ऑफिस मध्ये नेहमी पडणारे प्रश्न.
मला कार्यालयात काम करताना नेहमी पडणारे प्रश्न खाली देत आहे. माझ्याबरोबर हे प्रश्न इतर लोकांना देखील पडत असतीलच. जाणकार उत्तरे देऊ शकतील का?
1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?
2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?
3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :D
4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?
5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?
6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?
बस तूर्तास इतकेच.
💬 प्रतिसाद
(101)
च
चावटमेला
Fri, 01/18/2019 - 07:32
नवीन
हेच प्रश्न थोड्या फार फरकाने पडतात.
अगदि अगदि. हे लोक तर लैच्च डोक्यात जातात. जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 01/18/2019 - 08:03
नवीन
1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?
हा प्रकार आमच्या कार्यालयातदेखील आहे. मुली अतिशय भडक कपडे घालून येतात. तरी नशीब शॉर्ट स्कर्ट पूर्ण बंद केला आहे. काही मुलींचे टॉप्स इतके खोल असतात की खोलवर श्वास घेतल्यावरच चित्त जरा थार्यावर येते. मुळात असे कपडे घालण्यामागची मुलींची मानसिकता मला कळलेली नाही. तोकडे कपडे घालण्यामागची मुलींची भूमिका आणि कारणमीमांसा काय असते हे कळायलाच हवे.
2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?
हे चालवूनच घ्यावे लागते. नो ईलाज!
3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :D
हा निव्वळ फार्स असतो आणि हा फक्त भारतीय लोकं करतात.
4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?
आरडाओरडा करावा. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना येनकेनप्रकारे कळेल अशी व्यवस्था करावी. प्रोजेक्ट फेल्युअर असल्यास असले काहीही करू नये. ;-)
5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?
मराठी लोक बर्याच बाबतीत मागे आहेत. माजोर्डेपणा, आळस, दुही, विविध प्रकारचे न्यूनगंड, इतरांना क्षुल्लक लेखणे या बाबतीत मराठी लोक आघाडीवर आहेत. बाकी दक्षिण लोक्स चांगले असतात हे निरीक्षण नोंदवतो.
6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?
सापाला मारायची गरज नाही. त्याला डोलवत ठेवले तरी भागते. अशी व्यक्ती बॉस असेल तर त्याची स्तुती करून काम साधून घ्यावे. ज्युनिअर असेल तर अंतर ठेवावे. सोबतची असेल तर तेवढ्यापुरते हसून-खेळून संबंध ठेवावेत. उगीच तत्व म्हणून भांडण करू नये. ८-९ तास संबंध असणार्या लोकांविषयी फार विचार करू नये. अर्थात, गरज असेल तर बोलून वाद मिटवावेत. अगदीच गरज पडली तर असे भांडण करावे की पुन्हा आपल्या वाट्याला जायची कुणाची हिम्मत होऊ नये. वाद होणारच नाहीत असे बघणे सगळ्यात फायदेशीर!
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 01/18/2019 - 09:41
नवीन
योग्य प्रश्न..मलाही हा नेहमी पडतो..
म्हणजे जे दिसतं ते पुरुष बघतील हे माहिती असतं. मग पुररूषांनी बघावं की नाही बघावं की बघून न बघितल्यासारखं करावं ह्याविषयी मुलींना काय वाटतं नेमकं? आणि हा प्रश्न फक्त प्रचलित तोकड्या कपड्यांविषयी नाही तर साडी आणि नववारी विषयी पण आहे.
अर्थात काहीही दिसत नसताना सुद्धा काहीतरी दिसेलच ह्या आशेने बघणाऱ्या पुरुषांची मानसिकता हा सुद्धा तितक्याच अभ्यासाचा विषय आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 01/18/2019 - 08:14
नवीन
जेवढ्यास तेवढे काम करून सहकाऱ्यांशी कोणतेही संबंध न ठेवल्यास प्रश्नच पडत नाहीत. जे काही मिळत असते ते कंपनी देत असते, सहकारी नाहीत. पिकनिकना अजिबात जाऊ नये. बाहेरच्या लोकांबरोबर जावे. वाटसप ग्रूपचा डबा उडवावा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 01/18/2019 - 09:04
नवीन
प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचे काही काम कराल, त्याचे अपडेट्स, अख्ख्या टीमला, तुमच्या म्यानेजराला, स्टेक होल्डर लोकांनां व त्यांच्यापैकी जे तिथले म्यानेजर असतील, लीड्स वगैरे असतील त्यांना पाठवावीत. इमेल्स ची सुरुवात तुम्ही काय काय काम केले आहे - आठवड्यात, मोड्यूल/ ट्रेंच वाईज वगैरे हे थोडक्यात लिहावे, जर काही अडचणी आल्या असतील तर त्यावर काय सोल्यूशन काढले व त्यामुळे किती फायदा झाला - अमके म्यान अवर्स वाचले वगैरे हे जरूर हायलाईट करा. अर्थात हे प्रत्येक वेळी करता येणार नाही पण दोन तीन महिन्यातून एकदा तरी करा.
ईमेल पाठवताना त्याचा समारोप, काही अडचणी असतील तर मला संपर्क करा, हे अवश्य सांगून करा. स्टेक होल्डर लोकांबरोबर अतिशय उत्तम संबंध प्रस्थापित करा.
बाकी आपल्याकडे कधी खरेखुरे व्यावसायिक वातावरण बघायला मिळेल का, ह्याबद्दल खूप शंका आहेत.
अवांतर आणि हलके घेण्यासाठी : कामात लक्ष द्या, स्त्री सहकाऱ्यांचे कपडे, इतरांच्या डोक्यावरील टोप्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पाहण्यासाठी आणि श्र्वासांचे व्यायाम करण्यासाठी कोणी काही परिधान करून येत नाही, हे पक्के लक्षात असूद्या. कारण actual काम आणि त्यासंबंधित इमेल्स - हे जर केले तर ह्या आणि इतर negative extra curricular activitiesसाठी फारसा वेळ राहणार नाही, असे वाटते.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 01/18/2019 - 09:23
नवीन
अवांतर आणि हलके घेण्यासाठी : कामात लक्ष द्या, स्त्री सहकाऱ्यांचे कपडे, इतरांच्या डोक्यावरील टोप्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पाहण्यासाठी आणि श्र्वासांचे व्यायाम करण्यासाठी कोणी काही परिधान करून येत नाही, हे पक्के लक्षात असूद्या. कारण actual काम आणि त्यासंबंधित इमेल्स - हे जर केले तर ह्या आणि इतर negative extra curricular activitiesसाठी फारसा वेळ राहणार नाही, असे वाटते.
हाहाहा...मस्त प्रतिसाद. पण असं होत नाही. कार्यालयात आल्यानंतर निरीक्षण करण्याची वृत्ती, भावभावना ऑफ करून ठेवणे शक्य नसते. कुठल्याही घटनेवर, दृष्यावर, आवाजावर, मजकूरावर वगैरे विचार करून मते बनवणे, तुलना करणे, त्यात आपल्या फायद्याचे काय आहे हे बघणे हा नैसर्गिक मनुष्यस्वभाव आहे. तो कसा बदलता येईल? पाहणे, श्वासांचे व्यायाम वगैरे परिणाम आहेत, कारणे नाहीत.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 01/18/2019 - 09:37
नवीन
ऑफिसमध्ये तुम्हांला तुमच्या भावभावनांचा विचार करणे, आपल्या स्त्री सहकाऱ्यांचे निरीक्षण करणे, मते बनवणे ह्यासाठी बोलावत नाहीत आणि त्याचा पगार देत नाहीत, इतके लक्षात घेता आले तरी पुरेसे आहे.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 01/18/2019 - 10:06
नवीन
तुमचे वाक्य ऐकायला छान वाटते. पण ऑफिस मध्ये जिथे आपण काम करतो तिथे एटीकेट नावाचा देखील काही प्रकार असतो. ऑफिस मध्ये ऑफिस सारखे वातावरण ठेवणे he देखील महत्वाचे आहे हो..
उद्या समजा मी ऑफिस मध्ये बर्मुडा पॅन्ट घालून गेलो आणि कोणी त्याबाबत प्रश्न विचारला तर मी त्याला असे उत्तर नाही देऊ शकत कि - तुम्हाला इथे माझ्या बर्मुडा पॅन्ट चे निरक्षण करण्यासाठी नाही बोलावलेले. कृपया त्याचा पगार कंपनी देणार नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा...!!!
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 01/18/2019 - 10:39
नवीन
स्त्री सहकारी: अरे वा, आज बर्म्युडात एकदम? काय विशेष? दिसतोयस भारी पण...
पुरुषः हे बघा, कृपया माझ्या बर्म्युडाचे निरीक्षण करू नका; कंपनी तुम्हाला मी कुठले कपडे घालतो याचे निरीक्षण करण्याचा पगार देत नाही.
स्त्री सहकारी: हो का? मग "ट्रॅडिशनल डे"च्या दिवशी मी साडी घातली होती तेव्हा मला दिवसातून चार वेळा "ऑस्सम, जबरदस्त, नेवर-सीन-बिफोर" असे म्हटला होतास त्याचे वेगळे पैसे दिले का तुला कंपनीने?
पुरुषः तेव्हा मी अजाण बालक होतो. आता मी सुजाण, प्रगल्भ वगैरे झालोय! त्यामुळे आता माझ्या बर्म्युडाविषयी बोलणे टाळलेस तर बरे होईल.
(तिची एक रेशमी बट डोळ्यांवरून पुढे येते. पुरुष कर्मचारी अत्यवस्थ!)
पुरुषः हे बघा, ती बट मागे नीट खोचून ठेवा.
स्त्री सहकारी: जास्त वटवट करू नकोस. माझी बट! माझी वट! जिथे पाहिजे तिथे ठेवीन नाहीतर कापून टाकीन. जास्त खटपणा करशील तर 'ओम फट स्वः' करून टाकीन!
(ती फणकार्याने निघून जाते. जातांना तिचा सुगंध त्याच्या नाकाला त्रास देऊन जातो)
पुरुषः (त्रासून) अवघड आहे. ये थांब, सॉरी! चल कॉफी प्यायला जाऊ. बाकी तुझे डोळे आज निराळेच दिसतायेत...एकदम...
स्त्री सहकारी: कातिल? (डोळा मारते)
(दोघेही हसतात)
हीच तर गंमत आहे. प्रेम असेच तर फुलते. जसे प्रेम फुलते तसाच द्वेषही फुलतो. हे चालायचेच! अखंड! अनंत काळापर्यंत! जोपर्यंत माणूस नावाचा प्राणी या पृथ्वीवर आहे तोपर्यंत! कृत्रिम बांध घालून हे थांबवता थोडेच येते...
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 01/18/2019 - 17:27
नवीन
मी जातो अॉ फिसला बर्मुडा घालून काही फरक पडत नाही. (पुणे स्थित , MNC,नाव पाहिजे असेल तर व्यनि करा. ) रच्याकने जेव्हा एखादा सुटाबुटातला त्रस्त चेहरा आजूबाजूला बघतो तेव्हा गळ्यात आयडी आणि खाली ३/४ लै भारी वाटते. आयडी पण गळ्यात घालणे सक्तीचे नाही. पण उगाच आपलं घालायचं ;-)
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 01/18/2019 - 10:14
नवीन
तसं तर कंपनी आपल्याला फक्त आणि फक्त कामाचा पगार देते. कामानिमित्त सहकाऱ्यांशी बोलणे कंपनीत मान्य असते.
पण त्याव्यतिरिक्त सहकाऱ्याच्या कौटुंबिक अडचणी ऐकून घेणं, त्यावर सल्ले देणं, राजकारणावर गप्पा मारणं ह्यापैकी कुठल्याही गोष्टी साठी कंपनी पगार देत नाही. पण हे खरंच शक्य आहे का?
त्यासाठी कंपनीला रोबोट्स बसवावे लागतील.
त्यामुळे तुम्ही म्हणताय ते ऐकायला छान आहे..अनुसरायला नाही..
कंपनीत बसून मिपावर प्रतिसाद द्यायला सुद्धा कंपनी पगार देत नाही.
-- कंपनीत बसून मिपा मिपा खेळणारा चिनार..
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 01/18/2019 - 10:20
नवीन
जे प्रॅक्टीकली शक्य आहे त्याचाच आग्रह धरायला हवा. जे शक्यच नाही त्याचा आग्रह धरणे म्हणजे अकारण दुराग्रहीपणा झाला...असं सगळं शक्य असतं तर जग हे आदर्श झालं असतं...
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Fri, 01/18/2019 - 10:15
नवीन
बरोबर आहे...पण...
कार्यालयांमध्ये कित्येक प्रेमप्रकरणे, लिव-इन, ब्रेक-अप, मैत्री, वगैरे गुंतागुंतीची प्रकरणे घडत असतात. यामध्ये स्त्री सहकार्यांचा सहभागही तितकाच असतो. फक्त पुरुषच त्यांच्या स्त्री सहकार्यांचे निरीक्षण करतात असे नाही. स्त्री कर्मचारीदेखील पुरुष कर्मचार्यांना जोखत असतात हे ही तितकेच खरे; अन्यथा अतिशय तोकडे कपडे घालण्याचे कुठलेच तार्किक कारण दिसत नाही. मुळात मी अजूनही मुलींनी असे कपडे घालण्याचे कारण शोधतोय. याचे पटण्याजोगे कारण एकच आहे - आकर्षक, अधिकाधिक आकर्षक दिसावे हेच! म्हणजे उद्देशच तो असेल तर पुरुष कर्मचार्यांनी निरीक्षण केल्यास वावगे वाटण्याचे कारण नसावे असे माझे मत. बाकी "मुलींनी कपडे कसे घालावे यावर बंधन नको; मुलांनीच नीट, सभ्य वागणे शिकले पाहिजे" हे आजकालचे एक तद्दन फालतू लॉजिक आहे. ते एकदा तोंडावर मारून फेकले की सगळे बोलणेच खुंटते.
* माझ्या विभागात काम करणारा बंगळूर कार्यालयातील एक अतिशय हुशार कर्मचारी गेल्या शुक्रवारी (११ जाने २०१९) कार्यालयात येत असतांना एका भीषण अपघातात मृत्यू पावला. मी त्याच्यासोबत खूप काम केले होते. काल आमच्या विभागाने २० मिनिटांची शोकसभा आयोजित केली होती. त्याच्या शेजारी बसणारा त्याचा सहयोगी पण ज्युनिअर कर्मचारी अक्षरशः रडला. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. हा सगळा मूर्खपणाच म्हणायचा! भावभावना ऑफ करून ठेवणे महत्वाचे!
* आमच्या कार्यालयात एका कँटीनमध्ये काम करणार्या महिला कर्मचारीने मागे एका सोबतच्या पुरुष कर्मचार्यावर त्याने तिच्यावर कँटीनमध्येच बलात्कार केल्याचा घणाघाती आरोप केला होता. प्रकरण पोलीसात गेले. नंतर उघडकीस आले की त्यांचे सगळे संगनमताने चालले होते. पुरुष कर्मचार्याने व्हिडिओ काढल्याचा संशय आल्याने त्या महिलेचे धाबे दणाणले. बदनामीची भीती! तिने लगेच बलात्काराचे आरोप ठोकले. म्हणजे भावभावना असतातच. त्या टाळू शकणे कुणालाच जमले नाही; मग ते कार्यालय असो; घर असो; ट्रेन असो; लग्नाचा मंडप असो; अथवा स्मशान!. शिवाय तितक्याच तीव्र भावभावना स्त्री कर्मचार्यांच्यादेखील असतात. फक्त पुरुषांनाच धारेवर धरणे ही आजकाल फॅशन झाली आहे.
फक्त पुरुषांचच चुकतं हा गैरसमज आहे. स्त्रियांचंदेखील तितकंच चुकत असतं. सोनी टीव्हीवरील 'क्राईम पट्रोल' ही मालिका (सत्य घटनांवर आधारित) पाहिल्यास लक्षात येतं की स्त्री-पुरुष हे दोन्ही सारख्याच प्रमाणात चुकत असतात. काही काही केसेसमध्ये स्त्रियांची क्रूरता बघून अंगावर काटा येतो. आजच्या टाईम्समधली शबनमची बातमी वाचून मन सुन्न झाले. २००८ मध्ये या शबनमने (अमरोहा, उत्तर प्रदेश) आपल्याच घरातील ९ जणांचा आपल्या प्रियकराच्या साथीने निर्घृण खून केला. त्यावेळेस ती ७ महिन्यांची गरोदर होती. त्या खून झालेल्या ९ जणांमध्ये एक ८ महिन्यांचे बाळ होते! त्या गावात त्यानंतर कुणीच आपल्या मुलीचे नाव 'शबनम' ठेवलेले नाही. टाईम्स ऑफ इंडिया, १८-जाने-२०१९, पुणे आवृत्ती.
मुद्दा हा की भावभावना, चुका, गुन्हे, अविचार, अनाचार हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. यात पुरुष-स्त्री असा भेद करता येत नाही. असो.
- Log in or register to post comments
ह
हर्षद खुस्पे
Fri, 01/18/2019 - 11:14
नवीन
+++++1111111111111111
अत्यंत सुंदर मुद्दा. अशी सकस चर्चा मिपा वर कायम येण्यासाठी प्रेरित करते
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 01/18/2019 - 10:30
नवीन
प्रश्न 4 चे उत्तर आवडले. धन्यवाद. :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 01/22/2019 - 05:32
नवीन
एक विनोद --
एक मुलगी आपल्या मैत्रिणीला सांगते," अगं, तो मुलगा मला त्रास देतो आहे
मैत्रीण -- पण तो तर तुझ्याकडे बघतही नाहीये
मुलगी -- त्याचाच तर मला त्रास होतोय.
वस्तुस्थिती-- आपण चांगले कपडे घालावे आणि सुंदर दिसावे आणि आपण सुंदर दिसतो आहोत हे इतरांनी पाहावे आणि आपल्याला "दाद" द्यावी हि स्त्रियांची (थोडीफार पुरुषांची सुद्धा) नैसर्गिक उर्मी (इन्स्टिंक्ट) असते. यामुळेच मुली जिथे तिथे सेल्फी आणि फोटो काढत असतात. (हे प्रमाण पुरुषांपेक्षा बरेच जास्त आहे)
स्वतुष्टीकरण(self gratification) हा स्त्रीच्या स्वभावाचा एक भाग असतो. "सांगा राया मी कशी दिसते" किंवा "राग मेरे रूप के तू गाये जा" या तर्हेची गाणी या स्वभावाचे निदर्शक आहे.
कोणतीही मुलगी सकाळी साधं दूध आणायला केस विंचरून थोडेफारतरी नीटनेटके झाल्याशिवाय बाहेर पडणारच नाही याउलट मुलगे काय घातलंय त्याची चिंता ना करता किंवा "कोण बघतंय" म्हणून कसेही बाहेर पडतात. हा स्त्री आणि पुरुष व्यक्तिमत्त्वातील मूलभूत फरक आहे.एखाद्या समारंभात स्त्रीच्या कपड्यावर थोडासा जरी डाग पडला असेल तर पूर्ण समारंभ भर ती स्त्री फार त्रस्त असते. याउलट पुरुष दोन मिनिटं विचार करतील आणि सोडून देतील.
आपण चांगले दिसावे हि प्रत्येक मुलीची अपेक्षा असतेच पण त्यासाठी तोकडे कपडे घालून अतिरेक होत नाही ना हे पाहणे प्रत्येक मुलीचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने स्त्रियांच्या पोशाखाची पाश्चात्य परंपरेत संहिता (code) अशी नाही. त्यातून जेथे या संहिता निर्माण केल्या गेल्या तेंव्हा तेथे फारशा स्त्रिया काम करत नसत आणि तेथे १० महिने थंडी असल्याने अंगभर कपडे घालणे हे जास्त सोयीचे होते.
आता कपड्याबद्दलची आणि एकंदर वैचारिक स्वातंत्र्याची कल्पना शिथिल झालेली असल्याने काही मुली त्याचा गैरफायदा घेताना आढळतात हि वस्तुस्थिती. त्यातून एखादा कपडा अंगभर असूनही उदा. साडी अंगभर असली तरी झिरझिरीत साडी नेसणे सारखा पदर जागेवरून "चळणे" अशा तर्हेच्या गोष्टी "सहज" होऊ शकतात. यात कपड्यापेक्षा त्या मुलीची वैचारिक पातळी हि महत्त्वाची असते.
