Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सकारात्मक कटाक्ष - १ (हेल्मेटसक्ती)

M
mrcoolguynice
Wed, 12/05/2018 - 12:33
🗣 11 प्रतिसाद
गाभा : विचारांचं सामर्थ्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. मनात येणाऱ्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. जर आपण परिस्थितीच्या अवगुणांकडे न पाहता गुणांकडेच पाहले, तर आपण त्या परिस्थितीत आनंदी राहू शकतो. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- हेल्मेटसक्तीकडे जर मी सकारात्मकपणे पाहिले तर खालील फायदे माझ्या मनात येतात. तुम्हालाही काही फायदे अढळलयास प्रतिक्रियेत आवर्जून द्यावेत. १. हेल्मेटचा वापर मी, गाडी पार्क केल्यावर किरकोळ खरेदीकरता, एखाद्या परडीसारखा करतो, १ डझन केळी सहज मावतात, खरेदी झाल्यावर गाडीपाशी गेल्यावर केळी डिकीत ठेवायची. २. मोबाईल ब्लूटूथ चा वायफळ खर्च वाचावा, हेल्मेट घातलेले असताना कोपच्यात, कानापाशी मोबाईल घुसडा, आणि मस्त राईड करत करत मोबाईल संभाषण चालू ठेवा. ३. तुम्ही साखळी चोर असाल तर, सीसीटीव्ही च्या कक्षे बाहेरील स्पॉट हेरण्यात वेळ वाया घालवू नका, तर सरळ टिंटेड हेल्मेट वापरा

प्रतिक्रिया द्या
4666 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
माहितगार Wed, 12/05/2018 - 16:37 नवीन
पंजाबमध्यल्या अतिरेकी काळात ते गौरी लंकेश प्रकरणातही ओळख लपवण्यासाठी मास्कसारखा हेल्मेटचा उपयोग झालेला असण्याची शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 12/05/2018 - 18:30 नवीन
१. तुम्ही नेहमी फक्त केळीच घेता का ?
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 12/05/2018 - 18:58 नवीन
बटाटेवड्यात घालण्यासाठी आलेही घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/06/2018 - 11:35 नवीन
चांगल्या गोष्टींचा उलटा उपयोग भारतीय कसा करतात याचे उत्तम उदाहरण
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 12/18/2018 - 13:04 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खिलजि गुरुवार, 12/06/2018 - 13:57 नवीन
अहो बरेच उपयोग आहेत राव तसं बघायला गेले तर .. १) हेल्मेट हाणामारीमध्ये पटकन काढून दुसऱ्याच्या डोक्यात मारावे आणि मग चटकन स्वतःच्या डोक्यात घालावे .. २) कुणाची वाट बघत असलो कि हातात घेऊन मस्तपैकी ठेका धरावा आणि खुशाल झाकीर भाई बनून जावं ... ३) हेल्मेटला आतून असं काही फाडावे कि त्यामध्ये आपली चोरून करायची व्यसनं उदाहरणार्थ तंबाखूची पुडी किंवा मावा यथेच्छ लपवला जाऊ शकतो आणि घरात चान्गली संधी साधून निवांत हाणला जाऊ शकतो ..
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 12/08/2018 - 07:58 नवीन
हे आणी बाकीचे सुचवतील ते वापर करुन झाले की उरलं सुरलं असलेले डोकं सुरक्षित ठेवण्याकरता पण वापरता येईल.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 12/18/2018 - 13:18 नवीन
मी काय म्हंतो, स्मार्ट सायकल योजना करून त्याचा कचरा केला त्या पेक्षा सक्ति न करता हेल्मेट फुकट वाटली असती तरी फायदा झाला असता.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/19/2018 - 04:57 नवीन
बऱ्याच लोकांचं हेल्मेट डोक्यापेक्षा जास्त मौल्यवान असतं.
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Wed, 12/19/2018 - 05:57 नवीन
एक नंबर...लय हसलो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 12/19/2018 - 06:33 नवीन
काही लोकांचा आरसा डोक्यापेक्षा जास्त मौल्यवान असतो म्हणून हेल्मेट आरशावर ठेवलेले असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा