Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव

अ — अन्या बुद्धे, Wed, 04/03/2019 - 13:27
कितीक नवस देवासी बोलती भजती पूजती मनोभावे वाहणारी नदी देव कितीकांची पालक प्राणांची कितीकांच्या उगम डोंगरी अंत सागराशी वाहे दूर देशी असहाय्य? करी कुणी एक त्यात मासेमारी वाळू चोरी करी कुणी एक कुणी तीत करी सुखे जलक्रीडा आणि कुणा पीडा बुडोनिया तितूनच होई विजेची निर्मिती नासाडी पुरती पुरामाजी तिच्या पाण्यावरी वाढतात शेते शुष्क जग होते तिच्या विना सांगा मज आता नदीचे वागणे आमुच्या कारणे असते का? तिचा हा प्रवाह निसर्गे बांधला तसाच चालला युगे युगे आपुल्याच हाती नदीचा वापर शाप किंवा वर ठरतसे तैसे ची हे विश्व देवाने निर्मिले ज्याने वापरले त्याच्या साठी देव माझ्या साठी काही न करतो अलिप्त राहतो भले बुरे -अनुप

प्रतिक्रिया द्या
795 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा