फॉरेक्स ट्रेडिंग मधील गुंतवणूक
माझ्या पहाण्यातील एल ग्रुहस्थ नेहमी रीलॅक्स असतात. त्याना त्यांच्या व्यवसायाबाबत विचारले तर ते म्हणाले की मी फॉरेक्स ट्रेडिंग करतो.
त्यांच्या व्यवसायाची माहिती त्यानी अशी दिली
१) फॉरेक्स ट्रेडिंग करणार्या ब्रोकर कडे त्यांनी पैसे डिपॉझीट केले आहेत.
२) हे ब्रोकर पौम्ड , युरो, येन, डॉलर यांची खरेदी विक्री करतात.
३) दरातील फरकामुळे फायदा/तोटा होतो
४) तुम्ही सांगाल तसे हे ब्रोकर खरेदी विक्री करतात. ( हे साम्गण्यासाठी एक अॅप आहे. त्यामुळे त्याना सारखे लक्ष्य द्यावे लागत नाही. शिवाय अकाउंट स्टेटमेंट मिळते)
५) महिनाअखेरीस साधारणतः आठ ते दहा टक्के परतवा मिळतो.
मला शंका आहे की
ही गुंतवणूक कितपत सुरक्षीत असते?
फॉरेक्स ट्रेडिंग भारतात कायदेशीर आहे का?
यावर इनकम टॅक्स कसा दाखवता येईल?
असा आणखी कोणता व्यवसाय आहे का ( कमोडिटीज सोडून )
चूक
काय आहे ते दाखवा. हे असं "upto ५०% off" वाला सेल सारखं नको. तीन महिने १० % मिळाले आणि चौथ्या महिन्यात ४० % गेले असे असंख्य माणसांच्या बाबतीत घडते. वर्षानुवर्षे महिना १० % परतावा अशक्य आहे असे मी स्पष्ट शब्दात सांगितले आहे त्याचा गुळमुळीत नव्हे तर स्पष्ट प्रतिवाद करून दाखवा.