डेस्कटॉपवरील युद्धजन्य परीस्थिती
माझ्या साधारणतः सहावर्षे जुन्या एच पी लॅपटॉपवर मासॉची खिडकी क्रमांक १० कार्यप्रणाली कार्यरत असते. अगदी अलिकडे पर्यंत मी फाफॉ किंवा क्रोम ही ब्राऊजर्स गरजे प्रमाणे वापरत असे. एक्सप्लोरर आणि आताचे एज वापरून जमाना झालेला होता.
गेल्या दोन - एक महिन्यात केव्हातरी खिडकी १० आपोआप अद्ययावत झाली, आणि आमच्या संगणकावरच्या फाफॉ आणि क्रोमने दम तोडला -म्हणजे काही केल्या साईट्स डाऊनलोडच होत नव्हत्या एवढा वेग कमी झालेला. मासॉने उपलब्ध केलेले एज उघडले तर चालायला तर लागले. मनात विचार केला मासॉ एवढी सर्वीस पुरवते त्यांचाच ब्राऊजर वापरावा असा काही हट्ट असेल तर पुरवूया हट्ट आपणही कशाला मनाला लावून घ्यायचे म्हणून एजवर धकवायला लागलो. मी इतर गूगल सेवा जसे शोध, ड्राईव्ह , युट्यूब नाही म्हटलेतरी बर्यापैकी वापरतो. प्रत्येकवेळी गूगलची आलेली क्रोमवापरण्याची विनंती आम्ही नाईलाजाने नाकारली.
पण एवढ्यावर समस्या सुटली नसावी आमचा लॅपटॉप संगणक बराच आवाज करून आंतरजालाचा वेग कमी होऊन बंद पडण्याच्या स्थितीवर आला. मासॉची कोणतीतरी प्रणाली सतत कार्यरत होती. जरासे आंजा शोधले त्यातले काही गमणे आमच्या अतंत्रज्ञ बुद्धीस झेपणारे नव्हते. बाहेरून तांत्रिक सेवा घेण्यापुर्वी मासॉची रिसेटवाली काही सिस्टीम आढळली म्हटले ती वापरून खिडकी रिसेट करून पहावी. रिसेटींगच्यावेळी खिडकीशी संघर्षरत प्रणाली वगळल्या जातील अशी काहीशी सुचना आली. आमच्या संगणकावर इतर काही प्रणालीही फारशा नव्हत्या. अँटी व्हायरस जबाबदारी सुद्धा मासॉच्या डिफेंडरच्याच कृपेवर आहे. केवळ अशात न वापरलेले फाफॉ आणि क्रोम होते ते गिळंकृत करून खिडकी १० रिसेट होऊन शांत झाली.
काल कोणत्याशा वेबसाईटवर उपलब्ध युट्यूब डायरेक्ट युट्यूबवर बघावे म्हणून युट्यूबच्या आयकॉनवर क्लिककेले तर युट्यूब महाशयांनीको क्रोमचीच अँटी मालवेअर वापरून पहाण्याची अप्रत्यक्ष सुचना देत नकार दिला . तेव्हा क्रोम पुन्हा डाऊनलोड करण्याचा उद्योग केला. पण खिडकी १० ने प्रोग्राम रन करण्याबद्दल आम्हाला दम भरला म्हणून युट्यूब नाहीतर नाही म्हणून आम्ही नाद सोडला. पण काल क्रोम डाऊनलोड केल्या पासून खिडकी पुन्हा तापावयास लागली आहे.
आता तसे आम्ही अतंत्रज्ञ त्यामुळे मासॉ आणि गूगलचे आपापसातले सुप्त युद्ध आमच्या संगणकावर खेळ्ले जात नाही आहे ना या शंकेने आमचे मन घेरले आहे. हे केवळ आमच्या मनाचे आभासी खेळही असतील म्हणून मिपाकर खास करून जाणकारांपाशी मन मोकळे करत आहे. कुणास या बद्दल असे अनुभव आले येत असल्यास त्याची चर्चा या निमीत्ताने व्हावी किंवा आमची आभसी अंधश्रद्धा निर्मुलीत व्हावी म्हणून धागा काढत आहे.
* अनुषंगिका व्यतरीकत आवांतरे व्यक्तीगत टिका आणि तथाकथित शुद्धलेखनाचे डोस टाळण्यासाठी; धागा विषयास अनुसरून चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |