरावृत्ती येते. (Those who cannot remember the past are condemned to repeat it : George Santayana.) या उप्पर तुमची मर्जी. आपापली मते एकमेकाकडे ठेऊन, ही चर्चा इथेच थांबवावी असे माझे मत झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 12/01/2018 - 16:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा