Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टोळीगीत इ.स. २०५०?

अ — अनन्त्_यात्री, Tue, 01/29/2019 - 14:30
तुमच्या पिढ्यांच्या अक्षम्य चुकांचे पातक अम्हाला रोज भोगायचे रोज बघायचे भेसूर रुपडे भकास पृथ्वीचे अभद्र कार्बनी पाऊल ठशांचे विटल्या फाटल्या ओझोन थराचे गटारगंगांचे विखारी धुराचे अवकाळी वृष्टीचे जखमी सृृृष्टीचे सिमेंटी जंगलांचे भेगाळ भूमीचे मरणपंथाच्या हरितवनांचे थांबा थांबा ऐका चीत्कार कुणाचे? पाण्याचा टँकर पळवून आणल्या मरणासन्नांच्या आमच्या टोळीचे!

प्रतिक्रिया द्या
2734 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/30/2019 - 09:32 नवीन
भारी कच्चा माल ! चोळीगीत इ.स. ३६३८ ? असे विडंबन येऊ शकते ! वि.सु. : लेखन किंव्वा आयडी उडवल्या गेल्यास आमची जबाबदारी नाही !
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 01/30/2019 - 12:26 नवीन
चोळीगीत तयार करून मिळेल पण ----- ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/30/2019 - 21:13 नवीन
यदाकदाचित बनवलेच तर अम्हाला व्यणीतून पाठवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/31/2019 - 05:39 नवीन
चोळी ने आयडी उडणार असेल तर चोळी ऐवजी मोळी वापरा हा का ना का पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि गुरुवार, 01/31/2019 - 08:31 नवीन
दोन्ही सूचना मान्य आहेत . बघू कसं होतंय ते ..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा