Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऋतू !

फ — फिझा, Fri, 02/08/2019 - 03:55
ऋतू ! हा एवढा ऋतू संपल्यावर काळोखातल्या गारठ्यामध्येच निघेन मी ! .... दूरच्या गावात जाण्यासाठी .... अंधारात स्तब्ध पणे उभ्या असलेल्या तुझ्या गावातल्या, या झाडांना निरोप देऊन ..... या झाडांकडूनच शिकलीये बरंच काही ....... सगळे ऋतू एकाच जागी उभे राहून झेलायचे .... इतरांना हवंय म्हणून बहर दाखवायचा अन स्वतःला हवंय म्हणून टिपं पण गाळायची..... श्रावण असल्याचे निमित्त करून ..... . उन्हाळ्यात, क्वचित दुरून येणारा थंड वारा 'तुझ्याकडूनच' आला आहे असं समजून पानांची सळसळ करून झेलायचा...... त्या स्पर्शाने नकळत शहारून घेतल्यावर त्याला समुद्राच्या लाटांमध्ये सोडून घ्यायचं ..... आणि लाटांच्या वाढणाऱ्या आवाजात .... आपण निमूट होऊन जायचं ...... ! तुला न भेटताच निघत आहे ........ पुढल्या ऋतू मध्ये जेव्हा प्राजक्ताचा सडा पडला असेल तुझ्या दारात ..... तेव्हा त्या नाजूक फुलांवर पाय न ठेवता तू जसा दुरून निघून जाशील ........ अगदी तशीच !! -----------------फिझा !

प्रतिक्रिया द्या
1359 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रमोद देर्देकर Fri, 02/08/2019 - 05:08 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
पलाश Fri, 02/08/2019 - 05:12 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 02/08/2019 - 09:58 नवीन
हरेक ऋतू येतंच असतो घेऊन नवीन सांगावा कुणी पोळून टाकतो , करतो लाही लाही तर कुणी उभारतो रम्य देखावा मन सैरभैर , हरेक ऋतूत सळसळ अंगी बाणावलेली कायम चक्र असेच चालू राहते अविरत सृष्टीचा असे अलिखित नियम ................ -------- सुंदर कविता ------------
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा