Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

|| माझे बाबा ||

ब — बी.डी.वायळ, Fri, 03/15/2019 - 07:21
हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ|| त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी | खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी || त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले | म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले || हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1|| जुनी पुरानी कपडे त्यांनी शिवून शिवून घातली | माझ्यासाठी प्रत्येक वेळेस नविन फ्रॉक घेतली || एकच जोडी चपल ते सांधुन सांधून घालायचे | माझ्यासाठी पायघड्या ते काट्यांवरून चालायचे || त्यांच्याकडुन मला पण काही तरी शिकु दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||2|| शेतक-याची मुलगी आहे मी अभिमानाने सांगते | मिडियावरच्या बातम्या ऐकून उगीच भिती जागते || तसल काही करणार नाही अशी त्यांना शक्ती दे | त्यांचीच चरण सेवा घडो अशी मला भक्ती दे || त्यांच्याच पायावरती मला माझे डोके टेकू दे | माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||3|| बी.डी.वायळ

प्रतिक्रिया द्या
2131 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रभाकर पेठकर Fri, 03/15/2019 - 07:31 नवीन
कविता, त्या मागील भावना मनाला भिडणारी आहे. दुर्दैवाने, माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे हे वडीलांचे आयुष्य मर्यादीत करणारे वाक्य खटकले. थोडे स्वार्थी वाटले.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 03/15/2019 - 07:35 नवीन
एक सुचवणी.... हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे | माझ्या बाबांना माझ्यासाठी दीर्घायुष्य लाभू दे ।
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 03/16/2019 - 10:03 नवीन
नंतर बाप राहिला काय किंवा चचला काय काही फरक पडत नाही. उलट त्याने फास लावून घेतला तर मिळणारी सरकारी मदत पदरात पाडून घेता येईल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा