Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उदासी

श — शब्दबम्बाळ, Sun, 12/09/2018 - 16:02
सभोवताली उदासी साचून राहीली आहे तीचा परीघ केवढा हे माहीत नाही माहीती करुन घेण्याची गरजही वाटत नाही इथे फक्त मी आहे आणि माझ्यामध्येही ती आहे अगदी तुझ्यासारखीच... ती सुद्धा हल्ली कधीतरीच येते भेटायला, पण येते... मग मी सुद्धा तीच्यासोबत काही क्षण घालवतो ती लवकर जाऊ नये म्हणुन मुद्दाम एकटाच राहतो आता तर वाटतं तीच मला जास्त जवळची आहे अगदी तुझ्यापेक्षाही... ही उदासी मला बर्याच ठिकाणी फिरवते त्यातल्या काही जागा अजुनही ओळखीच्या वाटतात मग तिथले गंध, आवाज मनात दाटतात पण खरतर त्या सार्याच आता अनोळखी आहेत, अगदी तुझ्यासारख्याच... मला माहीत आहे ही जास्त वेळ राहणार नाही, पण तरीही मी तीची मनधरणी करत राहतो थांबेल थोडावेळ अजुन हे स्वतःला पटवत राहतो ती मात्र अचानक, आली तशी निघुनही जाते अगदी तुझ्यासारखीच...

प्रतिक्रिया द्या
740 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा