Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी काय संस्कार दिले?

आ
आनन्दा
Sat, 12/01/2018 - 16:13
🗣 12 प्रतिसाद
थांबा.. असा धागा ऐसीवर आलाय, त्याची replica म्हणून मी हा धागा काढलेला नाही. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू झाले. एकंदरीत चर्चेचा आशय असा होता की मुलांवर संस्कार करण्याचा प्रयत्न करणे इझ टिपिकल लोवर मिडल क्लास.. (सॉरी, साराभाई संचारली अंगात), मुख्य म्हणजे आपल्या मुलांवर कोणतेही संस्कार करणे हे दमनशाही टाइप काहीतरी आहे वगैरे. मी सहज विचार करत होतो, की उत्क्रांतीची आदिम प्रेरणा काय आहे? तर ती आहे वंशसातत्य. मग पुढचा प्रश्न असा आला, ही हे सातत्य केवळ जनुकीय पातळीवरच असेल का? जेव्हापासून माणूस *विचार* करायला लागलाय तेव्हा या जनुकीय पातळीवरील वंशसातत्याच्या जागेत हे वैचारिक वंशसातत्य पण घुसखोरी करत आहे की काय? आणि असे असेल, तर आपले संस्कार आपल्या मुलाला देऊन मुलाला आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न म्हणजे एक उंक्रांतीमध्ये आपल्याला मिळालेली आदिम प्रेरणा मानावी का? आणि जर तसे असेल तर मग आपण त्या प्रेरणेला नाकारण्यात काय हशील? तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
वैचारिक

प्रतिक्रिया द्या
7707 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
माहितगार Sat, 12/01/2018 - 16:43 नवीन
रोचक मुद्दा
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 12/02/2018 - 07:54 नवीन
असं म्हणतात..... संस्कार हे होतात, करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sun, 12/02/2018 - 13:11 नवीन
कभी कभी मेरे दिलमे ख्याल आता है, की हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला, वंशसातत्य / वैचारिक वंशसातत्य, च्या दृष्टीकोनातुन काय संस्कार दिले असतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
आ
आनन्दा Sun, 12/02/2018 - 17:05 नवीन
त्याने दिलेच की. प्रल्हादाने स्वीकारले नाहीत.. त्याचे काही वेगळे जीन्स ऍक्टिव्हेट झाले होते, आणि त्याला चुलत घराण्याचे संस्कार आवडत होते.. ☺️☺️
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
क
कपिलमुनी Sun, 12/02/2018 - 08:41 नवीन
ही चर्चा होण्याऐवढं मिपा वैचारिक आणि प्रगल्भ राहिला आहे का ??
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 12/02/2018 - 12:14 नवीन
का नाही? तुम्ही आम्हीच तर मिपा घडवतो.. तुम्ही सुरू तर करा, चर्चा पुढे आपोआप सरकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Sun, 12/02/2018 - 12:55 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नाखु Sun, 12/02/2018 - 18:15 नवीन
प्रश्र्न सुटण्यास मदत होईल असे नाही पण मोर्चा काढण्यानेही सुटतीलच असे नाही तरी मोर्चे काढले जातात. तस्मात निरूपद्रवी आणि पांढरपेशीय विषय चर्चेला व्यर्ज नसावेत. जाता जाता मिपा प्रगल्भ होवो न होवो मिपाकरांनी प्रगल्भ होण्याची संधी सोडू नये वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मनो Sun, 12/02/2018 - 18:06 नवीन
पु ल देशपांडे यांनी संस्कृती टिकवण्यावर दिलेले भाषण आठवले. विनोद सोडले तरी विचार करण्याजोगे नक्की आहे. https://youtu.be/rsTwQTYGl8Q
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Mon, 12/03/2018 - 05:20 नवीन
आईवडीलांचे वागणे बघून मुले शिकत असतात, पण काही वेळा घरातून चूकीचे संस्कार होत असतील, व मुले विचारी आणि प्रगल्भ असतील तर त्यांचे वागणे वेगळे असते. जसे प्रल्हाद हे एक उदा. आहे. बरेचदा 'भांगेत तु़ळस' असे अशा मुलांना म्हटले जाते :)
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 12/03/2018 - 06:49 नवीन
म्हणज़ेच, “घरातून होणारे संस्कार” व “मुलांची प्रगल्भता” हयांच्यात कोरिलेशन नाही आहे.
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 12/05/2018 - 10:06 नवीन
माणसाचे व्यक्तिमत्त्व संस्कार, स्वभाव आणि अनुभव ह्यांच्या मिश्रणातून घडत असते. संस्कारांतही केवळ आई-वडीलच हातभार लावतात, असे नाही तर आपले शिक्षक-शिक्षिका, मित्र-मैत्रिणी, त्यांचे आईवडील असा सगळा सामाजिक गोतावळा असतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'वैचारीक वंशसातत्य' हा संस्कारांमागचा एक महत्त्वपुर्ण कारणभाव आहे, कारण की 'Survival' ही आदीम-प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक संस्कार हा त्या-त्या काळातील सामाजिक परिस्थितीतून बघायला हवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा