पाककृती
अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला
Primary tabs
अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला
--------------------------------------
साहित्य
दालचिनी --३ तुकडे
काळी मिरी --२ टे स्पून
जावेत्री --२ पाकळ्या
जायफळ ३-४ खांडे
तमाल पत्र -३-४ पाने
मोठी वेलची -४-५ न ग
शहाजिरे - १ टे स्पून
लवंगा - १ टे स्पून
वेलदोडे -१० न ग
सर्व एकत्र करावे व ग्राइंडर वर बारीक पूड करावा
मसाले भात भरली वांगी व्हेज बिर्याणी आदी ला नेहमीच्या मसाल्या सोबत
एक चमचा वा प्रमाणात हा मसाला घालावा
चवीत अप्रतिम फरक पडतो
जावेत्री म्हणजे काय?
जायफळ
जावेत्री --२ पाकळ्याजायफळ ३-४ खांडे
म्हणजे डबल घ्यायचं का ? :)
माझाही तसाच गोंधळ झाला. बरं, मसाला कोणी बनवला तर सांगा, कसा होतो ते, म्हणजे बनवायला बरे.
जावेत्री म्हणजे जाय्फळाच्या वरचे केशरी आवरण
ओह, ओके. धन्यवाद. तुम्ही दिलेला फोटो दिसत नाही पण गुगल केले आत्ता. फोटो पाहून लक्षात आले.
https://www.myweekendkitchen.in/indian-spices-names-hindi-english/
जायफळ नाही, जायपत्र.
जावित्री म्हणजे जायपत्री. जायफळ हे फळ याचंच.
म्हणजे जायपत्री असेल
हां अभ्या आणि सवि.
न भाजता म्हंजे ड्राय रोस्ट
का तेलावर परतून
एक एक जिन्नस ड्राय रोस्ट
का वेगवेगळा
तेल किंवा तूप वापरायचे असेल तर
किती
आणि परतून घेताना पहिल्यांदा कोणता
जिन्नस घालायचा ....
त्ये बैजवार लिवलं तर मस्साला हटके का काय ते कळेल.
अक्कुकाकांनी तुम्हाला बैजवार उत्तर दिले तर मात्र हटके होइल मसाला एवढे खरे ;)
प्लस वण टू अभ्या. अकू नेहमी सारखे वावरात येऊन तांब्या टाकून पळून गेलेले आहेत. ;)
हे मात्र खरं रे अभ्या
बनवून बघायला हवा
इन्नोवेटीव धागा !
म्हणजे इन्नो घ्यायला लागेल, असा का? :D
राजस्थानात फक्त जिरे,धणे,बडिशोप पिकते.
शहाजिरे इराणचे. थोडेफार इकडे होत असेल.
नऊपैकी आठ जिन्नस केरळ किनारपट्टीत पिकतात.
वावरातून पळून जाऊ शकत नाही
मिपा भरारी पथक सज्ज असते कायम
७४ वर्षांचा अकुकाका पळून पळून कुठं पाळणार
असो
सर्व घटक पदार्थ एकटे करू कशी असताना ग्राइंडर वर दळायचे
खूप हटके चवदार मसाला आहे
टायपिंग मध्ये मिष्टेक आहे सुधारीत प्रतिसाद खाली दिला आहे-------------------
------------------------
वावरातून पळून जाऊ शकत नाही
मिपा भरारी पथक सज्ज असते कायम
७४ वर्षांचा अकुकाका पळून पळून कुठं पाळणार
असो
सर्व घटक पदार्थ एकत्र करून कच्चे असताना ग्राइंडर वर दळायचे
खूप हटके चवदार मसाला आहे
वावरातून पळून जाऊ शकत नाही
मिपा भरारी पथक सज्ज असते कायम
७४ वर्षांचा अकुकाका पळून पळून कुठं पाळणार
असो
सर्व घटक पदार्थ एकत्र करून कच्चे असताना ग्राइंडर वर दळायचे
खूप हटके चवदार मसाला आहे
हायला,
पुढच्या वर्षी अमृतमहोत्सव म्हणा की अक्कुकाका? भारीच हो.
पाच सहा वर्षात सहस्रचंद्रदर्शन पण येईल की. जोरात करा हं शताब्दी पण. शुभेच्छा तुम्हाला.
लिहीते राहा हो अकुकाका.
2-3 जायफळ जास्त होणार नाहीत का ?
जयफळ खुप बेताने घालावे लागते !
सॉरी ३-४ खांडे जायफळ लिहील आहे , म्हणजे नेमके किती ?
एका जायफळाच्या ३० ते ४० %
मी केला अन वापरला हा मसाला. चविला चांगला आहे. शहाजिर्यांच्या ऐवजी साधे जिरेच वापरले पण चांगला झाला.