Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी

ख — खिलजि, Mon, 02/11/2019 - 16:12
अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा नळाला येतंय पाणी II खुडबुड खुडबुड चालू होते तांबडं फुटताक्षणी घागरीवरती स्वार होऊनि साऱ्या जमती अर्धांगिनी II नजर रोखुनी फक्त नळावर कैक नागिणी जणू एक बिळावर हंडे, कळशी, बादल्या घेऊनि तयार पदर खोचुनी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा नळाला येतंय पाणी ॥ घटिका येता सज्ज त्राटिका ताम्रकडूंचा आवाज मोठा एक नळासी किती त्या वाटिका ? अन किती त्या रौद्र मरदाणी ? अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा नळाला येतंय पाणी ॥ धार लागता वार करी त्या जिव्हेने प्रहार करी त्या धक्काबुक्की हाणामारी नेहेमीची कहाणी आमच्या चाळीत येऊन बघा कैक मिळतील झाशीच्या राणी ॥ सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2684 वाचन

💬 प्रतिसाद (2)
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/12/2019 - 02:10 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/14/2019 - 07:25 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा