पालक होण्यामुळे झालेले बदल
संदर्भ
Painter Katha
मी एकेकाळी अगदी बेछूट माणूस होतो. काहीही करायचो - रात्री ९ वाजता सुरु झालेली पार्टी सकाळपर्यंत चालायची. ट्रेकला गेलो कि काहीही धाडस करायचो, शेकडो किलोमीटर मोटारसायकल वर फिरायचो. मजबूत भांडखोर होतो, गाडीत कायम एक लोखंडी कांब असायची आणि कुठेही रस्त्यावर भांडण झाले तर ती काढण्याचीही तयारी असायची. महिन्याच्या पगारातले १०० रुपयेही शिल्लक ठेवण्याची आसक्ती नसायची.
लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या पण मूळ स्वभाव जवळ जवळ तसाच होता.
आता, एका बाळाच्या जन्मानंतर पूर्ण बदललोय, कोणी काहीही ना सांगता.. अगदी बियरचा एक ग्लास हातात असेल तर मी उबेर बुक करतो, मोटारसायकल महिनोन महिने उभी असते. रस्त्यात लहान मुलांसोबत भिकारी दिसले कि पैसे देतो ( याची चर्चा करायला हा धागा नाही) . ट्रेक वगैरे जवळजवळ बंद झाले आहे, जो काय प्रवास करतो तो लक्सारी म्हणावा असा असतो. पीपीएफ आणि मुतुअल फंड अशा इन्वेस्टमेंटही आवर्जून करतो, टर्म इन्शुरन्स काढला आहे.
बराच भावनिकही झालोय, लहान मुलांविषयी काही वाईट वाचले/ ऐकले कि डोळ्याच्या कडा ओलावतात. ( वरची कथा, आजचे ताजे उदाहरण).
तुमचा स्वतःचा असा अनुभव आहे का? पालक बनल्यावर असे बदल होणे तुमच्या पाहण्यात आहे?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |