तंत्रजगत
चॅनलचं पॅकेज! हे काय नवीन?
Primary tabs
सध्या टिव्हीवर वारंवार दाखवतायत की १ जानेवारीपासून आपल्याला हवे ते चॅनेल पॅकेज निवडता येणारेत.जे पॅक निवडू तेवढ्याचेच पैसे द्यायची सोय आहे.त्यासाठी १९ डिसेंबरच्या आत पॅकेज निवडायचेत.चॅनलच्या दरांचीही माहिती प्रत्येक चॅनल देतंय.उदा.झी मराठी १९ रु.सोनी मराठी ९ रु. इ.
हा नेमका काय प्रकार आहे?यामुळे सेट टॉप ग्राहकांचे फायदे/तोटे कोणते होणार?हे केल्यामुळे सदर सेवा पुरवणार्या कंपन्यांचे फायदे/तोटे कोणते होणारेयत?
कृपया याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा! _/\_
तुमचे टाटा स्काइ आहे का?
त्यांचे आणि सोनीवाल्यांचा फीवरून वाद वाढला आहे.
In digital
यानंतर इतर चानेलवाल्यांनीही सर्विस प्रवाइडरांकडे अधिकचे पैसे आणिआत्यात अमुकअमुक अशा अटी घातल्या असतील॥
शिवाय येणाऱ्या जियो टिविमुळे आताचे खूप घाबरले आहेत.
काही महिन्यांपासून hbo, cartoon network, WB दिसत नव्हते. कस्टमर केअरला मेल केल्यावर चालू झाले. त्यांचा(videocon आणि Turner) काहीतरी वाद चालू असल्याचे कळले.
कृपया सर्व केबल तसेच सर्व डिश टीव्ही ग्राहकांनी काळजीपूर्वक वाचावे....
29/12/2018 पासून केबल/ डिश/ IP TV आणि HITS सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप मोठा बदल होणार आहे, आता चालू असलेल्या केबल/डिश आणि इतर सर्व सेवांचे चॅनेल पॅकेज बंद होणार आहेत. त्याला सुप्रीम कोर्टातून ही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आपण आता पाहत असलेले चॅनेल्स तुम्हाला 29 डिसेंबर नंतर पाहता येणार नाहीत याची ग्राहकांनी नोंद घ्यावी,
29 डिसेंबर नंतर आपणाला केबल/ डिश/ IP TV/ Hits सर्वांचे फक्त एकच 130/- रुपयांचे पॅकेज मिळेल फ्री चॅनेल्सचे. आणि पे चॅनेल्स पाहण्यासाठी आपणाला पाहिजे तेवढ्या चॅनेल्सचे पैसे देऊन ते पाहता येतील.
उदा. -
१)आपणाला फक्त झी मराठी पाहिजे असेल तर
बेस पॅक - RS.130/-
झी मराठी - RS. 19/-
-----------------------
एकूण - 149/-
उदा. -
2) आपणाला फक्त कलर्स मराठी, सोनी मराठी, मुव्हीज ओके पाहिजे असेल तर
बेस पॅक - RS.130/-
कलर्स मराठी - RS. 17/-
सोनी मराठी - RS. 10/-
मुव्हीज ओके - RS. 1/-
-----------------------
एकूण - 158/-
आशा पद्धतीने चॅनेल्स निवडून पैसे भरावे लागतील. सर्व चॅनेल्सची किंमत ही ग्राहकांसाठी ठरवून देण्यात आली आहे. ती आपणाला कोणत्याही डिश अथवा केबलच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल सर्व केबल/ डिश/ IP tv / Hits कंपन्यांसाठी एकच दर निश्चित करण्यात आला आहे. एखाद्या केबल ऑपरेटर/ डिश कंपनी ने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद केली गेली आहे. तसेच कोणत्याही SD किंवा HD चॅनेल्सची किंमत 19 रुपयांन पेक्षा जास्त ठेवता येणार नाही मग तो कोणत्याही कॅटेगिरी मधील असला तरी
उदा.
1) स्टार स्पोर्ट हिंदी
पहिली किं. Rs. 40/- PM आताची कीं. Rs. 19/- PM
2) टेन स्पोर्ट
पहिली कीं. Rs. 35/- PM
आताची HD RS.19/- PM
2) टेन स्पोर्ट HD
पहिली कीं. Rs. 60/- PM
आताची कीं. RS. 19/- PM
3) स्टार स्पोर्ट हिंदी HD
पहिली किं. Rs. 65/- PM आताची कीं. Rs. 19/- PM
GST 18% Extra
दिनांक 1/1/2019 पासुन केबल व डीश टीव्ही दरपत्रक
खालील प्रमाणे राहील.
नवे दर

हे महाग आहे.आता सध्या आमच्याइथे २२० रुपयात ४००+ चॅनल्स पहायला मिळतात.फ्री चॅनल्सची लायकी काय आहे हे काही सांगायला नको.म्हणजे गरज नसताना त्यांचे १३० रु भरायचे+आवडीचे चॅनेल्स.म्हणजे उरलेल्या ९० रुपयात अशी कितीशी चॅनल्स यायची??
३ खोल्यांमध्ये ९०० रुपये (४५०+२२५+२२५) भरून जवळ जवळ सगळ्या वाहिन्या (Videocon डायमंड पॅक) दिसतात.
आता गरजेपुरता विचार केला तरी (३*(१३०+२५०))=११४० रुपये जातील.
इंग्लिश पिच्चर, डिस्कव्हरी, natजिओ असलं काही घेतलं तर ते एक्स्ट्रा.
कठीण आहे.
कालचा लोकसत्ता - पान ३ - नव्या वर्षात केबल ग्राहकांच्या खिशाला कात्री
TRAI ची नवीन खाबुगिरी . अर्थात नवीन टॅक्स. त्यामुळे हे होत आहे. अच्छे दिन !!
स्टार, झी, यांचे बुके घेण्याचा पर्यायही ठेवतील॥ टा स्काइ बेसपॅक ९० अधिक मराठी पॅकेज ४० असे मध्यम मराठी वर्गाचे काम भागत होते॥ ते लोक , स्पोर्ट्स, मुविज पाहात नाहीत॥
या ९० मध्ये बंगाली, तमिऌ, पंजाबी,तेलगु २५+ चानेल असतात त्यांचेही काम व्हायचे.
आता डिशटिविला काय स्कीम येते बघू.
काय ? तुम्ही अजुनही टीव्ही पाहता ? ममव कुठचे :) :)
काहीजण टिवि कार्यक्रम मोबाइलवर पाहतात, युट्युब विडिओ पाहतात, वाटसपमधून उडालेले कण गोळा करतात.
बाळूमामा चंग भलं
कुंडम कुंडा कुंडम कुंडा कुंडम कुंडा
ह्या लिंक मध्ये सर्व चॅनल चे रेट दिलेले आहेत https://ultra.news/t-t/42687/new-trai-tariff-for-dth-cable-list-of-chan… उगी मोदिंच्या नावाने चिखलफेक करु नये
आपण जे पॅक घेतो त्यातील खुप कमी चॅनल बघतो त्या कारणाने सरकारने हा नियम लागु केलेला आहे.
रेडिमेड पॅकेज काढून टाका असे काही आदेश नाहीत. त्यातले एखादे घेता येईल.
बाकी जाहिरातवाल्यांचा प्रतिसाद कमी होऊन मालिकावाल्यांचे उत्पन्न घटेल?
300-400 चॅनल्स 24 तासांत (प्रत्यक्षात त्याहूनही कमी) कशी पहिली जातात हा एक संशोधनाचा विषय ठरू शकेल.. माझ्या घरी इन डिजिटल सेट टॉप बॉक्स आहे ज्यात भरमसाठ चॅनल्स 380 रुपयांत दिसतात. पण त्यातील जास्तीत जास्त 15 चॅनल्स महिन्यातील वेगवेगळ्या वेळी पहिली जातात. इतरांची गोष्टही काही वेगळी नसावी, अर्थात कोणी बेरोजगार असेल आणि टीव्ही बघण्याशिवाय आणखी काही काम नसेल तर सर्फिंग करायला 300 चॅनल्स लागू शकतात.
जेवढी वीज आणि जेवढा पाण्याचा वापर तेवढे देयक येते ना मग दिवसाचा जेवढा वेळ टीवी पाहाण्यात जाईल तेवढे देयक ग्राहकांकडून घ्यावे. चॅनल्सनी किंवा ट्रायने....
नाहीतरी प्रत्येकाकडे सेट टाॅप बाॅक्स आहेच. माेजमाप करणे अशक्य नाही.
उपयुक्त माहिती आणि चर्चा.
यापूर्वी दीर्घकाळासाठी (वार्षिक, अर्धवार्षिक) पॅकेज रिन्युअल म्हणून ऑलरेडी घेतलेल्या आगाऊ रकमेचं या कंपन्या काय करणार? अंशतः परतावा की पुढे वापरासाठी क्रेडिट?
क्रेडिट - नवीन पॅकेजप्रमाणे शेवटची तारीख बदलते.
पण हवे ते चानेलस घ्या हे चार वर्षांपूर्वीच आलं आहे॥ शिवाय रेडिमेडही घेऊ शकतो.
नुकतंच टाटा स्काय हेल्पलाईन (१८०० २०८ ६६३३) च्या क्रमांकावर नविन २९ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या योजने विषयी चौकशी केली. माझा सध्या धमाल मिक्स (रू .३२० प्रतिमहिना) पॅक आहे, त्यावर काय परिणाम होइल अशी विचारणा केली असता, त्यावर नविन योजनेवर काम चालू आहे, त्याची माहिती मिळताच आपणाशी संपर्क साधून माहिती दिली जाईल असे सांगितले गेलेय. माहिती कशी मिळेल हे विचारले असता “माहित नाही” असे उत्तर मिळाले. पण माहिती मिळताच ताबडतोब आपल्याला कळवण्यात येइल हे सांगितले.
इथं असे कुणाचे पॅक सुरु आहेत, इतर मिपाकरांचा काय अनुभव आहे?
हेल्पलाईन नंबरवर बोलणारे कंपनीचे अधिकारी नसतात. इमेल करा. शोधून देतो अॅड्रेस.
डिशटिविलाही इमेलच करतो.
दोनतीन तासांत तिकडून फोन येतो आणि प्रश्न नक्की सोडवतात संध्याकाळच्या आत.
पण आताचा प्राब्लेम मोठा आहे, तुमचा वैयक्तिक नाही.
धन्यवाद, कंजूस साहेब.
मेल पण पाठवतो त्यांना.
विडिओकॉनने वाहिन्यांच्या किंमती दाखवायला सुरुवात केलीय.
झी मराठी १९
कलर्स मराठी 10
स्टार प्रवाह ९
झी युवा ४
सोनी मराठी ४
झी टॉकीज १२
एबीपी माझा ५०पैसे
झी २४तास १०पैसे
सोनी मॅक्स १५
झी सिनेमा १९
स्टार गोल्ड ८
स्टार मुव्हीज १२
पिक्स १०
एचबीओ १२
&फ्लिक्स १५
WB १
मुव्हीज नाऊ १०
संगीत वाहिन्या बहुतेक फुकट आहेत. काही १०पैसे, काही ३ रुपये.
हिंदी वृत्तवाहिन्या फुकट ते १ रुपया
इंग्रजी वृत्तवाहिन्या थोड्या महाग आहेत १ ते ३ रुपये.
स्टार स्पोर्ट्स १९/६/१९
सोनी टेन आणि सिक्स आणि espn १९/१५/१७/१५/५
स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १९/७/१
डिस्कव्हरी/हिस्ट्री/नॅशनल जिओ ४/३/२
बाकी इन्फोटेनमेंट १ रुपया प्रत्येकी.
*फुकट सगळ्यांसाठी मिळून १३०-१४० भरायचेत वाटतं.
पण ते बेस पॅकेज मिनिमम ९० रु अधिक हवे असलेले असं करतील का?
देशभरात 'ट्राय'ने २९ डिसेंबरपासून केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. त्याला केबल व्यावसायिकांनी जोरदार विरोध करत, आंदोलनाचा निर्णय घेतला. 'ट्राय'च्या नव्या नियमांविरोधात केबल व्यावसायिकांनी २७ व २८ डिसेंबर रोजी ब्लॅक आऊट आंदोलन म्हणजे वाहिन्यांचे प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हजारो केबल व्यावसायिक बुधवारी दिल्लीत धडकले.
तेथे झालेल्या बैठकीत २९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसल्याचे आश्वासन 'ट्राय'नं दिल्याचे बांते यांनी सांगितले.--
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-new…
आमचे आणि मालिका आणि केबल वाल्यांचे पटत नसल्याने, ह्या त्रासातून सुटलो.
यु-ट्युब झिंदाबाद...
चानेल निवडण्याचे स्वातंत्र्य ठेवले तर मला वाटतं आता जे लोक तिनशे - पाचशे रुपये देत आहेत त्यांचं दिडशे किंवा कमी रुपयांत काम होईल. मग डिटीएचवाल्यांचं कलेक्शन धाडकन खाली येईल. सरकारी जिएसटीसुद्धा कमी जाईल. शंभरावरून पंचवीस जाईल.
मालिका निर्माते कलाकारांना कमी पैसे देतील.
एकूण असं असणार आहे.
किमान शुल्क = Network Capacity Fee = रु १३०(+१८% कर) = १०० फुकट वाहिन्या
बाकी वाहिन्या (किंवा वाहिन्यांकडून मिळणारे गुच्छ) = वरील प्रतिसादाप्रमाणे.
या शंभरहून पुढच्या अतिरिक्त वाहिन्यांसाठी प्रति २० वाहिन्यांमागे रुपये २५ Network Capacity Fee म्हणुन द्यावे लागतील.
उदा. तुम्हाला झी मराठी, इत्यादी १० सशुल्क वाहिन्या हव्या असतील ज्यांची किंमत समजा ९० रुपये आहे,
तर १३० (किमान Network Capacity Fee) + ९० (तुम्ही निवडलेल्या १० सशुल्क वाहिन्यांची किंमत) + २५ (तुम्ही निवडलेल्या १० वाहिन्यांची Network Capacity Fee) = २४५ रुपये + १८% = २८९ रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही ४२ सशुल्क वाहिन्या निवडल्या ज्यांची एकत्रित किंमत २६० रुपये आहे, तर त्यांची एकून Network Capacity Fee २५*३=७५ रुपये असेल.
एकूण १३०+२६०+७५ = ४६५ + १८% कर = ५४९ रुपये द्यावे लागतील.
टाटास्काइचे बेस पॅकेज ९९ होते ते त्यांनी १३० केलं.
२०११ साली ९९ अधिक तुमचे चानेल असं होतं. मला दुकानदाराने विचारलं की तुम्ही अमुक अमुक दोन चानेल बघता का? नाही बघत तर सरळ २२० चं रेडी पॅकेज घ्या . त्याप्रमाणे काम होत होतं.
आता डिशटिविचं सुपरफॅम्ली पॅकेज आहे त्यात कामाचे चानेल्स आहेत. फक्त तेच आता नवीन नियमात बसवायचे आहेत. कालपर्यंत त्यांचं माइडिशटिवि अॅप अपडेट नव्हतं ते आज झालं आहे. बघू त्यातून होतं का. सध्या त्या अॅपवर लोड फार आहे. वेबसाइट अजून अपडेट झालेली नाही.
हा लेख पाहा -
चानेल बदलाची सर्व माहिती इथे
हे बेसपॅकेज वगैरे बंद करावे .सर्वे चॅनल पेड करावी व कोणतेही चॅनल ची निवड करण्याची मुभा हीच खरी ग्राहकाची सोय ! बाकी माझे टी वही पाहणे बातम्या व क्रिकेट मॅच सोडले तर बंदच झाले आहे . यु ट्यूब झिन्दावाद !
या चॅनेल निवड प्रकरणाची मुदत ३१ जाने २०१९ पर्यंत वाढवण्यात आलीय. कंपन्या सुद्धा या बाबतीत नीट विचार करू शकत नाहीत असे दिसते. त्यांच्या फायद्याचे असते तर लगेच अंमलबजावणी केली असती. एकंदीत हे गोंधळाचे प्रकरण दिसते.
मिपाकरांनी काय विचार केलाय ?
कुणी हे सिलेकट केले आहे काय ?
डिशटिवि डॅाट इन साइटवर चानेल सिलेक्शन आलं आहे ( अॅपवरून वेबसाइटलाच नेतात )पण अजून फोन कस्टमर केअरला केा नाही.
ह्या निर्णयामुळे आर्थिक फटका ग्राहकांना बसणार आहेच आणि त्याला कारण 130 रुपये देवून ग्राहकांची बिलकुल पसंती नसलेले चॅनल ची जबरदस्ती .
पण ह्यातून ऐक चांगलं सुधा घडेल ते हिंदी भाषिक नसलेली राज्य पैसे देवून हिंदी चॅनल घेणार नाहीत त्यांची पहिली पसंती ही स्वभाषा हीच असेल आणि नंतर sport ,discovery आसा क्रम आसेल .
त्यामुळे स्थानिक भाषेतील कार्यक्रमांचे बजेट सुधा वाडून दर्जेदार कार्यक्रम तयार होतील
आता डिशटिविच्या साइटवर ( dishtv dot in)चानेलस सिलेक्ट करून पाठवायची सोय केली आहे त्यांतून पंधराएक चानेलस सिलेक्ट केल्यावर जी रक्कम दाखवली ( १३० रु भाडं + चानेलचे पैसे +जिएसटी ) ती माझ्या सध्या चालू असलेल्या पॅकपेक्षा जास्ती दाखवतेय. तरी मी सध्या चालू असलेल्या पॅकमधले सर्व चानेलस सिलेक्ट केलेले नाहीतच.
मग तो प्लान सबमिट केलाच नाही. जेव्हा बंद पडेल तेव्हा पाहू.
TRAI चे नियम २०१२ मध्येच आले आहेत, तरी त्यावेळी डिटिएच ओपरेटरांचे रेडिमेड प्याकेज घेण्याचे स्वातंत्र्य होतेच. ते आताही ठेवायला पाहिजेच.
म्हणजे गिऱ्हाइकाचे हक्क या TRAI च्या नियमांच्या अमलबजावणीत अधिकच नुकसान होणार आहे. कारण महिन्याचे भाडे या सदराखाली ओपरेटरांनी त्यांचे दुकान चालण्याची व्यवस्था केली आहे.
झी २४ तास आणि एबिपीमाझा यांचे भाडे दहा/पन्नास पैसे आहे, ते चानेल सरकारी डिटिएच फ्रि डिशवर येत आहेत अशी बातमी आहे. तसे झाले तर उत्तमच. तेच खरे हवे असलेले चानेल्स आहेत.
आत्ताच टाटा स्काय च्या साईट वर जाऊन पाहिले असता फक्त झी मराठी , स्टार प्रवाह , झी टॉकीज , कलर्स मराठी , ABP माझा इतक्याच चॅनेल्स ची किंमत २०० रू येते . हेच चॅनेल HD मध्ये हवे असल्यास २८२ रू येते.
वेगवेगळ्या ग्रुप चे चॅनेल निवडल्यास पॅक ६००-७०० पर्यंत जातो .
१५३ रू (१३० + १८% जीएसटी ) हे मिनिमम आहेत . तुम्ही १०० फ्री टू एअर चॅनेल निवडा किंवा एकही निवडू नका १५३ द्यावेच लागतील.
आणि टाटा स्काय chat सपोर्ट ने सांगितल्याप्रमाणे हे टेरिफ १ फेब्रुवारी पासून अनिवार्य आहे. टाटा स्काय चे आधीचे सगळे पॅक धमाका , धमाल सगळे बंद होणारेत आणि नवीन पॅक नव्या टेरिफ नुसार उपलब्ध आहेत त्याची किंमत ३५०-४०० च्या दरम्यान होईल..
थोडक्यात चॅनेल मालकांची तुंबडी भरण्यासाठी उद्योग आहे हा सगळा ....
channel.trai.gov.in या वेब्साईट वर आपल्याला नक्कि किती पैसे भरावे लागणार ते कळते.
पुन्हा एकदा तोच प्रश्न नव्याने विचारतो.
सहा महिने किंवा वर्षाचे पॅकेज एकरकमी पैसे भरुन घेतले असलेल्या लोकांचे पैसे समुद्रार्पण होणार का? की सध्या ज्या मुदतीपर्यंत रिन्यू केलंय ती संपेपर्यंत आत्ताचे चॅनल मिळणार?
रिफंड नसावा असा अंदाज आहे, कारण, वर्ष किंवा सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी मधेच पॅकेज संकल्पना रद्द केल्यास नेमका परतावा किती द्यायचा हे ठरवणं कठीण आहे. शिवाय एकरकमी पैसे भरून घेताना एक कालावधी "कमिट" केला होता. सेवा थांबवल्यास अथवा कमी केल्यास त्यांचं उल्लंघन होईल.
नाही. पहिले पॅकेज संपल्यावरच नवीन योजना लागू होते.
तयार पॅकेजचा पर्याय पुन्हा ठेवायचा ओपरेटरचा अधिकार ट्राइ डावलू शकत नाही.
ज्या ग्राहकास आम्सास एवढेच हवे आहे त्यांच्यासाठीचा ट्राइ पर्याय ओपरेटरने ठेवायचा आहे. ओपरेटरांच्या विरुद्ध जी ओरड होती की नको असलेले चानेल्स पाहावे लागतात त्यातून मुक्तता केली ना?(१३० +टॅक्स ).
वार्षिक किंवा अर्धवार्षिक पॅक हे चालू केलेल्या दिवसापासुन ३१ जानेवारी पर्यंत मासिक पॅक दराने चार्ज होऊन उरलेले पैसे मेन बॅलन्स मध्ये जमा होतील. आपण कोणताही पॅक स्वतः निवड न केल्यास dth ऑपेरेटर्स आपल्या सध्याच्या पॅकशी जुळणारा पॅक आपल्या अकाउंट वर सुरु करणार .
उदा. टाटा स्काय चा नवीन नियमानुसार तयार केलेला मराठी हिंदी HD पॅक हा ३२० रु आहे ज्यामध्ये स्पोर्ट्स व इंग्लिश चित्रपट चॅनेलस चा देखील समावेश आहे. नवीन नियमांनुसार हा पॅक ३२०+१५३+अजून काय असेल ते पकडून ४७५-५५० वर जाईल.
धन्यवाद.
@ अलबेला सजन,
तसं परस्पर करू शकत नाहीत. फारतर ओपरेटर तुम्हाला फोन करून परमिशन घेऊ शकतो.
( पॅकमधले चानेल गाळले जाण्याची मुभा त्यांनी आपल्याकडून अगोदरच मान्य करून घेतलेली असते पण अंतिम तारीख येईपर्यंत चालू ठेवतील.
माझे टाटाचे कोणतेतरी पॅक होते त्यात बदल करायचा होता तेव्हा त्यांनी सांगितले की हे पॅक घेतलेल्या लोकांना कन्टिन्यु राहते पण बदल करताना त्यावेळच्या नवीन पॅकमधूनच घ्यावे लागेल.)
टाटा स्काइ long term plan बंद करून पैसे परत करणार बातमी
धन्यू कंजूससाहेब !
या महत्वाची उपयुक्त बातमी बद्दल.
कोणाला रेलीयन्स गिगा फायबर बद्दल माहिती आहे का?
केबल ओपरेटरसच्या विरोधाने ते थांबले आहे. चालू झाल्यावरच प्राइसिंग उघड होइल.
तसं ओप्टिकल फाइबर १५००एमबीपीएस स्पीड कपेसिटी असते असं कळलं, गिर्हाइकास १५० स्पीड मिळेल म्हणतात.
बजेटनुसार चॅनेल निवडा; 'ट्राय'चे अॅप ट्राय करा
नवी दिल्ली: टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) डीटीएच वापरकर्त्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमांबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कोणते चॅनल्स, प्लान घ्यावा याबाबतही ग्राहक साशंक आहेत. ग्राहकांच्या मदतीसाठी ट्रायने वेब अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकांना आपल्या आवडीनुसार चॅनेल निवडता येतील.
ट्राय'चे अॅप
ग्राहकांसाठी डीटीएच चॅनल पॅक तयार करण्यासाठी 'ट्राय'ने तयार केलेल्या वेब अॅपला 'चॅनेल सिलेक्टर' नाव देण्यात आले आहे. या वेब अॅपच्या मदतीने चॅनेलचे दर पाहता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना हवे असलेले चॅनेल निवडल्यानंतर किती पैसे द्यावे लागतील याचा अंदाज बांधता येणार आहे. निवडण्यात आलेले चॅनेल पाहण्यासाठी सर्व्हिस प्रोवाइडरसोबत संपर्क साधावा लागणार आहे. ट्रायचे वेब अॅप फक्त तुम्हाला महिन्याकाठी किती पैसे द्यावे लागतील, याचा अंदाज येण्यासाठी मदतशीर ठरणार आहे.
फ्री टु एअर चॅनेल बघण्यासाठी देखील एक डिश यायची, तिला पण आता मासिक भाडे द्यावे लागणार काय ?
फ्री टु एअर चॅनेल बघण्यासाठी डबा सातशे रुपयांस मिळतो.
डिशटिवि कनेक्शन असेल तर तो डबा काढून हा लावला की काम झाले कारण दोघांचा सॅटेलाइट एकच आहे. माझ्याकडचा फ्री टु एअरचा ( यास आता फ्री डिश म्हणतात) डबा २००६ चा आहे, बिनबोभाट चालू आहे.
( जुना डबा त्यावेळचा एमपीइजी २ होता आता नवीन एमपीइजी ४ चा मिळतो.)