Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सजले अंतर

क — कुमार जावडेकर, Tue, 03/05/2019 - 21:06
नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर विसरलो गेला कसा सारा दिवस सरून झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर... - कुमार जावडेकर

प्रतिक्रिया द्या
4504 वाचन

💬 प्रतिसाद (11)
र
राघव Wed, 03/06/2019 - 11:53 नवीन
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर ही द्विपदी आवडली! :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/06/2019 - 13:25 नवीन
वा, सुरेख. काही काही ओळी फार सुरेख जमल्या आहेत.
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/08/2019 - 08:54 नवीन
मस्त... आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 03/11/2019 - 06:20 नवीन
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
ह्या नासिर काज़मी यांच्या ओळी आठवल्या -
दिन भर तो मैं दुनिया के धंदों में खोया रहा जब दीवारों से धूप ढली तुम याद आए
आणि ह्या ओळींसाठी प्र्णाम!
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
  • Log in or register to post comments
क
कुमार जावडेकर Sat, 03/16/2019 - 08:38 नवीन
मनीष, धन्यवाद... ‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या सांज होता तुझी जाणीव होते’ असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं. - कुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

कुमार जावडेकर Sat, 03/16/2019 - 08:39 नवीन

मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/20/2019 - 09:58 नवीन
सुंदर, फार दिवसांनी रेखिव रचना वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा