Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारत सोडावा?

ख
खंडेराव
Wed, 02/13/2019 - 13:14
🗣 53 प्रतिसाद
नमस्कार. बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आहे. डोक्यात एक विषय घोळत आहे त्याविषयी लिहितोय. प्रश्न - भारताबाहेरच्या विकसित म्हणाल्या जाणाऱ्या जगात नोकरीची संधी आल्यावर भारत सोडावा ? एक जवळचा मित्र सध्या भारतातच एका शहरात राहतोय. खाऊन पिऊन सुखी म्हणता यावे इतके उत्पन्न आहे. नौकरीही चांगली आहे. त्याचे आणि बायकोचे आई बाबा काही तासात घरी येऊ शकतील हि सोय हि आहे. लहान मुलगी आहे, तिच्यासाठी व्यवस्थित सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे दोघे नौकरी करत असल्यामुळे. तो राहतो ते शहर दोघांनाही आवडते. त्यांचे आई वडीलही येऊन भरपूर दिवस राहतात. युरोपमधल्या एका चांगल्या शहरात नौकरी त्याला स्वतःहून, न शोधता मिळत आहे. पगाराविषयी काही माहिती नाहीये, पण किती असेल तो अंदाज आहे. सुरुवातीला दोघेही खुश होते पण आता विचार करताय तेव्हा तितकेसे खुश नाहीत. + कारणे ( महत्वाच्या क्रमानुसार) दोघांना फिरण्याची खूप आवड आहे. पूर्ण युरोप तिथे राहून फिरून होईल असे वाटते. ते काय इथून जाऊन होणार नाही पोरीला एक जागतिक अनुभव मिळेल, मित्रालासुद्धा - पुढे करियर मध्ये कामाला येईल नवीन भाषा, संस्कृती आणि पाककृती - कारणे दोघांच्या आई वडिलांपासून दूर राहावे लागेल. इथे जी सपोर्ट सिस्टिम आहे ती काही तिथे उभी राहणार नाही. नवरा बायको दोघेही तसे इन्ट्रोव्हर्ट असल्यामुळे मित्रमंडळी कमी आहेत, तिथे गेल्यावर हे अगदीच एकटे पडायची हि शक्यता. दोघांनाही एकाच वेळी नोकरी मिळाली नाही तर उत्पन्न कमी होऊ शकेल काही दिवस . ( हे सगळ्यात कमी महत्वाचे. उत्पन्न वाढेल हि पण तो सध्या तरी डिसिजन फॅक्टर नाहीये ) आणि- सगळे व्यवस्थित चालले असतांना स्वतःचा देश सोडावा का? मिपाकरांपैकी कोणी हा डायलेमा अनुभवाला आहे का? असल्यास काय तोडगा काढला? इतर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे? धन्यवाद...
वर्गीकरण
Charcha

प्रतिक्रिया द्या
33270 वाचन

💬 प्रतिसाद (53)
म
मराठी_माणूस Tue, 04/30/2019 - 12:55 नवीन
अमेरिकेत जाणारे हे उच्य शिक्षित आणि हुशार लोकं असतात पण त्यांची हुशारी भारतातील भ्रष्ट लोकांना आवडत नाही त्यामुळे त्यांची योग्य संधी नाकारली जाते म्हणून ते अमेरिकेत जातात तिथे त्यांना योग्य मान मिळतो
गैरसमज
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/30/2019 - 15:55 नवीन
माझा असा समज होता कारण गल्फ मध्ये सहज जावू शकतो पण अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी जरा जास्तच kadak नियम आहेत . त्या मुळे चाळणी लावून ठराविक लोकच अमेरिकेत प्रवेश करत असावीत असा समज होता . चुकीच्या पोस्ट बध्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/01/2019 - 07:06 नवीन
काय झालं शेवटी ? सोडला की नाही भारत ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा