Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाड

व — वन, Tue, 11/27/2018 - 05:12
गुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस वाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच चिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती देतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी पुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण मागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन बागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम खुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम धोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण कमीच पडतंय की लावायला चांगले वळण केलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली शोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली गडगंज विपुलतेतून अंगात आलेला माज करू नाही शकत बौद्धिक दुबळेपणावर मात आणि अखेर प्रश्न पडतो मनाच्या कवाडात की खरंच करायला हवेत का नको इतके लाड ? ........................................................

प्रतिक्रिया द्या
1534 वाचन

💬 प्रतिसाद (2)
श
श्वेता२४ Tue, 11/27/2018 - 06:17 नवीन
लाड केवळ श्रीमंत लोकच करतात असे नव्हे मुलगा असेल तर मुलींच्या तुलनेत सर्वच आर्थिक स्तरात अतीलाड केले जाता (तुलनात्मक म्हणायचे आहे. सरसकट नव्हे). तसेच लाडामुळे मूल बिघडत असेल तर केवळ पालकच दोषी कसे असू शकतात. ते मूलही किंबहूना जास्त जबाबदार असते. श्रीमंतांच्या घरातही सुसंस्कृत मुले जन्माला येतात. मग काय सगळेच बिघडतात किंवा त्यांचे लाड केले जात नाहीत? मला हे व्यक्तिश: पटत नाही.
  • Log in or register to post comments
व
वन Tue, 11/27/2018 - 10:01 नवीन
प्रांजळ प्रतिसादाबद्दल आभार. या विषयाला दुसरी बाजू असणार हे मान्य.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा