तुम्ही अजूनही केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv ला शिफ्ट झाले आहेत?
आम्ही आधी टाटा स्काय वापरायचो. आवडती चॅनेल्स जवळ जवळ ६०० रुपये महिना पडायची. घरातला TV संच मोठ्या स्क्रीनचा पण नॉन स्मार्ट आहे.
ऍमेझॉन ने फायर स्टिक बाजारात आणल्यावर आम्ही ती पहिल्याच आठवड्यात विकत घेतली, आणि लक्षात आले, हे प्रकरण टाटा स्काय पेक्षा फारच चांगले आहे.
१. जुना TV स्मार्ट झाला.
२. भरपूर सिनेमे, सिरिअल्स यांचे कलेक्शन मिळाले.
३. youtube TV वर बघता यायला लागले.
४. सगळ्यात मोठा फायदा - शून्य जाहिराती.
तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स ची चलती होती, म्हणून हॉटस्टार चे एक वर्षाचे पैसे भरून तेही आमच्या TV वर दिसू लागले. prime आणि हॉटस्टार मिळून इतके कन्टेन्ट मिळाले कि आम्ही टाटा स्काय काढायचा निर्णय घेतला. एका महिन्यानंतर नार्कोस मुळे नेटफ्लिक्स सुद्धा सुरु झाले.
आता, आम्ही हे तीन वापरतो - prime , हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स, आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघता येतात, सगळ्या भाषांमध्ये! अगदी मसाला सिनेमा पासून मराठीतल्या अस्तु सारख्या आशयगर्द सिनेमांना ऍक्सेस मिळाला. थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याची गरज पूर्ण संपली.
यातला खर्च -
१. टाटा स्काय ला आम्ही ६०० रुपये द्यायचो महिन्याला
२. वरच्या तीन ला मिळून ४०० रुपये लागतात.
३. इंटरनेट, जे आम्ही तसेही वापरायचो, महिन्याला 900 लागतात - यात ५० MB वेग आणि अनलिमिटेड डेटा आहे. आणि कामाची गरज म्हणून आम्ही २ इंटरनेट सर्विस प्रोविडर ठेवले आहेत, त्यामुळे हा खर्च मी ० गृहीत धरतोय.
तर, असे आमचे पैसे आणि मौल्यवान वेळ, जो जाहिरातींमध्ये जायचा दोन्हीही वाचत आहे. आणि, जागतिक सिरियल्स व सिनेमे बघायला मिळतात जे आपल्या बहुतांशी कन्टेन्ट च्या तुलनेत खूपच चांगले आहेत ( नार्कोस, GOT , मार्वलस मिस मेसाईल्स, यंग शेल्डन, बिग बँग थेअरी, माईक अँड मौली आणि इतर अनेक!)
सध्या अजूनही लोक टाटा स्काय किंवा केबल ला इतके पैसे देतात, ते जर इंटरनेट स्वस्त असलेल्या भागात असतील तर हा उत्तम पर्याय आहे.
💬 प्रतिसाद
(83)
क
कंजूस
Tue, 02/19/2019 - 13:59
नवीन
तुमच्या गरजा आणि आवड पाहता पटण्यासारखे आहे.
---
इंटरनेट फास्ट,स्वस्त आणि चालू हवे मात्र.
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Tue, 02/19/2019 - 21:54
नवीन
उत्तम पर्याय! दुर्दैवाने अजूनही बहुतांश लोक (खासकरून मागच्या पिढीतील) त्याच त्याच रटाळ मराठी आणि हिंदी मालिका बघण्यात धन्यता मानतात त्यामुळे हा पर्याय तितका रुजेल आणी रुचेल का हे पाहावे लागेल.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 02/20/2019 - 08:15
नवीन
सध्या हॉटस्टार आणि सोनी वगैरेंच्या अँप्स वर या मालिकाही उपलब्ध आहेत, त्यासुद्धा सर्व भाग आणि बिना जाहिरातींच्या! माझ्या घरातले ज्येष्ठ तिथेच बघताय..मोठा फायदा म्हणजे रोज बघायची गरज नाही, वेळ असेल तेव्हा बघता येते..
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 02/19/2019 - 22:14
नवीन
आशयगर्द? कदाचित तुम्हाला आशयघन किंवा आशयगर्भ म्हणायचे असावे.
कॉर्डकटर बनल्याबद्दल अभिनंदन.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 02/20/2019 - 08:16
नवीन
आशयगर्भ म्हणायचे होते :-)
- Log in or register to post comments
स
सरनौबत
Sun, 02/24/2019 - 07:41
नवीन
मला वाटलं संजय दत्त चे चित्रपट बघता म्हणून आशय 'गर्द' म्हणालात ;-)
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Wed, 02/20/2019 - 03:58
नवीन
मला पण व्यक्तिशः टाटा स्काय चालू ठेवण्यात काही अर्थ वाटत नाही आहे. घरच्यांना वळवायचे प्रयत्न करतोय पण सध्या दोन्ही चालू आहेत.
वरच्या ३ सर्व्हिस मिळून ४०० मध्ये कसे काय होऊ शकत? की तुम्ही नेटफ्लिक्स ८०० चा प्लॅन ४ लोकांमध्ये वाटून घेतलाय? नेटफ्लिक्स एकट्याने घेणे शक्य नाही, खूप महाग आहे.
रच्याकने, टाटा स्काय चा रेकॉर्डिंग बॉक्स असल्यामुळे जाहिरातींचा मारा कमी करता येतो. मात्र लाईव्ह नाही :)
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 02/20/2019 - 08:18
नवीन
४ जणांचा प्लॅन आहे, तो २०० प्रति महिना पडतोय.
हॉटस्टार आणि प्राईम दोन्ही प्रत्येकी ८०/९० रुपये महिना आहेत.
जर घराचे स्टार समूहाच्या मालिका जास्त बघणारे असतील तर हॉटस्टार घेऊन बघा, हळू हळू शिफ्ट होतील..
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 02/20/2019 - 08:40
नवीन
जग झपाट्याने बदलतंय काही दिवसांनी आपोआप केबल, डिश बंद होणार आहे आता परिवर्तन प्रधम स्तरावर आहे
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Wed, 02/20/2019 - 21:49
नवीन
एकंदरीत amazon सगळ्यांचे धंदे बसवणार म्हणता!
तसेही हे होणे गरजेचेच आहे. आतापर्यंत या डिश/केबलवाल्यानी मनमानी करून लोकांकडून भरमसाठ पैसे उकळले.
now it's payback time!
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/20/2019 - 22:00
नवीन
जोपर्यंत, लोकप्रिय टिव्ही चॅनल्सचे सर्व प्रोग्रॅम्स (विशेषतः सिरियल्स व रिअॅलिटी शोज), नेटवर (विशेषतः ब्रॉडबँडवर) रियल टाईम / स्ट्रिमिंगने मिळत नाहीत, तोपर्यंत केबल/डिटिएच ला मरण नाही.
सिरियल्स व रिअॅलिटी शोज पाहणारी मंडळींची बहुसंख्या आहे हे विसरून चालणार नाही.
- Log in or register to post comments
व
वगिश
Tue, 02/26/2019 - 16:05
नवीन
वरील म्हणण्यात बर्याच त्रुटी आहे :
1. कोणतेही reality shows or daily soaps live nasun recorded असतात.
2. Firestick हा streaming platform आहे.
3. Firestick, Android बॉक्स ह्यामुळे चॅनल ने दिलेल्या वळेल बांधिल नसतो ⏰, आपल्या सवडीने सर्व Daily soaps व reality shows बघता येतात. हो अगदी सर्व चॅनेल्स बघता येतात, live न्यूज आणि मॅच सुध्दा.
जाता जाता, Netflix Hotstar आणि prime असताना तेचतेच रटाळ Daily सोप बघणे माझ्या आकलन शक्ति पलीकडे आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Sun, 03/17/2019 - 15:52
नवीन
डॉ. म्हात्रे सरांना कदाचित असे म्हणायचे असावे की कोणतीही सिरियल किंव्हा रियालिटी शो आधी केबल/डिटिएच वर प्रसारित होतो मग इतर स्ट्रिमिंग प्लेटफॉर्मवर. असे प्रोग्राम, स्ट्रिमिंग प्लेटफॉर्मवर जोपर्यंत रियल टाईम मधे प्रसारित होत नाहीत तो पर्यंत केबल व डिटिएचला मरण नाही.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Wed, 02/20/2019 - 09:39
नवीन
अॅमेझॉन म्हणते आहे की, "Connect Amazon Fire TV Stick to your HDTV and start streaming movies, TV shows and songs from Amazon Prime Video, Hotstar, Netflix, Gaana and many more ...."
तर या आगदुचीकाठीसाठी जास्त घनतेचा दुरचित्रवाणी संचाची आवश्यकता असते काय? कमी घनतेचा दुरचित्रवाणी संच चालू शकणार नाही काय?
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 02/20/2019 - 10:44
नवीन
माझ्या माहितीप्रमाणे - तुमच्या टीव्हीला HDMI पोर्ट असणे पुरेसे असावे. ते असे असते -
https://www.google.com/search?q=tv+hdmi+port&safe=active&rlz=1C1GGRV_enIE756IN759&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=0ahUKEwj84vj4gsrgAhWQbn0KHa0gDAIQ_AUIDigB&biw=1280&bih=६१०
जर माहितीत कोणाकडे स्टिक असेल तर तरी करून बघा.
- Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर
Wed, 02/20/2019 - 21:45
नवीन
कुठल्याही रेसोलुशनचा tv चालेल फक्त चित्राचा स्पष्टपणा कमीजास्त असेल.
शिवाय hdmi पोर्ट नसेल तर hdmi to rca connector मिळतं बाजारात ते वापरूनही काम होऊ शकतं.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 02/20/2019 - 11:50
नवीन
आगदुचीकाठी...... मस्त शब्द ! :))
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 02/20/2019 - 13:20
नवीन
त्यापेक्षा सरळ आगपेटी म्हणा असे सुचवतो
- Log in or register to post comments
व
वगिश
Wed, 02/20/2019 - 18:24
नवीन
5 वर्षा पुर्वी एलसीडी टीव्ही घेतला पण केबल, डिश काही घेतले नाही, भरमसाठ पैसे भरून (2000 प्रति महिना- पगार 18500 प्रती महिना ) airtel चे इंटरनेट घेतले. त्यावरून torrent वापरून चांगले चित्रपट व टीव्ही सिरीज डाऊनलोड करून टीव्ही वर usb द्वारे बघायचो.
नंतर firestick आले आणि सगळेच बदलले. Pirated content पूर्ण बंद केले बघायचे, 43" full hd led घेतला, इंटरनेट ही स्वस्त झाले.
सध्या Netflix, hotstar आणि prime सुरू आहे, गरजेनुसार hotstar सुरू बंद करतो(मॅचेस, got इत्यादी).
अतिशय उत्तम content, चांगल्या क्वालिटी मध्ये बघण्याची सवय झाल्याने आता पुन्हा डिश, केबल वैगेरे कडे वळणे अशक्य.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/21/2019 - 02:02
नवीन
इंटरनेट आणि इतर महिना फी( नेटफ्लिक्स हॅाटस्टार वगैरे) धरून रु ५००/१०००/२००० मध्ये कायकाय करमणूक मिळू शकते यावर धागा काढा कुणी.
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 02/21/2019 - 06:21
नवीन
firestick लय भारी ओप्शन आहे , अमेझोन ,नेटफ्लिक्स वर तर ख्जाना आहे वेब सेरिज , मुव्हिज चा
लहान मुलासाठीसुद्धा बरच काय काय आहे मला तर खुप आवडलय :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/21/2019 - 07:12
नवीन
अभिनंदन पिवशे :)
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 02/21/2019 - 07:33
नवीन
का रे दादुसअन्भिनन्न्दन ? :०
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Fri, 02/22/2019 - 10:33
नवीन
माझ्या गेल्या २-३ वर्षातल्या त्रांत्रिक खरेदीतली फायरस्टिक नंबर एक ला..
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/21/2019 - 07:14
नवीन
फायर स्टिक वापरतो, प्राईम आणि हॉटस्टारचं वार्शिक सदस्यत्व देखील आहे. जर घरी उत्तम इंटरनेट बॅण्डविड्थ असेल तरच हे घ्यावे. फुल एचडी मधे बघतना मजा येते.
- Log in or register to post comments
ल
लई भारी
गुरुवार, 02/21/2019 - 07:34
नवीन
जवळपास सगळे हिंदी मराठी शो/सिरीयल मिळतात स्ट्रीमिंग ऍप वर. बहुधा थोड्या उशिराने येतात लाईव्ह शो.
voot - कलर्स हिंदी/मराठी (मोफत आहे)
zee 5 : झी मराठी आणि झी वर आलेले नवीन चित्रपट. बहुधा झी(हिंदी) चे पण आहे कंटेन्ट. (५० रु महिना बहुधा, पण बरेच शो मोफत पण मिळतात)
हॉटस्टार - स्टार नेटवर्क च्या सिरीयल/शो आणि बऱ्यापैकी स्पोर्ट्स (९९९ रु. वार्षिक)
sony liv : सोनी मराठी, सब, सेट(केबीसी, कपिल शर्मा शो दिसतंय). वापरलं नाही.
ही सगळी ऍप(इतर पण आहेतच, प्राईम, नेटफ्लिक्स आणि युट्युब सह) फायर टीव्ही स्टिक वर मस्त चालतात.
Jio TV -चिक्कार कंटेन्ट दिसतंय पण बहुधा फक्त मोबाईल वरच चालतंय
आपल्या सोयीनुसार बघता येतात हा खूप मोठा फायदा आहे. आणि साधारण १००० रुपयांमध्ये चांगल ब्रॉडबँड कनेक्शन मिळू शकत आजकाल.
१५-२०Mbps पुरतो स्पीड(प्रत्यक्षात यायला हवा).
भरपूर वेळ(४ तास?) घालवणार असाल, ते पण HD मध्ये तर महिन्याला किमान २००-३००GB चा प्लॅन पाहिजे.
आता 4G मोबाईल डेटा वर कितपत नीट चालतंय हे बघायला हवं, कारण दिवसाला १-१.५GB जवळपास सगळ्यांच्या प्लॅन मध्ये आहेच. त्यामध्ये तस तासभरच चालेल म्हणा.
- Log in or register to post comments
व
वगिश
गुरुवार, 02/21/2019 - 16:46
नवीन
Jio Cinema Firestick वर आहे.
- Log in or register to post comments
ल
लई भारी
गुरुवार, 02/21/2019 - 17:01
नवीन
ते वापरतोच, पण Jio TV नाही सापडलं.
Jio Cinema वर टीव्ही चे कार्यक्रम बहुधा नाही आहेत.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
गुरुवार, 02/21/2019 - 17:56
नवीन
एवढं सगळं कंटेंट बघायला वेळ आहे? आणि आधीच कमी असलेला वेळ एवढं कंटेंट बघण्यात घालवायचा?
अजूनही आपल्याकडे मालिका नियमितपणे बघणारे आणि त्याभोवती आपले दैनंदिन जीवन गुंफणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्यामते अजून तरी ९०% लोक नियमितपणे टीव्ही बघतात. नेहमीची कामे करता करता टीव्ही बघता येतो; खूप बारकाईने लक्ष देऊन बघायची गरज नसते. हा प्रेक्षकवर्ग ठराविक साच्याच्याच मालिका बघणं पसंत करतो. हा प्रेक्षकवर्ग पस्तिशीच्या पुढे आहे. त्यामुळे केबल/डिश टीव्हीला माझ्यामते अजून किमान २०-२५ वर्षे तरी मरण नाही असे मला वाटते. आता साठीत असणारे प्रेक्षक अजून जवळपास १५-२० वर्षे तरी मालिका बघणारच आहेत.
मला एका दृष्टीने ते बरे वाटते. ठराविक वेळेत माफक मनोरंजन बघून मोकळे व्हायचे. एक शिस्त आहे. तासंतास, रात्रभर, सिझन पाठोपाठ सिझन, येता-जाता बिंज वॉचिंग करायचे हा प्रकार मला भयानक वाटतो. आपल्यातली सगळी ऊर्जा शोषून घेणारा हा प्रकार आहे. बकाबका वेळ खाणारा बकासूर आहे हा...
चित्रपट - मी नेहमी थिएटरला जाऊनच बघतो. ती मजाच निराळी! आतापर्यंत कधीही डाऊनलोड करून चित्रपट पाहिलेले नाहीत.
कुठल्याही साधन-सामुग्रीची अमर्याद उपलब्धता आपली किंमत वसूल केल्याशिवाय राहत नाही!
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Fri, 02/22/2019 - 06:49
नवीन
अगदी खरं आहे. पण शेवटी आपण कसा वापर करू त्यावर आहे सगळं. आपल्या दिमतीला आहे सगळं, मग आहारी जायचं की 'मापात' वापरायचं हे भान निश्चित ठेवायला पाहिजे.
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Mon, 02/25/2019 - 06:36
नवीन
मुबलक उपलब्धता असल्यामुळे कित्येकांना 'मापात' रहायला आवडतं पण बहुतेकांना जमत नाही. "पुढचा एकच भाग बघून बंद करू...एवढा इंटरेस्टिंग भाग कसा सोडायचा?..." असं म्हणत म्हणत बरीच कामे बाजूला राहतात आणि वेळ मात्र मजबूत जातो.
दोन-चार दिवसांपूर्वी टाईम्सला एक लेख आला होता. आजकाल तरुण मुले-मुली नेहमीची किरकोळ कामे खूप कमी प्रमाणात करतात. मोठ्या लोकांमध्येदेखील हा प्रकार वाढतोय. घर आवरून ठेवणे, कपाट नीट लावणे, कपडे इस्त्री करणे, झाडांना पाणी घालणे, बाजारातून किरकोळ सामान आणणे, पाहुण्यांना घ्यायला-सोडायला जाणे, पाहुणे आल्यास त्यांची व्यवस्था ठेवणे, अंथरुणं आवरून ठेवणे, गरज पडल्यास धुणी-भांडी करणे, घरात मदत करणे, वगैरे वगैरे. ही कामे सतत टाळली जातायेत. याला कारण आजकाल फोफावलेले मोबाईल, सोशल मीडिया, गेम्स, इंटरनेटचे प्रचंड वेड!
आजच्याच टाईम्समध्ये एक सर्वेक्षण आले आहे. लहान मुलांमध्ये गॅजेट्सचे वाढणारे व्यसन! त्यात एक निरीक्षण असे आहे की ज्या घरात पालक स्वत: या व्यसनात गुंतलेले आहेत, त्या घरातली मुलेदेखील या व्यसनाला विनासायास बळी पडतात. या व्यसनाचे दुष्परिणाम आहेतच. बेजबाबदारपणा, आळस, ध्येयांपासून दूर गेलेली नजर, प्रत्यक्ष जगापासून तुटलेला संपर्क, एकलकोंडेपणा, आत्मकेंद्री वृत्ती, लठ्ठपणा, एकाग्रतेचा अभाव, विविध प्रकारच्या शारिरीक आणि मानसिक व्याधी, हट्टीपणा, वगैरे वगैरे. असो.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Fri, 02/22/2019 - 10:28
नवीन
हे टीवीलाही लागू होतेच कि.. जेव्हा दूरदर्शन वर एकाच चॅनेल होते तेव्हाही दुसरे आल्यावर हा प्रश्न वाचकाची पत्रे सदरात आला असेल वर्तमानपत्रांच्या :-)
हे सर्व स्ट्रीमिंग लाही लागू आहे. नेहमीची कामे करतांना बघता येते, पॉस करता येते. बारकाईने काय, कोणत्याही मालिका बघायची गरज नसावी. तुम्ही दुसरी गल्लत हि करताय, हे दोन्हींचे कंटेंट म्हणजे दोन कंपार्टमेंट नाहीयेत. मालिका ज्या स्टार प्लस च्या आहेत त्या तशाच हॉटस्टार वर आहेत.
टीव्हीला तंतोतंत लागू..ससुराल सिमर का चे २००० वर एपिसोड आलेत :-)
blockquote>चित्रपट - मी नेहमी थिएटरला जाऊनच बघतो. ती मजाच निराळी! आतापर्यंत कधीही डाऊनलोड करून चित्रपट पाहिलेले नाहीत.
शेकडा एक सिनेमा बघायच्या लायक असतो थिएटरात..गैरलागू आहे.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 02/22/2019 - 15:06
नवीन
कंटेंट ची क्वालिटी जितकी चांगली तितका तो इंटेन्स असतो..
करण थोडेसे दुर्लक्ष झाले तरी डिटेल्स सुटायची शक्यता असते.
त्यामाणे डेलीसोप चांगल्या.. एखादा आख्खा एपिसोड चुकला तरी काहीही फरक पडत नाही..
मी घरी बायको असली की डेलीसोप बघतो, नसेल तेव्हा नाही बघत.. आठ दिवसाचा गॅप पडला तरी सिरीयल तिथेच असते.. वेब मालिका अश्या असतात का?
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Fri, 02/22/2019 - 18:47
नवीन
मालिका या कायम उपलब्ध असतात. तुम्ही आज एक भाग बघायचा चुकले तर सहा महिन्यांनी बघून पुन्हा पुढचे भाग बघू शकता..
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 02/22/2019 - 04:48
नवीन
Amazon fire stick आणि Google chromecast यापैकी काय घ्यावं ? नुकताच HD TV घेण्यात आला आहे. वरची चर्चा वाचुन डिश/ टाटा स्काय न घेता हॉटस्टार वगैरे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाटी Amazon fire stick आणि Google chromecast यापैकी काय चांगलं राहिल ?
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Fri, 02/22/2019 - 06:46
नवीन
मी क्रोमकास्ट खूप आधी वापरला होता पण आता सुद्धा बहुधा तसाच interface आहे.
महत्वाचा फरक म्हणजे क्रोमकास्ट वापरण्यासाठी नेहमी कुठलंतरी डिव्हाईस पाहिजे ज्यावरून कास्ट करायचं आहे. म्हणजे मोबाईल/टॅब्लेट/लॅपटॉप. आता काहीजणांना हेच सोयीचं वाटू शकत.
एका रिव्ह्यू मधलं वाक्य बघा:
दुसरीकडे फायर टीव्ही स्टिक ला रिमोट आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे रिमोट कटकटीचा आहे पण जुगाड आहेत उदा. मर्यादित 'voice command' चा वापर किंवा मोबाईल अँप वरून रिमोट वापरणे(ज्यामध्ये पूर्ण किबोर्ड वापरता येतो). त्यामुळे रिमोट वापरून मोबाईल च्या वापराशिवाय स्टिक वापरता येऊ शकते. मला ते जास्त intuitive वाटत. आणि मोबाईल वरून यूट्यूब तरी कास्ट करता येत. बाकी फोन अक्खा कास्ट करता येत नाही हा तोटा आहे(म्हणजे तसे 3rd party apps निश्चित असतील, मी तरी नाही वापरलं आणि गरज नाही वाटली)
स्टिक वर यूट्यूब च अँप officially नाही आहे, पण काही 3rd party apps यूट्यूबची लिंक वापरून ब्राऊजर मध्ये ओपन करतात आणि आपल्याला फरक सुद्धा कळत नाही एवढं smooth चालतं.
त्यामुळे माझं मत तरी स्टिक ला आहे.
रच्याकने, तुम्ही नवीन टीव्ही घेतला तो नॉन-स्मार्ट आहे का? कारण स्मार्ट टीव्ही हे खूपच कॉमन झालय आणि त्यामुळे वरच्या दोन्ही पर्यायांची गरजच उरत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे अगदी अलीकडे पर्यंत LG webos मध्ये हॉटस्टार मात्र नाही आहे :)
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Fri, 02/22/2019 - 08:02
नवीन
धन्यवाद !
TV smart आहे पण त्याचा UI वगैरे खूप गैरसोईचा वाटत आहे. म्हणून वरच्या पर्यायाचा विचार चालु आहे.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Fri, 02/22/2019 - 10:31
नवीन
+ १. माझा अनुभव अगदी चांगला आहे. रिमोट मजबूत ब्याटरी खातो हे सोडून दुसरा कोणताही निगेटिव्ह अनुभव नाही..
- Log in or register to post comments
व
वगिश
Tue, 02/26/2019 - 15:58
नवीन
हे दोन वेगवेगळे उत्पादन आहे, तुलना होऊ शकत नाही. Firestick हा standalone streaming platform आहे, Chromecast हे तुमचा मोबाईल स्क्रीन TV वर कास्ट (प्रक्षेपित) करण्यासाठी आहे.
Firll
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Fri, 02/22/2019 - 10:36
नवीन
आम्ही गेल्या २ वर्षात किमान २५ चांगले इतर भारतीय भाषांमधले सिनिमे बघू शकलो, मल्याळम, बांगला आणि तामिळ..
आईला नाटके आवडतात, हॉटस्टार वर खूप चांगले भारतीय भाषांमधील नाटकांचे कलेक्शन आहे ते पहिले..
- Log in or register to post comments
व
विकास...
Sat, 02/23/2019 - 07:13
नवीन
केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv . यापैकी आपल्याकडे काहीच नाही.. बरेच पैसे वाचतात आणि डोक्याला शांतता मिळते
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 03/10/2019 - 16:33
नवीन
विकास,
१. तुम्ही या अवस्थेला पोचला असाल तर अभिनंदन ! डोळे व डोक्याला शांतता खरेच. याचा अर्थ तुम्ही घराबाहेर पडून खेळ वा इतर करमणूक करीत असावेत. छान.
२. मी संयम ठेवून या जाल प्रकारांचा आनंद घेतो. महिन्यातून १० दिवस NF व U T पासून पूर्ण अलिप्त, तर १५ दिवस टीव्हीला हातही लावत नाही.
३. दिवसात ३ तास रेडिओ (काम व व्यायाम करताना) ही माझी सर्वात आवडती करमणूक.
समीरसूर,
सहमत. चांगली करमणूक मुबलक मिळाली की व्यसन लागते हे मान्य. त्यामानाने टीव्ही चा दर्जा व जाहिरात-व्यत्यय बघता माणूस त्याला जास्त चिकटत नाही. तरीसुद्धा हे वय व व्यक्तीसापेक्ष आहेच.
इतर सदस्यांनी चांगली नवी तांत्रिक माहिती (ते आगकाठी, इ) अनेक आभार. माहितीत भर चांगली.
- Log in or register to post comments
स
सुखी
Mon, 02/25/2019 - 18:17
नवीन
Android box ha सुद्धा एक उत्तम पर्याय आहे, अमेझॉन किंवा गूगल अस कुणाच्या अंगचटीला जायची गरज नाही
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Tue, 02/26/2019 - 04:14
नवीन
हे जरा इस्कटून सांगाल का?
म्हणजे वरती चर्चिलेल्या गोष्टींसाठी कुठला Android box चांगला पर्याय आहे? साधारण किंमत काय आहे? यांच्या तुलनेत काय फायदा आहे?
हे कंटेन्ट कसं बघायचं? किंवा अजून काही पर्याय आहे का ऑनलाईन शो/चित्रपट बघण्यासाठी?
- Log in or register to post comments
स
सुखी
Wed, 02/27/2019 - 17:34
नवीन
Fire stick la पर्याय आहे, वर सांगिल्याप्रमाणे Chromecast hi वेगळीच system असून, त्याला sourcing device म्हणून मोबाईल अथवा दुसरं device लागतं.
Fire stick la ji os aste to Amazon chya control madhye aste, an apla त्याच्यावर काही कंट्रोल नसतो, एखादं अॅप अमेझॉन वाले ब्लॉक करू शकतात.
अँड्रॉइड बॉक्स हा एक जवळपास without screen Android phone असतो. त्यावर गूगल play warch almost सगळी entertainment chi apps download करून वापरता येतात. याची किंमत 3हजारापासून सुरू होऊन 20000 पर्यंत जाते...
घरगुती वापरासाठी 3k wala योग्य आहे je 2gb ram an 16gb internal memory sobat येईल. मी पण हाच वापरतो.
माझ्याकडे नुसता led lcd TV ahe jo budhdhu ahe, त्याला या बॉक्स मुळे स्मार्ट करता आलं.
आता त्याच्या peripherals connectivity बद्दल थोडेसे, तुम्ही त्याला कीबोर्ड, माऊस, एअर माऊस, hdmi, component out, optical out, USB ports, ir ports for remote असतात.
Usb पोर्ट मुळे external HDD laun हवा तो content TV war बघू शकता... Wistarbayastav इथेच थांबतो.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 02/28/2019 - 10:05
नवीन
तुम्ही रशियात मुक्काम केलात की काय असं वाटून गेलं!
- Log in or register to post comments
स
सुखी
गुरुवार, 02/28/2019 - 17:56
नवीन
खी खीं खी
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/07/2019 - 16:56
नवीन
मारमीक बोललास्की
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 03/07/2019 - 19:16
नवीन
:P
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 02/28/2019 - 02:03
नवीन
युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून साधा स्मार्ट नसलेला टिवी ( युएसबी पॅार्ट असलेला) स्मार्ट होतो का? मोबाइलमधले कॅान्टेन्ट टिविवर दिसते का?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »