अवनी हम शरमिंदा है...
वाघिणच होती ती , त्यात २ पिलांची आई, कुत्री न्हवे,
प्रत्येक वाघाची एक स्वतःची हद्द असते , सहसा दुसऱ्या कुठल्या हिंस्त्र प्राण्याला तिच्या हद्दीत येण्याची परवानगी नसते, २ बछडे सांभाळायचे त्यांचे रक्षण करायचे आणि या जगात उद्या एकटे जीवन जगण्यासाठी तयार करायचे, शिकार शिकवायची, आत्मरक्षण शिकवायचे, लाड करायचे प्रसंगी कठोर व्हावे लागते हे सगळे करताना.
आणि या वाघिणीवर आरोप काय तर १३ लोकांचे प्राण घेतले म्हणे.. त्यातील ३ लोकांचे शवचिकित्सा केल्यावर त्याच्या जखमेवर अवनीची थुंकी आढळली. म्हणजेच तिने ठार केले. पण खाल्ले नाही. खाल्लेही असेल बहुदा. पण बाकी १० जणांच्या मृत्यूचे कारण काय ? माहित नाही. तरीही १३ लोकांच्या हत्येचे आरोप.
बरं मारलेही असतील तिने १३ जण , पण काय ती तुमच्या घरात घुसून हल्ला करत होती? अरे तुम्हीच वनक्षेत्रात शेती सुरु केलीत वनरक्षकांना हाताशी धरून, तेंदूपत्ते गोळा करायला तिच्या हद्दीत शिरलात..मग २ पिल्लांची आई असलेली वाघीण ती तिला धोका वाटल्यावर काय करणे अपेक्षित होते तिने?
वन्यप्राणी आणि वनसंपदा सांभाळण्यासाठी आपल्याकडे एक स्वतंत्र विभाग आहे, त्यासाठी एक मंत्री, एक राज्यमंत्री, आणि एक आय ए एस अधिकारी देखील नेमलाय . पण या प्रगत राज्याच्या वनविभागाला एक वाघ जिवंत पकडता आला नाही हि शरमेची नाही तर संताप आणणारी बाब आहे. तुम्हाला १३ महिने पाठलाग करून २ पिलांच्या आईला जिवंत पकडता आले नाही? खरंच प्रामाणिक प्रयत्न झाले का?
अवनीला मारल्यानंतर आता तिच्या २ पिलांचे काय ? जगातील का ती?
बरं या सगळ्या मोहिमेत संशय घेण्याला बरीच जागा आहे, १३ महिन्याचा शोध, रात्री केलेली कारवाई, त्यात दाट मारण्यासाठी पशुवैद्याचिकिसक असावा लागतो, तोही नव्हता सोबत, मग दाट कोणी मारला? नक्की दाट मारला का?
आज शवविच्छेदन करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगतिले ते म्हणजे अवनीला पाठमोरी असताना गोळी घातली गेलीये, दाट मारल्यावर तिथून रक्त निघणे अपेक्षित असते ते निघाले नाहीये., आणि महतवाचे म्हणजे शिकारी असगर अलीने गोळी नाही तर त्याच्या मुलाने शिकार केली आहे .....वर तो शिकारी असगर अली म्हणे तिची २ पिल्लेही नरभक्षक होऊ शकतात..म्हणजे याला हौस पूर्ण करण्याची अजून २ संधी.. अरे १३ महिन्याची पिल्ले माणसाची सोड, सशाची तरी शिकार करू शकतात का?
आणखी एक चीड आणणारी गोष्ट म्हणजे तिथली गावकऱ्यांनी अवनीची हत्या झाल्यावर गावात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला.. कहर आहे .. गावातील, घरातील व्यक्ती ठार झाल्यावर दुःख हे होणारच पण या गावकऱ्यांना समुपदेशनाची गरज होती, जेणे करून हि घटना टाळता अली असती.
वन आणि वन्य प्राण्याचे महत्व समजावून सांगून गावकऱ्यांच्या मदतीने हातात हात घालून काम करता आले असते.
त्याच कसंय ना कि असे वाघ मारल्याने सरकारला कधी धक्का लागत नाही, जेमतेम मंडळी सोशल नेटवर्किंगवर विरोध निषेध करतात पण चिंता नसावी , आपले सरकार सुरक्षित आहे.
आणि हो जेव्हापासून मुनगंटीवार वनमंत्री झालेत तेव्हापासून ३ वाघ, १२ बिबटे, आणि २००च्या वर रानडुकरे मारण्याचे आदेश गेलेत आणि अमलात देखील आलेत.
सलाम मुनगंटीवार आपल्याला.
नितीन पालकर साहेब , वन्य जीवनापेक्षा मानवी जीवन अधिक महत्वाचे आहे? हे कोण ठरवणार ? माणूसच?< नको. कशाला? ते वाघांनाच ठरवू द्या की! असंही समोर आलेल्या माणसाला मारु नये, त्याच्या मागं त्याची लेकरं असतील त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल असा काहीतरी विचार करुनच ते माणसांना मारत असतील की! किंवा माणसांना कोणत्या पद्धतीनं मारावं, कोणत्या परिस्थितीत मारावं याची कडक नियमावली असेल व सर्व वाघ त्याचं कसोशिनं पालन करत असतील . तसंच अशा नियम न पाळता माणसांना मारणाऱ्या वाघांवर इतर मानवप्रेमी वाघ एखाद्याधाग्यासदृश्य जागेवर जोरजोरात चर्चा करुन त्या वाघाला टोचून टोचून बोलण्याची व एकटं पाडण्याची किंवा शिक्षा देण्याची तरतुद करतीलच. त्यामुळे कोणाचे जीवन महत्वाचे हे ठरवण्याची जबाबदारी वाघ प्रजातीला द्यायला आपली काहीही हरकत नाही ब्वा.<त्यामुळे कोणाचे जीवन महत्वाचे हे ठरवण्याची जबाबदारी वाघ प्रजातीला द्यायला आपली काहीही हरकत नाही ब्वा.code> तसपण जबाबदारी ही दूस-यांचीच असते. निष्पाप प्राण्यांच्या बद्दल असेल तर पोल्ट्री, कत्तलखान्यातल्या जिवांची काही किंमत नाही ? त्यांची रोज कत्तल असते. उगाच एका वाघाच्या म्रुत्युचा एवढा बाजार मांडला आहे, ते पण . . "तेरे कातिल जिंदा है " या चालीवर ?