Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भुलण्याचे वय तुझे... सावर सावर

ध — धोंडोपंत, Mon, 11/03/2008 - 21:41

प्रतिक्रिया द्या
5638 वाचन

💬 प्रतिसाद (25)
आ
आजानुकर्ण Tue, 11/04/2008 - 00:33 नवीन
पंत, भलतीच जबरदस्त कविता लिहिलीत .
उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप?
ओहोहो... :)
बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग
क्या बात है... मस्त. आपला (जबराट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/04/2008 - 00:41 नवीन
उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? वावा!!! (तुळशीदास)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/04/2008 - 08:08 नवीन
उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? एकदम खास!! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
श
शनआत्तार Tue, 11/04/2008 - 05:14 नवीन
:S सुंदर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/04/2008 - 05:18 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/04/2008 - 05:52 नवीन
सुलोचना बाईंच्या आवाजातील गदिमांच्या तुज्या उसाला लागल कोल्हा ची आठवण आली. मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरपेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला (लावणी प्रेमी) प्रकाश घाटपांडे-पाटील बेल्हेकर
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 11/04/2008 - 06:02 नवीन
नमस्कार प्रकाशराव, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. एक मूलभूत मुद्दा सांगावासा वाटतो. गदिमांची " तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा" ही लावणी अप्रतिम आहे. आम्ही त्या लावणीचे दिवाने आहोत. पण गदिमांच्या तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा ची पार्श्वभूमी , वृत्त आणि विचार संपूर्णपणे भिन्न आहेत. त्यांच्या रचनेत तारूण्याने सळसळलेल्या युवतीचे रसभरीत वर्णन आहे . तिची काळजी करण्यापेक्षा तिच्या सौंदर्याचे वर्णन आणि त्यामुळे तिचे आशिक झालेल्यांची काय अवस्था असेल हे सांगण्याकडे त्यांचा कल आहे. इथे आम्हाला तिच्या तारूण्यामुळे होण्यार्‍या भावी गोष्टींची चिंता वाटते. "इंधनाच्या थेंबा थेंबामुळे आग भडकते" हे ज्वलंत धोकादायक वास्तव तिला कळावे, अशी अपेक्षा आहे. आपला, (सावध) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/04/2008 - 06:10 नवीन
फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या ऊसाला लागल कोल्हा "सांभाळ " मध्ये थोडी काळजी घेतल्या सारखे केले आहे ,पण मूळ तुम्ही म्हणता तसे आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
व
विनायक प्रभू Tue, 11/04/2008 - 06:06 नवीन
पंत कविता आवड्ली, भावली. परिस्थितीचे वास्तववादी चित्रण. सर्व पालकांनी जरुर वाचावी अशी. हा विषय कसा बोलावा ह्या बाबतीत कायम गोंधळ असतो.
  • Log in or register to post comments
S
sanjubaba Tue, 11/04/2008 - 06:13 नवीन
गदिमांची " तुझ्या ऊसाला लागलं कोल्हा" ही लावणी अप्रतिम आहे. आम्ही त्या लावणीचे दिवाने आहोत. पण ही लावणी गदिमा ची आहे या विषयी शंका वाटते मला वाटते ती खेबूडकराची आहे.....जरा शहानिशा केली तर उत्तम..! बाकी कविता फार च अप्रतिम आहे
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 11/04/2008 - 06:18 नवीन
शहानिशा कसली? १०० टक्के गदिमांचीच आहे. शंकाच नको. हे असलं लिहिणं गदिमाच जाणे. एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही गदिमांचा. गदिमांची ताकद आम्ही अजून कोणात पाहिलेली नाही. बाप माणूस. आमचा दंडवत. आपला, (गदिमाभक्त) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba
र
राघव Tue, 11/04/2008 - 08:17 नवीन
एक शब्द इकडचा तिकडे करता येत नाही गदिमांचा. गदिमांची ताकद आम्ही अजून कोणात पाहिलेली नाही. बाप माणूस. आमचा दंडवत. गदीमा म्हणजे आपलेही दैवत! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/04/2008 - 06:25 नवीन
येथे पहा. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba
ध
धोंडोपंत Tue, 11/04/2008 - 06:31 नवीन
क्या बात है प्रकाशराव, लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा ? सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा याला कुंपण घालशील किती ? जात चोरांची लई हिकमती आपली आपण धरावी भिती अर्ध्या रात्री घालतील घाला याला म्हणतात गदिमा. धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विसोबा खेचर Tue, 11/04/2008 - 06:15 नवीन
भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? वा वा पंत..! केवळ सुंदर काव्य.. काव्यातील आपला अधिकार वादातीत आहे..! तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/04/2008 - 06:27 नवीन
मस्त ! आवडली काव्य रचना आपली ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/04/2008 - 06:34 नवीन
पंत, कविता आवडली !!! भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? ओहो, तारुण्याची भानगड लैच मोक्कार असते नाय का ? :) -दिलीप बिरुटे (पंतांचा दोस्त )
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 11/04/2008 - 11:34 नवीन
बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग वा ! कविता आवडली. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/04/2008 - 15:37 नवीन
धोंडोपंत .. अतिशय सुरेख कविता. गावातल्या मुलींना का, हडळीचा शाप? केवड्याच्या झाडाखाली, असतोच साप खास! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 11/04/2008 - 15:53 नवीन
अप्रतिम! एकेक कडवे/शेर अस्सल आणि कसदार आहे .. खूप खूप आवडली :) -(प्रभावित) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/04/2008 - 15:57 नवीन
उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? भुलण्याचे वय तुझे सावर सावर....... बोललो जे काही त्याचा, नको मानू राग थेंब थेंब इंधनाने, भडकते आग सुरेखच रचना! वृत्तबद्ध आणि गेय! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 11/04/2008 - 16:21 नवीन
धोंडोपंत, आज बर्‍याच दिवसानी आपली रचना वाचायला मिळाली. सुरेख!
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 11/06/2008 - 11:29 नवीन
कविता छानच आहे .. गावातल्या मुलींना का, हडळीचा शाप? केवड्याच्या झाडाखाली, असतोच साप ... ... या ओळी विशेष आवडल्या .
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ गुरुवार, 11/06/2008 - 15:48 नवीन
अप्रतिम! उष्टावल्या नैवेद्याने, देवाचाही कोप भांगेसंगे जगते का, तुळशीचे रोप? क्या बात है!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/07/2008 - 05:14 नवीन
मस्तच.. भरलेल्या कणसाला, पाखरांची भिती हाती आल्या पिकाला गं, जपायचे किती? व्वा.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा