Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(पाहिजे)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Tue, 04/02/2019 - 08:36
पेरणा हे पाहिले आणि म्हटले आपणही जाहिरात देउनच टाकावी. ऑफिस मध्ये कामा साठी कष्टाळू मुलगा पाहिजे त्याच्या कडे स्वत:चे दुचाकी वहान असले पाहिजे गाईच्या धारा काढण्यासाठी हवा एक अनुभवी गडी गायीच्या लाथा गोड मानण्याची त्याची तयारी पाहिजे घरकामासाठी हवी आहे एक मोलकरीण घरात पडेल ते काम तिने केले पाहिजे शेतात काम करण्यासाठी मजूर हवे आहेत उन पाउस चिखलात राबण्याची त्यांची तयारी पाहिजे तसेच एक माळी, फिटर, प्लंबर, सुतार व गवंडी तसेच, हापिसात कामाला एक अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे वारजे किंवा सिंहगड रोड परिसरात १ किंवा २ बीएच के फ्लॅट कार पार्किंग सकट विकत किंवा भाड्याने पाहिजे, वृध्दाश्रमासाठी सेविका (८ जागा), व्यवस्थापिका, ड्रायव्हर व स्वयंपाकी पाहिजे, नामांकित बँकेच्या कामा साठी, १० वी १२ वी पास / नापास मुले मुली, व टिमलिडर पाहिजे, आणि शेवटी.... लग्न करायचे आहे, एक सुस्वरूप आणि संस्कारी मुलगी पाहिजे बाकी ती कशी असावी याची चर्चा खाजगीत करू, इकडे नको, इकडे (स्वयंघोषित) सुधारणावाद्यांना दुसर्‍यावर हल्ला करायचे काहीतरी निमित्त पाहिजे पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
3630 वाचन

💬 प्रतिसाद (6)
य
यशोधरा Tue, 04/02/2019 - 08:58 नवीन
मिळतेच मिपावर दादही भन्नाटशी विडंबन मात्र कचकून जमले पाहिजे!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/02/2019 - 09:59 नवीन
बुवा सध्या सॉलिड फोर्ममध्ये आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 04/02/2019 - 10:34 नवीन
नेहमीचेच यशस्वी... पैजारबुवा ! =))
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Tue, 04/02/2019 - 11:03 नवीन
जमतंय जमतंय! :)
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Tue, 04/02/2019 - 22:49 नवीन
कविता भन्नाट जमलीये, पैजारबुवा! पण हे खाली वर्गीकरण मध्ये काय काय आहे?
आता मला वाटते भिती, काणकोण, कोडाईकनाल, गरम पाण्याचे कुंड, इतिहासवाङ्मय, इंदुरी, कृष्णमुर्ती
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 04/03/2019 - 00:41 नवीन
तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ गझलेत काही राम नाही विडंबन!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा