Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'संस्कृतबाह्य मराठी शब्दांची उत्पत्ती'

उ
उपयोजक
Sat, 02/09/2019 - 06:37
🗣 31 प्रतिसाद
शब्दांची उत्पत्ती शोधणं हे नेहमीच रंजक असतं.मराठी भाषेतले किमान ६०% शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत अाहेत असं भाषातज्ज्ञ म्हणतात.याचा अर्थ किमान ६०% शब्दांचं मूळ हे संस्कृतमधे शोधता येईल.पण जे मराठी शब्द संस्कृतमधून आलेले नाहीत त्यांचं काय? त्या शब्दांची उत्पत्ती काय?कुठून आले असावेत हे शब्द?काय इतिहास असावा या शब्दांचा? प्राकृत,द्रविड? आंतरजालावर यासाठी फार साधने उपलब्ध नाहीत.शब्दकोश आहेत पण व्युत्पत्तीकोश मात्र नाहीत. मिपावर भाषेसंबंधीचे जाणकार बरेच आहेत,विविध प्रकारचं मराठी वाचन असणारी मंडळी आहेत.ते या कामी मदत करु शकतील असे वाटल्याने हा धागाप्रपंच! मला सध्या या शब्दांची उत्पत्ती हवी आहे. सांग ऐक कुलूप जेवण झोप डोळे ससा आंबट गोड तहान अजून बरेच आहेत.सध्या एवढेच. अजून कोणाला असेच संस्कृतबाह्य मराठी शब्दांच्या उत्पत्तीचे प्रश्न पडले असतील तर आवर्जून विचारा.होऊ द्या ज्ञानरंजन!
वर्गीकरण
भाषा

प्रतिक्रिया द्या
20652 वाचन

💬 प्रतिसाद (31)
र
रमेश आठवले Sun, 02/10/2019 - 00:30 नवीन
या शब्दांची उत्पत्ती या संस्कृत शब्दामधून असावी जेवण = जीवन ससा=शशांक आंबट =आम्ल
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Sun, 02/10/2019 - 01:45 नवीन
संस्कृतात सश्याला शशक असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Sun, 02/10/2019 - 03:02 नवीन
दुरुस्ती बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 07:27 नवीन
https://en.m.wiktionary.org/wiki/ससा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 07:29 नवीन
ससा इथे लिंक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
प
पुष्कर Mon, 02/11/2019 - 08:01 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
उ
उपयोजक Sun, 02/10/2019 - 05:26 नवीन
जेवण = जीवन??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Sun, 02/10/2019 - 07:24 नवीन
मराठी, गुजराती हिंदी, वगैरे भाषा संस्कृतोदभव आहेत असे मानतात. गुजरातीत जेवण या साठी जीमण असा शब्द आहे तर हिंदीत जीमन असा शब्द आहे. हिंदीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमिताभ ने गायलेल्या ' खैके पान बनारसवाला ' या गाण्यात ' सोनेकी थालीने जीमना परोसा ' असे शब्द आहेत. या कडीवरून जेवण हा शब्द जीवन या संस्कृत शब्दावरुन आला असे मी समजतो. परोसा म्हणजे वाढले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ग
गामा पैलवान Sun, 02/10/2019 - 14:03 नवीन
रमेश आठवले, माहितीबद्दल धन्यवाद. ते अमिताबचं गाणं खैके पान नसून रंग बरसे आहे : https://www.google.co.uk/search?q=रंग+बरसे+लिरिक्स आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Sun, 02/10/2019 - 15:27 नवीन
धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
समर्पक Mon, 02/11/2019 - 22:07 नवीन
जेमन >> जेवण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
द
दीपक११७७ Sun, 02/10/2019 - 03:23 नवीन
एखाद्या शब्दाचा शोध घ्याचा असेल तर खानदेशी, विदर्भिय, कोंकणी आणि पश्चिम महाराष्ट्र भाषेत त्याला समकक्ष काही शब्द आहेत का, ते पहावे, जेणे करुन शब्द उत्पत्तीचा अचुक अंदाज घेता येईलं.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 06:59 नवीन
मराठी भाषा ही एक स्वतंत्र भाषाही होतीच ना ? म्हणजे प्रत्येक शब्दाची इतर भाषेत उत्पत्ती सापडेलच असे नाही, कुलूप शब्दाचा खोलणे क्रियापदाशी सम्बम्ध असेल का ? खोलप
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 02/10/2019 - 07:07 नवीन
कुलूप फारसी शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ग
गामा पैलवान Sun, 02/10/2019 - 13:59 नवीन
प्रचेतस, मला कुलूप हा शब्द संस्कृतातल्या क्लृप धातूवरनं आलेला वाटतो. इंग्रजीतला clue ही त्यावरनंच आलेला वाटतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पलाश Sun, 02/10/2019 - 07:26 नवीन
गोड (गुड, गुडः हे गोड चवीच्या गुळाच्या समानार्थी संस्कृत शब्द आहेत.)
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 02/10/2019 - 10:51 नवीन
हे शब्द पण अपभ्रंश असतील तर?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 02/10/2019 - 14:53 नवीन
संस्कृत तसेच उत्तर भारतीय भाषा आणि भारताच्या पश्चिमेकडील देशांत आई साठी असलेले शब्द बहुतेक म ने सुरू होणारे आहेत. तर मराठीत आ ने सुरू होतो. ही व्युत्पत्ती मला दक्षिणेकडून आल्यासारखी वाटते. अम्मा, अव्वा इत्यादी.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 02/10/2019 - 15:10 नवीन
ठेच इत्यादी लागल्यानंतर 'आई ग!' हा शब्द सहज निघतो, दक्षिणेतील लोकं सहसा 'अय्यो' असे उच्चारतात सोबत 'अम्मा' पण जोडतात. पण हे सगळं सहज होतं, कोणालाही शकवावे लागत नाही. लहानपणी पण असे शिकविल्याचे आठवतं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
पुष्कर Mon, 02/11/2019 - 08:06 नवीन
लहान मूल आजूबाजूच्या लोकांच्या निरीक्षणातून देखिल बर्‍याच गोष्टी शिकते. त्यासाठी अगदी प्रत्येक गोष्ट पढवावीच लागते असे नाही. उदाहरणार्थ, आपापल्या भाषेतल्या शिव्या पण सर्वांना न शिकवता येतात आणि ते शब्द देखिल अगदी सहज निघतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Mon, 02/11/2019 - 11:14 नवीन
आहो, शिव्या शिकणे आणि ठेच लागल्यावर 'आई' सहज निघणे यात खूप फरक आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
प
पुष्कर Mon, 02/11/2019 - 21:53 नवीन
अगदीच मान्य आहे. सांगायचा उद्देश एवढाच होता की काही गोष्टी आपण निरीक्षणातून शिकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
स
समर्पक Mon, 02/11/2019 - 18:49 नवीन
आई हा शब्द पुर्वेकडे आसामी कार्वी भाषेतही आहे. तसेच वायव्येकडे उझ्बेक भाषेतही आया शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
म
मनो Sun, 02/10/2019 - 16:49 नवीन
मराठीमध्ये भरपूर फारसी शब्द आहेत, उदाहरणार्थ ही द पासून सुरू होणारी यादी पहा. दरोगा दाणा दाखल दार दरबान दर्द दरवाजा दर्या दस्त (आणि दस्तऐवज) दस्तुर दुश्मन दुआ दप्तर दिल दम दुनिया दवा दुपार (दु-पेहेर) दूर दोस्त दुकान दौलत दहा दिवाण (उदाहरण म्हणून थोडक्यात यादी दिली आहे, असे अनेक शब्द सापडतील) माझा हा एक जुना लेख - यात बरीच आडनावे सापडतील https://www.misalpav.com/node/42140
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 02/11/2019 - 05:28 नवीन
हा "द्वौ प्रहर" यावरून आला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ह
हुप्प्या Sun, 02/10/2019 - 18:57 नवीन
तहान : तहान ह्याला फारसीत तशन म्हणतात. संस्कृतमधे तृष्णा म्हणतात. ह्या दोन्हीपैकी एकापासून तहान हा शब्द बनला असावा. संस्कृत आणि फारसी ह्या भाषा बहिणी आहेत त्यामुळे त्यात अनेक शब्द सारखे आहेत. झोप/झोपणे हा स्वपिती ह्या संस्कृत धातूपासून अपभ्रष्ट होऊन निर्माण झालेला शब्द असावा. कुलुप हा शब्द फारसीमधे नाही. वर म्हटल्याप्रमाणे तो संस्कृतमधून आला असणे शक्य आहे. आंबट हा आम्लपासून बनला असणार. ट हा प्रत्यय अनेक मराठी शब्दात आढळतो. ऐक : ऐकणे हे क्रियापद कदाचित आकर्णयति ह्या संस्कृत धातूपासून बनला असेल. संस्कृतमधील श्रुणोति हा धातू सुनना ह्या हिंदी क्रियापदाचे मूळ आहे. मराठीचे मूळ हे वेगळ्या धातूतून आले आहे. सांगणे: कदाचित संकथयति ह्या संस्कृत धातूपासून सांगणे हे क्रियापद बनले असेल. फारसी वा अन्य भाषात अन्य साम्य आढळले नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 02/10/2019 - 21:07 नवीन
हुप्प्या, माहितीबद्दल धन्यवाद! स्वप --> झोप वरून आठवलं की इंग्रजीत (की ल्याटिनात) हिप्नोटाईझ मधला हिप्न हा स्वप्न वरनं आलेला असणार. Psychology मधला psyche हा इप्सित वरनं आलेला वाटतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
उ
उपयोजक Mon, 02/11/2019 - 05:34 नवीन
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा असल्याचे किंवा संस्कृतसारख्या दर्जेदार भाषेशी तिचा संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी काही भाषातज्ञ प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध अोढूनताणून संस्कृतशी जोडतात.वि.श्री.खैरे यांनी त्यांच्या बर्‍याच पुस्तकांमधे हे लिहीलंय. सांग याच्याशी मिळताजुळता शब्द तामिळमधे देखील आहे. सोल्लुंग சொல்லுங்க याचा अर्थ सांग असाच आहे. संकथयति जवळचा की सोल्ल(मूळ धातू)/सोल्लूंग जवळचा ते तुम्हीच ठरवा.असे बरेच शब्द आहेत मराठीत ज्यांचा संबंध द्रविड/तामिळकडे लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Mon, 02/11/2019 - 06:27 नवीन
काही शब्द नक्कीच तमिळ व अन्य द्रविड भाषांतून आले असतील. पण मराठी ही संस्कृतप्रमाणेच इंडो युरोपियन समूहातील भाषा आहे त्यामुळे त्या भाषेला संस्कृतमधून शब्द उचलणे जास्त सोपे जाते असे माझे मत आहे. सोल्लूंग हेही सांगणे चे मूळ असणे अगदी शक्य आहे. माहितीबद्दल आभार. जर जुन्या मराठीत ह्या धातूचे आधीचे रुप सापडले तर त्या धातूचा उगम शोधणे सोपे जाईल नाहीतर आपापला अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
समर्पक Mon, 02/11/2019 - 21:55 नवीन
कदाचित अरबी असू शकतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनिंद्य Mon, 02/11/2019 - 07:19 नवीन
उत्तम विषयावरचा धागा. मला काही मराठी शब्दांचे मूळ काय कुठे असावे याबद्दल कुतूहल आहे. डोळा (हा शब्द वर आला आहे) जवळ / जवळीक हळू / हळुवार कोवळा हळवा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा