जय जवान !
काही दिवसांपूर्वी एका पेपरात खालील बातमी वाचली:
‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’.
वाचून मनोमन वाईट वाटले आणि त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी मी प्रवासात अनुभवलेली घटना डोळ्यांसमोर उभी राहिली.
तेव्हा आम्ही काही मित्र एका अभ्यासदौऱ्यासाठी झेलम एक्सप्रेसने दिल्लीस निघालो होतोने. आम्ही द्वितीय श्रेणीच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण केले होते.
तेव्हा दिवाळीच्या सुटीचे दिवस असल्याने गाडीस प्रचंड गर्दी होती. आम्ही व्यवस्थित आरक्षण केले होते आणि सर्वांची तिकीटे निश्चित झालेली होती. गाडी येण्यापूर्वी जेव्हा आम्ही फलाटावर पोचलो तेव्हा तिथे पाय ठेवायलाही जागा नाही अशी तोबा गर्दी. त्यात सामान्य प्रवाशांबरोबरच जवानांच्या अनेक पलटणी होत्या. याच्या जोडीला त्यांच्या मोठाल्या अवजड ट्रंका. तेव्हाच जाणीव झाली की बिगर आरक्षितांच्या गदारोळातच आपल्याला गाडीत चढायची कसरत करावी लागणार आहे. अखेर गाडी आली आणि प्रचंड चेंगराचेंगरीतून आम्ही कसेबसे डब्यात शिरलो.
त्यानंतरचे दृश्य तर चीड आणणारे होते. आमच्या आरक्षित आसनांवर आमच्या आधीच अनेक जवान स्थानापन्न झाले होते. त्यांना उठवताना जे काही तीव्र संवाद हिंदीतून झाले ते आता आठवायलाही नको वाटतात. त्याचा निष्कर्ष एवढाच होता की आम्ही आरक्षित प्रवाशांनी ‘चुप्प’ बसायचे आहे ! आम्ही आमच्या आसनावर कसेबसे अंग चोरून बसलो आणि आमच्या शेजारी चक्क अंगावर रेलून जवान मंडळी बसली. डब्यात सर्व आसनांवर हीच स्थिती. एकंदरीत सर्व डब्यात हवे तसे वावरण्याचा प्रथम हक्क जवानांचा आणि आम्हीच विस्थापित अशी अवस्था होती. आमच्यातील ज्या एकदोघांनी जवानांशी नियमानुसार वाद घातला. पण त्यांना तर झटापट करून त्यांनी गप्प बसवले.
गाडी सुटली. चालत्या गाडीबरोबर आम्ही थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो. पण तो आनंद काही फार टिकला नाही. पुढच्या २ स्थानकांत जवानांच्या अजून पलटणी त्यांच्या ट्रंकासह डब्यात शिरल्या. आता तर आमच्या पाय ठेवायच्या जागी अजून ट्रंका आणि त्यावरही ते बसलेले अशी स्थिती झाली. म्हणजे त्या ‘३ टीअर’च्या डब्यात आता हा चौथा टीअर निर्माण झाला होता ! कहर तर यापुढे झाला. जेव्हा त्यांच्या ट्रंका डब्यात मावेनात तेव्हा त्यांनी त्या डब्याच्या एका बाजूच्या संडासात एकावर एक अशा ठेऊन दिल्या आणि तो संडास बाहेरून देखील ट्रंका लावून बंद करून टाकला. नंतर जेव्हा काही सामान्य प्रवासी लघवीसाठी तिकडे पोचले तेव्हा जवानांनी त्यांना अत्यंत उद्धटपणे, “ये बंद है, उस साइडमें जाव” असे फर्मावले. आता सर्व गर्दी तुडवत विरुद्ध बाजूस जाताना काय यातना झाल्या ते आम्हीच जाणो. सर्वांचीच खूप चिडचिड झाली. “काय तरी तक्रार करायला पाहिजे” असे हताश पुटपुटणे फक्त चालू होते. आता एवढ्या ओसंडून वाहणाऱ्या गाडीत रेल्वे-पोलीस तरी कशाला यायची तसदी घेईल? त्या काळी ‘१३८’ वगैरे तक्रारीचे फोननंबरही नव्हते आणि तिकीट तपासनीसाचे काम फक्त तिकीट पाहणे एवढेच असते. तेव्हा गुमान बसायला पर्याय नव्हता.
त्याकाळी झेलामचा प्रवास म्हणजे अगदी दिव्य असायचे. गाडी ५ तास उशीरा पोचणे हे “नॉर्मल” धरले जायचे. त्यापुढे जो काय उशीर होइल तोच फक्त मोजायचा असे ! त्यात आमचे दुर्दैव बघा. आम्हाला दिल्लीस जायचे तर सर्व जवान थेट जम्मूपर्यंत जाणार होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला हायसे वाटायचा प्रश्नच नव्हता. गर्दीची ही परिस्थिती दिवसा होती तर रात्री काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. डब्यातील एकमेव चालू संडासात जायच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.त्यात जमिनीवर झोपायचा ५वा टीअर निर्माण झालेला !
अखेर एकदाची दिल्ली आली आणि आम्ही उतरलो. आमच्या अभ्यास दौऱ्याची सुरवात अशा “भारतीय समाज-अभ्यासाने”च झाली होती खरी. एकूण परिस्थिती शाब्दिक हमरीतुमरीपर्यंतच राहिली हे नशीब. नंतर काही विचार मात्र मनात येऊन गेले. जवानांच्या सुखदुख्खाची जाणीव आपल्याला असते. पराक्रमी आणि धारातीर्थी पडलेल्या जवानांचा यथोचित गौरव समाज नेहमी करतोच. परंतु, जवान जेव्हा आपल्या बेशिस्त व बेताल वर्तनाने सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडतात तेव्हा काय म्हणायचे? एक आरक्षित प्रवासी म्हणून आम्हाला काहीच किमान हक्क नसतात का?
असो....
त्यानंतरचे दृश्य तर चीड आणणारे होते. आमच्या आरक्षित आसनांवर आमच्या आधीच अनेक जवान स्थानापन्न झाले होते. त्यांना उठवताना जे काही तीव्र संवाद हिंदीतून झाले ते आता आठवायलाही नको वाटतात. त्याचा निष्कर्ष एवढाच होता की आम्ही आरक्षित प्रवाशांनी ‘चुप्प’ बसायचे आहे ! आम्ही आमच्या आसनावर कसेबसे अंग चोरून बसलो आणि आमच्या शेजारी चक्क अंगावर रेलून जवान मंडळी बसली. डब्यात सर्व आसनांवर हीच स्थिती. एकंदरीत सर्व डब्यात हवे तसे वावरण्याचा प्रथम हक्क जवानांचा आणि आम्हीच विस्थापित अशी अवस्था होती. आमच्यातील ज्या एकदोघांनी जवानांशी नियमानुसार वाद घातला. पण त्यांना तर झटापट करून त्यांनी गप्प बसवले.
गाडी सुटली. चालत्या गाडीबरोबर आम्ही थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो. पण तो आनंद काही फार टिकला नाही. पुढच्या २ स्थानकांत जवानांच्या अजून पलटणी त्यांच्या ट्रंकासह डब्यात शिरल्या. आता तर आमच्या पाय ठेवायच्या जागी अजून ट्रंका आणि त्यावरही ते बसलेले अशी स्थिती झाली. म्हणजे त्या ‘३ टीअर’च्या डब्यात आता हा चौथा टीअर निर्माण झाला होता ! कहर तर यापुढे झाला. जेव्हा त्यांच्या ट्रंका डब्यात मावेनात तेव्हा त्यांनी त्या डब्याच्या एका बाजूच्या संडासात एकावर एक अशा ठेऊन दिल्या आणि तो संडास बाहेरून देखील ट्रंका लावून बंद करून टाकला. नंतर जेव्हा काही सामान्य प्रवासी लघवीसाठी तिकडे पोचले तेव्हा जवानांनी त्यांना अत्यंत उद्धटपणे, “ये बंद है, उस साइडमें जाव” असे फर्मावले. आता सर्व गर्दी तुडवत विरुद्ध बाजूस जाताना काय यातना झाल्या ते आम्हीच जाणो. सर्वांचीच खूप चिडचिड झाली. “काय तरी तक्रार करायला पाहिजे” असे हताश पुटपुटणे फक्त चालू होते. आता एवढ्या ओसंडून वाहणाऱ्या गाडीत रेल्वे-पोलीस तरी कशाला यायची तसदी घेईल? त्या काळी ‘१३८’ वगैरे तक्रारीचे फोननंबरही नव्हते आणि तिकीट तपासनीसाचे काम फक्त तिकीट पाहणे एवढेच असते. तेव्हा गुमान बसायला पर्याय नव्हता.
त्याकाळी झेलामचा प्रवास म्हणजे अगदी दिव्य असायचे. गाडी ५ तास उशीरा पोचणे हे “नॉर्मल” धरले जायचे. त्यापुढे जो काय उशीर होइल तोच फक्त मोजायचा असे ! त्यात आमचे दुर्दैव बघा. आम्हाला दिल्लीस जायचे तर सर्व जवान थेट जम्मूपर्यंत जाणार होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला हायसे वाटायचा प्रश्नच नव्हता. गर्दीची ही परिस्थिती दिवसा होती तर रात्री काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. डब्यातील एकमेव चालू संडासात जायच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.त्यात जमिनीवर झोपायचा ५वा टीअर निर्माण झालेला !
अखेर एकदाची दिल्ली आली आणि आम्ही उतरलो. आमच्या अभ्यास दौऱ्याची सुरवात अशा “भारतीय समाज-अभ्यासाने”च झाली होती खरी. एकूण परिस्थिती शाब्दिक हमरीतुमरीपर्यंतच राहिली हे नशीब. नंतर काही विचार मात्र मनात येऊन गेले. जवानांच्या सुखदुख्खाची जाणीव आपल्याला असते. पराक्रमी आणि धारातीर्थी पडलेल्या जवानांचा यथोचित गौरव समाज नेहमी करतोच. परंतु, जवान जेव्हा आपल्या बेशिस्त व बेताल वर्तनाने सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडतात तेव्हा काय म्हणायचे? एक आरक्षित प्रवासी म्हणून आम्हाला काहीच किमान हक्क नसतात का?
असो....
💬 प्रतिसाद
(86)
स
सुबोध खरे
Sat, 12/22/2018 - 07:35
नवीन
आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?
https://www.misalpav.com/node/24960
माझाच अनुभव आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 12/22/2018 - 12:00
नवीन
ही मनोवृत्ती बाळकडू मिळालं की जवान असो की किसान,शहरी असो वा ग्रामीण ,बोटचेटपण व बेमुर्वतखोरी बरोबरीने नांदणार.
कधी अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन तर कधी जवान-किसान असल्याचं कारण देउन.
तुका म्हणे उगी रहावे,चित्ती असू द्यावे समाधान.
कोपच्यातला वाचकांची पत्रेवाला नाखु
- Log in or register to post comments
व
वन
Sat, 12/22/2018 - 13:28
नवीन
या विषयाला अनेक पदर आहेत. त्यामुळे विविध मते असणार. सर्वांच्या मताबद्दल आदर आहे.
परामर्श:
१) डॉ म्हात्रे यांच्या प्रतिसादातील ‘जनता’ या मुद्द्याला पूर्ण अनुमोदन.
२) विशुमित: ""जनता """ लय वंगाळ आहे, याबाबत 100% सहमत >>>>> १०००% सहमत !
३) मनो: चीन हा एकच देश जिथे अगदी घरच्यासारखं वाटतं >>> स्वानुभव व माहितीबद्दल धन्यवाद !...
४) सुबोध खरे : * जपानमध्ये दर चौ.किमी. मध्ये भारतापेक्षा जास्त माणसे राहतात.
चुकीची माहिती आहे >>> धन्यवाद. मी ही माहिती संदीप वासलेकरांच्या लेखात वाचली होती. जालावर शहानिशा न केल्याबद्दल चू भू दे घे.
५) दोन मुलांवर नियंत्रण ठेवणे २० मुलांवर ठेवणे आणि २०० मुलांवर (ती सुद्धा विविध जाती धर्माची) नियंत्रण ठेवणे यात असलेला हा फरक आहे.>>> इथे मला नाखु यांचा बाळकडूचा मुद्दा लावावा वाटतो आणि पटतो. जर बाळकडू चांगले मिळाले तर मोठेपणी २०० जण सुद्धा स्वयंशिस्त होतील.
अति लोकसंख्या आणि अंगभूत बेशिस्त यात मी बेशिस्तीला ८०% जबाबदार धरेन. (अर्थात हे मा वै म.)
धन्यवाद !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 12/23/2018 - 05:09
नवीन
नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी.
त्यातले ठळक मुद्दे:
१. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले.
२. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण:
a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व
b) taxi सेवा मरणाची महाग आहे.
सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले.
- Log in or register to post comments
व
वन
Sun, 12/23/2018 - 15:29
नवीन
अजून दोन मुद्दे आहेत.
१.त्यांनी राजधानीत निवासी इमारती खूप कमी बांधल्या आहेत. बरेच लोक बऱ्यापैकी लांब (१-२ तासाचा प्रवास) राहून तिथे मेट्रोने कामाला येतात.
२. पादचारी व वाहनचालक वाहतूक नियम अगदी स्वयंशिस्तीत पाळतात; पोलिसाचा धाक म्हणून नव्हे. झेब्रा क्रॉसिंग, सीटबेल्ट इ. गोष्टी समजून उमजून पाळतात.
......
सहज म्हणून ....
द. कोरीआचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट, १९४८ आहे !
- Log in or register to post comments
S
Sanjay Uwach
Mon, 12/24/2018 - 03:00
नवीन
आता पर्यंत वरील विषयाच्या अनुषंगाने अनेक गोष्टीची चर्चा आपण या धाग्यवर केली .सर्वांच्या मते अनेक गोष्टी यातून पुढे आल्या . प्रामुख्याने लोकसंख्या ,बेशिस्त ,राजकीय परिस्थिती या सारखे अनेक मुद्दे यातून बाहेर आले . मात्र एक महत्त्वाचा मुद्धा ,ज्याने सदोदीत मला अंतर्मुख केले, तो मी इथे मांडण्याचा थोडा प्रयत्न करत आहे .
या साठी मी कांही उदाहरणे देतो .
पंधरा वर्षा पुर्वी रेल्वे प्रवासा साठी जी गर्दी होती ,तितकीच गर्दी किंव्हा त्या पेक्षा अधिक गर्दी आज हि आहे . रेल्वे मध्ये जागा मिळत नाही म्हणून रेल्वे डब्यांच्या वर बसून प्रवास करतात महाभाग अजूनही आहेत.या शिवाय लोकांच्या मध्ये असाही वर्ग असू शकेल कि मी थोडे जास्त पैसे देण्यास तयार आहे, पण मला आरामात प्रवास करता आला पाहिजे . याचाच अर्थ या सेवेची मागणी असणारे लोक अनेक आहेत. या गोष्टीचा आर्थिक लाभ कसा घ्यावा हे सांगण्या साठी कोण्या चाणक्याची मात्र बिलकुल गरज लागणार नाही . यातून मिळणाऱ्या उत्पनातून नवनवीन रेल्वे ,त्याचे असणारे नवीन रेल्वे मार्ग ,त्यासाठी लागणार पायाभुत खर्च(basic infrastructure) जाऊन देखील आणखीन निधी शिल्लक राहील असे मला वाटते . फक्त या साठी गरज आहे ती भविष्याचा विचार करून केलेल्या योग्य नियोजनाची . हे का होत नाही ? याचे उत्तर माहित असून देखील प्रत्येक भारतीय माणूस मात्र निरुत्तर होतो
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 12/24/2018 - 05:14
नवीन
२००४ पासून रेल्वेच्या भाड्यात वाढ झालेली नाही. कारण सवंग लोकप्रियता.
लालूप्रसाद यादव यांनी तर भंगार विकून आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हा "देणे" ऐवजी नफा दाखवून रेल्वे फायद्यात आणण्याची करामत करून दाखवली होती.त्याचा परिणाम २०१६ पर्यंत जाणवत होता.
Indian Railways still coping with Lalu Prasad's myth of "cash surplus"
https://www.business-standard.com/article/news-ians/when-railway-s-surplus-vanished-on-closer-scrutiny-looking-back-116022500895_1.html
आजमितीला भारतीय रेल्वे हि जगातील सर्वात स्वस्त रेल्वे पैकी एक आहे. एक किमी ला ३६ पैसे असा दर लावल्यावर पैसे आणायचा कुठून?
बेस्ट च्या साध्या बसचा दर २ रुपये किमी ला आहे
रिक्षाचा ११ रुपये आहे किमीला. (म्हणजे साधारण ३रुपये ६५ पैसे माणशी/ किमी ला)
त्यातून ममता बॅनर्जी यांनी सवंग लोकप्रियतेसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा वातानुकूलित तिसऱ्या दर्जाने प्रवास करण्याची "सुविधा उपलब्ध करून दिली यामुळे सर्वात नफ्यात असलेला प्रवासी वर्ग तोट्यात गेला. कारण १२ लाख कर्मचारी आणि त्यांचे किमान तीन कुटुंबीय मिळून ५० लाख लोकांना वातानुकूलित तिसऱ्या दर्जाने प्रवास करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याने याही वर्गाचे तिकीट तुम्हाला उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
बाकी विविध वेतन आयोगांनी सुचवलेली पगारातील भरघोस वाढ सर्व सरकारांनी मान्य केली पण कर्मचारी कपात सुट्टीतील कपात या गोष्टी मान्य केल्या नाहीत.
हा सर्व बोजा माल वाहतुकीवर टाकल्यामुळे माल वाहतूक महाग झाली आणि त्यामुळे उद्योगांनी आपला माल रस्त्याने पाठवायला सुरुवात झाली. त्यामुळे मालवाहतुकीच्या दर वाढवता येत नाही. प्रवासी वाहतुकीचा दर वाढवता येत नाही आणि भरघोस पगारवाढ सुट्ट्या आणि इतर सुविधा मात्र वाढत चाललेल्या या शृंगापत्तीत भारतीय रेल्वे सापडलेली आहे.
आज रेल्वेचे उत्पन्न १०० रुपये असेल तर खर्च १११ रुपये आहे. https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/railway-expenditure-outpaces-earnings-operating-ratio-breaches-112/articleshow/67205477.cms
https://www.indiatoday.in/india/story/indian-railways-operating-ratio-1318888-2018-08-20
आणि आता कर्जमाफीमुळे तीन राज्यात निवडणूक हरण्याची नामुष्की आलेला भाजप शेवटच्या वर्षात रेल्वेची भाडेवाढ करणे शक्य नाही.
होऊ द्या खर्च
सरकार आहे घरचं
चांग भलं
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 12/24/2018 - 06:59
नवीन
चांगली व समतोल चर्चा झाली आहे. आपली गर्दी, नियोजन, कारभार आणि मनोवृत्ती यांवर इथे अनेकांनी अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. हे सर्व धागालेखकाच्या अनुभवास अनुसरून झाले. पण, धाग्यात जी खालील अन्य बातमी उल्लेखिली आहे त्याकडे आपले लक्ष गेले नाही.
‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’.
आता यावर थोडे लिहितो.
जेव्हा जवान सामान्यांशी, “मरोत ते नागरिक, कारण ते आम्हालाही त्यांच्या भ्रष्टाचारातून सोडत नाहित”, अशी भूमिका घेतात ती एकवेळ ठीक म्हणू. पण, जेव्हा ते अशा वादातून ‘त्यांच्या’तल्याच एखाद्याचा चक्क खून करतात तेव्हा काय म्हणावे? ही हिंसक प्रवृत्ती निषेधार्ह आहे. तेव्हा त्यांनाही संयम व शांततेचे बाळकडू मिळायला हवे असे राहून वाटते.
अलीकडे आपल्या नागरी जीवनात शिस्त ही जवळपास संपली आहे. देशात जी काय शिल्लक आहे ती फक्त लष्करात, असे बरेचदा अभिमानाने सांगितले जाते. तेव्हा स्वतःवर काबू ठेवून कोणीच आपल्याच बांधवांशी हिंसक होता कामा नये.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 12/24/2018 - 07:59
नवीन
लष्करातील जवान ( पोलीस आणि निमलष्करी दले सुद्धा) अत्यंत तणावपूर्ण वातावरणात जगत असतात. त्यामुळे तणावातून आपल्याच बांधवांची हत्या किंवा आत्महत्या करण्याचे प्रमाण हा एक लष्करात चिंतेचा विषय असून लष्करी मनोविकारतज्ज्ञ यावर बरेच संशोधन आणि उपाय करण्याचा प्रयत्न करीत असतात.
नागरी जीवनात माणसे तणावातून हिंसेला प्रवृत्त होतात पण तेथे प्राणघातक शस्त्रे "त्या प्रमाणात" नसल्यामुळे हत्येचे हे प्रमाण कमी आहे
याउलट लष्कराच्या नोकरीत प्राणघातक शस्त्रास्त्रांशी रोजचा संबंध असल्याने हत्येचे प्रमाण जास्त आहे.
गुगलून पहा
https://www.google.com/search?q=soldier+kills+colleague&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=soldier+kills&aqs=chrome.1.69i57j0l5.5512j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Mon, 12/24/2018 - 09:25
नवीन
माहिती व दुवे दिल्याबद्दल धन्यवाद. वाचतो.
- Log in or register to post comments
व
वन
Mon, 12/24/2018 - 07:16
नवीन
आजमितीला भारतीय रेल्वे हि जगातील सर्वात स्वस्त रेल्वे पैकी एक आहे. एक किमी ला ३६ पैसे असा दर लावल्यावर पैसे आणायचा कुठून? >>> +१
तेव्हा स्वतःवर काबू ठेवून कोणीच आपल्याच बांधवांशी हिंसक होता कामा नये. >>> +११
या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Tue, 12/25/2018 - 07:12
नवीन
सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व उत्तर प्रदेश - बिहार मधल्या रंगरुटांचं असतं का पंजाबी -शीख लोक असतात/आहेत ??
(मला वाचीव शीख भारतीय सेनेत सगळ्यात जास्त आहेत इतकं आठवतं आहे, डिटेल मिळाले तर माझंही ज्ञान अपडेट होईल इतकाच हेतू)
- Log in or register to post comments
ज
जागु
Wed, 12/26/2018 - 11:04
नवीन
फारच त्रास घडला.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 12/27/2018 - 05:44
नवीन
भारतात आणि अन्य देशातही काहीवेळा सैन्याला नको इतके डोक्यावर चढवले जाते. प्रत्येक सैनिक हा अगदी तळहातावर प्राण ठेवून सीमेवर लढत असतो असे काही नाही. अनेक सैनिकांना आपल्या सैनिकी गणवेशाची गुर्मी असते.
सैन्याला पैसे कोण देते? त्यांचे शिक्षण, हत्यारे, त्यांच्या पार्ट्या, त्यांना स्वस्तात मिळणार्या वस्तू, त्यांचे दिमाखदार पोशाख गोष्टी ह्या आकाशातून पडत नाहीत. भारताच्या करदात्यांकडून जे पैसे मिळतात त्यावर हे चालते. देशासाठी सैन्य हे खरे. सैन्यासाठी देश नाही.
प्रत्येक देशाला अगदी पाकिस्तानलाही आपले सैनिक म्हणजे अगदी थोर, शूर, खंदे योद्धे आहेत. ते आहेत म्हणून देश आहे असे वाटत असते. केवळ भारतीय सैन्यच थोर असे काही नाही.
पण कुठेतरी ह्याला आवर घातला पाहिजे. सैन्यात राजकारण, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, सरकारी दिरंगाई, गलथानपणा नाही असे कोणी म्हणू नये. अनेक अनेक उदाहरणे आहेत जिथे लोकांवर अन्याय झाला आहे. मिग विमानांच्या अक्षम्य ढिसाळ देखभालीमुळे अनेक पायलट मेले आहेत.
इमाने इतबारे, कष्ट करून केलेले अन्य व्यवसाय आणि सैनिक ह्यात फार फरक करू नये. देश चालवण्याकरता दोन्ही लागतात. एकवेळ सैन्य नसणारे देश असू शकतात. पण निव्वळ सैनिकांचा देश असू शकत नाही. तसा असेल तर तिथे यादवी माजेल.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 12/27/2018 - 07:03
नवीन
सेनादले आणि सैनिकांबद्दल आदर आहेच पण, कादंबऱ्यांमध्ये आणि सिनेमात सैनिकी प्रशिक्षणात त्यांचे प्रशिक्षक तुम्ही सिव्हीलीयन्स पेक्षा वेगळे, श्रेष्ठ आहात असे त्यांच्या मनावर बिंबवताना, सिव्हीलीयन्सना तुच्छ लेखताना दाखवतात ते खरे असेल तर अशी गुर्मी त्यांच्या वागण्यात दिसणे स्वाभाविक आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही पण जर हे खरे असेल तर काळानुरूप प्रशिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
गुरुवार, 12/27/2018 - 07:28
नवीन
यात काही प्रमाणात तथ्य असेल असे वाटते.
एका सहकार्याने ऑफिस मध्ये एका मुलीला मागणी घातली होती... त्या दोघांची चांगली मैत्री वगैरे होती! तिचे वडील आर्मी मधून निवृत्त झालेले होते.
तिने कारण काय द्यावं तर, मी "सिव्हिलिअन" शी लग्न करू शकत नाही, पप्पाना आवडणार नाही वगैरे वगैरे!
तेव्हा पहिल्यांदा असे काही वेगळे भेददेखील असतात हा साक्षात्कार आम्हाला झाला! :D
आता ती मुलगी स्वतः एका ऑफिस मध्ये काम करत होती म्हणजे सिव्हिलिअनच होती ना?
का सैनिकांचे पूर्ण कुटुंब "सिव्हिलिअन" या सामान्य श्रेणीमधून बाहेर पडलेले असते? (हा खरंच प्रश्न आहे )
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 12/27/2018 - 07:39
नवीन
सिव्हिलिअन" शी लग्न करू शकत नाही, पप्पाना आवडणार नाही वगैरे वगैरे!
तेव्हा पहिल्यांदा असे काही वेगळे भेददेखील असतात हा साक्षात्कार आम्हाला झाला! :D >>>>> + १
आधीच समाजात बरेच जन्मजात 'भेद'आहेत; त्यात ह्याची एक भर झाली आहे.
- Log in or register to post comments
व
वन
गुरुवार, 12/27/2018 - 08:14
नवीन
जॉर्ज ऑरवेलचे वचन आठवले:
" सर्व लोक समान असतात पण काही लोक अधिक समान असतात !"
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 12/28/2018 - 15:36
नवीन
येस all are equal some people are more equal.
मला या वाक्याचा नक्की काय अर्थ आहे ते कोणी समजवून सांगाल काय?
अधिक समान म्हणजे ?
- Log in or register to post comments
व
वन
Fri, 12/28/2018 - 15:58
नवीन
त्याचा अर्थ असा:
एखाद्या राज्यव्यवस्थेत सर्व नागरिकांना मिळणाऱ्या खालील गोष्टी समान असाव्यात:
१. मूलभूत गरजा भागविण्याच्या सुविधा
२. राज्यकर्त्यांकडून मिळणारी वागणूक
३. कायदा/ नियम/ न्याय इ.
पण.....
वास्तवात काही जणांचे लाड होतात तर सामान्यजन त्या गोष्टींना वंचित होतात.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Fri, 12/28/2018 - 16:17
नवीन
त्या वाक्याचा Dictionary.com मधील अर्थ पहा:
The sentence is a comment on the hypocrisy of governments that proclaim the absolute equality of their citizens but give power and privileges to a small elite.
वन यांनी त्याचा भावार्थ बरोबर लिहिला आहे.
- Log in or register to post comments
व
वन
गुरुवार, 12/27/2018 - 05:55
नवीन
आवडला.
अनेक सैनिकांना आपल्या सैनिकी गणवेशाची गुर्मी असते. >>>>
याचे बरेच अनुभव आलेले आहेत. तेव्हा सैन्याप्रती आदर व्यक्त करूनही तुमच्याशी सहमत आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/27/2018 - 07:06
नवीन
त्यांचे शिक्षण, हत्यारे, त्यांच्या पार्ट्या, त्यांना स्वस्तात मिळणार्या वस्तू, त्यांचे दिमाखदार पोशाख गोष्टी ह्या आकाशातून पडत नाहीत.
बहुसंख्य लष्करी अधीकारी आणि सैनिक याना ( डॉकटर आणि इंजिनियर सोडून) लष्करात मिळणारे शिक्षण निवृत्त झाल्यावर निकामी असते. तोफखान्यात तोफ चालवण्याचे किंवा सामान्य सैनिकाला मिळालेले बंदूक मशीन गन चालवण्याचे उत्तम शिक्षण बाहेर संपूर्ण कुचकामी असते तेंव्हा ३२ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सैनिकाला ( १८ व्या वर्षी भरती आणि १५ वर्षे नोकरी) बाहेर केवळ रखवालदार म्हणून नोकरी मिळते ज्यात त्याला केवळ हडत हुडुत केले जाते. यामुळे मद्यपानाच्या आहारी गेलेले असंख्य सैनिक आणि अधिकारी मी लष्कराच्या व्यसन निवृत्ती केंद्रात पाहिलेले आहेत.
त्यांच्या पार्ट्या स्वतःच्या खर्चानेच होतात.
मिळणारी दारू फक्त स्वस्त असते.
दिमाखदार पोशाख हा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून स्वच्छ आणि कडक ठेवावा लागतो. २००६ साली मी निवृत्त झालो तेंव्हा सात वर्षात एकदा ७ हजार रुपये OUTFIT ALLOWANCE मिळत असे आणि महिना १०० रुपये KIT MAINTAINCE ALLOWANCE मिळत असे. वर्षाला मिळणाऱ्या एक हजार रुपयात गणवेशाचा दोन जोड्या विकत घेता येतात आणि स्वच्छ पांढरा गणवेश आपल्याला किमान ४ जोड्या दर सहा महिन्याला म्हणजे ८ जोड्या (शर्ट आणि पॅन्ट) आणि १५ ऑगस्ट २६ जानेवारी साठी एक कोरा करकरीत असे ९ जोड गणवेश दर वर्षी मला लागत असत. १०० रुपये महिन्यात बूट त्याचे पॉलिश खांद्यावरच्या चमकणाऱ्या फिती इ ची देशभाल अशक्य आहे.
बाकी मला मिळणाऱ्या पगाराच्या ३० % अगोदरच आयकर कापून जात असे त्यामुळे केवळ इतरच नव्हे तर मी पण एक प्रामाणिक करदाता होतो. आपल्या सारख्याच एका माझ्या डॉक्टर मित्राचे असे उद्गार ऐकून मी त्याला मी भरत असलेल्या कराची रक्कम सांगितली तेंव्हा तो माझ्यापेक्षा तिप्पट पैसे मिळवत असून कर मात्र अर्धाच भरत होता असे लक्षात आले अर्थात यानंतर तुमची "ऐश" आमच्या कराच्या पैशातून होते आहे असे बोलणे त्याने बंद केले.
मिग विमानांच्या अक्षम्य ढिसाळ देखभालीमुळे अनेक पायलट मेले आहेत.
या विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला एक तरी पुरावा देता येईल का?
विमाने ४० वर्षे जुनी आहेत. सर्वात जास्त वापरली गेली आहेत. त्यांचे सुटे भाग उपलब्ध करून देण्यात सरकार संपूर्णपणे कुचकामी ठरले आहे.
अद्ययावत वैमानिक प्रशिक्षण विमान( ऍडव्हान्सड जेट ट्रेनर) विमान त्यातील तीन दशके आपल्याकडे नव्हते. पहिले अद्ययावत वैमानिक प्रशिक्षण विमान वीस वर्षाच्या कंत्राटाच्या गुर्हाळानंतर २००८ मध्ये उपलब्ध झाले. तोवर दीपक (HPT ३२) हे वैमानिक प्रशिक्षण विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात असे. दीपक चा हवेतील जास्तीत जास्त वेग २८० किमी आहे तर मिग २१ चा उतरतानाचा कमीत कमी वेग ३९६ किमी आहे. म्हणजे म्हशीवर बसणाऱ्या माणसाला एकदम चित्त्यावर बसवले तर काय स्थिती होईल
राहिली गोष्ट देखभालीची-- सोव्हिएत युनियन कोसळल्यावर मिग विमानांचे सुटे भाग मिळत नसत. मिळत त्यासाठी पैसे देण्यात बाबू लोकांची अक्षम्य दिरंगाई होती. असंख्य सुटे भाग केवळ वर्षानुवर्षे पडून राहिल्याने (WEATHERING) मुळे कालबाह्य झाले होते ते प्रथम भंगारात काढून त्याच्या निविदा काढून ते रशिया युक्रेन अशा विविध देशांकडून मिळवावे लागत तेवढ्या कालावधी मध्ये इतर नादुरुस्त झालेल्या विमानांचे सुटे भाग (CANNIBALISATION) वापरून विमाने जिवंत ठेवली जात होती. देखभाल ढिसाळ कधीही नव्हती. वायुसेनेचे एक विमान जेंव्हा अगदी अर्ध्या तासासाठी सुद्धा उड्डाण करते तेंव्हा त्याच्या एकंदर १०,०००( दहा हजार) गोष्टींची कसून तपासणी(CHECKLIST) होते. सरकारच्या नालायकीमुळे असंख्य तरुण वैमानिक मृत्युमुखी पडलेले आहेत
केवळ बॅटऱ्या विकत घेण्यात (त्या सुद्धा भारतीय कंपनीच्या) झालेल्या दिरंगाई मुळे एक १५०० कोटी रुपयांची पाणबुडी स्फोटाने निकामी झाली त्याबद्दल जबादारी घेऊन नौसेनाध्यक्षानी राजीनामा दिला पण पण नोकरशाहीला ना खंत ना खेद.
ना संरसक्षण सचिव उपसचिव किंवा संरक्षण मंत्री यांनी जबादारी घेतली किंवा राजीनामा दिला.
हि स्थिती असूनही आपण अशी ढिसाळ विधाने पुरावा न देता करत आहेत याचे दुःख आणि आश्चर्य वाटते.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 12/27/2018 - 15:30
नवीन
फ्लाईट लेफ्ट्नंट अभिजित गाडगीळ ह्याचा मिग २१ नामक जुनाट विमान उडवताना मृत्यु झाला. विमानदळाने सगळा दोष अभिजित गाडगीळचा होता असे जाहीर केले. त्याच्या आईने प्रकरणाचा पाठपुरावा करुन अनेक वर्षे लढा दिला. विमानदळाने सर्वपरीने त्याला विरोध केला. सत्य बाहेर येणार नाही ह्या करता खूप प्रयत्न केले. कविता गाडगीळ (आई) वर वाईट आरोप केले. पण त्या आईने थेट राष्ट्रपतींची गाठ घेतली आणि नंतर कधीतरी पुन्हा तपास झाला आणि त्यात असे निष्पन्न झाले की अभिजित गाडगीळ पूर्ण निर्दोष होता. आणि त्या विमानांची देखभाल नीट होत नव्हती. ह्या विमानांना उडत्या शवपेट्या असे नाव दिले गेले होते. अनेक वर्षांनी एअर चीफ मार्शलने कविता गाडगीळांची माफी मागितली होती.
तुम्हाला गणवेष नीटनेटका ठेवायला मिळणारा भत्ता पुरत नाही. ठीक. पण पोषाख तर फुकट मिळतो ना? बाकी किती व्यवसायात लोकांना भपकेबाज पोषाख फुकट मिळतो?
लष्करातील तमाम पार्ट्या ह्या खाजगी पैशानेच होतात ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
जरी लष्करातील लोक कर भरत असले तरी ते मोठ्या प्रमाणात करदात्यांचे पैसे खर्च करतात हेही तितकेच खरे. सामान्य नागरिक कर भरतो पण त्याच्या कामाकरता, प्रशिक्षणाकरता कर खर्च होतो का? नगण्य.
लष्कर हे देशाच्या म्हणजे देशाच्या नागरिकांकरता आहे हे सैनिक अनेकदा विसरुन ब्लडी सिव्हिलियन्स वगैरे शिव्या देण्यात धन्यता मानतात. कितीही थोर असले तरी सैन्याच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणजे नागरी अधिकारीच असतो हे विसरू नये.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/27/2018 - 16:19
नवीन
१) ब्लडी सिव्हिलियन्स म्हणणारे दीड शहाणे लष्करात नक्कीच आहेत आणि ते अगदी चूक आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही
२) देशभक्ती काही लष्कराची मक्तेदारी नाही कोणीही माणूस जर आपले काम मन लावून इमानेइतबारे आणि संपूर्ण जबाबदारीने करत असेल तर तो तितकाच देशभक्त आहे यातही कोणताही वाद नसावा.
कारगिल युद्धाचे वेळेस मी जेंव्हा असे म्हणालो कि मी माझी नोकरी लष्करात करतो म्हणून मी जास्त देशभक्त असे नाही तर माझा भाऊ कारखाना चालवतो त्याच्याकडे ६ अभियंते आणि ३४ कामगार काम करतात म्हणजेच तो ४० लोकांना रोजगार पुरवतो तर तो माझ्यापेक्षा जास्त देशभक्त आहे, तेंव्हा हे म्हणणे लष्करातील लोकांना रुचले नव्हते( हे मी मिपावरच कोठे तरी अगोदर पण लिहिले आहे)
३) विमानांची 'देखभाल नीट होत नव्हती' हे आपले विधान पटत नाही कारण याचा सरळ अर्थ असा निघतो कि देखभाल करणारे वायुदलात कर्मचारी ढिसाळ होते. वस्तुस्थिती अशी आहे कि विमाने फार जुनी झाली होती आणि त्याचे सुटे भाग वेळेवर मिळत नसत त्यामुळे दुसऱ्या नादुरुस्त विमानांचे सुटे भाग लावून विमाने उड्डाणयोग्य स्थिती मध्ये आणली जात असत. विमाने जुनी होणे( वेळेत त्यांच्या जागी दुसरी विमाने न विकत घेणे), सुटे भाग वेळेत न मिळणें ( हि सरकारची जबाबदारी आहे) आणि देखभाल नीट न करणे ( हि जमिनीवरील देखभाल करणाऱ्या अभियांत्रिकी विभागाची आहे) आणि वायुदलात अभियांत्रिकी विभाग आपले चोख काम करतो याबद्दल मला कोणतीही शंका नाही.
४० वर्षे जुनी कार आपल्यापैकी कोण मेंटेन करीत आहे का? मग जे विमान उतरण्याचा वेग ३९६ किमी आहे (weathering, stress failure किती असेल याचा एकदा विचार करून पहा) त्या जुन्या विमानाची मनोभावे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण अपमान का करीत आहात?
३) सामान्य नागरिक कर भरतो पण त्याच्या कामाकरता, प्रशिक्षणाकरता कर खर्च होतो का? नगण्य.
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर खर्च होतो तो करदात्यांचाच असतो ना? उदा रेल्वेचा लोको पायलट किंवा लोकलच्या मोटर मनच्या प्रशिक्षणावर खर्च होतोच ना किंवा भाभा अणुकेंद्रात इसरो मध्ये एम एस सी/ बी टेक झालेल्या लोकांना घेतात आणि त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण होते तो खर्च काय ते शास्त्रज्ञ भरतात का?
मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण आपल्याला लष्कराबद्दल आकस आहे असेच मी म्हणेन
४) पण पोषाख तर फुकट मिळतो ना? बाकी किती व्यवसायात लोकांना भपकेबाज पोषाख फुकट मिळतो?
एअर इंडिया जेट एअरवेज इंडिगो सारख्या विमान कम्पन्यापासून पासून असंख्य आस्थापनात रुग्णालय हॉटेल इ ठिकाणी अक्षरशः फुकट पोषाख मिळतात.मला दर वर्षी येणार खर्च मी लिहिला आहे मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण उघड आहे.
५) लष्करातील तमाम पार्ट्या ह्या खाजगी पैशानेच होतात ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.हा तुमच्या विश्वासाचा प्रश्न आहे त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. शाळेच्या, कॉलेजच्या, कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त का मिळतात? याचे कारण त्यांच्या जागेचे भाडे वीज पाणी याचा खर्च नगण्य असतो तीच स्थिती लष्कराच्या पार्टीची आहे.
सगळ्याच पार्ट्या कोणीतरी स्पॉन्सर करते असे तुम्हाला वाटत असेल तर आपले मत परिवर्तन होणे अशक्य आहे.
आणि अशा स्पॉन्सर पार्ट्या पंचतारांकित हॉटेल सोडून लष्करी मेस मध्ये का होतील?
२००६ साली पार्टीचा खर्च माणशी २५० येत असे अर्थात लष्करात दारू स्वस्त मिळते हेही एक कारण आहे (मी स्वतः दारू पित नाही)
असो
आपले मतपरिवर्तन होइल यावर माझा विश्वास नाही परंतु इतर लोकांना वस्तुस्थिती समजावी म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 12/27/2018 - 20:12
नवीन
==
सुटे भाग वेळेत न मिळणें ( हि सरकारची जबाबदारी आहे) आणि देखभाल नीट न करणे ( हि जमिनीवरील देखभाल करणाऱ्या अभियांत्रिकी विभागाची आहे) आणि वायुदलात अभियांत्रिकी विभाग आपले चोख काम करतो याबद्दल मला कोणतीही शंका नाही
==
एखाद्या संस्थेवर आंधळा विश्वास ठेवणार्या लोकांचे मतपरिवर्तन करणे अशक्य आहे. परंतु विमाने उडवणे हे विमानदळाचे काम आणि त्यांची देखभाल करणे हे मात्र "सरकारचे" काम हे अगदीच मूर्खपणाचे आहे. जर जी विमाने आपण उडवत आहोत त्यांची देखभाल कुणी दुसराच करत असेल आणि त्याच्या दर्जाची शाश्वती नसेल तर अशी विमाने आपल्या प्रशिक्षित पायलटांना उडवायला देणे हा बेजबाबदारपणा आहे. माझ्या माहितीप्रमाणे लष्करी विमानतळावरील सर्व व्यवस्था लष्करच चालवते.
आणि जर हवाईदळाची चूक नव्हतीच तर एअरचीफ मार्शलने कविता गाडगीळांची माफी का बरे मागितली? कर्तृत्व आमचे आणि चुका मात्र दुसर्याच्या हे धोरण ढोंगीपणाचे आहे.
==
सगळ्याच पार्ट्या कोणीतरी स्पॉन्सर करते असे तुम्हाला वाटत असेल तर आपले मत परिवर्तन होणे अशक्य आहे.
आणि अशा स्पॉन्सर पार्ट्या पंचतारांकित हॉटेल सोडून लष्करी मेस मध्ये का होतील?
=====
सगळ्या पार्ट्यांना एकच नियम लागू असण्याचे काहीच कारण नाही. काही लष्करी आलिशान पार्ट्या ह्या नक्कीच सरकारी खर्चाने होतात हे मी ठासून सांगू शकतो.
बहुतेक मिलिटरी संस्था ह्या आपापल्या कँपसवर असतात. कित्येकदा हे कँपस मुख्य शहरापासून लांब असतात. उदा. पुण्याचे एन डी ए. पूर्वी हे पार गावाबाहेर होते. असे असल्यामुळे आणि लष्करी मेस पुरेशी उत्तम स्थितीत असल्यामुळे पार्ट्या तिकडेच झाल्या तर आश्चर्य नको.
==
एअर इंडिया जेट एअरवेज इंडिगो सारख्या विमान कम्पन्यापासून पासून असंख्य आस्थापनात रुग्णालय हॉटेल इ ठिकाणी अक्षरशः फुकट पोषाख मिळतात.मला दर वर्षी येणार खर्च मी लिहिला आहे मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण उघड आहे.
==
बँकेच क्लार्क, कॅशियर आणि अन्य कर्मचारी, विम्याच्या ऑफिसमधील कर्मचारी, रेल्वेच्या तिकिट ऑफिसात काम करणारे, बाकी कर्मचारी, शेतावर काम करणारे, अन्य खाजगी क्षेत्रात काम करणारे ह्यांची संख्या विमान कंपन्यात काम करणार्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि ह्यांना कुठलाही पोषाख दिला जात नाही. अशा लोकांच्या तुलनेत लष्करातील लोकांना निदान युनिफॉर्म आणि त्याकरता भत्ता तरी मिळतो हा माझा मुद्दा आहे.
==
कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर खर्च होतो तो करदात्यांचाच असतो ना? उदा रेल्वेचा लोको पायलट किंवा लोकलच्या मोटर मनच्या प्रशिक्षणावर खर्च होतोच ना किंवा भाभा अणुकेंद्रात इसरो मध्ये एम एस सी/ बी टेक झालेल्या लोकांना घेतात आणि त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण होते तो खर्च काय ते शास्त्रज्ञ भरतात का?
==
अतीविशिष्ट क्षेत्रात काम करणारे लोक सरकारी खर्चाने प्रशिक्षित होत असतीलही. पण बहुतांश कर्मचारी कुठलेही सरकारी खर्चाने प्रशिक्षण घेत नाहीत. उदा. कारकून, कॅशियर, हिशेबनीस, तिकिट तपासनीस, तिकिट विक्रेते हे सगळे शाळा कॉलेजच्या शिक्षणावर कामावर लागतात आणि काम करता करता ते शिकतात. लष्करात प्रशिक्षण, त्याकरता लागणारी साधने ह्याचा खर्च अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा कितीतरी जास्त आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. लष्कराकडील विमाने, बोटी, शस्त्रास्त्रे , दळणवळण उपकरणे ह्यातले काहीही स्वस्त नसते.
बाकी क्षेत्रात केले जाणारे काम आणि खर्च ह्यातून काहीतरी उत्पन्न मिळते. सेवा वा उत्पादन गिर्हाईकाला मिळते. नागरी विमान सेवा, हॉटेल, रेल्वे, बँक, विमा उत्पादने बनवणारे कारखाने सर्व. लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. खरोखरच अमुक एका दर्जाची संरक्षण सेवा पुरवायला इतका अफाट खर्च आवश्यक आहे का हा प्रश्न पुरेसा विचारला जात नाही असे मला वाटते. उलट लष्कराचे काम आहे म्हणजे पडेल ती किंमत घेऊन ते खरेदी करणे असा साधारण दृष्टीकोन असतो. आजवर भारतात झालेले मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्रातले होते. मग ते चीन युद्धातील जीप, बोफोर्स, वेस्टलँड, राफेल, शवपेट्या . हा योगायोग नाही. आणि प्रत्येक वेळी लष्करी अधिकारी धुतल्या तांदळासारखे. मात्र बाकी सगळे लोक सरकारी कर्मचारी, नेते मात्र भ्रष्ट अशी मांडणी करणे भोळसटपणाचे आहे.
- Log in or register to post comments
व
वन
Fri, 12/28/2018 - 04:03
नवीन
लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. खरोखरच अमुक एका दर्जाची संरक्षण सेवा पुरवायला इतका अफाट खर्च आवश्यक आहे का हा प्रश्न पुरेसा विचारला जात नाही असे मला वाटते. >>>+ १
कित्येकदा मला असे वाटते की जगात सर्वत्र शांतता नांदली असती तर अवाढव्य लष्करी खर्च वाचला असता आणि तो विकासासाठी उपयोगी पडला असता. पण असो….
दुसरा विचार असा की सध्या लष्कर सीमांचे संरक्षण करते आणि म्हणून नागरी लोकांनी त्यांच्यासाठी खर्च करायचा. एक प्रकारे ही पूरकता आहे का? नक्की समजत नाही. कोणी समजून सांगितल्यास आवडेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 12/28/2018 - 05:19
नवीन
आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी समजून आली. आपल्याला समजावणे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे.
फक्त दोनच मुद्दे
१) आजवर भारतात झालेले मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्रातले होते. फक्त दोनच घोटाळे पहा -- २G घोटाळा २ लाख कोटी आणि कोळसा घोटाळा २ लाख कोटी संरक्षण क्षेत्रातील आजवरचे सर्व घोटाळे मिळून यातील एका घोटाळ्याइतकीही रक्कम होत नाही
२) लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. हे अगदी बरोबर आहे. निव्वळ अनुत्पादक खर्च असलेले लष्कर बडतर्फच करून टाकावे.
शरीरात सर्वात जास्त वाढीचा वेग असणाऱ्या पेशी म्हणजे पांढऱ्या पेशी यांचे काम काय तर शरीराचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणे शरीराचा हा खर्चही अनुत्पादकच असतो कि मग निसर्ग एवढा खर्च का करतो?
पांढऱ्या पेशींचे काम बंद होते असा एक आजार आहे त्याला एड्स म्हणतात.
इतर आपला युक्तिवाद अगदीच हास्यस्पद आणि पूर्वग्रहदूषित आहे. तेंव्हा मी आपल्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही.
बाकी आपले मत आपल्यापाशी.
धन्यवाद
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 12/28/2018 - 17:14
नवीन
खरे तर पूर्वग्रह आपाल्याकडेही आहेतच. दुसरी बाजू ऐकून न घेता त्याची हेटाळणी करणे हे कसले लक्षण आहे?
लष्कर बडतर्फ करता आले तर खर्च कमी होईल. पण ते एक टोक आहे. लष्कराचा अफाट खर्च थोडा कमी करता आला तर चांगले असे म्हटले तर त्यात आकांडतांडव करण्यासारखे काय आहे? लष्कराच्या लोकांना आपला खर्च कमी केला जातो आहे ही कल्पनाच सहन होत नाही. कारण त्यांच्या हक्काची कुरणे जातात. पण करदात्यांनी तसा विचार केलाच पाहिजे. शून्य खर्च आणि अफाट खर्च ह्याच्या मध्ये काही असू शकते की नाही? डोक्यात राख घालून "करा बडतर्फ फौज मग!" असे म्हणणे प्रगल्भतेचे लक्षण नाही.
अनेक संरक्षण संबंधित भ्रष्टाचार प्रकरणे यावर निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. उदा. बोफोर्स. राजीव गांधी हरण्याचे कारण तेच होते. बाकीही प्रकरणे अशीच खळबळजनक होती. पैशाचा आकडा कदाचित कमी असेल पण धुरळा जास्त उडला होता.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 12/29/2018 - 13:44
नवीन
"संरक्षण संबंधित भ्रष्टाचार प्रकरणे"
लष्करी अधिकाऱ्यांनी केली का संरक्षण मंत्रालयात असलेल्या बाबू आणि राजकारण्यांनी केली आहेत याचा एकदा शोध घ्या बरं.
बाकी मी म्हटलंच आहे आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी आणि एकांगी मते बदलणे माझ्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहे.
त्यासाठी मी डोक्यात राख घालायची गरज नाहीच.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 12/27/2018 - 16:44
नवीन
कितीही थोर असले तरी सैन्याच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणजे नागरी अधिकारीच असतो हे विसरू नये.
>>>>> + ११
नागरी असो वा लष्करी, दोन्ही गटांनी एकमेकाबद्दल आदर ठेवावा. दोघे एकमेकास पूरक सेवा देत असतात.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Fri, 12/28/2018 - 06:35
नवीन
हे पद नागरी आहे हे ऐकून जामच करमणूक झाली
- Log in or register to post comments
व
वेडसर
Fri, 12/28/2018 - 07:15
नवीन
तु्म्ही रोज तर प्रवास करत नाही ना? आणि असं तुमच्या बाबतीत रोज तर होत नाही ना?
तुमच्या आरक्षित स्थानांवर लष्करी जवान बसले आणि एखाद वेळेस तुम्हाला झाला थोडा त्रास तर असं काय मोठं बिघडलं?!
बरं, सगळे तरूण मित्रच तर होतात. असंही नाही की कुणी वृद्ध आणि आजारी होतं!
पण आमचं असं आहे ना, की आमचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आम्ही जवानांकरता जराही तोशिश पत्करणार नाही..आणि मग त्यानंतरच आम्ही 'येईन तर तिरंगा रोवून किंवा तिरंग्यात गुंडाळून!' असं म्हणणाया कारगील शहीद विक्रम बात्राचं कौतुक करणार!
मगच आम्ही दुर्दम्य देशभक्तीच्या जोरावर ६ दिवस बर्फाखाली जिवंत राहणाया हनुमंताप्पाचे कौतुक करणार!
पण आम्ही आमच्या एक वेळच्या प्रवासाच्या आरक्षित जागाही खुल्या दिलाने त्यांना देणार नाही!
अरेरे..कीव येते आम्हाला आमच्या कोतेपणाची!

- Log in or register to post comments
व
वेडसर
Fri, 12/28/2018 - 07:51
नवीन
आणि मुळात एक दिवसाच्या प्रवासातली गैरसोय ती काय आणि त्यावर चर्चा ती केवढी भली मोठी!
अरे घरदार, आईवडील, बायको, मुलं कशाचीही पर्वा न करता ते जवान आपल्याकरता मरणाला सामोरे जातात!
असो. माझी मलाच लाज वाटली आज!
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 12/28/2018 - 11:55
नवीन
जवानांकरिता तुमची गैरसोय झाली तर त्यात तक्रार कशाला असे म्हणण्यात तथ्य नाही.
जवानांची चांगली सोय व्हावी (अधिक रेल्वेगाड्या, डबे ई) हे मान्यच त्याकरिता अनेक सरकारने अधिक बजेट दिले तरी चालेल, रेल्वे तिकिटावर वा इतर कोणत्या सरकारी खर्चावर अतिरिक्त अधिभार लावावा त्याबद्दल बहूसंख्य नागरिक तक्रार करणार नाहीत. सैन्याने आवाहन केले तर मदतनिधीसाठीही अनेकजण पुढे येतील हे नक्कीच..
पण जवानांनी अरेरावी करावी ,इतरांना त्रास द्यावा याचं समर्थन अयोग्य आहे. सर्वसामान्य नागरी सुविधांचा लाभ घेताना वा नागरिकांशी संबंध येत असताना देशातले कायदे , नियम जवानांकरिताही लागू आहेत हे सैन्यातील जवानांनी विसरू नये. किंबहूना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान 'नागरी कायद्याचा आदर करणे त्यांना अनिवार्य आहे' हे त्यांच्या मनावर बिंबविण्यात यावे.
- Log in or register to post comments
व
वन
Fri, 12/28/2018 - 13:33
नवीन
आतापर्यंत सदस्यांनी मांडलेले ठळक मुद्दे:
१. नागरी लोकांनी जेव्हा केव्हा गैरसोयीची वेळ येते तेव्हा कायम पडती बाजू घ्यावी व लष्करी लोकांना प्राधन्य द्यावे
२. लष्करी लोकांना त्यांच्या गणवेशाची गुर्मी असते. ती अयोग्यच
३. लष्करावरील अवाढव्य खर्च हा योग्य आहे का याचे मूल्यमापन व्हावे
४. जवानांनी अरेरावी करावी ,इतरांना त्रास द्यावा याचं समर्थन अयोग्य आहे
५. भारतातील अशा समस्यांचे मूळ अफाट लोकसंख्या, मुरलेली बेशिस्त, ढिसाळ नियोजन आणि बेपर्वाई यात दडलेले आहे.
.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2