"स्त्रीत्वाचा गैरफायदा" घेणाऱ्या मुलीसुद्धा आपल्याला असंख्य वेळेस दिसतात. यात एखाद्या रांगेत घुसणे (उदा. तिकिटाच्या) पासून आपली कामे भिडस्त सहकार्याच्या गळ्यात टाकणे पर्यंत येते.
बरेच पुरुष लघळपणा करतात हे जगजाहीर असते पण स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेंव्हा सहानुभूती स्त्रीकडेच जाते.
रुग्णालयात येणाऱ्या मुली जेंव्हा असे तोकडे कपडे घालतात तेंव्हा त्याबद्दल नक्की काय ते सांगणे कठीण जाते. पवई येथे मी काम करीत असलेल्या रुग्णालयात एक मुलगी इतक्या खोल गळ्याचा टॉप घालून आली होती कि माझ्या दोन महिला सहकार्यांना पण लाज वाटली. गम्मत म्हणजे झाडूवाल्यापासून ते क्षकिरण तंत्रज्ञापर्यंत सर्व लोक तिच्या कडे "पाहत" होते आणि तिला त्याची काही फिकीर नव्हती. काही वेळेस मुली इतक्या तोकड्या अर्ध्या चड्ड्या घालून येतात कि अंतर्वस्त्राची कड त्याच्या खालून दिसावी.
दुर्दैवाने सौंदर्य हे "मोहक" असावे "मादक" नव्हे हा विचार आता जुनाट वाटू लागला असून प्रसिद्धी (मग ती चांगली असो कि वाईट ते गौण आहे) हि महत्त्वाची झाली आहे.
असो
हा विषय फार गहन आहे
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Tue, 01/22/2019 - 12:17
नवीन
माझ्या कामाच्या ठिकाणी १२ मोठ्या इमारती आहेत. एका इमारतीत साधारण दोन-तीन हजार कर्मचारी आहेत. मी ज्या इमारतीत बसतो तिथेच अजून एक मुलगी काम करते. ही मुलगी रोज, न चुकता अतिशय तंग टी-शर्ट आणि जीन्स घालते. टी-शर्ट इतका कमालीचा तंग असतो की विचारता सोय नाही. इतका तंग टी-शर्ट घालण्याचे खरे कारण म्हणजे तिच्या पोटावरच्या अणि मानेखालच्या विशिष्ट भागावर उपरवालेने अतिशय सढळ हाताने सौंदर्य दिले आहे. जाऊ द्या. उगीच कोडी घालण्यात अर्थ नाही. स्पष्टपणे सांगायचे म्हणजे तिचा स्तनप्रांत हा अतिउन्नत (आणि, खोटे का बोला, आकर्षकदेखील!) असून तिच्या पेहरावावरून नक्कीच हे अनुमान काढता येते की तिच्या या मालमत्तेची जाहिरात करण्यासाठीच ती तंग टी-शर्ट घालून येते. तिची लिफ्टमधून येतांना-जातांना, बाहेर लंचला, चहाला जातांना बहुतेक सगळे पुरुष कर्मचारी त्या मुलीच्या छातीकडे लपून-छपून बघत असतात. लिफ्टमध्ये तर खरी मजा येते. उभे असलेले पुरुष कर्मचारी एवढ्याशा जागेत शिताफीने तिच्याकडे (?) चोरून बघत असतात. कुणाच्या लक्षात न येऊ देता ही कसरत एवढ्या छोट्या आणि गच्च भरलेल्या लिफ्टमध्ये करायची म्हणजे खायचं काम नाही. ही मुलगी अगदी रोज असाच पेहराव करून येते. आता तिला आपल्याकडे पुरुष सहकारी कसे बघत असतील हे कळत नसेल? अर्थात, अशा बर्याच मुली असतात म्हणा. त्यांच्याकडे नाही पाहिलं तर त्यांना खरोखर 'त्रास' होतो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 01/22/2019 - 15:58
नवीन
तुमच्यासारख्या बुरसटलेले विचार असलेले लोक हापिसातल्या स्त्रियांना "आयकँडी" समजतात....स्त्रीला तिने काय कसे आणि किती कपडे घालावे हे व्यवस्थित समजते
- माशे धरा
त.टी. - हा फक्त टाईमपास प्रतिसाद आहे...वस्कन बोचकारू नये :D
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Wed, 01/23/2019 - 05:51
नवीन
हाहा...अहो अशा स्त्रियांना पुरुषांनी आयकँडी समजावे म्हणूनच तर त्या असले उत्तेजक कपडे घालतात; यात आयकँडी समजणार्यांचा काय दोष? :-)
सगळ्याच स्त्रियांना कपडे किती आणि कसे परिधान करावे हे कळले असते तर वर डॉक्टरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे कपडे घातले नसते आजकालच्या मुलींनी! कितीतरी बायका अतिशय झिरझिरीत साडी घालून पोट दिसेल अशा पद्धतीने साडी अॅडजस्ट करतात. याला काय म्हणावे? दुपट्टा कशासाठी असतो याबद्दल मुलींचं शिक्षण घेण्यासाठी आमच्या कंपनीत ईमेल्स पाठवले गेले होते. आजकाल किती मुली/बायका दुपट्टा तो ज्या कामासाठी वापरायचा असतो त्या कामासाठी वापरतात? अगदी नगण्य! दुपट्टा सहसा अगदी वर गळ्याभोवती गुंडाळलेला असतो. एकदम कुणी अनोळखी माणसे असल्यास तो उगीच खाली ओढण्याचा फक्त अभिनय केला जातो. हे सगळे कशासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतोय पण मिपावर तरी अजून या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीतयेत. मला वाटलं इथेतरी खरी, प्रामाणिक उत्तरे मिळतील पण ती उत्तरे सोडून बाकीची चर्चा फक्त होतेय...ती उत्तरे तशी जगजाहीरच आहेत फक्त पब्लिकली मान्य करण्याचे धाडस बहुधा नाहीये.
मी अगदीच आयकँडी समजतो असे नव्हे पण आकर्षक चेहरा दिसल्यास कोण मान फिरवतो? असे महान आत्मे या जगात किती असतील? अशा महान (आणि बहुधा ढोंगी) आत्म्यांचा मी जाहीर सत्कार करायला तयार आहे. :-)
हा प्रतिसाद "वस्कन बोचकारणे" कॅटेगरीमध्ये बसतो का याचा कृपया खुलासा करावा. असल्यास मोठ्या मनाने क्षमा करावी. (नेहमीप्रमाणे, कृ. ह. घे. :-))
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 01/23/2019 - 07:12
नवीन
विषय निघालाच आहे म्हणून विचारून घेतो..लगेच वसकन बोचकारु नका..
आजकाल (म्हणजे दहा-बारा वर्षांपासून) साधारण गुढघ्याच्या खालपर्यंत येईल असे कुर्ते घालण्यात येतात. हा पेहराव एकंदरीत पंजाबी ड्रेसचा चुलत घराण्यातला वाटतो. ह्यात ओढणी घेण्यात येत नाही.
मज पामराला प्रश्न असा आहे की कुर्त्यात असं काय वेगळं असतं ज्यामुळे ओढणीची गरज नाही असं पेहराव करणाऱ्यांना वाटतं?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 01/23/2019 - 09:25
नवीन
थोडा जाड कापडाचा आणि अंगासरशी बसणारा नसावा अशी "अपेक्षा"असते. त्यामुळे "अंगप्रदर्शन" होणार नाही.
वस्तुस्थिती तशी "असतेच" असे नाही
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
गुरुवार, 01/24/2019 - 19:57
नवीन
योग्य प्रतिसाद . ते श्वासांचे व्यायाम करायला ऑफिसात न जाता
पैसे भरुन योगा क्लास लावावेत ;)
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
गुरुवार, 01/24/2019 - 19:59
नवीन
माझा प्रतिसाद तशोधरा च्या प्रतिसादाला आहे .
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
गुरुवार, 01/24/2019 - 20:06
नवीन
नक्कि धागा कश्यावर आहे ? स्त्रियांनी काय घालावे कि ऑफिस मध्ये काय घालुन यावे ?
कन्फुजन आहे .
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 01/24/2019 - 20:44
नवीन
....
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
गुरुवार, 01/24/2019 - 20:50
नवीन
कुणी त्ये ??
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 01/25/2019 - 03:07
नवीन
स्त्रियांनी ऑफिसात काम करताना वेशभूषेची आचारसंहिता काय आहे? आणि असेल तर त्याचे पालन का बहुतांश स्त्रिया का करत नाहीत? यामागे नेमकी काय मानसिकता आहे??
आणि या बाबतीत HR वाले इथे स्त्रियांना सॉफ्ट कॉर्नर का देतात?
नेमका हा चर्चे चा विषय आहे तरी बरेच स्त्री मिपाकर या चर्चे ला " स्त्रियांनी काय परिधान करावे आणि काय करू नये " या विषयाकडे खेचत आहेत.
स्त्रियांनी ऑफिस च्या बाहेर काय परिधान करावे आणि काय नको हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. पण ऑफिस मध्ये हा निश्चित च वयक्तिक प्रश्न नही.. !! ऑफिस चे नाव, रेप्युटेशन हे सगळे पणाला लागू शकते. !
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
Mon, 01/28/2019 - 03:36
नवीन
हा विचार एच आर करतिल कि , आपण का भांडतोय ?
नेहेमी मुलींनी काय घालावे हा प्रश्न येतो . मुलेहि ऑफिसमध्ये
लोव वेस्ट पँट्स घालुन येतात , विचित्र दिसतं बसताना पण हे
कुणी सांगायचं त्यांना ??
मुलींवर नेहेमीच कसले विषय हे... :(
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Fri, 01/18/2019 - 11:24
नवीन
1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?
आमच्या सध्याच्या ऑफिसमध्ये असाच व्हायचं, आमचं शर्टाचे एक बटन उघडे दिसले कि hr आरडा ओरड करायची, एक दिवशी डोके सटकले आणि ४ चौघात झापले,- आमच्या शर्टाचे एक बटन उघडे चालत नाही, मग या बायका एवढ्या खोल गळ्याचे कपडे घालतात ते कसे चालते? आणि स्लीव्ह लेसच्या नावाने हि अशी बगलेतले केस दाखवणे हि कुठले फॅशन ? हे हि चालते का तुम्हाला? तेव्हा सगळ्या बायका खिदळल्या पण परत कधी hr ने या हा विषय काढला नाही.
2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?
माझ्या हनुवटीवर आलेली थोडीशी दाढी बघून ती hr किरकिर करत होती, मग म्हटले ते टोप्या घालून दाढ्या वाढवून येतात तेव्हा डोळे बंद होतात का तुमचे? तेव्हा ती hr म्हणाली कि ते त्यांचे धार्मिक कारण आहे, मग म्हटले ठीक आहे, आणि मी शेंडी राखली, अगदी २ वर्ष, hr आली होती विचारायला मी म्हटले माझ्या धार्मिक गोष्टीत लुडबुड नको.२ वर्ष सगळे हसायचे पण मी शेंडी तेव्हाच काढली जेव्हा सगळे दाढीवाले सोडून गेले.
3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :द
त्यांच्या तोंडावर हसून निघून जायचे , दुर्लक्ष करायचे, कारण त्यांच्या घराच्या छपरावरून इंग्रजांचे विमान गेलेले असते.
6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?
कामापुरतेच संबंध ठेवायचे, उगाच सकाळी तोंड वर करून गॉड मॉर्निंग, वेगैरे म्हणायचे सोपस्कार देखील पार पाडू नयेत.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 01/18/2019 - 19:31
नवीन
सतिश पाटील,
तुम्ही मुद्दाम शेंडी वाढवलीत कि फक्त HR वर खुन्नस म्हणून???
तुम्हाला वाढवायची इच्छा असेल म्हणून वाढवली असेल तर ठीक आहे. पण खुन्नस म्हणून वाढवली असेल तर मात्र - कुछ ज्यादा ही हो गया यह तो... !!!!
- Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची
Mon, 01/28/2019 - 03:39
नवीन
मला तरी त्यांनी फक्त इथे लिहिन्यापुर्ती वाढवलेली वाटतेय ( शेंडी )
=))
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Wed, 01/30/2019 - 11:59
नवीन
फुकट आमचे कौतुक करा किंवा उगाच लक्ष वेधून घ्याव्या अश्या सवयी नाहीत आम्हाला.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 01/20/2019 - 16:21
नवीन
ऑफिस ला आपण कशाला जातो हे कधीच विसरता कामा नये.
आपण आपलं काम चोख करणे कामापुरता च स्टाफ शी संबंध ठेवणे
कान डोळे उघडे ठेवून आपल्या शी कोण राजकारण करत नाही ना ह्या वर लक्ष ठेवणे .
आणि थोडा जरी वास आला तरी विरोध करने ओपनली नाही गुप्तपणे .
स्त्री ह्या प्राण्या पासून खूप खूप लांबच अंतर ठेवणे .सुंदर स्त्रिया office chya बाहेर पण आसतात हे सत्य मान्य करने .
बस सर्व सोप आसात मग manage Karne
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Mon, 01/21/2019 - 09:31
नवीन
1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?
असे नाही कि महिलांबद्दल बोटचेपे धोरण असते . त्यांनाही नियम लागू असतात पण काही स्त्रिया इतक्या बिनधास्त आणि बदमाश असतात कि काही विचारू नका . त्यांना हे असे काही भव्यदिव्य करून , कायम चर्चेत राहायला आवडते . त्यामुळे त्या बहुधा अश्या वागत असाव्यात . आणि हे नियम बनवणारे लोकहि त्यांना सांगून सांगून थकतात आणि नंतर दुर्लक्ष करतात .
पुरुष हे सर्व निमूटपणे सहन करतात त्यामागे त्यांचा कुटुंबप्रमुखपणा कारणीभूत असतो . त्यांना अशी अचानक या अश्या फालतू मुद्दयांमुळे गादीवर लाथ बसलेली चालत नाही . आणि अचानक बसलेली तर मुळीच नाही .. कारण एकच इ एम आय .. हा इ एम आय च पुरुषीपणाची आयमाय एक करतो आणि मग त्या पुरुषाचं बनतंएक भू भू करणारं पॉमेरियन पिल्लू . जे फक्त शेपटी हलवू शकत आणि भू भू करू शकत ..जास्तीत जास्त कुणाच्या तरी उघड्या दानपेटीत एक रुपयाची दक्षिणा टाकू शकत आणि मग बाथरूम मध्ये जाऊन हलकं होऊ शकत दुसरं काही नाही ..
2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?
बरोबर आहे .. हा मुद्दा पटण्यासारखा आहे . आमच्या इथेही हे चालते . आम्ही बाहेर गेलो हुंदडायला कि मज्जाव , आणि हे नमाज पढून आले तरी ठीक .. मी विरोध केला होता तेव्हा कुठे आता त्यांना तो वेळ ज्यादा काम करून भरून द्यावा लागतो .. टोपी वगैरेवर माझा आक्षेप नाही कारण मी स्वतः पाच सहा महिने दाढ्या मिश्या वाढवून फिरत असतो .
3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :द
मी अश्या लोकांची यथेच्छ टेर खेचतो तेही गावंढळ भाषेत .. एकदा वादही झाला होता.
4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?
मुळात अश्या गोष्टी हाताळणे कठीण आहे .. त्यासाठी तूम्हाला तुमचे इतर नेटवर्क नीट ठेवावे लागते. हे पोपटराव जिथेतिथे असतात . पण त्यांना तुमच्या साहेबासमोर आणणे आणि त्याचे व्यवस्थित सत्कार करणे तोही योग्यवेळी गरजेचे असते .. सुदैवाने मी अश्या ठिकाणी काम करतो जिथे तुम्हाला तुम्ही काम केलेल्या गोष्टी इतक्या सहजासहजी चोरता येत नाहीत आणि चोरल्या तरी काहीतरी लूपहोल मी स्वतःकडे राखून ठेवतो म्हणजे त्या पोपटरावाला माझे पाय धरणे आले . .
5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?
मला हे मान्य नाही कारण असे जरी केले तरी त्याने फारसा पडत नाही . जर तो उमेदवार त्या लायकीचाच नसेल तर त्याविरुध्ध आवाजही उठवत येतो .. सरकारी दफ्तारी हे सर्व ठीक आहे पण संशोधनामध्ये आपल्याला हे माझे लोक ते त्यांचे असे करत येत नाही . तिथे तुम्हाला जे चांगले आहे तेच घ्यावे लागते अन्यथा वाटोळे अटळ आहे . तुमचेही आणि त्या प्रयोगशाळेचेही . मी तुम्हाला सांगतो , आजही माझ्या इथे संपूर्ण भारत सामावला आहे .. अक्षरशः मिझोरामवरूनही लोक इथे काम करत आहेत . पण तुम्हाला सांगू , ते अक्षरशः सोडून जाताना ढसाढसा रडतात .. कारण एकंच , राजकारण मुक्त वातावरण .. याच ओढीने बरेचसे सोडून गेलेले परतही येतात .. तात्पर्य , तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल आणि तेही लाखपटीने ..
6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?
यात मला वाटत मी बराच निपुण आहे .. हे माझे नाही तर माझ्या साहेबाचे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱयांचे हि मत आहे .. मी कामावरून अंबरेच वाद घालतो इतके कि त्याची आईबहिणही काढतो पण नंतर कसे ते देव जाणे पण त्याच्याबरोबर चहापाणी आणि खेळमेळीने बोलतो .. असे कि जणू काह्ही झालेच नाही आहे .. मिठी काय मारतो आणि जोक काय .. एकंदरीत वातावरण निवळून जाते आणि परत शक्यतो त्याच्याकडूनतरी असे घडत नाही ..
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 01/21/2019 - 17:54
नवीन
प्रतिसाद आवडला.
उघडपणे धर्माधिष्ठित कार्यप्रणाली असूनही नसल्याचेच भासवणार्या कंपनीतील य:किंशचित कर्मचारी वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा
- Log in or register to post comments
व
वीणा३
Mon, 01/21/2019 - 21:08
नवीन
समीरसूर आणि चिनार, हा तुम्हाला व्यक्तिगत प्रतिसाद नाही, आतापर्यंत अनेक लोकांकडून या प्रकाचे प्रश्न ऐकलेत तेव्हा मनात आलेले विचार
===================================================
हा प्रकार आमच्या कार्यालयात देखील आहे लोक अतिशय छान छान जेवण घेऊन येतात. तरी नशीब चिकन मटण बंद केलाय. तरी काही जण रसमलाई घेऊन येतात कि बादलीभर लाळ गाळल्यावरच चित्त थाऱ्यावर येत. मुळात स्वतःच्या डब्यात जेवायला असे छान पदार्थ घेऊन येणार्यांची मानसिकता मला कळलेली नाही. डब्यात स्वतःसाठी चांगले पदार्थ घेऊन येणार्यांची भूमिका / मानसिकता कळलीच पाहिजे.
- योग्य प्रश्न. म्हणजे जे काही डब्यात आणाल ते सर्वाना दिसेल हे माहित आहे. मग बाकीच्यांनी डब्याकडे बघावं कि नाही, कि बघून न बघिल्यासारखं करावं ह्याविषयी त्या डबेवाल्याला काय वाटत नेमकं? आणि हा प्रश्न फक्त फक्त चिकन मटण बद्दल नाही तर पोळी भाजी बद्दल पण आहे.
=======================================================
यात जेवणाच्या ऐवजी कार / महागडी घड्याळ / महागडे कपडे / महागडे फोन या सगळ्या गोष्टी येतात. मुळात आपल्या कडे जे काही चांगलं आहे त्याच लोकांनी कौतुक करावं हि प्रत्येकाची अपेक्षा असते. फेसबुक उगाच लोकप्रिय नाहीये. पण त्याचबरोबर ते कौतुक व्यक्त करण्याची एक पद्धत पण असते. त्या पद्धतीच्या बाहेर गेलं कि प्रॉब्लेम चालू होतो. असं गृहीत धारा कि प्रतिक्रिया देणारी व्यक्ती फक्त कलीग आहे, जास्त ओळख नाही मैत्री नाही. तुम्हाला खालीलपैकी कुठली प्रतिक्रिया आवडेल ?
उदा
१. तुम्ही दिसायला खूप हँडसम आहेत, ६ पॅक इ आहेत आणि ते दाखवणारा शर्ट घातलाय
अ . छान दिसतोयस - तो माणूस / बाई पुढे आपल्या कामाला लागले.
ब . काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त कामाचं बोलून निघून गेला / गेली
क. सतत, जेव्हा जेव्हा तुम्ही समोर आलात तेव्हा तेव्हा तुमच्या बरगड्यात डोळे खुपसून बघत राहिला /ली. आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर तुमच्या कडे बघून हसत खिदळत राहिला /ली.
२. .तुम्ही महागडी कार ऑफिस ला नळीत
अ . कार छान आहे आणि काही जुजबी प्रश्न - पुढे आपल्या कमला लागला/ली
ब . काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त कामाचं बोलून निघून गेला / गेली
क. सतत तुमच्या कार कडे बघत राहिला/ली. सतत कार चा विषय काढत राहिला / ली
मला वाटतं २नाही केसेस मध्ये बऱ्याच लोकांना अ आणि ब प्रतिक्रिया चालतील.
अ आवडेल, ब - ठीक आहे , क -राग येईल, विचित्र (inappropriate ) वाटेल.
थोडक्यात फेसबुक वर लाईक च बटण दाबण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ द्यावा अशी साधारण अपेक्षा असते असं वाटतं.
- एचआर काय करतात हा वेगळा विषय आहे. तुम्हाला चूक वाटलं/ तुमच्यावर अन्याय होतोय असं वाटलं तर तुम्हालाही तक्रार करण्याचा अधिकार आहे. बायकांच्या कपड्याबद्दल एचआर पोलिसी document बघून घ्या, त्यात काय चालतं काय नाही ते नीट दिलेलं असेल. खूप उत्साही असाल तर आणि कोणी नियम मोडताना दिसल्यावर तातडीने एचआर कडे जा. नसाल तर लक्ष ठेवा कोण नियम मोडत ते, आणि एचआर तुमच्याकडे तक्रार करायला आल्यावर आम्हालाच का नियम म्हणून भावनेला हात घाला :P . हाच प्रकार टोप्यांच्या बाबतीत पण करता येईल.
आमच्या सोसायटीत मी एकदा दिवाळी ला माझ्या घराबाहेर रांगोळी काढली तर मला सोसायटीच्या मॅनेजमेंट ने नोटीस दिली. मी जाऊन सांगून आले कि सगळ्यांना ख्रिसमस, हॅलोविन डेकोरेशन बाहेर ठेवायला बंदी करा मी रांगोळी साफ करते. काय बोलले नाहीत. बोलल्याविण होत नाही रे आधी बोलालेची पाहिजे :D
मुद्दा ३ - या लोकांकडे दुर्लक्ष करा. कामाचं बोलत असाल तर स्वतःला समजेपर्यंत सांगायला लावा. आत्मविश्वासाने यांच्या समोर वागा.
मुद्दा ४. हि शिकण्याची गोष्ट आहे. स्वतःच्या कामाची जाहिरात करायला शिका. त्यासाठी ढोल बडवायची गरज नसते. नेमक्या वेळी एखाद्या वाक्याने सुद्धा काम होऊ शकत
मुद्दा ५ - काय विशेष अनुभव नाही. "डोक्यावर बर्फ तोंडात साखर" हा नियम पळाला तर सगळे मदत करतात. तुमच्या बरोबर सगळ्यांची मैत्री होते.
मुद्दा ६. जेवढ्यास तेवढे. त्याशिवाय इलाज नाही.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Wed, 01/23/2019 - 04:54
नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
चर्चा काहीशी नैतिकता आणि पुरुषांची स्त्रियांबद्दल ची मानसिकता याकडे वळली. परंतु या चर्चे चा विषय हा नव्हता तरीही उठसुठ पुरुषांवर तोंडसुख घेणाऱ्या लोकांनी काही काळासाठी हा धागा हायजॅक केला होता. या लोकांचे म्हणणे आहे कि ऑफिस मध्ये कोण काय घालतो हे पाहण्यापेक्षा आपण आपले काम करावे ज्याचा आपल्याला पगार मिळतो. परंतु ऑफिस मध्ये ऑफिस सारखे वातावरण ठेवावे लागते. त्यामध्ये ड्रेस कोड हा फॅक्टर महत्वाचा आहे. आणि पुरुष वर्ग नियम व्यवस्थित पाळत असतील तर मग स्त्री वर्गाचे नेमके नियम कोणते आणि ते त्या पाळताना का दिसत नाहीत? त्यांनी खोल गळ्याचा ब्लॉउज किंवा तोकडा स्कर्ट घातला तर त्यामुळे ऑफिस मधील ड्रेस कोड शिस्त नक्कीच बिघडत असते. फॉर्मल च्या नावावर काहीही (स्कर्ट, पंजाबी, चुडीदार, साडी, शर्ट पॅन्ट, जीन्स,
सॅंडल, स्लीपर, खोल गळ्याचे फॅन्सी ड्रेस, उघड्या पाठीचे सलवार, लेहंगा, कोपरापर्यंत च्या रंगेबेरंगी बांगड्या, स्लीपर आणि सॉक्स कॉम्बिनेशन, भडक ज्वेलरी इ इ ) परिधान करण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांनाच का? याबाबत HR लोक इतकेसे का सवेंदनशील नाहीयेत?
बाकी इतर प्रश्नांची मिपाकरांनी दिलेली उत्तरे आवडली.
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 01/23/2019 - 09:45
नवीन
स्त्रियांच्या वेगवेगळ्या पोषाखाबद्दल ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी आपापल्या मनुष्यबळ विभागाला इपत्र लिहून स्त्री-पुरुष सगळ्यांना कंपनीने ठरवून एकच प्रकारचा गणवेश द्यावा असे सुचवावे.
इथे चर्चा करून काय होणार?
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 01/24/2019 - 02:58
नवीन
तुमची जळजळ समजली.
विरोध वेगवेगळ्या पोशाखाला नसून, फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये आपल्या आपल्या कपाटातले सगळे ड्रेस बसतात या स्त्री - मानसिकतेला आहे. बाकी मी याबद्दल वेळो वेळी Hr कडे आवाज उठवलाच आहे पण अजूनपर्यंत कसलीच कारवाई झालेली नाहीये. हाच प्रकार जर पुरुष कर्मचाऱ्याबद्दल झाला असता तर एव्हाना वॉर्निंग ई-मेल आली असती.
हेच लॉजिक सगळ्या चर्चांना वापरले तर मिपावर काथ्याकूट नावाचा विभाग बंद करावा लागेल, कारण इथे चर्चा करून प्रत्यक्षात काहीही होत नाही. कोणताही विषय निवडा. पण चर्चा करून इतर लोकांची त्या त्या विषयावरील मते समजून येतात.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/24/2019 - 03:53
नवीन
जळजळ? कोणावर? कशासाठी?
पुरुषांना खोल गळ्याचे ब्लाउज घालता येत नाहीत म्हणून माझी जळजळ होतेय?
कि त्यांना स्तन नसतात म्हणून माझी जळजळ होतेय?
एनिवे कोणते कपडे फॉर्मल आहेत आणि कोणते नाही हे प्रत्येक स्त्रीचा वॉर्डरोब चेक करून सांगणार आहे का HR?
एवढे करत बसण्याऐवजी सरळ बल्क प्रोड्यूस केलेले गणवेश देऊन टाकलेलं बरं होईल. पुरुष स्त्री दोघांना फॉर्मल शर्ट ट्राऊजर ब्लेझर.
एकेक वारासाठी एकेक रंग किंवा पॅटर्न द्या हवे तर ;)
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 01/24/2019 - 04:52
नवीन
थोड तरी लॉजिकल बोला.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/24/2019 - 05:15
नवीन
काय इलॉजिकल वाटतंय तुम्हाला यात?
वरची सगळी चर्चा फॅट लॉजिकली आणि काहीतरी सोल्युशन मिळवण्यासाठी चालली आहे का?
असेल तर चांगला इंप्लिमेंट करता येण्यासारखा उपाय सुचवतेय.
कि उपाय नकोच आहे फक्त पब्लिकली गॉसिप करायचंय?
पण मग हे तर फारच 'बायकी' झालं कि! यु नो बायकांना फक्त त्यांची दुःखं उगाळायची असतात, त्यावर काही उपाय शोधायचा नसतो (म्हणे)....
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/24/2019 - 10:41
नवीन
खरेच आहे ते =))
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/24/2019 - 12:15
नवीन
ते खरेच आहेच की नाही कोण म्हणतंय?
पण इथे पुरुष कशाला बायकांसारखं दुःख उगाळत बसलेत? उपाय शोधायचा सोडून.... आणि सुचवलेल्या उपायावर जळजळ, लॉजिकल बोला वगैरे रडारड....
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 01/24/2019 - 06:15
नवीन
पुरुषांसाठी फॉर्मल कपडे ठरवताना पुरुषांचा वॉर्डरोब चेक करून ठरवतात का HR वाले??
वाद घालायचा म्हणून काहीही???
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/24/2019 - 07:47
नवीन
पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये किंवा एकंदरच पुरुषांच्या कपड्यांमध्ये काय काय पर्याय असतात?
शर्ट पॅन्ट, टीशर्ट जीन्स, बर्मुडा खेरीज?
- Log in or register to post comments
स
सॅगी
गुरुवार, 01/24/2019 - 08:33
नवीन
पुरुषांच्या वॉर्डरोब मध्ये जनरली कोणते कपडे असतात हे HR ला माहीत असतं आणि त्यातले फॉर्मल कोणते आणि इंफॉर्मल कोणते हे पुरुषांच्या बाबतीत व्यवस्थित ठरवलेलं असतं, कंपनीच्या ड्रेस कोड रूल्स मध्ये लिहिलेलं असतं.
स्त्रियांच्या वॉर्डरोब मध्ये जनरली कोणते कपडे असतात हे ही HR ला माहीत असतं, मग त्यातले फॉर्मल कोणते आणि इंफॉर्मल कोणते हे स्त्रियांच्या बाबतीत का ठरवले जात नाही?
मुळात हाच तर प्रश्न आहे ना धाग्याचा?
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 01/24/2019 - 08:49
नवीन
माझ्याकडे शर्ट (हाल्फ, फुल्ल, प्लेन, लायनिंग, चित्रे असणारे, रंगीबेरंगी ) टी शर्ट ( हाल्फ, फुल्ल, व्ही नेक , गोल गळ्याचे, कॉलर चे, बनियान सारखे, मेसेज लिहिलेले, चित्रे असलेले)
पॅन्ट ( फुल्ल, हाल्फ, 3/4th, बर्मुडा, नाडी असलेली, पायात घोळणारी, कॉटन ची, जीन्स ची, गुढघ्याजवळ फाटलेली, कार्गो पॅन्ट, पायजमा, ट्रॅकसूट इ )
सलवार, कुर्ता, लग्नातला ब्लेझर, धोतर, टोपी, संग्राम फेम कुर्ता आणि अजून बरेच काही आहे. इतके ऑपशन आहेत परंतु तरीही ऑफिस ला जाताना यापैकी फक्त ऑफिस च्या policy मध्ये बसणारे शर्ट आणि पॅन्ट घालतो.
हाच न्याय शूज ला pan आहे. ( स्लीपर, सॅन्डल, स्पोर्ट्स शूज, जॉगिंग शूज इ असून सुद्धा रोज तेच तेच काळे शूज घालावे लागतात. )
आणि हे सर्व बऱ्यापैकी पुरुष कर्मचारी वर्ग फॉलो करतो...
आता प्लीज तुमचा वॊर्डरॉब चेक करा आणि पहा तुम्ही ऑफिस ला जाताना काय घालून जाता , आणि नक्की ते फॉर्मल च आहेत का? कंपनी च्या ड्रेस कोड पोलिसी मध्ये त्या सर्वांचा उल्लेख आहे का हे सर्व एकदा चेक करा.
या सर्वातून बहुतांश स्त्री वर्ग ड्रेस कोड फॉलो करत नाही हे एवढेच सांगायचे होते.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/24/2019 - 09:31
नवीन
> आणि हे सर्व बऱ्यापैकी पुरुष कर्मचारी वर्ग फॉलो करतो... > मी सांगतेय तसा गणवेश दिला सगळ्यांना तर पुरुष कर्मचाऱ्याला नक्की काय फरक पडणार आहे? फॉलो करताचयना तुम्ही सगळे नियम आधीच?
गणवेश दिला तर फरक कोणाला पडणार आहे? स्त्रियांना! मग झाला ना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व? कोणाच्या ड्रेसचा गळा कसा आहे, तो किती तंग आहे, मागे/ खांद्यावर खिडक्या आहेत का, ओढणी घेतली आहे का, मांड्या दिसतायत का वगैरे सगळे प्रॉब्लेम एका फटक्यात संपले ना?
===
बादवे माझी जळजळ कशामुळे झाली होती त्याचे उत्तर देऊन कृतकृत्य करा कि मला....
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 01/25/2019 - 03:20
नवीन
तुमची जळजळ होतेय कारण तुम्ही वा विषय म्हणजे स्त्री च्या कपडे परिधान करण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे या नजरेतून पाहत आहात. पण ही चर्चा फक्त कार्यालय आचारसंहिते बद्दल ची आहे.!
तुमचे वाक्य " इथे चर्चा करून काय उपयोग? हे मिपाकरांनी जर जास्त च मनावर घेतले तर मग मिपावर चर्चा करणेच बंद करावे लागेल.
उदा.
पेट्रोल डिझेल चे भाव वाढले - मोदींना तक्रार करा. मिपावर चर्चा करून काय होणार??
घरात मेडिकल प्रॉब्लेम आहे - डॉक्टर ला जाऊन भेटा. मिपावर चर्चा करून काय होणार??
काही कायदेशीर अडचणी आहेत - वकिलाला जाऊन विचारा मिपावर चर्चा करून काय होणार??
गाडी घ्यायचीय - शोरूम मध्ये जाऊन सेल्समन ला भेटा. मिपावर चर्चा करून काय होणार??
जवळपास प्रत्येक चर्चेला एक फटक्यात संपवू शकते हे वाक्य.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »