Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ट्रेंडी फॅशन आणि किमती

म
माहितगार
Sun, 11/04/2018 - 16:18
🗣 3 प्रतिसाद
कपड्यांच्या ट्रेंडी फॅशनचे खूप सुरेख नाविन्यपूर्ण ऑप्शन्स उपलब्ध होत आहेत. अर्थात दुसर्‍या बाजूस गेल्या दहा वर्षापासूनच तसा किमतींचाही आलेख चढता आहे. सणासुदीला ट्रेंडी फॅशनचे कपडे घेतले जाणे सहाजिक आहे त्याच वेळी चार माणसांच्या कुटूंबांची कपड्यांची खरेदी सेव्हिंग्सना बर्‍या पैकी कात्री लावते आहे. ट्रेंडी फॅशनही व्हावी सणही साजरा व्हावा आणि सेव्हींग्सना लागणरा जोर का झटका धीरेसे लागावा म्हणून काही सुचवण्या सारखे आहे का ? तुम्ही ट्रेंडी फॅशन च्या वाढत्या किमतींना कसे फेस करता आहात? ह्या वेळची खरेदी तर झाली पण चर्चेतून काही चांगल्या सुचवण्या आल्यास पुढे वापरता येतील. चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया द्या
2592 वाचन

💬 प्रतिसाद (3)
उ
उगा काहितरीच Sun, 11/04/2018 - 16:52 नवीन
यावेळची खरेदी : औंध भागातील एका नामांकीत (Branded) दुकानातून कुर्ते घेत होतो. किंमत थोडी जास्त वाटत होती पण २-४ दुकाने पाहून आलेलो होतो व तेथील कुर्ते आवडले होते. एक कर्मचारी जवळ आली व हळूच म्हणाली , कर्मचाऱ्यांना ३०% सवलत आहे बिलींग करताना सांगा . खरेदी झाल्यावर तिला बोलावलं तिने तिचा नंबर , OTP वगैरे टाकला व आम्हाला MRP वर ३०% सवलत मिळाली. ;-) (कदाचित कर्मचाऱ्यांशी चांगलं बोलण्याचा , ट्राय केलेले कपडे व्यवस्थित ठेवण्याचा परिणाम )
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/05/2018 - 18:02 नवीन
तसे करुन गंडवले असे तर नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
P
Pvdpune Mon, 11/05/2018 - 12:24 नवीन
मोठ्या रिटेल दुकानांमध्ये जी किंमत आपण पाहतो, त्यामध्ये जवळपास 30% ते 65% margin असू शकते. ज्या स्टाफने तुम्हाला स्टाफ डिस्काउंट देऊ केले, ते कदाचित त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी असू शकते. बऱ्याच कंपन्या सणासुदी दरम्यान टार्गेट्स वाढवून देतात, परंतु तीव्र स्पर्धेमुळे स्टाफ हा मार्ग वापरतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा