Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राया उशीर का जाहला...

व — विजुभाऊ, Fri, 11/09/2018 - 14:11
रात सरली पहाट झाली झुंझुरल्या सार्‍या दिशा झोप नाही ,जीव झाला सखया वेडापिसा वाट पहाते तुमची राया, उशीर का जाहला सख्या सांगा उशीर का जाहला ....... काल दुपारी राघू आला निरोप तो घेउनी मी मैना हरखून गेले सांगावा ऐकुनी ऐकुन माझे रूप खुलले, चमचम जणू चांदणी दिवा ठेवते दो नयनांचा तुमच्या वाटंला राया उशीर का जाहला..... ...... विडा केशरी सायंकाळी , काया माझी कातकेवडा मिठीत घेता विरघळले मी, ओठ साखर खडा. खयाल येता किणकीण वाजे, हाती हिरवा चुडा हुरहूर का ही मनी दाटली , जीव पिसा जाहला.... सांगा राया उशीर का जाहला.... ........ रात्र सजणा अंधारी ही, काटा फुलतो अंगावरती. मिठीत गंधीत चांदणं ल्याले , रातराणी बघ मी झाले. गालावरती गुलाब फुलले, लाजलाजून चूर झाले स्वप्न पाहून जीव शिणला, राया उशीर का जाहला. ................................ चकोर शाह.

प्रतिक्रिया द्या
1398 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा