Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्नांची गोष्ट (गझल)

क — कहर, Mon, 01/28/2019 - 12:58
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग कीव येते मज अशा विकलांग स्वप्नांची

प्रतिक्रिया द्या
1746 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा