Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुलवामा : काही प्रश्न

ग
गामा पैलवान
Fri, 02/15/2019 - 14:30
🗣 193 प्रतिसाद
लोकहो, काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत. १. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का? २. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का? ३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते. ४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय? ५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय? झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील? ६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147 यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं. क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो. च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं. ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो. या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल? असो. जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत. धन्यवाद! आपला नम्र, -गामा पैलवान
वर्गीकरण
दहशतवाद
काश्मीर
पुलवामा
CPRF
IED

प्रतिक्रिया द्या
184618 वाचन

💬 प्रतिसाद (193)
L
lakhu risbud Wed, 02/20/2019 - 09:04 नवीन
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला प्रश्न MBBS म्हणवणारा कोणी डागदर धनगरी औषध वापरण्याची कबुली आणि जाहिरात कसे देऊ शकतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
अ
अर्वाच्य Wed, 02/20/2019 - 08:29 नवीन
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक हल्ला होतो तेंव्हा त्याच्या मागे कमीत कमी १०० हल्ले निकामी केलेले असतात. {{> हे वाक्य जेव्हा राहुल गांधी बोलले होते तेव्हा बरीच टिका झाली होती. तुम्हि अगदि राहुल गान्धीसारखे बोलत आहात. :-) https://goo.gl/XQ8FSQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 14:53 नवीन
राहुल गांधी राजकारणी आहेत पण कुठे बोलायचे आणि कुठे नाही याचा त्यांना पोच नाही. मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काही जबाबदारीने बोलावे कि नाही. सत्य कुठे आणि कसे बोलावे हे महत्त्वाचे असते. एखाद्या पायलटच्या मृत्यू प्रसंगी पायलटची चूक होती म्हणून तो दिवंगत झाला हे बोलणे सत्य असले तरी अप्रस्तुत आणि अनुचित असते अंधभक्ती हि अशीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्वाच्य
N
NiluMP Tue, 02/26/2019 - 20:26 नवीन
माझ्या मते आपण घटनेतलं ३७० कलम रद्द करायचा आग्रह धरू शकतो. बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. हे का होत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
R
Rajesh188 Tue, 02/19/2019 - 07:43 नवीन
नेहमी 370 कलम रद्द करा आसा युक्तिवाद होतो पण ते कलम रद्द करण्याचा अधिकार संसेदला आहे का . काश्मीर भारतात जेव्हा विलीन झाला तेव्हा काही करार झाला होता त्यात हे कलम सुधा आहे आस ( मला नक्की माहित नाही चुकीचं आसेल तर माहिती द्यावी ,) ते कलम रद्द केले तर भारतीय कायदे त्या राज्याला सुधा लागू होतील .आणि भारतीय जनता तिथे जावून जमीन सुधा खरेदी करू शकेल आणि तिथे बाकी समाजाची वस्ती वाढेल आसा युक्तिवाद आहे . पण आशा अस्थिर वातावरणात tas स्थलांतर होईल
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/19/2019 - 08:09 नवीन
खरे आहे. एवढा साधासुधा तर्क नाही ३७० मागे. नाहीतर केव्हाच रद्द केले असते आधीच्या सरकारानी. सार्वमत झाल्याशिवाय ३७० चा निर्णय घेता येणार नाही अशी अट आहे असे वाचले होते. नक्की माहित नाही. त्यामुळे ३७० रद्द करण्याचा आग्रह धरायचा तर तो कश्मिरमध्ये घेतला पाहिजे. मुंबई/पुण्यात्/दिल्लीतल्या लोकांच्या आग्रहाला विशेष महत्व नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
स
सुबोध खरे Wed, 02/27/2019 - 06:27 नवीन
@माईसाहेब आधीच्या सरकारांनी तीन तलाक बंद केला नाही. आधीच्या सरकारांनी बेनामी मालमत्तेचा कायदा येऊ दिला नाही आधीच्या सरकारांनी पाकिस्तानात घुसून कार्यवाही केली नाही आधीच्या सरकारांनी ३७० कलम रद्द केले नाही. यात काही साम्य दिसतंय का माईसाहेब? आधीच्या सरकारांनी केलं नाही म्हणून आताचे सरकार या गोष्टी करू शकत नाही हे म्हणणे हास्यास्पद आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ग
गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 09:31 नवीन
माईसाहेब, भारतीय संसद अनुच्छेद ३७० स्वत:च्या अधिकारात रहित करू शकते. इतर कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. कलम ३७०, परिच्छेद ३ असा आहे : Notwithstanding anything in the foregoing provisions of this article, the President may, by public notification, declare that this article shall cease to be operative or shall be operative only with such exceptions and modifications and from such date as he may specify: Provided that the recommendation of the Constituent Assembly of the State referred to in clause (2) shall be necessary before the President issues such a notification. वरील मजकुरातली Constituent Assembly (= घटना समिती) या घडीला अस्तित्वात नाही. त्यामुळे राष्ट्रपती एका वटहुकूमाद्वारे कलम ३७० रद्द करू शकतो. तसंही पाहता ३७० हे तात्पुरत्या तरतुदींसाठी अस्तित्वात आलेलं आहे. कलमाच्या शीर्षकात Temporary, Transitional and Special Provisions असा उल्लेख आहे. तात्पुरत्या तरतुदी रद्द करण्यातही खास परवानग्यांची गरज नसते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/19/2019 - 10:02 नवीन
धन्यवाद रे पैलवाना. Constituent Assembly अस्तित्वात नसेल तर हे डेड-लॉक झाले म्हणायचे. On 3 April 2018, the Supreme Court of India gave a similar opinion declaring that the Article 370 has acquired a permanent status. It stated that, since the State Constituent Assembly has ceased to exist, the President of India would not be able to fulfil the mandatory provisions required for its abrogation.[49] https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 02/19/2019 - 13:32 नवीन
अहो माईसाहेब, घटनासमिती अस्तित्वात नसल्याने ३७० रहित करता येणार नाही असा निर्णय जम्मूकाश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ३७० कायमस्वरूपी आहे असं मत प्रदर्शित केलंय. ३७० च्या शीर्षकात जरी 'तात्पुरते व अंतरिम' असा उल्लेख असला तरी त्यास कायमपणा प्राप्त झालाय. असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Article_370_of_the_Constitution_of_India#Calls_for_abrogation असं असलं तरीही माझ्या माहितीप्रमाणे घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास न्यायिक फेरआढावा ( = ज्युडिशियल रिव्ह्यू) घेता येतो. किंवा शासन तसा घेण्यास स.न्या.स विनंती करू शकतं. यामागचं कारण म्हणजे घटनासमिती हीच मुळी तात्पुरती योजना आहे. मग तिच्या अनास्तित्वाच्या आधारे तात्पुरते ३७० कायम कसे करता येईल? असा युक्तिवाद करून शासन सर्वोच्च न्यायालयाकडे पुनरावेदन ( = अपील) करून निर्णय फिरवून घेऊ शकेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/19/2019 - 14:38 नवीन
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/19/2019 - 15:22 नवीन
प्लॉट्स वगैरे मोठ्या बिल्डरांना- लोढा/हिरानंदानीना,राजकीय पुढार्यांना घेऊ देत. एखादी टाऊनशीपची जाहिरात येऊ दे.. मग बघु.. असो २६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता. आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
अ
अर्धवटराव Tue, 02/19/2019 - 15:49 नवीन
शिवाजीरावांनी दिवसभरात तीन वेळा कपडे बदलुन प्रतिक्रीया दिल्या, त्यावरुन ते ट्रोल झाले (आपली जनता ट्रोल करण्याच्या बाबतीत जरा जास्तच जागृत आहे). त्यांची देहबोली देखील मानसीक खच्चीकरण झाल्यासारखी निस्तेज झाली होती. त्यामुळे गृहमंत्रालयाची इमेज कचखाऊ झाल्यासारखी वाटत होती. तसंही, शिवाजीरावांना स्वतंत्रपणे बोलण्याचा काहि अधिकार नव्हता (आजच्या गृहमंत्र्यांना देखील तो अधिकार नाहि). त्यामुळे त्यांनी बस्तान आवरतं घेतलं. आबा पाटलांचा राजिनामा मात्र अवास्तव होता असं वाटतं. एक कार्यक्षम मंत्री म्हणुन मला आबा पाटील फार आवडायचे. त्यांच्या हिंदी प्रतिक्रीयेला उगाच ओढुन ताणुन दाखवण्यात आलं, आणि त्यांना राजीनाम द्यायला लागला (राष्ट्रवादीतली अंतर्गत स्पर्धा देखील काहि अंशी कारणीभूत असेल. पण पवार साहेबांचा आबांना नेहेमीच पाठिंबा राहिला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डँबिस००७ Tue, 02/19/2019 - 18:46 नवीन
Blackcat , ३७० कलम ठेवुन कश्मिरला स्वतःच प्राईव्हेट राज्य करायचा प्लान होता का तुमच्या लाडक्या पंडीतजींचा ? नाही म्हणजे संपुर्ण देश एकसंध केलेला असताना फक्त ह्यांच्या गावाला (काश्मिरला) स्पेशल स्टेटस का हवा होता म्हणे ? 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? ३७० कलम असताना कायद्याप्रमाणे भारतीय माणसाला काश्मिरमध्ये प्रॉपर्टी विकत घेता येत नाही त्यामुळे विकत घ्यायची असेल तर ३७० कलम जाण्याची वाट पहावी लागेलच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Tue, 02/19/2019 - 18:53 नवीन
काश्मीरचे सँस्थानिक नेहरू नव्हते , कुणीतरी हरीसिंग वा तत्सम होते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 06:29 नवीन
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे प्लॉट घेणारेत का ? तुम्ही घ्या कि चारी बाजूला भरपूर मशिदी आणि मदरसे आहेत. तुमचा वेळ बरा जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 08:10 नवीन
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर दुवा पाठवला आहे. भरपूर प्लॉट्स रिकामे आहेत. https://www.justdial.com/Baramulla/Estate-Agents-in-Gurez/nct-10192623
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 09:38 नवीन
मशिदी अन भोंगे इथेही आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 14:55 नवीन
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि भोंगेच आहेत इकडच्या सारखे "आरती, स्तोत्र, जय भवानी जय शिवाजी ऐकून " वगैरे ऐकून तुमचे ब्लड प्रेशर वाढणार नाही शिवाय तिथे प्लॉट फारच स्वस्तात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
र
रानरेडा Sun, 02/24/2019 - 19:40 नवीन
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू , मेंढपाळ असतील तिकडे तुम्हाला औषधच औषध मिळेल ! फक्त आपण MBBS डॉक्टर आहात हे सांगू नका हा , ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
R
Rajesh188 Wed, 02/20/2019 - 08:16 नवीन
आपण स्वतःचा जरी विचार केला तरी समजेल . मुंबई आणि राज्यात हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढली आहे आणि त्या मुळे आपण सुधा अस्वस्थ होतो .हे सत्य आहेच की . कोणत्याच राज्याच्या संस्कृतीवर आक्रमण विनाश कडे घेवून जाईल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/20/2019 - 09:38 नवीन
ह्या विषयावर खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वाचल्या . पण पूर्ण विचार करून परिणामाचा विचार करून प्रतिक्रिया खूप कमी आहेत . प्रत्येक जण आपल्या विचारधारा सोडायला तयार नाहीत आणि aashich अवस्था पाकिस्तान मध्ये सुधा आहे . डोकं थोड शांत ठेवून दोन्ही देशांनी मिळून निर्णय घेणे अपेक्षित आहे इथे भावनिक mudhe काही कामाचे नाहीत. व्यवहारिक विचार झाला पाहिजे . दोन्ही देश विकसनशील देश आहेत आणि दोघे सुधा गरीबी bairojgari,लोकसंख्या अनियंत्रित वाढ आशा बऱ्याच समस्यांनी ग्रासले आहेत .जर दोन्ही देशांना काश्मीर च हित हवं आसेल तेथील जनता सुखी समाधानी झालेली बघायची आसेल तर थोड पाठी सरल पाहिजे . दोन्ही देशाची अखंडत्व आणि सर्वभोमत्व ह्या वर कसली ही तडजोड न करता सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे . हा सुवर्ण मध्य दोन्ही देशांनी ठरवावं .तो आपण काय सुचवणार . आता आसा विचार केला की दोन्ही देश आपल्याला हवा तसा काश्मीर प्रश्न सोडवू लागला तर त्याचे परिणाम काय होतील aatangvad हा त्याच्या वर नक्कीच उपाय नाही आणि युद्ध हा सुधा उपाय नाही . Aatangvad ही दुधारी तलवार आहे हिचा वापर जो करेल ती तलवार त्याच्या वर सुधा वार करू शकते आणि ह्याचा चांगला अनुभव पाकिस्तान कडे आहे ते चक्रव्यूहात सापडले आहेत बाहेर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद आहे . दोन्ही देशातील दुष्मानीचा फायदा बाकी देश मित्रत्वाचे वाचन देवून स्वतःचा स्वार्थ साधून घेतली त्यात होणाऱ्या नुकसानी शी त्यांचा काहीही संबंध नसेल . पाहिजे तर ह्या विषयावर bayanbaji करायला दोन्ही देशांनी बंदी घातली पाहिजे .प्रधान मंत्री व्यतिरिक्त कोणताही नेता ह्या विषयावर बोलणार नाही ह्याची काळजी घेणे . युद्ध न परवडणारे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आताच युद्ध खूप भयंकर आसेल .आणि युद्ध काळात सर्व विकास योजना बंद होवून रोजगाराचा प्रश्न गंभीर होईल . आपण आता कितीही बोललो तरी त्या वेळी वेगळा विचार करू . पोट भरणे अवघड झाले की afratafar maju शकते . शास्त्र विकणारे लढा चालू ठेवतील आणि दोन्ही देशाचं वाटोळे होईल . समजा आपण युद्ध जिंकाल तर पाकिस्तान मध्ये आपण सत्ता स्थापित करू शकणार नाही जागतिक विरोध होईल मग युद्ध जिंकून फायदा काय अजुन द्वेष वाढेल
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 09:54 नवीन
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 02/20/2019 - 11:12 नवीन
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद आला तेव्हा तुमचे शासन होत वाटते तिथे? हजारो काश्मीरी पंडितींना विस्थापित केले तेव्हा नव्हता वाटते दहशतवाद? की तो जिहाद होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 14:30 नवीन
बरेच विसरभोळे आहात तुम्ही !! पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! हा हा हा काँग्रेस चे कमकुवत सरकार बघुन एक दोन नव्हे तर चार चार युद्धे लादली पाकिस्तानने भारतावर !! चीन ने तर एकाच तडाख्यात लोळवल होत विसरले काय ? ते तर बर की भारतीय सेना खमकी होती म्हणुन बचावलो !! अन्यथा काँग्रेसवाल्यांनी देशच आंदण दिला असता पाकिस्तानला ! काश्मिरचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग पाकिस्तानच्या अख्त्यारीत आहे ! गीलगीट बाल्टीस्तान, अक्साई चीन हा भाग सुद्धा काँग्रेसवाल्यांनी देऊन टाकला ! कॉग्रेस मुक्त भारत झाल तर १८८५ पासुनचा रोग बरा होईल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 14:52 नवीन
जवानांच्या अंतयात्रेत उपमुख्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, साक्षी महाराज हसत होते व प्रार्थनेत जोडे घालून आले होते, नातेवाईकांनी हाकलून लावले. व्हाट्सपवर व्हिडीओ फिरत आहेत, ते पहा. भाजपयाना तर इथलेच लोक विचारेनात , पाकिस्तान तर लांब राहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 14:58 नवीन

९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.

त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 15:27 नवीन
त्या वर गेल्या. आता मोदीना 9000 तरी पकडून आणायला सांगा. सोडायचे का ठेवायचे , ते नन्तर बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 15:51 नवीन
त्यांना (९००० लोकांना) एक वेळ तरी जेवायला घालायची आपली लायकी आहे का? आपला पगार किती? आपण बोलता किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 16:02 नवीन
इंदिराजी त्यावेळी 90000 पाकिस्तानयाना जेवायला घालत बसल्या असत्या , तर तुम्हाला पेन्शनला उरले असते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 04:52 नवीन
इतिहास वाचलेलाच दिसत नाही. १ कोटी बांगलादेशी निर्वासित भारतात आले होते आणि त्या निर्वासितांच्या निर्वाहासाठी आपण( सामान्य नागरिक) २० पैशाच्या पोस्टाच्या तिकिटांवर ५ पैसे निर्वासित अधिभाराचे तिकीट लावत होतो https://www.thedailystar.net/supplements/victory-day-2016-special/refugee-relief-the-postal-tax-helped-millions-1330345. त्यामध्ये ९०,००० तोंडे म्हणजे काहीच नाही

त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.

त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
व
विशुमित गुरुवार, 02/21/2019 - 11:32 नवीन
काश्मीर प्रश्नाला पंडित नेहरूच कारणीभूत, अमित शाह यांचा आरोप. काश्मीर प्रश्नाचे जनक कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर पंडित नेहरू असेच आहे. नेहरूंमुळे काश्मीरचा मुद्दा निर्माण झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काश्मीर खोरे कायम धगधगतेच असते या सगळ्याचं कारण पंडित नेहरू आहेत त्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि भिजत ठेवला असाही आरोप अमित शाह यांनी केला. सगळ्यात महत्वाचे आहे, हे तुम्ही लक्ष्यात ठेवा == पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे असे पंतप्रधान आहेत जे २४ पैकी १८ तास काम करतात. देशाच्या सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्यावर तुमच्यासारख्यांच्या आरोपांमुळे परिणाम होणार नाही असेही अमित शाह यांनी ठणकावले आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pandit-nehru-responsible-for-kashmir-issue-says-amit-shah-1845117/ === सगळं रांकेला लावून आज ते कोरियाला भुर्र उडून गेले आहेत. तुम्ही बसा उंदरांचा पाठलाग करत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 09:54 नवीन
१९८९ पर्यंत भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबे अगदी सहजपणे काश्मिरभर हिंडून-फिरून , एक तरी कौटुंबिक फोटो-अल्बम सोबत घेऊन आनंदाने परतत होता! काश्मीर की कली, परदेसियो से ना अखिया मिलाना, किती सुंदर गाणी बघायला मिळायची. याचा अर्थ, तेव्हा तेथे दहशदवादाचा मागमूस नव्हता. नेहरुजी, शास्त्रीजी, इंदिराजी आणि राजीवजीपर्यंत काश्मिरात दहशदवाद नव्हता, आणि पाकिस्तानची हिम्मत नव्हती नजर वर करून पाहण्याची! २००१ मध्ये जम्मू- काश्मीर विधानसभेवर हल्ला झाला. पी एम होते अटलजी! अमरनाथ यात्रा हल्ला.... तेव्हाही भाजपाचे शासन! काँग्रेस-शासनात असा एकही हल्ला नाही. काश्मीरसाठी कॉंग्रेसने ३ युध्दे खेळली आणि जिंकली देखील! नव्या सरकारकडून काही अपेक्षा ठेवायच्या तर सैनिकच सुरक्षित नाहीत आणि त्यांना सुरक्षित करायचे तर म्हणे 50 % कर भरा, असे इथले तज्ञ सांगतात. आमचे पूर्वधर्माचे गोत्र काश्यप , ज्यांनी काश्मीर निर्माण केले त्या ऋषीचे नाव , बिचारे तळमळत असतील , हेचि फळ काय मम तपाला?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 02/20/2019 - 18:31 नवीन
5लाख पंडितानी जीवाच्या भीतिने काश्मीर सोडले तेव्हा विद्यमान सरकारने ना त्यांची चिंता केली वा चिकित्सा, मग जे पाहिजे ते आपसुक तोंडात पडले तर कोण कशाला अतिरेकी बनतोय? उद्या काळ्या माउकड़े शांतताप्रिय धर्माचे लोक बोलायला आले की तुमची जागा आम्हाला आमचे प्रार्थनास्थळ म्हणून हवे आहे तर तुम्ही किती आनंदाने ते खाली कराल ? आधी तुमचा प्रतिसादच गंडलाय, भाजपा सरकारमधे अमरनाथ हल्ला झाला व विधानसभा हल्ला झाला मग पाकिस्तानमधून कसाब आणि कंपनी कोंग्रेसच्या काळात क़ाय आटयांपाट्या खेळायला आली होती ? हायला , यांचा क़ाय भरोसा नाय, प्रतिसाद झोम्बल्यावर कसाब आपल्या मुब्र्यातुंन आला होता बोलायला कमी करणार नाही. इशरतजहांचा बदला घ्यायला ! संपादक मंडळाला एक विनंती आहे , ह्या काळ्या माऊचा ईमेल आईडी उघड़ करावा , मग काहीतरी सामदामदंडभेद करता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
L
lakhu risbud गुरुवार, 02/21/2019 - 07:28 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा व वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल. का या असल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची धमक नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
स
सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 08:26 नवीन
@ Blackcat निम लस्क्री लोकांचे पगार 2012 नन्तर वाढलेले नाहीत ( आमचेही नाहीत) हे सपशेल खोटे विधान निर्लज्जपणे केलेत त्यावर पुरावा मागितला तो काही देता येत नाही. माझ्या वर्णव्यवस्थेच्या पुरस्काराबद्दल खोटारडेपणा केला त्याबद्दल कोणताही पुरावा देता येत नाही. इतका खोटारडेपणा, निलाजरेपण,, लोक टोचून बोलतात त्याबद्दल खंत नाही खेद नाही मिपावरून हाकलून दिल्यावर पन्नास वेगवेगळे डू आयडी घेऊन परत परत येण्यासारखा लोचट पणा आणि लुब्रेपणा आहे. आयुष्यातील वैफल्य जालावर काढून ते जाणार नाही आणि खोटेपणा हा लांड्या चादरी सारखा असतो. वरनं ओढली तर खालचा भाग उघड पडतो आणि खाली ओढली तर वरचा. मनाची नाहीच पण जनाची तरी लाज बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 02/20/2019 - 13:22 नवीन
सुबोध खरे-"उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे आज जो उठतो तो बेफाट आरोप करतोय "प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया? आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?" नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न. (https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s २०:०० ते २३:००) ह्याला काय म्हणायचे रे सुबोधा? उचलली जीभ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 02/20/2019 - 14:56 नवीन
माईसाहेब , अजुनही तुमची उचलली बोटे आणि लावली कळफलकाला अशी स्थिती आहे पुलवामा रस्त्यावर तिन तिन बॅरीकेडस होते ! कश्मिरच्या मुख्यमंत्र्यामुळे ते बॅरीकेडस बंद झाले आणि अतिरेक्यांना रस्ता साफ झाला ! पण त्या कश्मिरच्या मुख्यमंत्र्याला ना खंत ना खेद ! अजुन ही पाकिस्तानशी बोलणी कर ण्याची वार्ता करत आहे ! वायरलेस, मोबाईल, टेक्स्ट मेसेज,व ईतर कम्युनिकेशन वर करडी नजर असल्याने अतिरेक्यांनी ह्यावेळेला नविन मोबाईल + वायरलेस मेसेज सिस्टीम वापरली. चायनात बनलेली ही एनक्रिपशन सिस्टीम अजुन ही आपल्या कम्युनिकेशन ए़क्स्पर्टसना क्रॅक झालेली नाही. स्फोटके कश्मिरच्या सीमा भागातुन खंदक खणुन त्या मार्गाने आणलेली आहेत असा कयास आहे. गेल्या ६५ वर्षांत काश्मिरची सीमा सील करता आलेली नाही. त्या सीमेतुन माणसे, प्राणी , मादक पदार्थ ह्यांची तस्करी चालु असते. अश्या तस्करी मुळे सीमा पुर्ण पणे सील राहील ह्याची शाश्वती नसते. गेल्या ६५ वर्षांत सील न झालेली सीमा आता सील का झाली नाही अस विचारण म्हणजे मुर्खपणा आहे हे तुमच्या व तुमच्या ह्यांना आम्ही सांगावे म्हणजे काजव्याने सुर्याला .................. गेल्या ६५ वर्षांत जे न घडलेल आहे त्यातल जे काही ह्या ५ वर्षांत घडलेल आहे ते मात्र बघायच नाही असा प्रयास आपल्यालाच खाली घेऊन जाणार आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 15:29 नवीन
61 चा पाढा आता 65 ला आला, त्यातली 10 भाजपचीही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सॅगी Wed, 02/20/2019 - 16:03 नवीन
बाकी ५५ कोणाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Wed, 02/20/2019 - 16:05 नवीन
आमच्या काँग्रेसची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी
स
सुबोध खरे Wed, 02/20/2019 - 15:05 नवीन
| माईसाहेब कुरसूंदीकर १)डिसेंबर पासून हल्ले होत असतना आपली गुप्तचर यंत्रणा गप्प राहिली.. वा अपयशी ठरली. यंत्रणेच्या प्रमुखाने/गृहखात्याने हे सांगायला हवे की नको? २) बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ. ने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बसेसने नेण्यास विरोध केला होता. हॅलिकॉप्टरची मागणी केली होती. ती अमान्य झाली. या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आणि अप्रासंगिक आहेत आणि त्यात आपला केवळ भाजप द्वेष दिसतो आहे हे मी सप्रमाण सिद्ध केलंय. ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात तीन वेळेस हेलीकॉप्टरने घेऊन जाणे आणि परत आणणे हि अशक्य गोष्ट आहे हे शेम्बड्या पोरालाही पटेल. मुळात हि मागणी कुणी केली आहे हे तुम्हाला दाखवता येईल का? नसेल तर उगाच कळफलक बडवणे थांबवा कोणत्यातरी बोकड प्रेस्टिट्यूटने कुणाचा तरी हवाला देऊन लिहिलेले वाक्य मोगा खानने पाठवले होते उगाच फालतू प्रतिवाद करू नका आणि विषयाला फाटे फोडून पळवाट काढू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/21/2019 - 05:39 नवीन
ही घ्या लिंक https://www.thequint.com/news/india/pulwama-terror-attack-crpf-request-air-transit-of-jawans-ignored#gs.9bLAc65P मूळ मुद्दा हा नाही. मोदी व भाजपा २०१२ च्या भाषणात ज्या गमजा मारत होते, मनमोहन सिंगांनाच जबाबदार ठरवत होते. कश्मिर प्रश्न हा जणू काही काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून निर्माण केला आहे.. आम्ही सत्तेवर आलो की तो सोडवू... मग वाट वाकडी करून नवाझ शरीफांना केक भरवायला जाणे.. मोदी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तान सूतासारखा सरळ आला आहे.. ह्या बद्दल बातम्या पसरवणे... मग सर्जिकल स्ट्राएकने कशी कायमची अद्दल घड्वली..वगैरे... ६०-६५ वर्षत जे झाले नाही ते ५ वर्षात होणार नाही हे कळण्यास राजकीय पंडिताची गरज नाही. मग जाहिरातबाजी न करता निमूटपणे काम तरी करा. प्रत्येकवेळी ईतिहासात जाऊन आधीचे सत्ताधारी कसे चुकले.. हेच सांगणार असाल तर लोक प्रश्न विचारणारच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 06:30 नवीन
परत तेच कुणा तरी पत्रकाराने कुणाचा तरी हवाला देऊन सांगितलेली गोष्ट जी केवळ अशक्यप्राय आहे ( ३ लाख ४० हजार सैनिकांना वर्षात सहा फेऱ्या हेलिकॉप्टरने करणे). बरेच लोक मूळ वस्तुस्थिती माहित नसताना आपल्या त्रोटक माहितीप्रमाणे आणि आपल्या राजकीय कल (INCLINATION) प्रमाणे सोयीस्कर अशा काहीही गोष्टी टंकतात याबद्दल हा आक्षेप आहे. या स्थितीवर अचूक बोट ठेवणारा जालावर फिरणारा विनोद -- कुठे कुठे आणि कशी क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानला नष्ट करणारा डावपेच मी जालावर टाकणार होतोच तेवढ्यात आतून आमची हि ओरडली अहो जाता जाता धोब्याकडे इस्त्रीला कपडे टाका आणि ऑफिसमधून येताना न विसरता दळणाचा डबा घेऊन या. मुलखाचे धांदरट मेले. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक? मग लक्षात आलं -- आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/21/2019 - 08:36 नवीन
तात्पर्य : इथून पुढे चहावाल्यांनी चहावालेच रहावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित गुरुवार, 02/21/2019 - 09:47 नवीन
छान..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
र
रानरेडा Mon, 02/25/2019 - 07:05 नवीन
साहेबांनी संरक्षण मंत्री असतांना खास सरकारी विमानातीन दोन गुन्हेगार कि अतिरेकी नेलेले ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 02/25/2019 - 08:43 नवीन
होय का?? मला आइडिया नाही राव! === बाकी हिरवा चारा वगेरे मुबलक मिळतोय ना छावणीत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानरेडा
स
सुबोध खरे गुरुवार, 02/21/2019 - 15:17 नवीन
हो डॉक्टर होऊन धनगराचे औषध घेण्यापेक्षा बरं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/21/2019 - 08:43 नवीन
"आपण कोण आहोत आणि काय करतो आहोत" हे प्रथम सत्तधार्यांना सांगाय्ला हवे. अंतिम संस्काराला चपला घालुन बसणे, अंत्ययात्रा जात असताना पोझ देणे. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच रात्री खाजगी पार्टीत नाचणे.... https://www.youtube.com/watch?v=CiEatCP6X6Q
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा