भटकंती

कोकणात सहलीसाठी मार्गदर्शन हवे आहे

Primary tabs

नोव्हेंबर २०१७ मध्ये मी पहिल्यांदा कोकण पाहिले आणि प्रेमातच पडलो.
कुणाच्या काय म्हणता, कोकणाच्या ;-)
त्या प्रवासावर एकदा निवांत लिहील हे नक्की ('आता उशीर झाला लिहायला फार' असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती ठरेल :-))

आता पुनःश्च कोकणात जाण्याचा बेत आखीत आहे.
मागच्या वेळी आम्ही कर्दे ते रत्नागिरी हा परिसर डोळ्यांत आणि आठवणीत साठवून घेतला.
अर्थातच यावेळी नवीन ठिकाणी सहलीचा बेत आहे.

थोडक्यात:
१) कोकणात जायचंय हे नक्की (दुसरं एखादं निसर्गरम्य ठिकाण महाराष्ट्रात असल्यास कृपया माझे अज्ञान दूर करावे ही विनंती :-))
२) सर्व कुटुंब (साधारण ७ ते १० जण)
३) स्वतःचे वाहन
४) निवांत प्रवासाची आवड (कर्दे ते रत्नागिरी प्रवास फक्त १० तासात पूर्ण करण्याचा अनुभव :-))
५) वेळ: मार्चचा पहिला किंवा दुसरा आठवडा (साधारण ४ ते ५ दिवस)

मिपाकर मंडळी योग्य मार्गदर्शन करतील यात शंका नाही.
धन्यवाद.

कंजूस

येणार कुठून? कारण त्यातही एकेक दिवस जाणार आहे.
-----
तीनचार भागांत कोकण पाहावे. ४-५ दिवसांत एवढेच होईल.
----
एक डोंगर आणि समुद्र असे धरून चार भाग पडतात.
१) कनकेश्वर, अलिबाग ते मुरुड जंजिरा परिसर
((वाहन असल्याने बोटीने मुंबईमार्गे परत करता येणार नाही.))
२) रायगड,/शिवथरघळ श्रीवर्धन परिसर
३) रत्नागिरी (हेदवी,पावस,गणपतीपुळे,मालगुंडसह) परिसर तुम्ही केलाय.
किंवा महाबळेश्वर दापोली कर्दे वगैरे
४)सिंधुदुर्ग ,मालवण,तारकर्ली परिसर
हे प्रत्येकी चारपाच दिवसांत होते.

चौथा कोनाडा

+१
मिपाकर भटकंती साहित्य प्रकारात शोधायचे कष्ट घेत नाहीत !

विकास...

एकदिवसीय सहल
सकाळी विजयदुर्ग
विजयदुर्ग जवळ आहे Shri Dev Rameshwar Mandir, Girye
देवगड जवळ Shri Vimaleshvar Temple, Maharashtra State Highway 4, Wada, Maharashtra
कुणकेश्वर मुक्काम

विकास...

एकदिवसीय सहल
सकाळी विजयदुर्ग
विजयदुर्ग जवळ आहे Shri Dev Rameshwar Mandir, Girye
देवगड जवळ Shri Vimaleshvar Temple, Maharashtra State Highway 4, Wada, Maharashtra
कुणकेश्वर मुक्काम